निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी...
धन्यवाद जिप्सी इथे फुलांचा रेफरन्स दिल्याबद्दल... Happy

आमच्या घोरवडेश्वरला (लेख इथे) अवचित कधी दुर्मिळ फुले दिसतात, त्यांची नावे कळल्यास आनंद होईल...

1. Kuda.
4. Kudachya khalche dhaman
8. Fadya nivdung.
10. Sonpankhi.
13. Shalmali/katesavar
17. devchafa
25. Ran jaee
26. Terda
27.rantil
29. Sonki
32. Kanchan

Discoverसह्याद्री निगवर तुझे मनापासुन स्वागत. Happy

कधी दुर्मिळ फुले दिसतात, त्यांची नावे कळल्यास आनंद होईल... >>>>>इथे फोटो टाकत जा रे, फुलांची नावं नक्कीच समजतील. Happy

मानुषीताई, ती सगळीच फुले आणि त्यांचे फोटो एकदम भारीए. Happy

पिंपळपान

पिंपळाच सारं सौंदर्य पानांच्या बहरात आणि त्यांच्या सळसळण्यात होतं. उन्हाळ्यानंतर निष्पर्ण पिंपळावर पिवळ्या रंगाच्या पानांच्या कळ्या येत. एके दिवशी त्या कळ्यांची आवरणं गळून पडत आणि सर्व फांद्यावर लाल-किरमिजी रंगाची कोवळी मुलायम पानं फुलतं. पिंपळाला या पान-फुलांवरच समाधान मानावं लागे. पण त्यातही केवढं अफाट सौंदर्य असे!! या पारदर्शक पान-फुलांची पोपटी पालवी होत असे. कालांतराने त्या नाजूक पानांची लांबसड्क, ताठ, हिरव्या रंगाची पानं होतं. उभी लोंबणारी पिंपळपान वार्‍यानें एकमेकांवर आपटुन होणारी सळसळ अस्वस्थ करणारी असे. मंद झुळुकीवर त्यांचा आवाज श्रावण-निर्झरासारखा वाटे, वार्‍यामध्ये तो धबधब्यासारखा वाटे, तर एखाद्या सोसाट्याच्या वादळात तो खवळलेल्या समुद्रासारखा वाटे.
ग्रेस यांच्या शब्दातः
"श्वासांचे घेऊन बंधन, जे ह्रदय फुलांचे होई
शिशिरात कसे झाडांचे, मग वैभव निघून जाई
सळसळते पिंपळपान, वार्‍यात भुताची गाणी
भिंतीवर नक्षत्रांचे, आभाळ खचविले कोणी"
(लेखकः श्रीकांत इंगळहळीकर - पुस्तकः "आसमंत")

जागू, <<<<<< ह्याचे नाव काय नक्की? अशा आकाराचे आमच्याकडे २-३ प्रकारचे पक्षी येतात >>>>

ही सूर्य पक्षाची मादी आहे असे वाटते.

जिप्सि, तूला शाळेत "पिंपळपान" हा निबंध होता का ? बहुतेक पु. भा. भावे यांचा होता तो. उन्हाळ्याची तल्लखी आणि त्याला वेडावून दाखवणारी पिंपळाची पालवी याचे मस्त वर्णन होते. कदाचित मानुषीला आठवत असेल.

मानुषी, घरच्या गुगल क्रोम वर विंडोज चे शील्ड बसलेय. ते चालतच नाही. आय ई वर मराठी टाईप करायला युगं लागतात.. आता भारतात आलो कि तो रिपेर होणार Sad

जिप्सीभौ धन्यवाद!
दिनेश...मराठी टायपिंग.... Uhoh
पिंपळ्पान अंधुक आठवतय....पण आता मात्र ते मिळ्वून वाचावसं वाट्तय....आणि वरच्या झाडाचे..इन्डोर प्लान्ट...नाव ?

मानुषी, तिकडे कदाचित चायनीज संत्राचे इनडोअर व्हर्जन मिळू शकेल. त्याला घरातही संत्री लागतात. कुठेतरी बघितल्यासारखे वाटतेय.

