निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मृनीश, त्याला नंतर हिरव्या
मृनीश, त्याला नंतर हिरव्या रंगाची लांबुडकी फळे लागतात, पिकल्यावर केशरी रंगाची होतात. पिकलेल्या फळातला गर खा... अप्रतिम....स्लर्प......
हो का...नक्की लक्ष ठेवते आता
हो का...नक्की लक्ष ठेवते आता त्या झाडावर आणि फळावर...
आमच्या बकुळी नीटनेटक्या,
आमच्या बकुळी नीटनेटक्या, टापटीप आहेत बाई. अशा पाकळ्या फिस्कारुन नाही बसत.:P
:
अग त्या मुंबईच्या बकुळी आहेत बाई..असणारच टापटीप..
आमच्या आपल्या निजामाच्या राज्यातल्या निवांत ..ऐसपैस..स्मित

त्याला नंतर हिरव्या रंगाची
त्याला नंतर हिरव्या रंगाची लांबुडकी फळे लागतात, पिकल्यावर केशरी रंगाची होतात. पिकलेल्या फळातला गर खा... अप्रतिम....स्लर्प......>>>>>>साधने नको ग माझ्या दुखा:वर डागण्या देऊ.
(त्याला ओवळदोडे म्हणतात ना?) 
हो बकुळीला कोकणात ओवळच
हो बकुळीला कोकणात ओवळच म्हणतात. ह्या फळांचा आकार साधारण मोठ्या वेलदोड्यासारखा असल्याने हे ओवळदोडे.
बकुळीच्या फळांबद्दल ऐकलय खुप
बकुळीच्या फळांबद्दल ऐकलय खुप पण कधीच खाल्ली नाहीयेत
साधना, मी कधी तुझ्या घरी आलेच तर देशील ना मला?
हो बकुळीला कोकणात ओवळच
हो बकुळीला कोकणात ओवळच म्हणतात. ह्या फळांचा आकार साधारण मोठ्या वेलदोड्यासारखा असल्याने हे ओवळदोडे.>>>>>>>>>.हो. आमच्या शाळेत जाण्याच्या वाटेवर याचं झाड होतं. मग काय शाळेत जाताना आम्ही सगळी मेंढरं, पतेर्यात ओवळदोडे शोधत बसायचो. कधी कधी शाळेत गेल्यावर 'प्रसाद' ही मिळालाय उशीर झाल्याबद्दल.
साधना, मी कधी तुझ्या घरी आलेच
साधना, मी कधी तुझ्या घरी आलेच तर देशील ना मला?
घरी आत्ताच ये.. आपण दोघी मिळून शोधुया...
मी गेले कित्येक वर्षे शोधतेय ओवळदोडे आणि मिळत नाहीयेत कुठेही. राजस्थानला सहेलियोंकी बाडीमध्ये एक अतिप्रचंड झाड होते. त्याच्याखाली हिरवे ओवळदोडे होते.
गेल्या वर्षीच्या मे महिन्यात आंबोलीला ओवळीची मोरी आहे त्या तिथे एकच ओवळदोडा सापडला. पण बिचारा एवढा खास नव्हता.. शोधाशोध चालु आहे.
शोधाशोध चालु
शोधाशोध चालु आहे.>>>>>>>>>>>>शुभेच्छा!
मग काय शाळेत जाताना आम्ही
मग काय शाळेत जाताना आम्ही सगळी मेंढरं, पतेर्यात ओवळदोडे शोधत बसायचो.:

Manilkara zapota म्हणजे
Manilkara zapota म्हणजे चिक्कू आणि Mimusops elengi म्हणजे बकुळ दोन्हीही Sapotaceae या कुळातले - त्यामुळेच ते ओवळदोडे गोड असतात की काय ???
मनीमोहोर,कित्ती सुन्दर
मनीमोहोर,कित्ती सुन्दर .त्या.चा मन्द सुगन्ध पोहोचला इथे .
मीरा
हा माझा आधिचा बकुळीचा लेख.
हा माझा आधिचा बकुळीचा लेख. अजून फोटो आहेत. शोध सुरु आहे.
http://www.maayboli.com/node/32841
Manilkara zapota म्हणजे
Manilkara zapota म्हणजे चिक्कू आणि Mimusops elengi म्हणजे बकुळ दोन्हीही Sapotaceae.>>>
कदाचित या Sapotaceae कुळामुळेच असेल पण तेलुगु मध्ये चिक्कुला सपोटा म्हणतात..
आमच्या गुलाबावर ह्या कोळ्याने
आमच्या गुलाबावर ह्या कोळ्याने केलेली ही विण मला नवखी वाटली.

