अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुताच्या गोष्टी म्हणुन लिहायला काय हरकत आहे? अनुभव आला हा अट्टहास नसला कि झाले.

True... भगवती

पण इथे तर एक्सपीरियंस होल्डर चा सुध्हा पोस्ट मोर्टम करतात लोक , Wink

<<<<<< अणि हे विषय खुप सेंसिटिव असतात त्या मुळे Govt. असे विषय पेपर न्यूज़ मधे Leak होउ देत नाही , म्हणून investigation च्या वेळी LACK OF CONCENTRATION WHILST DRIVING असा रिमार्क ड्राईवर ला देतात आणि त्याला फाइन मारून MATTER तिथेच बंद करतात, >>>>>>

वेल, मला नाही वाटत कि सरकार असे काही करू शकत असेल. आपल्या देशात मेडिया हा बर्यापैकी मुक्त आहे. आणि अश्या (किंवा दुसर्या अनेक ) बातम्या प्रसिद्ध करायला त्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागत नाही. इतरांचे काय मत आहे यावर ????

<<<< ILLUMINATI बद्दल कुणाला छान माहिती आहे का ? >>>>
नाही. पण तुम्ही Dan Brown च्या "Angels & Demons" मधल्या illuminati बद्दलच बोलताय कि वेगळ्या? पण त्यात "अमानवीय" काय आहे??

मी ST स्टैंड बद्दल नाही बोल़त मी एअरपोर्ट बद्दल बोलतोय तिथे Tarmac वर होणारे matter एअरपोर्ट अथॉरिटी ला विचारल्याशिवाय मीडिया पर्यन्त जात नाही

नाही. पण तुम्ही Dan Brown च्या "Angels &
Demons" मधल्या illuminati बद्दलच बोलताय
कि वेगळ्या? पण त्यात "अमानवीय" काय आहे??>>>>>>

कळले तुमचे ज्ञान Wikipedia karun बघा फक्त, पुस्तकी ज्ञान
चुक झाली माझी मी illuminati चा विषय काढला

सामी, अगदी अगदी!

झपाटलं या धाग्याला Uhoh

अभिजीत, ऐकिव गोष्टी वाचायला ऐकायला गूगल देव आहे. तुमचे अनुभव टाका इथे फक्त!

अ‍ॅडमिनच लक्ष कसं नाही गेलं इथे आत्तापर्यंत? Uhoh

बाकी तुमचे सगळेच किस्से लैच बोअर आहेत.
काही मज्जा आली नाही..

अभिजित,
<<<<< मी ST स्टैंड बद्दल नाही बोल़त मी एअरपोर्ट बद्दल बोलतोय तिथे Tarmac वर होणारे matter एअरपोर्ट अथॉरिटी ला विचारल्याशिवाय मीडिया पर्यन्त जात नाही >>>>>

मला याची कल्पना नव्हती. तसे असेल आणि जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सरकार असे प्रकरण दाबून वगैरे टाकत असेल तर, असे होवू नये असे मला वाटते.

मी अगोदरच म्हणालो त्याप्रमाणे मला इलुमिनाति बद्दल काहीच माहिती नाही. मी फक्त त्याचा उल्लेख पुस्तकातूनच वाचला होता. पण निराश होवू नका. माबो वरील इतर सदस्यांशी तुम्हाला यावर चर्चा करता येईल. मलाही त्या विषयावर झालेली चर्चा वाचायला आवडेल. शुभेच्छा. Happy

रिया: बाकी तुमचे सगळेच किस्से लैच बोअर आहेत.
काही मज्जा आली नाही..>>>>>>>> तू टाक ना मग मज्जा वाले किस्से , का फक्त लोकांची मज्जा वाचायची ? नुसती शाब्दिक टिका करू नका छान लिखान पण करूँ दाखवा , Wink

तू टाक ना मग मज्जा वाले किस्से , का फक्त लोकांची मज्जा वाचायची ? नुसती शाब्दिक टिका करू नका छान लिखान पण करूँ दाखवा>>>>>>>>>>>.. भुतं काय सेलिब्रिटी आहेत दिसायला??? आणि आधीपासुन वाचा धागा..वाहता धागा हा नक्कीच नाहीय....त्यमुळे जरा वाचुन काढा वेळ असेल तर कोणी कोणी काय काय लिहिलय ते दिसेल....सर्वच तुमच्या सारखे नसतात हो....भुत पाहणारे किंवा भुतांचा अनुभव येणारे..लक्की यु....

