मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुर्योधनाने कर्णाला राज्य दिलं
कर्णाने त्याबदल्यात आयुष्यभर सर्व्हिस दिली.

दुर्योधनाचं आडनाव अदानी किंवा अंबानी असावं असी शंका येतेय.

धृतराष्ट्राचे आडनाव सिंग असावे याबद्दल खात्री पटत चालली आहे, तर पितामहांचे आडनाव गांधी असावे, विदुराचे पटेल ...आणि पंडूचे ...व्हॅलेंटाईन डे नंतर नौ महिन्यांनी कुठला डे येतो त्यांचे

जळलेला वास आला Biggrin
बोफोर्स नेच कारगिल जिंकून दिलेले
नाहीतर लुटूपुटी लढाईत प्रदेश गमवला असतात

आपल्या काही निवडक उद्योजकांना फेवर करणे, सत्तेत आल्यानंतर आपल्याला नको असलेले राज्यपाल हटवणे (http://maharashtratimes.indiatimes.com/nation/NDA-government-nudges-7-go...), निवड्णुकी पुर्वी केलेली आश्वासनांचा सोईस्कर तेव्हढाच भाग लक्षात ठेवणे किंवा विसरणे ( e.g. FDI ) , पॉप्युलिस्ट पण इम्प्लीमेंट न करता येणार्‍या घोषणा करणे (http://www.financialexpress.com/news/narendra-modi-govt-set-to-create-la...), मंत्र्यांचे कमी शिक्षण जस्टीफाय करणे , अर्ध्या कच्या स्टेट्मेंट्मेंट्स ने पक्षाचीडोके दुख्या वाढवणे ( बाबुल सुप्रियो, सिंग) हे अगदी काँग्रेस सारखेच चालु आहे

येक महिन्यात महगाई कमी होण्याची अपेक्षा करणे चुकिचे खरे तर ती वाढतेच आहे (http://indianexpress.com/article/business/economy/inflation-hits-5-month... ) पण कठोर इकॉनॉमीक पावले उचलावी लागतील ती मात्र उचलावीत. सबसीडी कमी करणे, अनावष्यक योजना बंद करणे , टॅक्स सिम्प्लिफीकेशन /GST (ज्याला मोदीनी मुख्यमंत्री असताना विरोध केला होता) या गोष्टी राबवाव्यात. सरकार बहुमतात आहे, त्यामुळे निवड्णुकांचा विचार न करता हे करणे शक्य आहे . हे सरकार हे करेल ही आशा सुद्धा आहे.

बाकी मोदी नी परदेशातली भाषणे extempore करु नयेत , वाचुन करावीत , आता ते देशाचे पंतप्रधान आहेत हे लक्षात ठेउन भाषणातल्या चुका टाळाव्यात .

जळलेला वास आला खो खो >>
चला नाक सलामत आहे म्हणायचं, जळण बिळणं काही नाही, जप चाललेला अडाणी अडाणीचा, एव्हढा जप मोदी पण करत नसेल , कधी कधी क्वॉत्रोची, वड्रा हा पण जप करायला पहिजे ना!
नाहितर, एखद्याची विष्ठासुद्धा गुलाबाप्रमाणे मानयची, आणि दुसर्‍याने दिलेलं गुलाबाचं फुल पण विष्ठेसारखं मानायच असा दुटप्पी न्याय नको..
बोफोर्स नेच कारगिल जिंकून दिलेले नाहीतर लुटूपुटी लढाईत प्रदेश गमवला असतात>>
२जी, कोल्गेटचा पण उदो उदो करा!

मागल्या सरकारवर अर्वाच्य टीका करताना मात्र टीकेऐवजी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह सुचवण्याचा उद्योग टोच्या-विचारवंत अथवा मास्तुरे-जोशींनी केल्याचे ऐकीवात नव्हते.

*

केदार,

तुम्ही म्हणता, "बातमी वाचा की राव."
ज्या बातमीची लिंक देण्यात आली होती, त्यात,

"Summary:
Narendra Modi facing allegations of wrongdoing over aiding Adani group's Gautam Adani"
असं लिहिलेलं आहे. हे पहा:

tpt.PNG

हे वाचून माझ्यासारख्या अशिक्षित माणसाला मोदी यांचा काहीतरी हात यामागे असावा अशी शंका येते ब्वा.