किती नजाकत आहे कोळ्याच्या
किती नजाकत आहे कोळ्याच्या विणीत, जागू.
जागू तूझा बकुळफुलांचा लेख वाचला, तशीच बकुळफुले मी बघितली आहेत. हेमाताई यांनी टाकलेल्या फोटोतील पहिल्यांदाच बघितले.
हेमाताईने टाकलेले भरगच्च
हेमाताईने टाकलेले भरगच्च पाकळ्यांचे आहे.
बकुळीचे कुळ

बकुळफुल असंही असतं. मी
बकुळफुल असंही असतं. मी कोकणातपण अशी पहिली नाहीत>>>>>> खरंच.बटमोगर्यासारखी तर तर ही जात असेल का?
साधना
आमच्या बकुळी नीटनेटक्या, टापटीप आहेत बाई. अशा पाकळ्या फिस्कारुन नाही बसत.>>>>> हे आवडलं.
बकुळीचे एक झाड सागर उद्यानात
बकुळीचे एक झाड सागर उद्यानात देखील आहे.. समुद्राच्या बाजूला ही छोटी टेकडी सारखी केलेलि आहे , lawn असलेली त्यावर आहे
जागू, तुझा बकुळ फुलांवरचा
जागू, तुझा बकुळ फुलांवरचा लेख मी मागेच वाचला होता आणि तो मला तेंव्हा ही खूप आवडला होता, पण मी तेव्हा सभासद नसल्याने प्रतिक्रिया देऊ शकले नव्हते. ती संधी तू मला आज दिलीस . धन्यवाद.
कदाचित या Sapotaceae
कदाचित या Sapotaceae कुळामुळेच असेल पण तेलुगु मध्ये चिक्कुला सपोटा म्हणतात..>>>>> येस्स....
Sapodilla म्हणजेही चिक्कूच
हा पण आवळे लपुन खातोय.
हा पण आवळे लपुन खातोय.

जागुले या कोळ्याने तुझ्याकडे
जागुले
या कोळ्याने तुझ्याकडे विण्कामाचा क्लास लावला होता का?
आणि चोराला अगदी रेड हॅन्ड पकडलस. अगदी चोचीत आवळा दिसतोय.
जागुले या कोळ्याने तुझ्याकडे
जागुले
अगदी!!अगदी!!
या कोळ्याने तुझ्याकडे विण्कामाचा क्लास लावला होता का?..
मस्त फोटोज आलेत...
सुप्रभात साधना पण खरच मी
सुप्रभात
साधना :p
पण खरच मी अशी बकुळ फुल पाहिली नाहित कधी.
आणि ज्यांना ज्यांना ओवळदोडे हवेत त्यांना आपल्या नेक्स्ट गटगला मिळतील, मी घेऊन येईल.
जागु, कोळ्याच विणकाम मस्तच आहे ग.
आणि चोराला रंगेहाथ पकडलस ग तू. आता आरोप सिद्ध करण सोप जाईल की
उजु, मला मला पण तुम्ही
उजु, मला मला
पण तुम्ही पुण्यात करा न गटग !
जागू, मस्त पकडलस हं आवळा
जागू, मस्त पकडलस हं आवळा खाताना.
Have a nice weekend. अधिक निळं कोण आहे? आकाश की जॅकरंडा
monalip,uju,Sayali
monalip,uju,Sayali Paturkar,अंजू,सामी,साधना,दिनेशदा,रिया,वर्षु नील,मनीमोहोर तुम्हा सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. मी औरंगाबादला राहते.तुम्हा सर्वांचे माझ्याकडे स्वागतच आहे.केव्हाही व जरूर या!
सरिवा औरंगाबादला मोर आहेत
सरिवा औरंगाबादला मोर आहेत एवढे वा. ८ वर्षापूर्वी मी श्रीरामपूर येथे काही वर्षे होते तिथून औरंगाबाद जवळ होतं, बऱ्याचदा भद्रा मारुती, वेरूळ इथे जायचो आता डोंबिवलीहून लांब आहे औरंगाबाद. श्रीरामपूरला असते तर लगेच आले असते खास मोर बघायला.
वरचे सगळे फोटो मस्त. त्याचबरोबर शशांकजी माहिती देतात ती सोनेपे सुहागा.
जागु, कोळ्याच विणकाम छानच.
जागु, कोळ्याच विणकाम छानच. स्वतःच्या आकाराचं विणकाम केलय अगदी. पण शत्रूच कौतुक कसं करणार ना?


मोर तर मस्तच. कधी असे जवळून बघायला मिळतील?
वरचे सगळे फोटो मस्त. त्याचबरोबर शशांकजी माहिती देतात ती सोनेपे सुहागा.+११११११११११११११
Pages