आणि दुसरे तुम्ही फे बु वरचे माय हॉरर एक्स्पिरीयंस वरचे किस्से कॉपी पेस्ट करुन लावता ते बर्याच लोकांनी आधीच वाचलेले असतात.. म्हणुन लोक तुम्हाला जे समजवत आहेत...ते पॉझिटिव्हली घ्या....अरे ला कारे करुन कळलं तुमच ज्ञान वगैरे म्हणुन स्वता:च्या ज्ञानाचा शो ऑफ करु नका...

अनिश्का.,

>> भुतं काय सेलिब्रिटी आहेत दिसायला???

Rofl

अनेक सेलिब्रिटी भुतांसारख्या आहेत हे मात्र नक्की! Lol

आ.न.,
-गा.पै.

अरे अरे काय हे ??......भुताच्या विषयावरून इथे तर मानवांची भांडणे सुरु झाली कि काय ????

आबासाहेब. | 17 April, 2011 - 06:29

हा अनुभव माझ्या मित्राचा आहे.
तो एका software company मध्ये आहे. लोकेशन आहे कल्याणीनगर पुणे.
त्याला नेहमीप्रमाणे नाईट्शीफ्ट होती. तो आणी त्याचे 2 मित्र ७व्या मजल्यावर जिथे toilet आहे तिकडे गेले. त्या वेळी मजल्यावर दुसरे कोणीच नव्हते. wash basin ला हाथ धुताना त्याना सर्व toilet मधुन पाणी सोडल्याचा आवाज आला. toilet चे दार उघडल कि आवाज बन्द झाले. मग सगळ्या ट्यूबलाईट चालु बन्द होऊ लागल्या. तसे हे तिघे पळत सुटले.
आणखी एका ग्रुपला असाच अनुभव आला.
मग कम्पनीने तो फ्लोअर बन्द केला हे मित्राने सागितले.
............

आबासाहेब आपण सांगितलेली सत्य घटना आहे ...मी त्या कंपनीत काम केल होत आणि खरोखर तो मजला बंद होता ...आता ती कंपनी दुसरीकडे शिफ्ट झाली आहे पण नदीकाठी असलेली तिची इमारत रात्रीच्या वेळी भयानक अनुभव द्यायची ...आम्ही त्या वेळी नाईट शिफ्ट करायचो आणि रात्री २ ला लंच ब्रेक होयचा ..अशा वेळी बाथरूम ला एकट्याने जाण्याची सोय नव्हती !एका प्रचंड कामाचा उरक असणार्या मुलाने तिथे आत्महत्या केली होती ...एवढंच नाही तर त्याच मजल्यावर नाही तर इतर मजल्यांवर सुद्धा कधी कधी विचित्र अनुभव यायचे ...काही आळशी मुल रात्री झोपली कि त्यांना टपला मारण ...pcकाम्पुटर अचानक चालू होणे किवा बंद होणे ...एकूण चार लिफ्ट असणार्या त्या इमारतीची एक लिफ्ट हमेशा बंद पडण ...त्याच्या आतील काचा फुटण ..कहर म्हणजे ती लिफ्ट नेमकी ७ व्या मजल्यावर जावून थांबायची म्हणजे तिचा सातव्या मजल्यावरच नेहमी मुक्काम असायचा ...मी भूत ना पाहिलं ना अनुभवलं आहे पण या गोष्टी माझ्या डोळ्या समोर पहिल्या आहेत ...माझा एक तर्क आहे जर आपण देवाच अस्तित्व मानतो तस त्याचं पण असलच पाहिजे ...कारण पूर्ण जगात भिन्न भाषा ,जीवनशैली ,मानव प्रणाली अस्तित्वात असताना भूतांच अस्तित्व सर्वांनी एकाच प्रकारे अनुभवलं आहे म्हणजे त्यात थोड फार तरी तथ्य असल पाहिजे ...!

