जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी बरोबर ती त्या अर्चूचीच मुलगी... दाखवतात की ती अधूनमधून.
अर्चूच सासरी कधी राहत नाही. मुलगी कसली राहतेय. Proud

त्या दोन मुलांपेक्षा किति तरी सोज्वळ वाटते ती.
त्या विजया चि मुल मात्र फारच आगाऊ आहेत.प्रचंड राग येतो...

त्या सतीश चा हि अलि कडे राग येतो त्याच ते 'अर्चो (अर्चु नव्हे)' म्हटलेल तर डोक्यातच जात.एवढा आडदांड आहे,काय धाड झालि होति,मुलीला उचलून घेउन आपल्या घरि न्यायला?????

अर्चु चे ड्रेस किती फुगीर असतात...एवढा खळ वापरावा?????

सोफ्या वर बसोन चहा...मग उत्ठून डायनिंग टेबल व जेवायला बसायच...एवढच काम करतात देसाई

धन्यवाद अन्जली. अग मला वाटले अर्चुला मेदे बरोबर बरोबरी करायला मिळावी म्हणून साईडिन्गला टाकले की काय.:फिदी: तशी ती अर्चु भलतीच वस्ताद आहे.

गोपिका भारी निरीक्षण आहे.:फिदी:

एवढा का काथ्याकूट चाललाय म्हणे? मेदे, गिओ शाळेत गेलेत त्या अर्चूचं हज्जारदा विचारून झालं शाळा डूख धरेल!! ती मेदेची बालपणीची आवृती असावी अशी मुलगी पांघरूणात गुरफटलेली. त्यानिमीत्त्ताने आजारपणातील पाककृती सुरू आहेत. नक्की झालंय काय? मधला बहुदा एक (किंवा जास्त) एपि मिस केला...

भिकेचे डोहाळे लागलेत या झी मराठी च्या सर्व रायटर्स ला
एक नाही सर्व प्रोग्राम कॉमन सेन्स सोडून चाललेत
बघणारे पण अक्कल गहाण ठेऊन पाहतात
आता आल्या न रेशीमगाठी जुळून , सिरियल संपवा नाहीतर दोन चार नवी पात्रे तरी आणा , किती दिवस अजून आदे-मेदे ची पहिली रात्र बाकी आहे हो , ह्या एकाच विषयाला चिकटून बसणार

वट पौर्णिमेची अमावस्या आली उद्या
दोन आठवड्यात स्टोरी किती पुढे सरकली ?
लग्न नोव्हेंबर मध्ये , गोंधळ जून मध्ये , आणि हनिमून जानेवारी मध्ये
हम आपके है कौन तीन तासात लग्नाची कॅसेट संपली होती , त्याच धर्तीवर हे पण चाललेय
उद्या पिंपळाला फेर्या मारेल आदे , कारण त्याच्या बायकोला कीस केल्याचे स्वप्न पडायला लागलेत
नक्की शेवट काय त्याची कोणाला काय उत्कंठा ते त्याचे त्यालाच माहित

हाहाहाहा....आता महिनाभर बाबाजींच्या कृपेने आदे आणि मेदे
'वाट पाहुनी जीव शिणला
दिसामागुनी दिस टळला
सूर्व्या आला तळपून गेला....
गडनीs सखेs गडsनीs'
आळवणार....
Rolling on the Floor Laughing

कहर आहे. पण हे बाबाजी आणि आऊसाहेब कुठे झोपणारेत? का रात्रभर बाबाजी लक्ष असू द्या म्हणत बसणार आहेत आदेच्या खोलीत?

ह्याह्याह्या! बेफि, गेल्या ४/५ दिवसांत ही गंमत बघितलीच नव्हती मी! लै भारी प्रकार आहे! वा वा वा! डॉक्यावर पडलेल्या जानूला टफ काम्पिटिसन आहे! =))

"आजकी रात होता है जो
हो जाने दो "

हे डॉन मधील गाणं देसायांच्या घरी ऐकायला / बघायला बन्दी घातलेल्या यादीत दिसतय. Proud

सध्या साबांची ही फेवरिट सिरीयल आहे. मी त्यांना म्हटलं की तो ऐश्वर्या रायचा हम दिल दे चुके सनम होता त्याची ही सिरीयल सरळ सरळ कॉपी आहे. तर म्हणाल्या छे छे काहीतरीच काय. मी म्हटलं की बघा ना सगळं सेमच तर आहे- नायिकेचं नायक-१ वर प्रेम, ते माहीत झाल्यावर तिच्या पित्याने जबरदस्तीने तिचं नायक-२ शी लग्न लावून देणं, नायक-२ ला सगळं कळल्यावर त्याची नायिकेने नायक-१ शी लग्न करण्याला हरकत नसणं, पण तोपर्यंत नायिकेने नायक-१ च्या प्रेमाबाहेर पडून नायक-२ च्या प्रेमात पडणं..
तर साबा म्हणतात की हां तसा हा बेसिक कन्सेप्ट सिमिलर आहे पण कॉपी म्हणता येणार नाही- कारण सिनेमात नायकाचे आईवडील, भावंडं, त्यांच्या फॅमिलीज, नायिकेची बोरीवलीची मावशी- हे लोक कुठे होते? शिवाय त्यातला नायक-१ परदेशस्थ होता, पण फा.च. त्याच शहरात आहे.
मीच शरणागती पत्करुन म्हटलं की हो बाबाजी तरी कुठे होते म्हणा..

