होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिली Happy

मंजुडी.. शब्दखुणांमध्ये घारगे, गोडाचा शिरा इ. टाक ना.
फारच सिरियस धागा वाटतोय हा.

मंजू, धागा इतका फॉर्मल नको ठेउस........
जरा इतर विषयावर चर्चा करायला पण मजा येईल अग.

अशोक मामा,

मंजून माझं आणि दक्षिणाच काम आधीच केलं.
आता आजचे अपडेट्स वाचायला आम्ही वाट पाहतो....

फोटोतले घारगे शरयुने न आणलेल्या भोपळ्याचे का?

बेफि
आपटे हेल्थ प्रशाला
आमचे सुंदर ठाणे (विशेषत: मल्हार थिएटरजवळचे)

बरं झालं नविन धागा काढला... आताही मी ही येईन इकडे Happy
बाकी प्राचीचे घारगे एकदम मस्त्तच!!! Happy (शरयु ने कुठे आणलाय पण भोपळा? Uhoh )

आज गोखल्यांकडे शरयूने आणलेल्या भोपळ्याचे भगरीचे पीठ घालुन केलेले घारगे आणि चोचलेल्या काकडीची दाण्याचा कुट आणि दही घालुन केलेली पातळ कोशिंबीर हा मेन्यु आहे महाशिवरात्री निमित्त. Happy

पण जान्हवी त्यांना कवठाचा गर घालुन केलेली भगरीची खिचडी खायला घालुन सगळ्यांचे मन जिंकणार बहुदा आणि लक्ष्मीकांत घरी येणार.

विशेष सुचना जास्त आवडलीये Proud

मधुरा, तुम्ही होसुमीयाघवरच्या गप्पा (पारावरच्या गप्पा टाईप्स ;)) असं वाहतं पानं काढा त्यासाठी Proud

रिया., त्या धागा-१ वर तू रश्मीवर भडकलीस, पण नंदिनी-भरत मयेकरांना सोडून दिलंस........ हा न्याय नव्हे Proud Proud

तेच की माधव...
लोकांना ना काही कळतच नाही. (माझ्यासारखीला) फुक्कट सूचना करत बसतात : शब्दखुणा हव्यात, धागा सिरीयस वाटतोय, धागा फॉर्मल नको इत्यादी इत्यादी..... गंमतीजंमती काय ठरवून थोड्याच करायच्या असतात?

Biggrin

रिया त्या धाग्यावरच त्याच धाग्यावर का नाही संपवलस?? Wink आता इथे नविन काहीतरी Happy

बर ते जौद्या, मालिकेविषयी - सगळ्यांची तुटलेली नाती जान्हवी सांधु शकेल काय असे प्रोमो येताहेत त्यावर बोला.

माधव, आहेत कि काही पोस्ट मालिकेच्या, गोखल्यांच्या घरातल्या पदार्थांचीच चर्चा चालू आहे. त्यात सर्व बायका जास्तीत जास्त किचनमध्ये काय करायचं ह्याचाच विचार करत असतात.

सगळ्यांची तुटलेली नाती जान्हवी सांधु शकेल काय असे प्रोमो येताहेत त्यावर बोला >>> अजून ही मालिका लोक बघताहेत? Uhoh Proud

I do not agree how they are taking away Sharayu's freedom to get out of the house. this is against constitutional rights.
she should sue the old lady. And six ladies among themselves cannot decide that each of them does need a guy in her life
they have to be exceptionally dumb or in denial mode perpetually.

Its the 21st century, no woman needs to live like this.

अमा, अगदी बरोबर. आमच्याकडे ओमिशा असे दोन उत्तम वकिल आहेत. त्यांना केस देउयात.

तळटीपः यात जरी ओमिशा असले तरी केस ही होसूमी..... याच मालिकेतल्या पात्राची आहे याची नोंद घेण्यात यावी.

ut Ama they have been living like this for years now.>>> so does it make right?

मुलगा दारूडा आहे तर त्याला व्यसनमुक्ती केंद्रात घाल, कामात अडकव. बायकोला मारहाण करत असेल तर काऊन्सिलरकडे घेऊन जा. त्याचे अजून काय मानसिक प्रॉब्लेम असतील तर त्यात मदत कर.

एखाद्याला / एखादीला घराबाहेर काढणे हा दारू वर कसा काय उपाय होऊ शकतो ते मला आजवर समजलेले नाही.

Pages