आता ज्या छातीठोकपणे तुम्ही या बातमीचा इन्कार करीत इथे मोदींचा काहीच संबंध नाही म्हटलात, त्यावरून तुमच्याकडे काहीतरी आतली माहिती नक्कीच असणार.

वरती एका प्रतिसादात पक्षकार्याकरता फेर्‍या असतात का? हे विचारलं होतं त्याचंही कारण तेच होतं, की ज्या कारणानुसार आपण जातो तसा पहाण्याचा चष्मा बदलतो. तो चष्मा एस्टॅब्लिश करण्यासाठी हे प्रश्न विचारले, तर तुम्हाला त्यात भांडाभांडी जाणवते. त्यास माझा नाइलाज आहे. Happy

कोल्गेटचा >>>>. कोलगेट काय आहे माहीत आहे का जरा ? माहीती करुन घ्या... भाजप्यांचे मुख्यमंत्र्यांनी देखील पत्रे लिहिलेली आहेत लिलाव करु नका आम्हाला ताबडतोब कोळसा उपलब्ध करुन द्या म्हणुन .. पण विकलेली मिडीया याकडे दुर्लक्ष करत आहे......

Narendra Modi facing allegations of wrongdoing over aiding Adani group's Gautam Adan >>> ओके मग ड्यु डिलिजंस उघडा / अ‍ॅक्विझिशेन विरुद्ध न्यायालयात नक्कीच जाता येईल.

थोडक्यात असे चित्र दिसते

रिलायंन्स - मुकेश अंबानी
|
अडाणी
|
मोदी
|
टाटा / LNT

ठिक !

अहो मला चष्मा तुम्ही बळजबरीने बसवू पाहात आहात. तुमचा चष्मा स्वच्छ करा जरा. Happy

ये मां बेटे की सरकार ने सरकारी खजीना खाली कर दिया.........इति आद्य इतिहासाचार्य मोदी

मग भुतान ला ४५०० करोड दिले ते काय अंबानी अडानीच्या घरातुन आले का ???? Biggrin

परदेशात रहा णारे मायबोलिकर मोदीविरोधात बोलु लागले की मोदीचेचमचे बोलतात.. गप्प रहा. तुम्ही भारतात नाही.

यान्च्या टोलीतील पैलवान लन्डनात बसुन गान्धी नेहरु कॉम्ग्रेसबद्दल बोलतात, तेन्व्हा त्याना मात्र हा नियम लागु होत नाही.

समोरच्याचा आवाजच गप्प करणे हा हिन्दुत्ववादी लोकान्चा पुरातन अजेन्डaagआ हे.

उदयन्,पैसे भूतानला पोहोचले की नेपाळला ते आधी बघा बुवा!

तसेही सन्घवादी लोकाना भुतान काय नेपाळ काय सगळे एकच. कारण सन्घाच्या अखन्ड हिन्दुस्तानच्या नकाशात अफागाण ते म्यानमार आणि नेपाळ ते लन्का सगळा अखन्ड हिन्दुस्तान आहे.

Proud

भितानला मोदीनेपैसे दिले . त्यामुळे तिथला तो प्रमुख मोदीना बोलला ..आमचा देश ने आणि आता तुच पाळ.

म्हणुन ते ने पाळ झालं

<< प्रत्येक पार्टीला देणगी मिळते, मोदींना अदानी देणगी देत असेल तर आपला दुसरे कुणीतरी, मोदी त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये निवडणूक प्रचार करत फिरले तर त्यात मला काही वावगे वाटत नाही.>>

आप ने देणगीचा हिशोब ऑनलाइन ओपन ठेवला आहे. भाजपा आणि काँग्रेसचा हिशोब??

