निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान गप्पा आणि प्र चि.
नवीन ब्लॉगबद्दल जिप्सीचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेछा! ब्लॉग बुकमार्क केला आहे.

कालिना यूनिवर्सिटीच्या रोड वरील नर्सरी ( रोडच्या दुतर्फा असलेली) रोडच्या खोद कामा निमित्त हलविण्यात येत आहे..... फारच कमी किमतीत झाडे विकत आहेत ....त्वरा करा ........ कुणाचे तरी नुकसान ... कुणाचा तरी फायदा ...... मात्र निसर्गाचा फायदा व्हावा हीच अपेक्षा ........

सुप्रभात!!!
एकदम सुपरफास्ट धागा!!! काय वाचू किती वाचू असे होत असते.

0534.jpg
कडक उन्हात हा फोटो काढला आहे. साधारणपणे ही फुले केशरी रंगाची पाहिली आहेत. पण या झाडावरची फुले पांढरट होती. मधे मधे केशरट रेषा होत्या.

साधना, केक खरच छान झालेला दिसतोय... माझ्या कडुन लेकीला शाब्बास....
काय वय आहे ग तीचे?

मनीमोहर... वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा!!!!

जागु कडचे जाम जाम रसाळ दिसतायत!

अग शाब्बासकी वगैर देण्याइतकी लहान नाहीय. गेल्या वर्षी अ‍ॅडल्ट झालीय. आता या वर्षी टिनेज पण संपेल. मोठ्ठी जबाबदार नागरीक आहे ती आता Happy

मणीमोहोर, वादिहाशु.. Happy

मुलुंडहुन ऐरोलीला येताना टोलनाक्याच्या आधी, साधारण अडुळशाच्या पानासारखे पान असलेले एक झाड दिसले. झाडाची उंची साधारण १०-१२ फूट असेल. टोकावर पांढर्‍या रंगाची फुले फुलली होती. ४-५ पाकळ्या असलेल्या ह्या फुलांचे केशर वरच्या बाजुला होते. पानं पाहिल्यावर अडुळशाचेच झाड वाटत होते पण अडुळसा नक्कीच नाही. ऑफिसबस मधुन जात असल्याने (आणि अर्थातच कॅमेरा सोबत नसल्याने) फोटो काढता आला नाही. Wink

रच्याकने, ऐरोली स्टेशनच्या बाहेर (दिघा गावाच्या बाजुला) भरपूर सॉसेज ट्री आहेत. घोसाळ्याच्या आकाराच्या सॉसेजेसमुळे लगेच ओळखता येतात. काहि झाडावर फुलेसुद्धा दिसली. Happy

या लिंकवर पहा: (फोटो मोठा पाहण्यासाठी फोटोवर टिचकी मारा Happy )
http://www.mgonlinestore.com/sausage/

जिस्प्या, त्या रस्त्यावर धणसोलीपर्यंत महापालिकेने ही ब्रम्हदंडाची झाडे लावलीत. माझ्या पारसिक हिलवरही थेट वरपर्यंत दोन्ही बाजुला ही झाडे आहेत.

काल भावाने त्याला भेटलेल्या पिवळ्या टॅबेबुयाचा फोटो पाठवला. कांदिवलीला महिंद्र फॅक्टरीच्या आवारात आहे. बराच फुललाय. रात्री फोटो टाकते. तोवर कोणी तिकडचे असेल तर पाहुन या.

ज्ञानेश, धन्यवाद. मला जायला आवडले असते पण सध्या जमणार नाही. भावाला कळवते, त्याला रस असेल तर तो जाईल.

महापालिकेने ही ब्रम्हदंडाची झाडे लावलीत>>>>>म्हणजे नक्की कुठली? सॉसेजेस ट्रिला "ब्रह्मदंड" म्हणतात का?

आणि ती पांढरी फुले कशाची असावीत?

(आणि अर्थातच कॅमेरा सोबत नसल्याने) फोटो काढता आला नाही>>>>>>>>>>तुझ्या बायकोने, तिच्या सवतीला लपवून ठेवलं वाटतं Wink

हे... सर्वांच्या छान गप्पा चालू आहेत......
पूर्वीचे सारे भाग वाचणे चालू आहे.
जागू, साधना हे असं निर्मळ्पणे निसर्गाबद्दल वाचायला किती मजा येतेय.
पण माझी सध्या वाचन साधनाच चालु आहे.
हि माझी एक वसंत ऋतू ची कविता ....
मधुमासाची चाहूल धून

गाऊ लागले रान कधीचे
मधुमासाची चाहूल धून
पळस तरुंचे केसरिया बन
सर्वांगानी उभे फुलून- मधुमासाची चाहूल धून

गोड गुलाबी मधु फुलांनी
उभी शाल्मली साज सजून
पांगारेही उधळून होते
तुरे पोवळी पानांतून- मधुमासाची चाहूल धून

जर्द पिवळा गर्द बहावा
रंग उन्हाचा आला खुलून
माध्यान्हीच्या प्रहरी डोलत
मॄदू कोवळे भासते ऊन- मधुमासाची चाहूल धून

तसा काहीसा गुलमोहरही
लाल केशरी उभा उमलून
म्हणे रंग उन्हाचा हा ही असतो
झुलत होता मन हरखून- मधुमासाची चाहूल धून

अनेकरंगी बोगनवेली
परोपरींनी आली फुलून
मोगरा चाफा मधुमाल्ती तर
सुखावणारे गंध भरुन- मधुमासाची चाहूल धून
-अंजली चितळे
फोटो लोड करायला आपले सारे फोटो गुगल + च्या अकाऊंट वर टाकावे लागतात कां?
मला कुणी सांगेल कां?

वा, अंजली चितळे - उत्तम काव्य ....

हा घ्या माझा झब्बू - http://www.maayboli.com/node/48353

चैत्राची चाहूल

चैत्राची पालवी
तांबूस कोवळी
तप्त निखार्‍यात
शीतल साऊली

पळस पांगारा
फुलला भरारा
पावला भरुन
मनाचा गाभारा

शुभ्र रातराणी
मोगरा साजणी
खुळावले मन
सुगंध गगनी

रंग उधळण
मुक्त पखरण
पक्षीगण कंठी
चैतन्याचे गान

नील-लाल-पीत
पताका भरात
उभारल्या गुढ्या
हिरवी कनात

सृष्टीचे सृजन
फुटे पान पान
सोहळा देखणा
भरारले मन

अरे वा! आज नि.ग. चा धागा काव्यरुपात बागडतोय अगदि !
मनिमोहोर वाढदिवसाच्या शुभेच्छा !
जिप्सी, अभिनंदन !

अंजली, काय मस्त कविता आहे! जियो!! खूप आवडली! ह्या वसंत वैभवाचं अगदी समर्पक शब्दचित्रंच तुम्ही रेखाटलं आहे!! Happy

Pages