चायनीज संत्री....बघूया होमडेपोत मिळ्तं का. काही काही लावायचा प्लॅन आहे मुलांचा.

जिप्सि, तूला शाळेत "पिंपळपान" हा निबंध होता का ? बहुतेक पु. भा. भावे यांचा होता तो. उन्हाळ्याची तल्लखी आणि त्याला वेडावून दाखवणारी पिंपळाची पालवी याचे मस्त वर्णन होते. >>>>>>> येस! पु.भा.भाव्यांचाच लेख आहे.मला नाव आठवत नव्हते.धन्यवाद दिनेश.
मानुषी, फुलांचे फोटो झकासच.नावे पण लिहाल का?

मानुषी मला नाही ग माहीत त्या झाडाचे नाव.

ओके तर ही सूर्य पक्षाची मादी आहे. धन्स.

जिप्स्या छान उतारा.

ह्याला हेलिकेनिया म्हणायच की बर्ड ऑफ पॅराडाइज?
40" width="480" />

देवकी मला नावं माहिती नाहीत.
हे तर खोटं फूल वाट्तं. अजून या झाडांना पानं नाहीत. पण फुलं आली आहेत. आत्तापर्यंत खराटेच होते.



जागु, हे हेलिकोनियाच ग.. शशांकने लिहिलंय बघ मागे साने मॅडमवर त्यामध्ये चित्रे दिलीत दोघांचीही.

जिप्सि, तूला शाळेत "पिंपळपान" हा निबंध होता का?>>>>नाही दिनेशदा.

मानुषीताई, छान फुल. Happy
माझा फु.स. (निगवर फोटो टाकला आहे म्हणुन सांगण्याचं धाडस करतोय.)
पहिल्या तीन फोटोमध्ये फोकस गंडलाय. फोकस फुलांऐवजी कार आणि भिंतीवर झालाय त्यामुळे फुलं ब्लर दिसत आहे. अशावेळी कॅमेरा क्लिक करताना हाफ क्लिक करून आधी ऑब्जेक्ट सिलेक्ट करावा आणि फोटो काढावा. Happy

'पिंपळपाने' यांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार.

Discoverसह्याद्री,जागू,मानुषी फोटो आवडले.

जिप्सी, खरोखरच पिंपळाचे सौंदर्य त्याच्या सळसळण्यात असते.विशेष म्हणजे ही सळसळ जशी ऐकू येते, तशीच लांबूनही डोळ्यांना पण जाणवते! त्याच्या पानांचा लांब देठ,हृदयाकार आणि पानांचा पुढचा टोकदारपणा यामुळे हे घडते.अगदी थोड्या वाऱ्यानेही पाने हलतात.यामुळेच पिंपळाला 'चलदल' असेही म्हणतात.पिंपळाची पानेही हलत नाहीत तेव्हा वारा पडला असे सांगतात.

अश्वत्थ,बोधिवृक्ष,कृष्णावास,पवित्रक,कुन्जराशन अशी त्याची विविध नामाभिधाने त्याची छान ओळख करून देतात.जसे अ=न,श्व=उद्या,त्थः=तिष्ठति म्हणजे आज घातलेले पाणी दुसऱ्या दिवशी तेथे राहत नाही.त्याच्या पानातून पाण्याचे तुषार खाली पडत असतात.याची पाने हत्तीचे आवडते खाद्य म्हणून कुन्जराशन वगैरे. हिंदू व बौद्ध धर्मातही या वृक्षाला महत्वाचे स्थान आहे

मारुती चितमपल्ली यांनी 'पाखरमाया' पुस्तकात 'सोन्याचा पिंपळ' या लेखात वाचनीय माहिती दिली आहे.

आयुर्वेदातही त्याचे औषधी म्हणून आगळेच महत्वआहे!

मनुषी... खुप गोड फुलं...

जागु कैर्‍या तोपासु.

जिप्सी ... सुरेख वर्णन..

मला ती शिंपी पक्षाची मादी वाटते आहे.... आमच्या कडे पण येते खुपच चपळ असते...

Discoverसह्याद्री... स्वागत...

Pages