निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली , शशांक, मस्त कविता.
प्रज्ञा, देवकी, वादिहाशु बद्दल धन्यवाद. ,

अंजली, शशांक मस्तच कविता Happy निसर्गा सारखी प्रसन्न...

मनीमोहोर , बिलेटेड हॅपी बर्थ् डे !!!

जो, सुंदर कॅशिया..

शांकली, अग ती कविता मी नाही केलीये. लोकसत्तात एका लेखात आली होती.
इशिकाला मराठीच्या पेपरची तयारी म्हणून गुढीपाडवा या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता मी घरी. तेव्हा ती ममा एखादी कविता सांग ह्यावर अस मागे लागली होती तेव्हा तिलाच पेपरमधून बघून सांगितली होती ही कविता,माझ्या फक्त कवितेच्या काही ओळीच लक्षात राहिल्या. तेव्हा तिला कवियत्रीच नाव पण सांगितल होत ते नेमक विसरायला झालय, ती आली की तिच्या लक्षात असेलच त्यामूळे तिला विचारून इथे टाकेल.
मनीमोहोर , बिलेटेड हॅपी बर्थ् डे !!!
जो सुंदर आहे गुलाबी कॅशिया.
अंजली, शशांक कविता मस्त!!!!!

जो, कॅशिया मस्त. गुलाबी रंग खासच वाटतोय.
वर्षु नील, उजु शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
उजु, कविता तुझी नसली तरी इथे आणि या वेळी म्हणजे वसंतात वाचायला छान वाटली.

जो... आई ग.. गुलाबी कॅशिया,, एकदम घायाळ.............
कसला बहरला आहे, बापरे............
दिल गार्डन गार्डन हो गया.....

अंजली + शशांक जी मस्त कविता...

Happy Happy

सायली अंगठी मस्त. मी करायचा प्रयत्न करेन.

चैत्राच्या कविताही अगदी सुंदर आहेत.

जिप्स्या कस्ली पांढरी फुले म्हणतोयस?? ब्रम्हदंडाची फुले रक्तवर्णी असतात.

जिप्स्या कस्ली पांढरी फुले म्हणतोयस?? ब्रम्हदंडाची फुले रक्तवर्णी असतात.>>>>हां ते माहित आहे. मी याच्याबद्दल बोलतोय.

मुलुंडहुन ऐरोलीला येताना टोलनाक्याच्या आधी, साधारण अडुळशाच्या पानासारखे पान असलेले एक झाड दिसले. झाडाची उंची साधारण १०-१२ फूट असेल. टोकावर पांढर्‍या रंगाची फुले फुलली होती. ४-५ पाकळ्या असलेल्या ह्या फुलांचे केशर वरच्या बाजुला होते. पानं पाहिल्यावर अडुळशाचेच झाड वाटत होते पण अडुळसा नक्कीच नाही.

Happy
तुम्हा सर्वांना कविता आवड्ल्याबद्द्ल धन्यवाद.

प्रज्ञा,देवकी वादिहाशु.

मनीमोहर बिलेटेड वादिहाशु.

गुलाबी कॅशिया............ ओ एम जी!!!!!!!!!!! फोटोवरूनच नजर हटत नव्हती प्रत्यक्षात काय झालं असतं पाहून...

हा..... आँखोंकी ठंडक!!!!

मानुषी... मस्त बहर.. अग इकडे पण मैलोमैल रस्त्याच्या कडेला असाच बहर आलाय (होता.. दोन दिवसापूर्वी पाहिला होता..)

आज फोटो काढाय्ला गेले पण हा>>य.. गेल्या दोन रात्रीत पडलेल्या जोरदार पावसामुळे आणी तूफानी वार्‍या मुळे

जमिनीवर गालिचा बनून गेलेली होती

काही होती ,फोटो काढलाय..पण इथे पिकासा बॅन असल्याने अपलोड नाही येते करता... काही दुसरी प्रॉक्सी वापरायला हवीये.. फिर भी अपने चायना के बारेमे कुछ वाईट साईट नय बोल्नेका..क्या???

ni. ga. mhaNaje jaagche tisare ( mdhale ) aptya. malaa puree tichya emails yaachy. ni. g.vr hallee kamee lok yetat. kaay karu yaa ? mee tilaa lihaacho aapN lihit raahu... lok yeteelach..

aaj tila ek aaee mhaNun dhnya vaaTat asel aaNi malaa ek ajobaa mhaNun.

ni. ga. mhaNaje jaagche tisare ( mdhale ) aptya. malaa puree tichya emails yaachy. ni. g.vr hallee kamee lok yetat. kaay karu yaa ? mee tilaa lihaacho aapN lihit raahu... lok yeteelach..

aaj tila ek aaee mhaNun dhnya vaaTat asel aaNi malaa ek ajobaa mhaNun.

मनीमोहोर मोगरा आहे का तो? माझ्याकडे सेम अस्सा पण पाकळ्या जास्त सुबक असलेला मोगरा आहे. फुलला की मिनी कमळ आहे असे वाटते.

मानुषी मस्तच गं.. कित्ती ते डॅफोज..

आमच्या घराजवळची सरकारी वसाहत तिथला विस्तीर्ण परिसर,वृक्षराजी आणि शांतता यामुळे मोरांचे वसतीस्थान आहे. आमची ही मोराची चिंचोलीच म्हणा ना!
काल व आज मी तिकडे खूप दिवसांनी फिरायला गेले. २०-२५ मोर,लांडोरी मस्त विहार करत होते.३-४ मोरांना तर उंच झाडावर उडून बसताना पाहायला मिळाले.झपकन उडताना पंखांचा होणारा आवाज,त्यांच्या केका ऐकायला मस्त वाटत होते! सध्या कमी उंचीचे गवत,पानगळ यामुळे त्यांचे स्पष्ट दर्शन होते आहे.
त्यांची थोडीशी झलक तुमच्यासाठी!

आमच्या घराजवळची सरकारी वसाहत तिथला विस्तीर्ण परिसर,वृक्षराजी आणि शांतता यामुळे मोरांचे वसतीस्थान आहे. आमची ही मोराची चिंचोलीच म्हणा ना!
काल व आज मी तिकडे खूप दिवसांनी फिरायला गेले. २०-२५ मोर,लांडोरी मस्त विहार करत होते.३-४ मोरांना तर उंच झाडावर उडून बसताना पाहायला मिळाले.झपकन उडताना पंखांचा होणारा आवाज,त्यांच्या केका ऐकायला मस्त वाटत होते! सध्या कमी उंचीचे गवत,पानगळ यामुळे त्यांचे स्पष्ट दर्शन होते आहे.
त्यांची थोडीशी झलक तुमच्यासाठी!

Pages