अनू Rofl
अभिजीत, मला येतच नाही हो लिहिता. पण म्हणून किमान मी कॉपी पेस्ट तरी करत नाही. आणि मला नुसती वाचुन मजा घ्यायची असेल तर तुमचा आक्षेप का असावा? Uhoh

बाकी अनू म्हणाली तसं या धाग्याची ५५ पानं वाचुन काढलीत तर बरं होईल.

स्वप्नवेडी Uhoh बाप्रे!

आता काही महिन्यांपुर्वी आमच्या ऑफिसातही एक अनुभव ऐकला (कितपत खरा माहीत नाही त्यामुळे इथे देत नव्हते).
आमच्या मजल्यावरच एका ओडीसी मध्ये नाईट शिफ्टला २ मुली काम करत होत्या. आमच्या फ्लोअरवरच्या कोणत्याच ओडीसी मध्ये फोन अलाऊड नाहीये. त्या दोघी एका क्रिटिकल मॉड्युलवर काम करत होत्या आणि काही केल्या इश्श्यु सॉल्व होत नव्हता. तेंव्हा त्यातली एक जण म्हणाली ,'कोणीतरी हवं होतं मदतीला' इतक्यात त्यांना आवाज आला, 'मे आय हेल्प यू?' त्यांना वाटलं कोणी तरी असेल ओडीसी मध्ये. पण इथले लाईट्स बायोसेन्सर वर चालतात. जिथे माणूस असेल तिथलीच लाईट चालू असते. आणि पुर्ण ओडीसी मध्ये फक्त यांच्याच बेची लाईट चालू होती. त्यांना वाटलं भास झाला असेल म्हणुन त्यांनी इग्नोर केलं. पुन्हा थोड्या वेळाने त्यांना हसण्याचा आवाज ऐकु आला तेंव्हा त्यांना वाटलं बाहेर कोणीतरी असेल. तस असलं तरी ओडीसी साऊंडप्रूफ आहे. बाहेरुन आवाज आत येत नाही आणि आतुन बाहेर आवाज जात नाही. तरीही त्या उठल्या आणि बाहेर बसलेल्या वॉचमनला विचारलं की कोणी होतं का इथे. तो म्हणाला नाही. त्यानंतर पुन्हा त्या आत जाऊन काम करायला लागल्या. तेंव्हा मात्र त्यांना जोर जोरात हसण्याचे आवाज ऐकु आले (की काही तरी बोलण्याचाच आवाज ऐकू आला. नीटस आठवत नाहीये) मग मात्र त्या घाबरल्या आणि तिथुन लगेच घरी निघुन गेल्या. नंतर आजारी पडल्या आणि मग त्यांनी इथुन दुसर्‍या लोकेशनला ट्रान्सफरच करुन घेतली.
आमच्या ओडीसीमध्येही काही लोकं नाईट शिफ्ट ला असतात, त्यांनी आल्यावर आम्हाला हा प्रकार सांगितला. आम्ही आधी विश्वास ठेवला नव्हता पण आमच्या ओडीसी बाहेरच्या वॉचमनने आणि आमच्या मॅनेजरनेही हा प्रकार खरा असल्याचं सांगितलं, त्यानंतर काही दिवस आमच्या फ्लोअरवरच्या सगळ्या ओडीसीमधल्या नाईट शिफ्ट बंद केलेल्या आणि तापास चालू आहे असं सांगितलं. पुढे काय झालं माहीत नाही. आता शिफ्ट्स पुन्हा सुरू झाल्यात आणी विषय बंद!

१७००

स्वप्न वेडी | 18 April, 2014 - 11:33 >>>> If you don't mind can you tell me the name of this building located at Kalyaninagar? You can send it to my mail id through samparka suvidha of MaBo. I am asking you this bcoz my husband's office is at Kalyaninagar & now I got little tensed.

