निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली, त्याची चोच पाहा. खास फुलांमधुन मध चोखुन घेण्यासाठी ही चोच तयार केलीय अशी. शिंप्याची चोच अशी नसते कारण त्याची ती गरज नाहीय.

सनबर्डला दुर्गाबाई भागवतांनी फुलचुख्या हे नाव दिलेय त्यांच्या ऋतुरंगमध्ये.

गुर्जींचा सल्ला कधीच "फु स" नसतो.
सुधारणा करण्यात येईल नक्कीच!
असो... फोटो बघितल्यावरच लक्षात आलं होतं की फोकस गण्लाय. पण कुठे तरी जाताना अत्यंत घाईघाईत घेतलेत.

सारिवा,
पिंपळाचा आणखी एक उपयोग.. त्याच्या पानाची पत्रावळ करून त्यावर गरम तूपभात वाढला तर उच्चार सुधारतात. याचा प्रयोग माझ्यावर आईने केला होता. मला लहानपणी "र" उच्चारता येत नव्हता. असा तूपभात जेवल्यावर तो आला.( र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र बघा येतो कि नाही. )

दिनेश र्र्र्र्र्र्र्र वरून जोक आठवला(सॉरी अवांतर) थोडा वेगळा विषय.
एका सरदाराला इंग्रजीची ट्यूशन लावतात. ए टु झेड शिकवण्याचा प्रयत्न चालू असतो.
स्मॉल आणि कॅपिट्ल शिकवून संपल्यावर सर म्हण्तात.....आता ए टु झेड म्हणून दाखव बरं.
तर सरदार विचारतो.....म्हण्तो ना....पाठ्च आहे मला. पण स्मॉल की कॅपिट्ल ते तरी सांगा!

मानुषी Happy

मी सातवीत गेले तेव्हा मला कुठे र बोलता आला...

र सोडता बाकी सगळे मी अगदी नीट वाचायचे. एकदा शाळेत मला बाईंनी मुद्दाम परत परत एक धडा इतर शिक्षकांना बोलावुन त्यांच्यासमोर वाचायला लावला. त्यांना माझ्या र च्या जागी ल म्हणण्याची खुप गंमत वाटायची.

पण माझ्यावर पिंपळपानावर जेवण वगिअरे असली मेहनत कोणी घेतली नाही Sad मी बापडी आपले आपणच लाम लाम म्हणत राहिले आणि मग एके दिवशी ते आपोआप राम झाले.

साधना Happy
र सोडता बाकी सगळे मी अगदी नीट वाचायचे. एकदा शाळेत मला बाईंनी मुद्दाम परत परत एक धडा इतर शिक्षकांना बोलावुन त्यांच्यासमोर वाचायला लावला. त्यांना माझ्या र च्या जागी ल म्हणण्याची खुप गंमत वाटायची.
>>
Sad
निर्दयी मेले Angry

दिनेशदा,याबाबत मला लिहायचे होतेच.अपास्मार व बहुदा स्मृतीभ्रंश या विकारात सुद्धा त्याचा असाच वापर करतात असे वाचल्याचे आठवत होते.नक्की दोन्हीत कि एकात वापरतात याची खात्री करून घेतली नव्हती म्हणून लिहिणे टाळले! आता बघायला हवे.

<<<<असा तूपभात जेवल्यावर तो आला.( र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र बघा येतो कि नाह>>>>>:)
वरिल सर्व फोटो एकदम मस्त|

ह्यापुर्वीच्या नि.ग.च्या वेगवेगळ्या भागात मला वाटतं दिनेशानी काहि लिंक दिल्या होत्या. पण मला आत्ता त्या
favourites मधे सेव्ह करायच्यात पण मला आत्ता त्या सापडल्या नाहित. कुणाकडे त्या सेव्ह केल्या असतील तर मला मिळतील का?

पुन्हा जाम...

घोलवडच्या मैत्रिणीकडून भेट मिळालेले. शेवटचा राहीला तेव्हा फोटोचे सुचले....

पांढरे नाही... गुलाबी नाही... लाल नाही.... चक्क हिरवे जाम
0554.jpg

हाताला कसा एकदम मऊ नरम लागत होता.
0555.jpg

कापल्यावर आत अगदीच पोकळ
0556.jpg

आणि या मोठया मोठ्या बीया....
0557.jpg

चव मात्र अप्रतिम!!!!

