जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल शाळेत बेंच बदलला यावर चर्चा
आज कोणीतरी मोरे मेला त्यावर चर्चा
उद्या काय पाण्याचा ग्लास सांडल्यावर चर्चा करणार का
। काहीही दाखवा । पर्याय नाही । बघावेच लागणार

आदे आणि मेदेंचा भातुकलीचा खेळ पाहून लहानपणीचं एक टाईमपास गाणं आठवलं....धृवपद थोडं बदलावं लागेल अर्थातच

घड्याळात वाजला एक, आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला ||धृ.||

घड्याळात वाजले दोन, बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला

घड्याळात वाजले तीन, ताईची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला

घड्याळात वाजले चार, आईने दिला मार
मार खाण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला

आता आवराच ..
एवढा गोड कारभार पाहुन डायबेटीस व्हायची वेळ आलीये.

गिरिश चा हात कसला भयंकर वाटत होता... कयामेरा साले येडे कुठे पण ठेवतात

तो जो मोठा मुलगा दाखवलाय तो नेहमी चिडक्या चेहर्‍याने का बोलत असतो कळत नाही. दिसायला हि अगदी चिडकाच आहे म्हणे. ... एकेक पात्रं आणतात. आणि त्याची बहिण एकदम जुन्या काळातली यमुना लूक्स. काय ते फ्रॉक आणि वेण्या... गबाळ ध्यान आहे.

सगळी कार्टी मोठी असूनसुद्धा ह्या आदेमेदेच्या रूम मध्ये का येतात कळत नाही. आणि आदे मेदेचा अजून सहप्रवास सुरुच व्हायचाय..... Proud

तो ज्वेलरी बॉक्स रीकामा करायचा मुहुर्त बघताहेत अगदी. दिला ना निर्णय मग काय तो कचरा साठवलाय... आईकडे नेवून ठेव जुन्या चांगल्या आठवणी म्हणून Proud
आणि दर वेळी भाव असे की कोणी बॉक्स पाहिला तर काय सांगायचे? अरे, अगदी बॉक्स दाखवूनच विकत घ्यायचाय का? आणि दाखवला तरी उघडूनच दाखवायचा असला तरी तो कचरा त्यातच ठेवून दाखवायचाय का? काढून द्या तो कचरा आणि जाळा कुठे तरी... काहिहि एकदम दाखवताहेत. एरवी हुशार असलेला आदे पण हो खरच आता काय करायच बॉक्स दाखवायचा असेल तर अश्या विचारात?

नाहितर ते येडं खुळं (मेदे) मी माझ्या पुर्व आयुष्याबद्दल सांगणारच हा हट्ट धरून... श्शी! कैच्यकै.

अगदी जळजळ झाली त्यांचा नको तो काथ्याकूट त्या बॉक्स वर पाहून आणि तो मठठपणा पाहून. Proud

दिला ना निर्णय मग काय तो कचरा साठवलाय... आईकडे नेवून ठेव जुन्या चांगल्या आठवणी म्हणून >>>बॉक्स समुद्रात टाकायचे ठरविले आहे तिने

>>बॉक्स समुद्रात टाकायचे ठरविले आहे तिन
अरेरे आता कोळ्याची गोष्ट दाखवणार
एक कोळी असतो
तो खूप गरीब असतो
समुद्रावर प्रदूषणामुळे त्याचे दिवस हलाखीत जात असतात
त्याची बायको आजारी पडते
तिला डॉक्टर कडे न्यायला पैसे नसतात
म्हणून शेजार्याची मुलगी तिची मन लावून सेवा करते
कोळ्याची बायको बरी होते
त्या कोळ्याच्या बायकोची भाची मुंबईला कसलीतरी परीक्षा द्यायला येते
पण परीक्षा संपेस्तोवर बराच उशीर होतो म्हणून ती रात्री आपल्या मावशीकडे मुक्कामाला जाते
पण मावशीकडे फोन नसल्यामुळे घरी सांगायचे राहून जाते
घरी सगळे चिंताक्रांत होतात
.
.
एके दिवशी सकाळी कोळ्याची बायको समुद्रावर फिरायला जाते
तिला एक बॉक्स भेटतो
तो बॉक्स ती आपल्या भाचीला देते
.
भाची अर्चुची मैत्रीण निघते
ती अर्चुला बॉक्स बद्दल सांगते
बॉक्स बघून अर्चू ला सर्व काही आठवते
पण
ओले झाल्यामुळे काहीच वाचता येत नसते
एक आठवडा सर्व सुखाने नंदू लागतात
पण
बॉक्स फेकून का दिला या बद्दल माई मेदेला विचारतात
आता पुढे …।
क्रमश

