निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा,
ते फळ रुद्राक्षी चे आहे. Guazuma ulmifolia Sterculiaceae.
आणि रुद्राक्ष म्हणजे Elaeocarpus sphaericus Elaeocarpacee

खर्‍या रुद्राक्षाचे झाड ग्रीन फार्मसी, कर्वेनगर जवळ आहे.
कुणीतरी जाऊन बघा बरं.

खरं तर हे शांकलीचे काम आहे, मी काय म्हणून करायचं Happy

अन्जू, सत्यसाईबाबांनी दृष्टांत दिला Happy

आज मला बाजारात इतका मस्त रंगाचा लाल भोपळा मिळाला ना, कि फोटो टाकल्याशिवाय रहावलंच नाही.

अन्जू, कधी कधी गूगलपेक्षा पुस्तके जास्त उपयोगी पडतात. ( इथे तसेच झाले )
पुस्तक चाळताना बाकीची पण बरीच माहिती मिळत जाते.

सुप्रभात....

तुमच्या कौशल्यामुळे त्या ओबड धोबड भोपळा हि आज सुंदर दिसत आहे....मस्तच,

सायली व मनीमोहर, तुमचे फोटो हि खूप आवडले Happy

अंबाडी ( भाजी ) ची बोंडे. याच्या पाकळ्यांचे सरबत करतात. लोकसत्ता व्हीवा मधे, शेफ देवव्रत यांनी त्यांच्या इजिप्तच्या खाद्यसंस्कृती वरच्या लेखातही, जास्वंदीच्या पाकळ्यांचे सरबत असा चुकीचा उल्लेख केलेला आहे.

गोपिका आणि दिनेशदा सुंदर फोटो.

रानचवळीचे फुल किती क्युट आहे. मस्त रंगछटा.

दिनेशदा तुम्ही मेल पाठवून लोकसत्तेला कळवायचेना, बऱ्याच जणांना माहिती नसेल.

दिनेशदा,
परत एकदा....भारी फोटो आहेत सगळे....आणि तुमच्या अभ्यासाला माझा _______//\\________
तसेच इथ असलेल्या सगळ्याच निसर्ग प्रेमी व त्यचे ज्ञान बाळगणार्‍यांना ही ______//\\______
आंबाडि वरून आठवल....मला कालच इथे जुडि मिळालि.आमेरिकेत पहिळ्यांदाच मला मिळाली.कधि एकदा त्याचि भाजि करून मस्त ताव मारीन अस झालय....

नमस्कार!

या पूर्वी मी इथे तुळशी च्या रोपट्याबद्दल विचारले होते. ते रोप अगदी फिक्के पडले होते. नंतर लक्षात आले कि त्याला अति प्रमाणात पाणी देण्यात येत होते व पाण्याचे प्रमाण कमी केल्यावर आपोआप त्याचा रंग परत हिरवागार झाला. त्यापुढची गोष्ट. ते रोपटे आता वाढले आहे आणि त्याला मंजिरी येऊ लागल्या आहेत. पण त्या नव्या आणि कोवळ्या असतानाच कोमेजून जात आहेत आणि तपकिरी पडत आहेत. वाढत नाहीत. काय कारण असावे?

वॉव..केशर्री रंग आहे भोपळ्याचा.. (तरीही माझी ना>>वडती भाजी.. Uhoh ..)

दिनेश, तिकडल्या स्ट्रॉबेरीज. क्रीम लागलेल्याच मिळतात का?? Lol

अंबाडीची बोंडं ही सुरेख आहेत..

मनिमोहर सुंदर फोटो....
मनिमोहर + अन्जु, खरच शनिवारी सगळेच गायब होते... परत गटग केले की काय?...

दिनेश दा.... कसला मस्त भोपळा आहे तो... केवढा गर आहे त्याला! आणि रंग कीती गोड!..
स्ट्रॉबेरीज,रानचवळीचे फुल तर खुपच सुरेख...
आम्ही आंबाडी च्या बोंडांची लसुण, जिरे, तिखट,मिठ घालुन चटणी करतो.... छान लागते...

गोपिका, मस्त फोटो...

अच्छा शेवटी ते रुद्राक्षंच आहे... उलगडा झाला तर!...

जिप्सी, "आजोबा" चे फोटोसेशन खुप मस्त.... मला माहिती नव्हतं तुम्ही एवढी मोठी हस्ती आहात म्हणुन...

हाय...पुन्हा बहावा... व्वा...

जिप्सी, "आजोबा" चे फोटोसेशन खुप मस्त.... मला माहिती नव्हतं तुम्ही एवढी मोठी हस्ती आहात म्हणुन...>>>>>पहिल्या वाक्यासाठी धन्यवाद. आणि दुसर्‍या वाक्यासाठी "का उगा गरीबाची मस्करी करून राहिलात" Proud

मस्त बहावा,
वर्षू... क्रीमच काय चॉकलेट लावलेल्या पण असतात. एकदा येच आफ्रिकेला.
इ-पूर्वाई - तुळशीच्या मंजिर्‍या दिसायला लागल्याबरोबर खुडत जा. म्हणजे आणखी पाने येतील. मंजिर्‍या आल्या कि वाढ खुंटते.

Pages