निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वगत - 'ही मुंबैकर मंडळी बहुधा मुद्दाम हे असे प्लॅन्स इथे देताहेत वाट्टं! राणीबाग काय, खादाडी काय!! रोपं काय !
काय चाल्लंय काय?' जौंदे जौंदे... छोड दिया...:डोमा:

शांकली Proud

सकाळी ठिक ९ वाजता राणीबागेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भेटुया. Happy
आधी प्रदर्शनात भेट देऊन मग राणीबागेत फेरफटका मारूया. पुढच्या कार्यक्रम तिथेच ठरवूया. Wink

मेरवानचे केक सकाळी साडेसातलाच संपतात?? मग उरलेला दिवस मेरवान करतो काय? झोपा काढतो?? पब्लिक डिमांड इतकी आहे तर त्याला केकच्या अजुन दहा बॅची बनवायला काय जातेय? त्याचे दुकान बंद होत असण्यामागचे खरे कारण त्याला केक बनवायचा कंटाळा हे तर नाही ना??? मेरवानच्या जागी जर एखादा मारवाडी असता तर ते केक आज कुठल्या कुठे गेले असते....

मेरवान मुंबईचे चितळे आहेत का?????
(ही कमेंट माझी नाहीय बरं... Happy )

त्याचे दुकान बंद होत असण्यामागचे खरे कारण त्याला केक बनवायचा कंटाळा हे तर नाही ना??? >>>>:हहगलो:

दहा बॅची बनवायला काय जातेय? त्याचे दुकान बंद होत असण्यामागचे खरे कारण त्याला केक बनवायचा कंटाळा हे तर नाही ना?? > Lol

ए काय प्लॅन्स चाललेत मस्त. मला पण यायला पाहीजे राणीच्या बागेत. बघते जमले तर. आणि ते कंद मलाही घ्यायचे आहेत. माझ्या लहानपणी वडीलांनी आणले होते.

आमच्या मनिमाउला दोन बाळे झाली. आज त्यांचा हॅपी बर्थ डे. उद्या माझा आहे.

Happy Happy

फोटो नंतर.

आजही वॉकला गेले होते. तर एका झाडावर अगदी झाडावरच्या पानांच्या रंगाचे पक्षी अगदी झुंडीने बसले होते. पण लांबून आजिबात लक्षात येणार नाही इतके कॅमॉफ्लॉजिन्ग होते.
मी जवळ गेल्याबरोब्बर फर्रदिशी सगळे उडले तेव्हा कळ्लं की इथे पक्षी होते. साधारण पणे कबुतरापेक्षा लहान आणि विट्करी रंगाचा पोटाचा भाग होता. नीट काही कळायच्या आत उडून गेले.
आता उद्या याच वेळी ( दु. १२ ते १) जाईन. अजूनही इथे प्रचंड थंडी असल्याने हाच टाइम बरा पड्तो.

साधना, नाही गं. तेव्हा वांगी नव्हती, पण काही फुले होती. त्यांचा फोटो काढला नाही. हे माझ्या ऑफिसमधले कुंडीत लावलेले झाड आहे.

20140212_080951.jpg

घरी आलेले कारले... छान मोठे होउ दे म्हणून काढले नव्हते आणी आज असे झाले :)... मी पहिल्यांदाच पाहिले ... शिवाय घरी आलेले म्हणून जास्त आवडले

कारले पिकुन फुटले. Happy मस्त रंग येतो ना अशा कारल्याचा.

नव्या मुंबईतल्या प्रदर्शनामधुन मी गांडूळखत निर्मितीचे किट घेतले. किंमत १००० रुपये. खुप जास्त वाटली. पण जे गृहस्थ हे विकत होते त्यांची निसर्गाबद्दलची कळकळ पाहुन मी दिले १००० रुपये.

आणि तसेही मी घरातला कचरा फेकुन देत होते. कच-यापासुन खत करु करु म्हणत खरे तर काहीच करत नव्हते. आता रेडीमेड किट घरात आल्यावर रोज कचरा टाकायला लागले त्यात. चार महिन्यानी पहिला हप्ता मिळेल गांडूळखताचा.