>>>>>>
.अकलेचं दारिद्र्य आहे ही सिरियल
.
हे बिलकुल खरे नाही
आमच्या घरात हा प्रोग्राम जेवताना पहिला जातो , एखाद्याचे जेवण झाले कि किचनमध्ये ताट ठेवायला जाताना , शेवटचा घास खात ताट हातात घेऊन पाहतात . नंतर जेव्हा ब्रेक येतो तेव्हाच किचन मध्ये पाऊल ठेवतात

प्रत्येक सीन हा क्रिकेट सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर दोन धावा पाहिजेत इतका उत्कंठा वर्धक असतो

प्रत्येक सीन हा क्रिकेट सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर दोन धावा पाहिजेत इतका उत्कंठा वर्धक असतो >>> खरं आहे हे!!! म्हसोबा क्रिकेट इलेव्हन स्टार कोंजाणखुर्द विरुध्द जाणाबाई टायगर्स बेडकीहाळ यांच्या सामन्यापेक्षाही उत्कंठावार्धक्य असते मालिका.
वेळ नसला की समोर उर्वशी आली तरी माणूस टाळून जातो आणि मोकळ्या वेळेत राखी सावंतलाही स्वर्गीची अप्सरा वगैरे म्हणत बसतो.

तो मयुच्या मैत्रीणीचा ओढून ताणून आणलेला भाग ह्यासाठी होता - मेदे मित्र मैत्री ह्यावर काहीतरी बोलणार, त्यावरून अर्चुला संशय येणार वगैरे वगैरे

अत्यंतिक फालतू सिरियल.
रोज त्या आदे आणि मेदेच्या मध्ये कुणीना कुणी हड्डी बनून येतंय. आज सुमो येइल बहुतेक. उद्या नाना. अजून कोण कोण राहिलंय यादी काढा रे.. Proud

मुख्य म्हणजे इतके दिवस बेड ओस पडला होता तेव्हा कुणी फिरकलेही नाही! यातून एक महान सत्य उलगडते, दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. (अर्चुला कळले असते की मेदे आदे गंमत म्हणून एकेकटे आलटून पालटून एकदा फरशीवर एकदा बेडवर झोपता तर तिनेही तसेच केले असते, करायला लावले असते म्हणून हे गुपित फुटले नाही. वाचला सतिश!)

मुख्य म्हणजे इतके दिवस बेड ओस पडला होता तेव्हा कुणी फिरकलेही नाही! यातून एक महान सत्य उलगडते, दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. (अर्चुला कळले असते की मेदे आदे गंमत म्हणून एकेकटे आलटून पालटून एकदा फरशीवर एकदा बेडवर झोपता तर तिनेही तसेच केले असते, करायला लावले असते म्हणून हे गुपित फुटले नाही. वाचला सतिश!)>>>>>>>>>>:हाहा: जबरी पोस्ट!

रोज त्या आदे आणि मेदेच्या मध्ये कुणीना कुणी हड्डी बनून येतंय. आज सुमो येइल बहुतेक. उद्या नाना. >>> काही नाही ध्येयानं झपाटलेल्या माणसाला अडचणी म्हणजे संधी वाटतात. रिकाम्या रस्त्यानं पळण्यात काय अर्थ? संकटांचे कडे कपार पार करत शौर्याने मोहिम मेळविली तरच त्या विजयास अर्थ असतो....

