निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु, तु सुचवल्यानुसार इथे चहाच्या फुलांचे फोटो टाकत आहे. पण डायरेक्ट फोटो बघायला मिळणार नाही. आधी लेक्चर वाचा....

च॑हाची झाडं जरी बुटकी दिसत असली तरी ती झुडुपं नव्हेत ती व्यवस्थित झाडंच असतात. त्यांची छाटणी करून करून त्यांना बुटकं ठेवलं जातं. नाहीतर पानं तोडणार कशी? पण त्यांचे बुंधे मात्र एकदम मजबूत असतात. एकदा लावलं की चहाचं झाड ८० वर्षांपर्यंत जगू शकतं. फाद्यांच्या पहिल्या १ ते २ इंचापर्यंतची पानंच फक्त खुडली जातात. खुडणी सहसा बायकाच करतात. एकदा खुडणी झाली की पुन्हा ७ ते १५ दिवसांत नविन फुटवा येतो.

दार्जिलिंगच्या टी-इस्टेटवरील चहाची झाडे आणि फुले

ज्यांनी लेक्चर वाचले नाही त्यांना ही तीन भुतं छळतील...

मागील पानावर जागूने ज्या कोळ्याचा फोटो टाकलाय तो बहुधा - argiope spider असावा.

बहुतेक कोळी आपल्या भक्ष्याच्या अंगात एक प्रकारचे व्हेनम (विष) टोचतात जेणेकरुन ते भक्ष्य पॅरलाईज्ड होऊन जाते - जोपर्यंत कोळी महाशयांना त्याला खायचे नसते तो पर्यंत ते भक्ष्य जिवंत तर असते पण हालचाल-बंद अवस्थेत जखडून ठेवलेले असते. मागे कुठेतरी वाचले होते की मानवी अ‍ॅनॅस्थेशियाचा शोध लावण्यासाठी या कोळ्याच्या विषाचा खूप अभ्यास केला गेला होता - (का या कोळ्याच्या विशिष्ट वागणुकीवरुन -भक्ष्याला पॅरलाईज्ड करणे- मानवी अ‍ॅनॅस्थेशियाचा शोध लावण्यासाठी प्रेरणा मिळाली) ..... चुभूदेघे .... Happy Wink

मागील पानावर जागूने ज्या कोळ्याचा फोटो टाकलाय तो बहुधा - argiope spider असावा. >>>>>> मला वाटले सिग्नेचर स्पायडर असावा.

बकुळीच्या फळांबद्दल प्रथमच कळले.

0553.jpg
बॉक्स ग्रीलच्या पत्र्याखाली हे बांधकाम चालू आहे. लाल रंगाच्या माशा (?) आहेत. दरवर्षीच करतात. मग कधीतरी गळून जाते. आम्ही कधी काढत नाही. तसेही फार चिवट असते. पोकळ भोकांमधे पांढरी अंडी घालतात बहुतेक. "पेपर वास्प" असावे का???

वा नवीन धागा खुपच जोरात पळायला लागला आहे....... मस्तच...

मस्त मस्त फोटो पहायला मिळाले..... खुप दीवसांनी....... Happy

मागील पानावर जागूने ज्या कोळ्याचा फोटो टाकलाय तो बहुधा - argiope spider असावा. >>>>>> मला वाटले सिग्नेचर स्पायडर असावा. >>>>>>>बरोबरे - Signature spider म्हणजेच Argiope anasuja

मामी, चहाची पाने कच्ची खाऊन बघितली का? कशी लागतात ? आंबा घाटाजवळ एका डोंगरावर चहाच्या लागवडीचा प्रयत्न चालू आहे.

मधु, पहिल्यांदाच बकुळीची फळे खाताना जरा जपून. ती पिठूळ आणि गोडसर ( गोड नाहीत ) असतात. पण त्याचा तोठरा बसतो.

मानुषी... मस्त फोटो.

शशांक... मी मगे उल्लेख केलेल्या पुस्तकात् अशा छोट्या किटकांबद्दल बरेच काही आहे. उदा. या कोळ्याल
ते भक्ष्य आता खायचे नसते.. म्हणजे भविष्याकरत तरतूद की ! एवढा विचार तो करू शकतो ( शकते ! )

हाय निगकर्स...
चहाची फुलं पेरूच्या फुलांसारखी दिसताहेत.>>>+१ ... बरे झाले मानुषी ताई आठवण करून दिलीस ... मी आठवत होते कि असे काहीसे फूल पाहिले आहे म्हणून Happy

कालच घरात दोन नवीन मेंबर्स आले. बहिण भावाची जोडी - एस जुनिअर आणि रॉबिन Happy

परवा आमचा एस वारला. त्याला आम्ही १८ एप्रिल २०१२ ला दीड महिन्यांचा असताना दत्तक घेतले. त्यानंतर १ वर्ष ११ महिने तो आमच्या सोबत होता. तो २ वर्ष १ महिन्याचा होता.

