निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदुरबारमध्ये इतिहास घडेल असे दिसते.... तब्बल ९ वेळा लोकसभेची निवडणूक जिंकणारे माणिकराव गाबित आता मात्र डॉ.हीना गाबित यांच्याकडून पराभव स्वीकारणार असे चिन्ह दिसत आहे. वीस हजाराची आघाडी आहे हीना यांच्याकडे.

रागा जिंकणार... युपीत रागा आणि सोगा दोघेही जिंकणार.. बहुतेक तेव्हढ्या दोनच सीट्स मिळतील काँग्रेसला. आणि लागलाच तर एखाद्या सीटचा बोनस..

सो कॉल्ड तिसरी आघाडी पार धुतली गेली आहे. ही द्विपक्षीय पोलराईज्ड राजकारणाकडे वाटचाल मानावी का?

आयला, गुजरातेतून सगळ्या (२६/२६) जागांवर भाजप आघाडीवर! काँग्रेस एकही जागेवर आघाडीस नाही!! शोचनीय परिस्थिती आहे.
-गा.पै.

माढा MOHITE PATIL VIJAYSINH SHANKARRAO 2036 मतांनी आघाडीवर

बारामती सु.सुळे 5440 मतांनी आघाडीवर

Pages