मालिका बघणे सर्वमताने बंद केले असल्याने आता येथील प्रतिसादावरूनच मालिका किती सुरेख भरकटतीये ते कळेल. व्रतस्थांनी या रेशीम धाग्यावर नित्य गाठी टाकाव्यात ही विनंती.

>>>>>>>>>>मालिका बघणे सर्वमताने बंद केले असल्याने आता येथील प्रतिसादावरूनच मालिका किती सुरेख भरकटतीये ते कळेल.
.
लकी आहेस
इथे एकास चार मताने पडल्यामुळे सक्तीने बघावीच लागणार आहे.
हे अतीच होतेय, काहीपण दाखवतात , इतक साधं कळत नाही मेघना ला , असं बोलून पाच मिनिटे चेनल बदलतात तेच काय ते मृगजळ
.
इतर वेळी कधीच कुठल्या प्रोग्राम च्या वेळी जाहिराती बघत नाहीत .
पण एकदा साडे सहा वाजता झी मराठी लागला, कि नऊ वाजे पर्यंत अगदी टोयलेट क्लिनर च्या जाहिराती पण सोडत नाहीत

>>>>>रोज त्या आदे आणि मेदेच्या मध्ये कुणीना कुणी हड्डी बनून येतंय. आज सुमो येइल बहुतेक. उद्या नाना. अजून कोण कोण राहिलंय यादी काढा रे..
.
आवड असेल तर सवड निघते I
इथे मुळातच आदे हा पुरुष नाही
महापुरुष आहे
त्यामुळे अजून बरेच दिवस असेच चालेल

आवड असेल तर सवड निघते I
इथे मुळातच आदे हा पुरुष नाही
महापुरुष आहे
त्यामुळे अजून बरेच दिवस असेच चालेल>>>>>>सत्यजित मुधळखोर>>>>>>> अंदाज अपना अपना आठवला.. Biggrin

किती दिवस दळतायत त्या मयु च्या मैत्रीणीची आणि तिची शाळेतली बसायची जागा बदलली ते.
मेदे चा कृत्रिम आवाज ऐकवत नाही अगदी.

लो ब्लड प्रेशर वरती अक्सीर इलाज म्हणुन हे 'बाबाजी'चं पात्र दाखवलं पाहिजे, अलोंग विथ 'डोक्यावर पडलेली जानु' फ्रोम होसुमीयाघ...

अवांतर

मराठी न्युज चॅनल मधे सर्वोत्तम पर्याय कोणता?

मी टाटास्कायवर १६० रुपयात ठराविक असे चॅनल घेताना एबीपी माझा हा एकच चॅनल घेतलेला. पहिल्यापासून हा माझा आवडता चॅनल आहे. खांडेकर सोडून सगळे लोक खूपच अभ्यासू आणि गोंगाट न करता स्पष्ट बोलणारे वाटतात पण सध्या अती जाहिरातीनी हैराण झालोय. नको इतक्या जाहिराती दाखवू लागलेत. आणि मुंडेजी गेले तेव्हा तर ती कोण पोरगी होती ती दोन तीनदा "थोड्याच वेळात नरेंद्र मोदिंचे शव लातूर येथे आणले जाईल" म्हणाली. एकुण त्याना कामाचा आणि मलाही बघण्याचा थोडा कंटाळा आल्यासारखं झालय.

माणसासारख्या बातम्या वाचणार्‍या व नशापाणी केल्याप्रमाणे चर्चा न करणार्‍या निवेदकांचा चॅनल सुचवा.

मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उद्य टिकेकर

मुग्धानंद : ते प्लीज बदलून 'उदय' करणार का ? तसा काही फरक पडत नाही म्हणा... Happy

ए ही मयु कोण आहे? माझ्या अन्दाजानुसार त्या भोचक अर्चुची मुलगी का?:अओ: मग इतके दिवस कुठे लपली होती? तिला होस्टेलवर ठेवले होते का अर्चुच्या सासरी रहात होती ती? माझ्या बर्‍याच गाठी उसवल्या गेल्यात परगावी गेल्याने.:फिदी:

Pages