निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Maharashtra - Baramati
Counting In Progress
Candidate Party Votes
MAHADEV JAGANNATH JANKAR Rashtriya Samaj Paksha 109406
SUPRIYA SULE Nationalist Congress Party 108963

मराठा आरक्षणामध्ये काँग्रेसची टाळाटाळ,
दलित मते भाजपकडे फिरविण्यास आरपीआय ला आलेले यश (महायुती)
मागील काही काळात कॉग्रेस राष्ट्रवादीने मध्यमवर्गीयांची केलेली क्रुर चेष्टा ( गॅस,पेट्रोल, शेती व रोजगाराबाबत धोरणे)
प्रसिध्दी माध्यमांनी डोक्यावर बसविलेले मोदी
आप ने काही प्रमाणात भ्रष्टाचारा विरोधात उठविलेला आवाज
टोलबद्दल भूजबळांची बकवास कारणे
.
..
.

परिणाम
अब भूगतो
अब कि बार मोदी सरकार Happy

बहुतेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचं लीड मार्जिन एवढं आहे, की मनसे/आप ने इतर कुणाची मतं खाल्ली असंही म्हणता येत नाहीये...

>>> आज बाळासाहेब हवे होते <<<<< होय.

हे निकाल अद्भुत असेच आहेत! न भूतो न भविष्यती म्हणजे काय ते दिसते आहे, अर्थात "न भविष्यती" असे मी म्हणणार नाही, कारण याची पुनरावृत्ती होऊदे.

इडलीवाला,

>> फक्त फक्त मोदींचा करीश्मा, मोदीप्रकाशात लुंगेसुंगेही चमकून घेत आहेत.

सहमत! यालाच लाटेची निवडणूक म्हणतात. भाऊ तोरसेकरांचा सुमारे वर्षभरापूर्वीचा लेख आहे : http://bhautorsekar.blogspot.co.uk/2013/05/blog-post_28.html

लाटेची निवडणूक कशाला म्हणतात ते स्पष्ट व्हावे. Happy

आ.न.,
-गा.पै.

शपथविधी व्हायच्या आधीच स्पेशल प्रोटेक्शन ग्रूपचे अहमदाबादला प्रयाण!

पंतप्रधानांना एस पी जी चे प्रोटेक्शन दिले जाते.

गोपीनाथ मुंडेचं - काय ? ?? >> निवडणुक आयोगाच्या साईटवर Round 1 not completed असे दिसतेय.

http://www.ndtv.com/elections/india-mps/mah-beed-election-results-2014

पण इथे गोपीनाथ मुंडे आघाडिवर असे दाखवतायत.

एक बाब विचारात घ्यायला हवी आहे.

शिवसेना पुन्हा ताकदवान झाल्याचे स्पष्ट होत आहे, विशेषतः मनसेच्या तुलनेत!

मनसे मते फोडायला उमेदवार उभे करते हे स्पष्ट झाल्याने जनतेने लोकसभेच्या निवडणूकीत त्यांना जागा दाखवली असे दिसते.

MAHADEV JAGANNATH JANKAR Rashtriya Samaj Paksha 109406
SUPRIYA SULE Nationalist Congress Party 108963<<<

सुप्रिया सुळे 883 मतांनी पिछाडीवर

निलेश राणे 72515 मतांनी पिछाडीवर <<<

धन्यवाद पराग व विचारवंत

मनसे मते फोडायला उमेदवार उभे करते हे स्पष्ट झाल्याने जनतेने लोकसभेच्या निवडणूकीत त्यांना जागा दाखवली असे दिसते.<<< +१

कर्नाटकातल्या आमच्या गावात अनएक्सपेक्टेडली काँग्रेस हरतेय.
बीजेपीचा कुणी न ऐकलेला माणूस २५००० मतांनी पुढे.

Pages