खरतर असा काही अनुभव मला स्वत:ला आलेला नाही परंतु माझ्या नवर्‍यावर attack झालेला मी ऐकला आहे. पण जो अनुभव मी घेतला नाही तो इथे टाकण्यात मला रस नाही. कारण ज्यावेळी हे घडल त्यावेळी मला गाढ झोप लागलेली होती आणि नवर्‍याच्या विचित्र ओरडण्याच्या आवाजाने मी जागी झाले इतकच सांगु शकते. या बेसीसवर काय स्टॉरी रचणार म्हणुन आत्तापर्यंत फ़क्त वाचत होते. स्वप्नवेडी यांनी टाकलेल्या पोस्टमध्ये कल्याणीनगरचा उल्लेख आल्याने काळजी पोटी ही पोस्ट टाकली.

मुग्धा Sad

मुग्धा , मारि गोल्ड बिल्डींग जिथे पूर्वी mphasiss ऑफिस होत ...,

माझ्या वडिलांचा एक अनुभव सांगावासा वाटतो .. लहानपणी एकदा वडिलानी कुणाला तरी सांगताना ऐकला मी तो आज परेंत माझ्या डोक्यात अगदी पक्की जागा करून आहे ...साधारण १९७६ चा कालावधी वडील त्याचं लगन होण्या पूर्वी मुंबईला माझ्या काका कडे राहत ...तिथेच एका कंपनीत त्यांना jo जॉब मिळाला ..तिथे तिन्ही शिफ्ट मध्ये काम करावे लागे ..कंपनीत जाण्यासाठी ते सायकल वापरायचे ..घरी येण्याच्या मार्ग खाडीच्या बाजूनी असायचा नि पूर्वी वाहनांची फारशी वर्दळ नसायची त्यामुळे रात्री 8 नंतर सगळ सामसूम होयचं ..
असेच एकदा घरी परतत असताना त्यांना एक स्त्री सायकल वरून जाताना दिसली ..अत्यंत सुंदर ,सुशिक्षित वाटत होती खांद्याला पर्स अडकवलेली अगदी आधुनिक अशी ...ती काही न बोलता वडिलांच्या मागून आली नि हळू हळू पुढे निघून गेली काही न बोलता ...पुढे हा अनुभव रोज त्यांना येवू लागला ..ती एका वळणावर अचानक मागून यायची नि पुढे निघून जायची ...एक दिवस तिने पुढे निघून न जाता वडिलांबरोबरच सायकल चालवायला लागली ..वडिलांनी तिच्या शी हसून सायकल चालवन चालू ठेवलं ..पुढे न राहवून त्यांनी विचारलं कि तुम्ही एवढ्या रात्री एकट्याच कशा येता तर तिने सांगितलं मी इथे जवळच काम करते पण ओवर टाईम करायला लागत असल्या मुळे वेळ होतो वगैरे वगैरे ...अशा पद्धतीने दोघांची छान मैत्री जमली ...वडिलांची शिफ्ट बदलली नि दोघांची भेट होईनाशी झाली ..ती त्या कालावधीत त्यांना दिसली सुद्धा नाही ...पुढे पुन्हा शिफ्ट बदलल्यावर ती दिसली ...वडिलांना बघून तिला खूप आनद झाला ..शेवटी प्रकरण वाढून अगदी प्रेमात पडण वगैरे झाले आणि पुढच्या रविवारी आपण नाईट शो चा सिनेमा पाहू अस दोघांच ठरलं ..हेय सगळं अगदी १ महिन्यांच्या कालावधीत घडल ...झाल रविवार उजाडला ..तिला सुट्टी नसल्यामुळे रात्री त्याच वाटेवर भेटायचं ठरलं ...त्या दिवशी जरा लवकरच भेट ठरली कारण रात्री 9/१२ शो होता ...ती आली मस्त साडी ,गजरा वगैरे घालून आली..!
वडील हि तिला पाहून खूष झाले ..थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आल कि आज जरा जास्तच अंधार वाटतोय ...तिने सायकल नव्हती आणली ..मग वडिलांच्या सायकलवर डबल सीट जायचं ठरल ...ती सायकल वर बसली थोड अंतर गेल्यावर त्यांच्या लक्षात आल कि सायकल फार जड वाटतेय पण त्यांनी दुर्लक्ष केल नंतर तर अगदी पेंडल पण मारवेना हा काय प्रकार आहे ..इतकी नाजूक मुलीच वजन का इतक जास्त ?? असंख्य प्रश्न ...ती वडिलांना शी अखंड बोलत होती ..नंतर तिने सांगितलं मी सांगते त्या रस्त्याने चला शोर्टकट आहे तुम्ही नवीन आहत तुम्हाला माहित नसेल, वडील ठीक आहे म्हंटले ..! त्यांच्या पुढे हि काही पर्याय नव्हता ना ...तिने सांगितलेल्या रस्त्याने ते जायला निघाले मिट्ट अंधार समोरच दिसेना आणि हि बाई अशी कशी बिनधास्त ..त्यांना शंका येवू लागली नंतर त्यांच्या लक्षात आल कि त्यांच्या पाय ओले झालेत त्यांचे बूट पाण्याने भिजून गेलेत... अरे,हे पाणी कुठून आल ?? तर खाली खाडी कडे ते उतरले होते ..वडिलांच्या लक्षात आल कि हा काही तरी वेगळाच प्रकार आहे ..त्यांनी सायकल तशीच टाकून जीवाच्या आकांताने धूम ठोकली ...मागे वळून न पहाता ...ती प्रचंड जोरात किंचाळली नामदेव मला सोडून जावू नकोस ...पण त्यांनी मागे वळून पाहिलं नाही ..
घरी आले नि ग्लानी येवून दारातच पडले ...सगळे गोळा झाले ...लोकांचे तर्क वितर्क सुरु झाले कारण तो अमाव्स्याचा दिवस होता ..वडील 10 दिवस बिछान्यात होते ..पुढे काकांनी मांत्रिक आणून काय काय ते सोपस्कार केले ...वडिलांचा अनुभव ऐकून सगळ्यांनी सांगितलं कि त्यांची ती मैत्रीण २ वर्षापूर्वीच मरण पावलेली होती ...ती कामा वरून घरी परतत असताना काही गुंडांनी तिच्या वर बलात्कार करून तिला खाडीत मारून टाकली होती .. वडिलांचा तर विश्वासच बसत नव्हता कि इतक्या दिवसात त्यांना एकदा हि तिने जाणवून दिल नाही ..तिची शेवटची किंकाळी पुढे खूप वर्ष त्यांना ऐकू येत असे ..यातूनच वडील आध्यात्मा कडे वळले ते आज परेंत ..आज हि ते सांगतात कि कुठे अरुंधती नाव वाचल कि त्यांना घाम फुटतो कारण तिने वडिलांना सांगितलं होत तीच नाव अरुंधती भाटे ...!

