निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो.. मी तशी ट्यूलिप्स अनेक ठिकाणी बघितलीत.. पण तो असा लांबवर पसरलेला ताटवा बघायचा अजून योग आला नाही.. ( तशी मिस रेखा गणेशनही प्रत्यक्ष बघितली, पण तो योग काही आला नाही Happy )

( तशी मिस रेखा गणेशनही प्रत्यक्ष बघितली, पण तो योग काही आला नाही स्मित ) >>> दिनेशदा,क्षण भर विचारात पडले मि...हा हा हा

तो किस्सा पण सांगायलाच पाहिजे.
मी १९८७ साली एका मारुती डीलरकडे जॉब करत होतो. तिने आमच्याकडून गाडी घेतली होती. ती स्वतः डिलिव्हरी घ्यायला आली होती. माझ्या सेक्रेटरीने तिचे बिल मुद्दाम माझ्या टेबलावर आणून ठेवले आणि रेखा स्वतः माझ्याकडून बिल घेऊन गेली.. पण मी तिला ओळखले नव्हते. बिना मेकपची आली होती. तिने बिल मागितले तेव्हा आवाजावरुन ओळखले मी.

ग्रीष्म ऋतूत नैसर्गिक वा मानवनिर्मित वणवे आपल्याला नेहमीच दिसतात.काही वेळा हे वणवे उपयोगी असतातही, पण बहुतांशी वणवे जंगलातील साधनसंपत्ती,कीटक वगैरेंचा नाश करतात.काही वेळा त्यांचे नियंत्रण करणे अवघड होते.
हा आमच्या जवळच्या डोंगरावर लागलेला वणवा.
१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

सुप्रभात....

सरिवा, वणवा केवढा भीषण आहे....

सारखे हातातून काहीतरी काढत असते >:हहगलो:
तशी मिस रेखा गणेशनही प्रत्यक्ष बघितली, पण तो योग काही आला नाही. Lol Lol

वर्षा, दिनेश दा म्हणतायत ते बरोबर आहे, ती कोरफडीची फुल आहेत...
आणि खुप सुंदर चितारलीयस तु...

शोभा ताई, सांगुन टाका बघु काय आहे ते.....

सारखे हातातून काहीतरी काढत असते >>>>>>>>>>दिनेशदा, मी पटकन मुठ उघडून बघीतली. Proud

आता सांगा, हे काय ? (आता सगळे निगकर मला धरून मारणार आहेत. :डोमा:)

शोभा१ (सत्यसाईबाबांचा नवअवतार ... Happy )

आता सांगा, हे काय ? (आता सगळे निगकर मला धरून मारणार आहेत. >>>> ही नारळ किंवा सुपारीची फुले आहेत ..

सरिवा, वणवा तसा आता नैसर्गिकच मानायला हवा. अगदी मानवाने लावलेला असला तरीही. नव्या वाढीला तो उपयोगी असतो. काही झाडांच्या बिया ( उदा. बॉटलब्रश, प्रोटिआ ) वणव्याशिवाय प्रसारीत होत नाहीत.

शोभा, ती फुले हाताला पण टोचतात. लहानपणी मला झाडावरून नारळ काढताना बघताना, प्रत्येक नारळासोबत भुंडा देठ का ते कळायचे नाही. त्या देठाला एकच स्त्री फुल असते ते नंतर कळले.

नारळाची फुलं? अय्या! ऐकावं/बघावं ते नविनच.....
शोभा ताई.... धन्यवाद..
दिनेश दा + शशांकजी छान माहिती.....

लक्ष्मी गोडबोले >खुप छान फोटो.... कावळ्याचे घरटे आहे का ते? सहसा झाडावर काटक्याचे उचकटलेले /
बोचक्या सारखे पाहिले आहे... घरात? पहिल्यांदाच पाहाते आहे?

शोभा बाळा कोड्यांची उत्तरे क्रमाक्रामाने द्यावीत डोळा मारा>>>>>>>..वाटलचं होतं Proud
बाळ मोनालिप, ते हरडे-बेहडे असावं असं मला वाटतय. घरी असतील तर जरा नीट फ़ोटो काढण्याचा प्रयत्न करेन. Happy
(चालेल ना स्निग्धा? :डोमा:)

हीरडे लंबगोलाकार असतात, आणि बेगडे अश्या आकाराचे असतात पण ते जरा मोठे असतात.. त्यामूळे सस्पेंस वाढला आहे Happy

हीरडे लंबगोलाकार असतात, आणि बेगडे अश्या आकाराचे असतात पण ते जरा मोठे असतात.. त्यामूळे सस्पेंस वाढला आहे स्मित>>>>>>> मी ते काय, हे मला समजाव. म्हनून विचारलं होतं. तर सगळे मलाच विचारतात. Uhoh

Pages