त्या बॉक्सच्या बाबतीत येडपटपणा चाल्लाय तसलाच प्रकार. आदे आणि मेदे परत कुठेतरी बाहेर का जात नाहीत? म्हणजे घरातल्या आगाऊ कार्ट्यांचा त्रास पण नाही आणि बाबाजी पण नाही!

हो बाबाजी तरी कुठे होते म्हणा..<<< Rofl

त्या बॉक्सच्या बाबतीत येडपटपणा चाल्लाय <<< +१००

आदे आणि मेदे परत कुठेतरी बाहेर का जात नाहीत?<<< अहो जे घरात वर्षभर एकाच खोलीत वेगवेगळे झोपत होते ते बाहेर जाऊन काय दिवे लावणारेत?

आन आणि किरण अचानक मालिकेतुन गायब कुठे झाले? कथानकाच्या सोयीनुसार पात्रांची ये-जा चालु असते मालिकेत.

किरण हा आहे का ही इथपासून सुरुवात आहे....देसायांच्या भाडेकरूंमध्ये दोन भोचक भवान्या आहेत त्यातली यंगर वन म्हणजे किरण का? जिचा नवरा सैन्यात असल्याने नेहेमी लष्कराच्या भाकर्या भाजत बसलेली असते ती....

होणार सून मी ह्या घरची प्रमाणे यालाही रिस्टार्ट ची गरज आहे
आदे कडून काहीही होत नाही म्हटल्यावर , मेदे शेजार्याच्या प्रेमात पडते
आणि आदे परत तिला कौल लावून बसतो
आदे बाबाजीना शरण जातो
बाबाजी आदे ला मुसली पॉवर जडी बुटी खायला घालतात
आदे मेदेला परत पुढच्या वट पौर्णिमेला पटवतो
.
कमेंट explicit/ फालतू असली तरी unfortunately मालिकेच्या विषयाशी रीलीतेड आहे .
वाटले नव्हते कि तू तिथे मी चा फालातुपनाचा रेकॉर्ड इतक्या लवकर तुटेल ….

हा किरण कोण ? <<< विचारवंतांना विचारा
>>>
Lol Lol Lol

sakhi, kiran mhanaje aan cha ani mede cha common friend

हम आपके है कौन तीन तासात लग्नाची कॅसेट संपली होती >>>>> त्या तीन तासात रेणुका शाणेला मुलगा होउन, ती जिन्यावरुन पडुन मरुन, माधुरी आणि मोहनीशच लग्न ठरुन, वरात दारात आल्यावर टफी नामक पाळीव प्राण्याने चिठ्ठी योग्य त्या माणसापर्यंत पोचवुन सलमान्-माधुरी लग्न पण लागल होत....

ही मालिकाही मी इथले अपडेट्स वाचून कधितरी तुनळीवर बघते .

बाबाजी मेघनाला महिन्याभरासाठी माहेरी रहायला बोलवणार आहेत, तिच्या पोटी राक्षस बाळ जन्माला येऊ नये म्हणून>> त्याना म्हणाव आयुश्यभर लेक सासरी रहिली तरी काही होणार नाही ..

मध्यंतरी तो एपिसोड पाहीला होता ..

सुमो आणि गिओ ना घेउन अमित चेक अप ला जाणार असतो
त्या अगोदर सगळे आदे-मेदे ची खेचत असतात डायनि.ग टेबल्वर .
आणि मग ते एक आगाउ कार्ट येत .. काकू तु येणार आहेस ना किड्सझोन मध्ये , वगैरे .

किती वाह्यात सीन होता . समवयस्कांमध्ये अशी मस्करी ठीक आहे -- पण आई बाबा समोर असताना हा फालतुपणा .
आणि ते दोदे ( दोन दे - आदे-मेदे) किती निर्लज्ज्पणे लाजत होते (?????)

आणि एक कळेना , या अगोदर घरातली लोक त्या दोघाना एकट सोडुन कधीच गेली नव्हती ?
नविन लग्न झालेल्या जोडप्यासरखी वागणूक अचानक का ?
मी कहीतरी मिसतेय Sad

किती निर्लज्ज्पणे लाजत होते >>> Lol

लेखकाला आदे मेदे ला दूर ठेवण्यासाठी उगाच नव्या नव्या कल्पना सुचत आहेत....एकाला डोक्यावर पाडायचे आणि मस्तपैकी स्मृतीभ्रंश करून टाकायचा ...हाकानाका

Pages