तो गेल्यावर त्याच्याच रूपाने आम्हाला हि बहिण भावाची जोडी मिळाली. या दोघांना आम्ही IDA - India (इन डिफेन्स ऑफ अ‍ॅनिमल्स - इंडिया) कडून दत्तक घेतले. कालपर्यंत पाळणाघरात (foster होम) राहणाऱ्या या दोन पिल्लांना काल कायमचे आणि हक्काचे घर मिळाले. Happy

एस चे मायबोली वरचे फोटोस इथे पाहता येतील.

एस जुनिअर आणि रॉबिन चे फोटोस -

आम्हाला अजून तरी दोघांतला फरक कळत नाहीये. ट्वीन्स आहेत Happy

शो श्वीट दिस्तायेत झोपलेले..

झरबेरा... ___/\___ यू आर रिअली अन अ‍ॅनिमल ऑर रादर अ कॅटी लवर... Happy

हा आहे पळस. एकटा फुललेला दिसतो तेंव्हा नाही एवढ जाणवत पण असे खूप फुललेले पळस दिसले की कळतं इंग्रजांनी ह्याला दिलेले "फ्लेम ऑफ जंगल" हे नाव किती सार्थ आहे ते.

From mayboli
हा जवळून
From mayboli

अगं हा पळस नाही, तर पांगारा आहे. नेटवर पळस आणि पांगारा असे गुगलुन पाहा म्हणजे फरक लक्षात येईल. मीहीकित्येक वर्षे पांगा -या लच पळस समजत होते.

पळस केशरी रंगाचा असतो. इथे आहे बघ पळस. http://www.maayboli.com/node/6108

पळसाचे मी एक वैशिष्ट्य पाहिले. तोजेव्हा फुलतो तेव्हा त्याच्या फुले असलेल्या भागावर अजिबात पाने नसतात. केशरी रंगचा स्तंभ उभा आहे कीकाय असे वाटते त्याला पाहुन. मी एक्ष्प्रेस वे वर किमान तिनचार तरी झाडे अशी पाहिलीत ज्यांच्या खालच्या बाजुला हिरवीव्गर्र पाने आणि त्या पानांच्या वर एक भला मो ठ्ठा उंच केशरी स्तंभ.

-साधना

जागू कोळ्याच्या जाळ्याचा फोट अप्रतीम, चिक्कू आणि आवळे खाणारा मस्त

मामी चहाचे फोटो छानच , फूल पहिल्यांदीच पाहीलं

मानुषी काय आकाश आहे मस्त

मांजरं भारीच आहेत.

पळस सुंदर....

चहाची फुलं मी प्रथमच पाहतेय.
पण
मला ती चहाची फुलं नागचाफ्यासारखी वाट्ताएत.

फुललेल्या पांगा-याचा रान नजारा अप्रतिम.

झरबेरा तुझ्यासाठी जोरदार टाळ्या.

मनीमोहोर पळसाची फुले कुयरीच्या आकाराची असतात साधारण आणि केशरी. हा पांगारा आहे. आज मी पण पनवेलला जाताना रस्त्यात बर्‍याच ठिकाणी फुललेला पाहीला.

हो अंजली नागचाफ्यासारखी फुले दिसताहेत चाफाची.

मामी धन्स ग. आणि इथे लेक्चर आवडते सगळ्यांना अशा प्रकारचे.

पेरूच्या फुलाचा उल्लेख आला म्हणुन हे पेरूचे फुल. मला खुप आवडत ह्याच रुप पहायला.

हो ़ जागू ...मलापण!
जरबेरा काय गोड बाळं आहेत मनीची. ही एस चीच बाळ्ं वाटताहेत. त्यांचा खेळ बघण्यात ़ कित्ती तास जाऊ शकतात.
बादवे...तू यु ट्यूब वरचे फनी कॅट व्हिडिओ पाहिलेस का? हहपुवा आहेत.

Pages