<<सिरियसली मिर्ची, तुमच्या ह्या अश्या आरोपामुळे अन विचित्र लिंक देऊन विचित्र संबंध लावण्यामुळे तुमचीच क्रेडिबिलिटी माझ्या लेखी कमी होतेय. योग्य उदाहरणं द्या, अ‍ॅप्रिशिएशन मागेही दिले परतही देईन. पण सध्या तरी तुमची मोदी नावामुळे गोची झालेली आहे.>>

पाच मिनिटांसाठी विसरून जाऊ या, कोण कुणाचं समर्थक. मांडलेले प्रश्न खरंच इल्लॉजिकल वाटत आहेत का तुम्हाला?

परदेशात रहा णारे मायबोलिकर मोदीविरोधात बोलु लागले की मोदीचेचमचे बोलतात.. गप्प रहा. तुम्ही भारतात नाही.

यान्च्या टोलीतील पैलवान लन्डनात बसुन गान्धी नेहरु कॉम्ग्रेसबद्दल बोलतात, तेन्व्हा त्याना मात्र हा नियम लागु होत नाही.
----- गापै यान्नी मान्डलेला युक्तीवाद जेव्हा खोडता येत नाही किवा आलेला नाही किवा खोडताना निराशा येते तेव्हा त्यान्ना देखिल त्यान्च्या नागरिकत्वा (?) बद्दल किन्वा त्यान्च्या राणीच्या देशात राहुन भारताबद्दल कॉमेन्ट करण्याच्या हक्काबद्दल प्रश्न विचारले गेलेले आहेत या प्रवृत्तीन्कडे दुर्लक्ष नाही करता येणार.

असा युक्तीवाद करणे योग्य आहे असे मलाही वाटत नाही पण असा युक्तीवाद एकतर्फी खचितच नाही.

गापै यान्नी मान्डलेला युक्तीवाद जेव्हा खोडता येत नाही >>>>>>>>. कैच्याकै..... हज्जार वेळा मीच खोडला आहे Biggrin
उदा. साठी त्यांचे आदरणिय पुज्य आसाराम यांचा धागा वाचावा Wink

खुद्द पैलवान्नानाच अ‍ॅडमिनने खोडले होते.

गामा लन्डनमध्ये रहातात याची मस्करे होते.

पण त्म्ही गप्प बसा बोलुच नका, असे त्याना कुनी म्हणत नाहे

खुद्द पैलवान्नानाच अ‍ॅडमिनने खोडले होते.
----- तुम्हाला दहा वेळा खोडले Happy आहे आणि त्यान्ना एकवेळा, त्याने काय फरक पडतो?

चर्चा करताना दोन्ही बाजूच्या आयडीन्चा बन्दोबस्त करताना गापै यान्चाही आयडी धारातिर्थी पडला होता... सुक्याबरोबर ओलेही जळते त्याप्रमाणे... Happy सुके आणि ओले हे सन्दर्भ व्यक्तीसापेक्ष आहेत.

उदा. साठी त्यांचे आदरणिय पुज्य आसाराम यांचा धागा वाचावा
----- मायबोलीवर अनेक बाफ वर विचारान्ची Happy देवाण घेवाण होत असते... आणि काही ठिकाणी आपल्या नम्र व्यक्तीचे आणि माझेही टोकाचे मतभेद आहेत. आसाराम बाफ आणि तेथे घडलेली चर्चा माझ्याही लक्षात आहे.... आणि माझ्या दोन ओळी तेथेही आहेत...

पुन्हा पहार्‍याच्या कामाला लागतो...

भूतान भेटित काय काय झालं याचा थोडक्यात गोषवारा कुणी लिहिणार काय?
मी मूळ लेखात कॉपी पेस्ट करेन .
कारण ही मोदी यांची पंतप्रधान झाल्यानंतरची पहिली विदेशवारी आहे.
त्यामुळे महत्वाची आहे.

सुडाचे राजकारण करणार नाही म्हणणार्या मोदीचा खरा चेहरा

काँग्रेसने नियुक्त केलेल्या ७ राज्यपालांना राजीनामे देण्याची सूचना करत एनडीए सरकारने जोर का झटका दिला आहे. केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी सात राज्यपालांना आपले राजीनामे लवकरच सादर करण्यास सांगितलं आहे. यानुसार उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.

-------------------

हे काय आहे मग ???????

Pages