निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर त्याच्या जीवनाबद्दल ठरवणे / मागणे हे स्त्रीच्या कार्याने प्रभावीत होते तर आपला समाज पुरुषश्रेष्ठ का?

प्रत्येक गोष्टीत खायचे आणि दाखवायचे दात वेगळे हेच तर आपल्या समाजाचे वैशिष्ट्य आहे. बाहेर स्त्रीला शक्ती, देवी म्हणुन पुजणारा आणि त्याचवेळी आपल्या घरात मात्र मुलगी जन्मालाही येऊ नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेणारा आपलाच समाज ....

मानुषी, कित्ती सुंदर.. आणि आठवणीने इथे शेअर केल्याबद्दल खुप खुप आभार. टुरिस्ट स्पॉटचे फोटो पाहण्यापेक्षा तिथल्या रोजच्या हलचलीचे फोटो पाहायला मला जास्त आवडतात. आपणच तिथे जाऊन आल्याचा भास होतो.>>>>>>>>>> साधना भापो! मलाही!
सर्वांना ठांकू!
दिनेश........डायन पाहिला पाहिजे! पालीच्या भुमिकेसाठी??????? >>>>>>एकदा अंगोलाच्या सामान्य जीवनाचे पण दर्शन घडवायचे आहे.>>>>> नक्की घडवा. वाट पाहतोय आम्ही.
>>>>>>>>>>>तो किती व्यवस्थीत राहिलाय. आपल्याकडे एव्हाना ती हाता पायाची बोटे, केस असे काय न काय चोर बाजारात गेले असते विकायला>>>>>>>>> मोनालीप.........बरोब्बर!

सुप्रभात!!!

हि माझी रिक्षा Happy पण विक्रमच्या कामाची ओळख व्हावी म्हणुन. त्या धाग्यावर प्रतिसाद दिला नाही तरी चालेल पण आवर्जुन वाचा. Happy
"वृक्षसखा"

साधना Lol अग बघ ना तू काडी टाकलीस तिला पण सगळ्यांनी फुसकी ठरवली. कोणीच काही बोलत नाही. तुच एकटी माझी खरी मैत्रीण ग. Lol

हे खास तुझ्यासाठी Happy

अहा... किती सुबक, सुरेख वेणी!! Happy फुलांचा रंगही छानच!
पण अशी वेणी माळायला केसही तेवढे मोठे हवेत! Sad

बरी आठवण झाली. जागु, गजरा बनवतांनाचे फोटो तु टाकले होतेस का निगवर? कुठल्या भागात?
अरे कुणीतरी प्लीज, बुचाच्या फुलाचा गजरा बनवायचे फोटो ही टाका स्टेप बाय स्टेप. जरा अवघड असतं ना या फुलांचा गजरा बनवणं????

मागच्या भागात आपण बर्च ट्री बद्दल बोललो होतो ( वर्षूने फोटो टाकला होता. ) त्याच झाडापासून एक आर्टीफिशियल स्वीटनर xylitol तयार करतात.

Possessing approximately 33% fewer calories, xylitol is a lower-calorie alternative to table sugar. Absorbed more slowly than sugar, it does not contribute to high blood sugar levels or the resulting hyperglycemia caused by insufficient insulin response. This characteristic has also proven beneficial for people suffering from metabolic syndrome, a common disorder that includes insulin resistance, hypertension, hypercholesterolemia, and an increased risk for blood clots.[30] Xylitol is used as a sweetener in medicines, chewing gum and pastilles.[31]

हे पान बघा.

http://en.wikipedia.org/wiki/Xylitol

जागू, अबोलिचि फुले आणि गजरा मस्तच !!
कालच्या मुंबईत समुद्राच्या लाटांमुळे नि.ग.करांपैकी कुणाचे नुकसान वगैरे झाले नाही ना?

काल खवळलेल्या समुद्राने एक गोष्ट केली आजच्या पेपरची हेड लाईन आहे.
समुद्राची परतफेड - समुद्रातील कचरा रस्त्यावर आला.

नितीन, आजपण धोक्याचा इशारा होता ना ?
होना दा जर जोरदार पाऊस असता तर मुंबई पुन्हा पाण्यात गेली असती.

यस.. दिनेश कालपासून बीच वर चा नेहमीचा वॉक करायला जाता येत नाहीये...

आत्ताच मोठ्या सरी कोसळल्या आणी दुपारी हाय टाईड होती..

टू बॅड.. जूहू बीच बर्‍यापैकी रुंद होता. रंगिला मधे उर्मिला आणि जॅकी तिथेच धावताना दिसतात. तिथे पाणी आले म्हणजे.. होप हे तात्पुरते असेल.

आत्ताच ऑफिसच्या बाहेर आलो होतो. थोड्या वेळापूर्वीच पावसाचा शिडकावा होऊन गेल्याने आकाश अगदी स्वच्छ धुतल्यासारखे दिसत होते. मस्त निळा रंग (जो मुंबईत प्रदुषणामुळे फार कमी दिसतो). पांढरे ढग/काळे ढग आणि निळे आकाश आणि हो त्यावर अर्धवट उमटलेले "इंद्रधनुष्य". आजचा टि ब्रेक एकदम झक्कास. Happy

पण फोटो कुठे ?>>>>>ऑफिसमध्ये असल्याने फोटो नाही. Happy

एवढ्यात इंद्रधनुष्य !>>>>>येस्स. पहिल्याच पावसात इंद्रधनुष्य Happy

एकदा गोव्याला मी झुआरी पूलावरून इंद्रधनुष्य बघितले होते. पुर्ण कमान होती आणि दोन्ही टोके पाण्यात बुडालेली.. मस्त.
इथे अंगोलात प्रदूषण नसल्याने इंद्रधनुष्य जास्तच ठळक दिसते. आपल्याकडे नीट न दिसणारा पारवा रंग पण इथे छान दिसतो.

Pages