सगळ्यांचे फोटोज मस्त आहेत.

ममं, मी आतापर्यंत खाल्लेले जाम हिरवे/पिवळटच आहेत. गुलाबी व्हरायटी इकडच्या फोटोजमध्ये पाहिली. फार खाल्ल्याचं आठवत नाही. जाम खाऊन काळ लोटला Uhoh मस्त फळ आहे. उन्हाळ्यासाठी परफेक्ट. जास्त तहान तहान होत नाही. आता कलिंगडं पण येतील. Happy

बँकॉक विमानतळावर खुप मोठे पोपटी रंगाचे जाम विकायला होते. थायलंड मधे अनेक फळे सुकवून ठेवलेली दिसतात. अगदी ताडगोळ्यांपासून रास्बेरी पर्यत मी फळे खाल्ली आहेत. रंग, चव सर्व टिकवलेले असते.

माझ्याकडे तिन रंगाचे जाम आहेत.
परवा फोटो टाकते.

हे एक रानफुल. ह्याच्या पानांची रचना पहा ना. मोठे मोठे काटे ह्याच्या पानांवर उभे आहेत.

Jagu, aaeechyaa gaavee yaalaa kaaTevaange kaa raanavaange ase mhaNataat. yaachee faLe daaDhadukheevar vaaparataat.

दिनेश, अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.. खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्च की.... बरोब्बरे र्र्र्र Happy

मानुषी लेकीच्या घरी र्र्र्र्र्र्र्मलेली दिस्तीये..... ह्म्म्म्म्म्म... सेम टू मी Lol

थायलँड च्या फळांची क्या बात है.... मी आत्तापर्यन्त फक्त हिरवे आणी फिकट लाल या दोनच रंगात जाम पाहिलेले..

सध्या इथे ब्लॅकबेरीज (शहतूत?), टँजरिन, आंबे, चेस्टनट्स, दुरियन, हिरवे,काळे,लाल एक्स एल साईझ चे अंगूर,

लोंगान (Long Gnun), ड्रॅगन फ्रूट, लोकात (loquat (Eriobotrya japonica) इ. फळांची बहार आलीये. जोडीला नेहमीची लहान्,मोठी संत्री , केळी , पोपई आणी इतर ऑल सीझन फळं आहेतच.

इथले आंबे आकाराने मोठे आणी रसाने भरलेले टुम्म गुबगुबीत आहेत, चवीला साधारण आपल्याकडील बदाम आंब्यासारखे पण कोय कागदासारखी पातळ.. इकडच्या चायनीज मुलींना आंब्याच्या कोईची उपमा देत असावेत
बहुतेक Happy

ही आजची बातमी वाचा.
जागेच्या हव्यासापायी झाडांवर विषप्रयोग
तुमच्या भागात झाडांवर कुठे खिळे ठोकल्याप्रमाणे भोकं दिसली तर लगेच तक्रार करा. (पण तक्रार कुठे करायची हे माहीत नाही. कुणाला माहीत असल्यास प्लिज इथे लिहा)

आजच्या लोकसत्ताची हेडलाईन-----जागेच्या हव्यासापायी झाडांवर विषप्रयोग---:: Sad
मालाडला बसथांब्याच्या बाजूला एका हिरव्यागार पर्जन्यव्रुक्षाची सगळीच्या सगळी पाने दोन दिवसात गळून गेल्याचे समजताच तेथील व्रुक्षमित्रांनी झाडाची पाहणी केली तेव्हा त्यांना झाडाच्या खोडावर तब्बल ४० ठिकाणी खिळे मारल्याच्या खुणा आणि त्या भोकांतून काडी टाकल्यास त्या काडीला पांढर्‍या रंगाचा चिकट द्रव म्हणजेच रासायनिक विष आढळले.तक्रार करूनही महापालिकेने कोणतीही कारवाई सुरू न केल्याने मालाड पोलिसांनीच त्पास सुरू केला आहे. असे प्रकार मालाड मध्ये बर्‍याच झाडांवर झाल्याचे आढळून येत आहेत. Sad
काय बोलू हे शब्दच सुचत नाहियेत हे वाचून Sad
फक्त भयंकर अस्वस्थता जाणवत आहे. Sad

जवळचे पोलिस स्टेशन, महानगर पालिका येथे तक्रार करता येते, पण फक्त तक्रार करून उपयोग नाही, त्या तक्रारीचा पाठपुरावा केला तरच अ‍ॅक्शन घेतली जाते.

