नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी स्ट्रॉबेरी पल्प आणि तुकडे घालुन केले होते. साखर थोडी घालायला पाहिजे असे वाटले. आईस्क्रिमपेक्शा कुल्फीसारखी चव आली होती. थोडे क्रिस्टल्स झाले. आज रात्री फोटो टाकेन.

सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्यपूर्ण, उत्साहाची, यशाची, भरभराटीची जावो ही सदिच्छा.

@manuruchi,

chocolate flavour मध्ये फळामूळे येणारा घट्ट्पणा नसल्यामूळे त्याऐवजी कन्डेन्स्ड मिल्क वापरून पहा

मुग्धाने दिलेले मूळ प्रमाण घेतलेत तर दुधात दीड ते दोन लहान चमचे नेस्ले कोको पावडर टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. साखरेचे प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी - जास्त करा. डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवण्यापूर्वी त्यामध्ये तयार मिळणारे २ लहान चमचे गोड choco चिप्स मिसळा.(हे कमी गोडीचेसुद्धा मिळ्तात)

मुग्धा, तुझ्या धाग्यावर सूचना केलेली आवड्ली नाही तर जरूर सांग. प्रतिसाद काढून टाकीन Happy

खूप मस्त आणि सोप्पी पाकृ! एक महत्वाचा प्रश्न! चितळ्यांचं गायीचं दूध आणि त्याच दुधाची साय चालेल का? कोणी करून बघितलंय का गायीच्या दुधाचं आईसक्रीम?? कारण त्या सायीचं लोणी तूप होत नाही! खूप कमी fats असतात! नाहीतर अर्धा लिटर म्हशीचं दूध आणायला!!!

मुग्धा, तुझ्या धाग्यावर सूचना केलेली आवड्ली नाही तर जरूर सांग. प्रतिसाद काढून टाकीन>>>>> अरे अस काय चंद्रा? तुझ्या सुचनेमुळे आता मलाही चॉकलेट आईस्क्रीम करता येणारे.. धन्स तुलाच...

गायत्री>>> ट्राय करुन बघा. मला नाही वाटत काही अडचण येईल. बादवे या आइस्क्रीमचा स्त्रोत ज्या आहेत ना आमच्या नणंदबाई त्यांच नाव पण गायत्री आहे.

नक्की टाकेन, अग ते फ्रिज च्या बाहेर काढलं की फोटो काढे पर्यंत रहातच नाही.
सध्या चिकू, टेन्डर कोकोनट आणि मस्कमेलन करून झाल आहे.

गाईच्या दुधाच्या आइस्क्रीम मधे मिल्क पाउडर जास्त घातली मी. म्हशीच्या दुधासाठी सेम प्रमाण. मॅप्रोचे पल्प घातले तर साखर लागत नाही. गेल्या सिझन मधे आमच्या कडे ७-८ वेळा करून झाले . चिकू, आंबा, कॉफी अक्रोड, सिताफळ, मस्क मेलन (त्यात बर्फाचे खडे झाले) आणि अंजिर.
झकास !! श्रेय नामावलीत तुझ नाव सांगते नेहेमी Happy

मंजुडी, अंजिराच्या मोसमात, ताज्या अंजिराचा पल्प मिळाला होता इथे (भिमथडी जत्रा)
कॉफी अक्रोड अस केल होतं माझ लैच आवडत म्हणून. नेस्कॅफे फेटून घेतली क्रीम मधे, थोडी ड्रींकिंग चॉकलेट पावडर सुद्धा घातली. साखर चवीप्रमाणे. अक्रोड तुकडे करून थोड सेट झाल्यावर. आणि सर्व करताना.
उद्याच्याला मद्दान करून आल्यावर निवेद म्हणून करीन म्हणते. Wink

मला क्रीम कोणते घ्यावे हे समजत नाहीये. अमेरिकेत काय वापरावे क्रीमसाठि? high calorie असल्यामु़ळे कधी घरात आणलचं नाही असं काही. एवढे सगळे प्रतिसाद आणि रेचिपी सोपी दिसत आहे म्हणुन ट्राय करावी वाटत आहे. क्रुपया सांगा.

सुप्रिया-

अमेरिकेत हेवी whipped cream घेऊ शकता.

गायत्री- मी गाईचं (चितळे) दूध वापरुन सीताफळ आईस्क्रीम केलं होतं. प्रमाणात काहीही फेरफार केले नव्हते. व्यवस्थित झालं होतं. कदाचित सीताफळाच्या गरामुळे क्रीमीनेस आला असावा!

मुग्धटली, सगळ्या गायत्री ग्रेट च असतात! Proud बीटीडब्ल्यू मी म्हशीचं दूध, गायीच्या दुधाची साय, एव्हरीडे मिल्क पावडर आणि मलई वापरून टेंडर कोकोनट लावलंय सेटिंग ला Wink

मुग्धटली, सगळ्या गायत्री ग्रेट च असतात! बीटीडब्ल्यू मी म्हशीचं दूध, गायीच्या दुधाची साय, एव्हरीडे मिल्क पावडर आणि मलई वापरून टेंडर कोकोनट लावलंय सेटिंग ला>>>>> खायच्या आधी फोटो टाक गायु

मस्त झालं होतं! धन्स मुग्धटली इतक्या सोप्या रेसिपिबद्दल. फोटो काढेपर्यंत संपला पण डबा'..आता उद्या आंबा घालून करणार आहे तेंव्हा नक्की टाकेन फोटो..

आणि अजून एक, मी १ वाजता ठेवलं पण राहवेना म्हणून ५ वाजताच चव घेऊन बघितली तर सेट झालं होतं. पण आम्ही १० वाजता खायला घेतलं तेंव्हा थोडे क्रिस्टल्स लागले आणि घट्ट पण झालं होतं. म्हणजे खरंतर ५ तासातच हाय कूल सेटिंग वर तयार झालं होतं. पुढच्या वेळेस उशिराच लावेन..कारण ५ वाजता टेस्ट केलं तेंव्हा मस्त क्रीमी होतं!

मला त्वरीत मदत हवी आहे
आयस्क्रीम करण्यासाठी उकळत ठेवलेल दुध खाली जळाल त्याला जळका वास लागला आहे काय करु?

Pages