अभिजीत सोडुन सगळ्यान्चे अनूभव भयानक आहेत. काय सोसत असतील त्यावेळी हे लोक.मग ते यान्चे सहकारी पण का असेनात.:अरेरे:

स्वप्न वेडी भूत असतेच. मी प्रत्यक्ष पाहिले नाही, पण अतीन्द्रिय शक्ती आपल्या आजू बाजूला सतत वावरत असतात याचा अनूभव घेतलाय. का आणी कसा आणी केव्हा हे नाही सान्गु शकणार.

मनुष्य गणाला याचा जास्त अनूभव येतो. राक्षस गण आणी देव गणाला त्रास होत नाही आणी देव गणाला दिसले तरी त्याच्या आसपास ही भूते भट्कत नाहीत.

देव गणाची माणसे मनाने सोशिक आणी पापभिरु, तर राक्षस गणाची माणसे टफ असतात आणी वेळ प्रसन्गी साम दाम दन्ड भेद वापरु शकतात. आणी मनुष्य गणाची माणसे मनाने भित्री असल्याने शक्यतो सन्कटापासुन चार हात दूर रहाणे पसन्त करतात. ( घरचे अनूभव आहेत हे, त्यामुळे ठामपणे सान्गु शकते.:फिदी:)

बाप्रे Sad

Pages