आई गं देवा!!! Uhoh किती किती दुष्ट्पणा!! निसर्गावर इतका क्रूर हल्ला??? मग निसर्ग ही माणसावर उलटणार नाही तर काय.. Sad

उजु हे इथेही केलेले.. इथे झाडाच्या बुंध्यावरची साधारण एक फुटाएअढी साल काढुन टाकलेली त्यामुळॅ झाड सुकुन मेले.
जिव्ंत झाडाला मारणा-यांनाही असेच सुकुन सुकून मरण येवो एवढी इच्छा मी करु शकते कारण यात सगळ्यांचीच मिलीभगत आहे. जे लोक हे करतात त्यांच्या कंपन्यांमध्ये नगरसेवक मंडळी हिस्सेदार असतात... उद्या तिथे बिल्डिंगी झाल्या की सगऴ्यांनाच फायदा होतो. आजचा फायदा पाहताहेत, उद्या ह्यांचे नातु आणि पणतु अन्न पाण्यासाठी तडफडतील तेव्हा ते बघायला हे नसतील.

मग निसर्ग ही माणसावर उलटणार नाही तर काय..

नाही उलटणार. निसर्ग माणसासारखा खुजा नाही सुड उगवायला.

पण त्याचे नियम खुप कडक आहेत. तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आणि तुमच्या समोर भुत म्हणुन उभे राहणार. कल्पबृक्ष पेरलात तरच अमृत मिळेल.. माणसाने विषच पेरायचे ठरवले तर तो काय करणार? जे पेरले तेच त्याला देणार.

पण त्याचे नियम खुप कडक आहेत. तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आणि तुमच्या समोर भुत म्हणुन उभे राहणार. कल्पबृक्ष पेरलात तरच अमृत मिळेल.. माणसाने विषच पेरायचे ठरवले तर तो काय करणार? जे पेरले तेच त्याला देणार.>>>>>>सौ पते कि बात, साधना. Happy

साधना, खरच ग ह्यात सगळ्यांची मिलीभगत असते. सगळ माहित आहे तरीपण जेव्हा जेव्हा अश्या स्वरूपाच्या बातम्या समजतात तेव्हा तेव्हा जीवाला त्रास होतोच ना Sad
असह्य राग येतो तेव्हा आणि तेवढीच हतबलताही जाणवते.
अश्यावेळेस आपण जमेल तेव्हढी झाड लावून ती व्यवस्थित वाढतील अस बघायच, हेच उत्तर आहे अश्या निर्दयी लोकांच्या वागण्यावर.

जिस्प्या, प्लॅन बनव रे बाबा .. लोक्स चौकश्या करताहेत.....

काही मंडळी राणी बागेत आता प्राणी नाहीयेत मग तुम्ही कशाला जाता असेही प्रश्न करतात.. काय उत्तर द्यावे सुचतच नाही अशा वेळेला... तसेहि अशांना उत्तर देऊनही काही फायदा नाही, जाउदे. आपले व्यसन आपल्याकडेच ठेवावे गुपचुप हेच बरे.

जागेच्या हव्यासापायी झाडांवर विषप्रयोग>>>>> Sad Sad

काल (पुन्हा) ऑफिसला जाताना, साधारण पर्जन्यवृक्षासारखाच (Rain Tree) झाड दिसलं, फुलही साधारण पर्जन्यवृक्षासारखीच (ब्रशसारखी) होती पण रंग मात्र पिवळसर होता. हाच पांढरा शिरीष (कि शिशिर?) आहे का?

जिप्सी, इशिकाची परीक्षा आज संपली. ती पण रोज विचारतेय मला की ममा कधी जायचय राणीच्या बागेत.
लवकर प्लॅन ठरवा.

जिस्प्या, प्लॅन बनव रे बाबा >>>>>शनिवारी १९ एप्रिलला जमेल का सगळ्यांना? शुक्रवारी "गुड फ्रायडेची" सुट्टी आहे (आम्हाला नाही).

हो जिप्सी शिरीषच असावा तो. शिरीषची फुल पर्जन्यवृक्षासारखी असतात पण त्यांचा रंग पिवळसर असतो आणि फुल सुकली की मातकट होत जातो.

येस्स्स्स, मला जमेल १९ ला. वर्षु दि येतेय तो पर्यंत परत?

Pages