निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अन्जू
पण आज सगळं बन्द. परवाच बाहेर ़ जाऊन किराणा भाजी सगळं भरून ठेवलं. स्नो चं प्रेडिक्शन होतंच.
अजूनही स्नो चालूच. सगळे म्हण्ताहेत की .....( तसाही हा लॉन्ग वीकेन्ड आहे, सोमवारी पण कसलीशी सुट्टी आहे.) स्नो असाच चालू रहावा म्हण्जे ..... वीकेन्ड अजूनच लॉऑऑऑऑऑन्ग मिळेल.

बाहेर असा बर्फ पडत असावा आणि मस्त कॉफी पित घरात बसावं !!!

आज ( १४ ) वर्षूच्या लग्नाचा वाढदिवस... वर्षू आणि रमेशभैय्याना हॅपी वेडींग अ‍ॅनिव्हर्सरी..
परवा भेटली तर तिला न्यू यॉर्कर दाखवा आणि मग तिथेच बाजूला कुल्फी कित्ती छान मिळते ते पण सांगा.. मग कोपर्‍यावरच कैलाश पर्बत उघडं आहे का ते पण पहा.

दिनेशदा.....कॉफी कसली पिता...:स्मितः ड्राइव्हवे साफ करताना पूर्ण आठवड्याचा घाम निघाला.
संपूर्ण कम्युनिटीत आज सामुदायिक रित्या हेच दृश्य होते.
बादवे.....वर्षू तुम्हा दोघांना हॅप्पी वेडिंग अ‍ॅनिवर्सरी !

अबब...... केवढा हा बर्फ!!! एन्जॉय!!!!!

dudhi bhopala.jpg

बाळ दुध्या ... बालदुध्या झाला.

मानुषी - मस्त आहेत गं फोटु .... बर्फच बर्फ चोहिकडे ...

दुध्याची वाढ फारच जोरात दिस्तेय ... कोणतं टॉनिक/खत देता या बाळाला ??

क्या बात है, मानुषीताई. मस्त फोटोज.
तो पांढराशुभ्र बर्फ कसला सह्ही दिसतोय.
मी अजुन एकदाही स्नोफॉल पाहिला नाही. फिनलंडला तीन महिने होतो पण मायदेशी परतल्यानंतर एका आठवड्यात तिथे स्नोफॉल सुरू झाला. Sad Happy

कित्ती मज्जा ना.. बर्फ किती मस्त दिसतोय... अगदि हातात घ्यावासा वाटतोय..

जिप्स्या, तुझ्या लेहमधल्या कमेंट आठवल्या.. ज्यांना दरी बघायचीय त्यांनी उजवीकडे पहा, ज्यांना बर्फ, त्यांनी डावीकडे... Happy

आहाहा! काय बर्फ़ आहे. खेळावसं वाटतय त्यात. Happy (इथे थंडीने कुडकुडतेय :फिदी:)

वर्षू, तुम्हा दोघांनाही "लग्न वाढदिवसाच्या" हार्दिक शुभेच्छा! Happy
Copy of DSCN1434_0.jpg

वर्षूताई लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तिने मस्त कोलंबी मसाला केलाय आज. चला जेवायला. Lol

मानुषी मस्त बर्फ आहे ग.

जिप्स्या, साधना तुम्ही उद्या किती वाजता जाणार आहात राणीच्या बागेत? उजूलाही यायचेय.

अरे हो, उजुला फोन करायचा विसरलोच. Sad
जागू, उद्या आम्ही भल्या पहाटे ठिक ९ वाजता राणीबागेत (मुख्य प्रवेशद्वारासमोर) भेटणार आहोत.

जागू, उद्या आम्ही भल्या पहाटे ठिक ९ वाजता राणीबागेत (मुख्य प्रवेशद्वारासमोर) भेटणार आहोत

जिप्स्या, आज तुझा पहिला वॅलेंटाईन आहे रे.. उद्या भल्या पहाटे ९ ला उठशील ना?? की डिस्टर्ब करायला फोन करु रामप्रहरी ८ वाजता?????? Wink

वर्षु, आजचा उरलेला केक उद्या जर आणला नाहीस तर राणीबागेत नो एंट्री हा..... Happy

आणि माझ्या शुभेच्छा केक खाल्ल्यावरच मिळणार....

साधने, Lol

जिप्स्या नाही रे उद्या श्रावणीची शाळा आहे. शिवाय ९ वाजता तिथे पोहोचणे तर मला शक्य नाही. तू छान छान फुलांचे फोटो काढ आणि मला पाठव.

साधना Lol

वर्षूतै... मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा!!...........:स्मित:

जिप्स्याचं काही खरं नाही! Wink

जिप्स्या, आज तुझा पहिला वॅलेंटाईन आहे रे.. उद्या भल्या पहाटे ९ ला उठशील ना?? की डिस्टर्ब करायला फोन करु रामप्रहरी ८ वाजता??????

.......हं.....लागले ़ का जिप्सीच्या मागे? असो.... राणीबागेतला वृत्तांत लिहा बरं....

वैशाली,आर्या,शोभा,शांकली.. थांकु गा सर्वांना..
कोलंबी मसाला... मस्त झाला ... जागु जिंदाबाद!!!!!!!!

आज मस्त मस्त झाली ट्रिप... खूप मजा आली..

Pages