माझ्या घरी दोन अननसे आलीत. पण पहिले खुप लहान आले, दुसरे अजुन बाल्यावस्थेत आहे Sad त्याला खतपाणी नीट नाहीय त्यामुळे असे झाले असावे. दुस-याकडे आता नीट लक्ष पुरवते.

पालक, माठ, ढोबळी मिरचीच्या बीया घेतल्या विकत. आता परत सुरू करते घरच्या घरी भाज्या Happy

दिनेश, तुम्ही दिलेल्या बेसिलची सहा सात रोपे आली. दोन पाने आली, आता दोनाची चार झाली Happy अजुन खुप बीया आहेत शिल्लक.

वेलीच्या बीया पेरल्या नाहीत अजुन. एक बी मी पेरेन.जागूला देईन असे म्हणतेय पण जागुकडे जाणे झाले नाही. जाईनजाईन म्हणतेय नुसते.

चार पाच रोपे घेतली गवती चहा, निवडूंग, कापुर तुळस, कृष्ण तुळस. मल्लीगे मोगरा म्हणुन एक मिळाले रोप ते घेतले. आणि अतिशय सुंदर वेरीगेटेड आयवी मिळाली. फोटो टाअकेन. कधीकाळी माझ्याकडे तुळशीचे बन झालेले. आता विकत घ्याय्ची वेळ आली. किती आळसपणा केलाय मी...

अय्यो... मल्लिगे म्हणजेच मोगरा काय?
आणि गिरिश कर्नाडच्या 'चेलुवी'मधे दाखवलेली फुलं कोणती???

महानगरपालिका आयोजित फळ, फुल, झाडांचे प्रदर्शन पुण्यात सुद्धा आहे संभाजी उद्यानात. १५ /१६ लाच बहुतेक. जमेल त्यांनी जरूर जा.>>>>>>>>>>.नक्की तारीख आणि वेळ क़ळेल का? रविवारी असेल तर ३-४ वाजता जाता येईल. बघा कुणा कुणाला जमेल . Happy

मानुषी वॉकला जातेस की पक्ष्यांची सभा उधळायला?? >>>>साधना.....:खोखो: ...।असो...पण मलाही तसंच वाट्लं!
नंतर जरा सर्च केला तर लक्षात आलं की ते रॉबिन असावेत.
जाणकार प्रकाश टाकतीलच.

हं.... साधना बरेच प्लॅन्स दिसतात. शुभेच्छा! खत किटाचा फोटू टाका की वाइच.
माझ्या खताचा प्रोजेक्ट फार यशस्वी झाला होता. आता परत गेले ़ की पुन्हा चालू करीन.
नारळाच्या झाडाला खत घातलयावर् चा फरक खूपच जाण्वला.

मधु मकरंद - या फोटोतला हा "बाळ दुध्या"च आहे ना ?? Happy Wink ... दुधी भोपळा

Lagenaria siceraria Family: Cucurbitaceae (Pumpkin family)

मस्त आहे फोटो .... पूर्ण वाढ झाल्यावर कसा दिसतो तो फोटोही येउंदेत .... Happy

मधु मकरंद - या फोटोतला हा "बाळ दुध्या"च आहे ना ?? >>>>> हो. पुन्हा हे माझ्या ऑफिसमधले कुंडीत लावलेले आहे. माळ्यांची करामत!!

अरे वा.. बाळ दुध्या अजुन बाळ आहे तोवर मान वर करुन जग पाहुन घेतोय वाटते... नंतर बिचारा ओबेस होईल आणि कायम मान खाली घालुन बसेल Happy

मानुषी Happy आज गुपचुप, पाय न वाजवता जा.. म्हणजे त्यांना कळणार नाही....

अंगणात पारिजातकाचे झाड लावायचे आहे. कसे लावतात?

त्याचे वाळलेले बी पेरुन झाड येते का? की, लहान रोप लावावे लागते?

सुप्रभात.
लक्ष्मी गोडबोले बिया लावूनही रोपे येतात. पण सगळ्याच बिया रुजतात असे नाही. म्हणून ३-४ लावून ठेवायच्या. रोप नर्सरीत मिळते.

साधना तुला माझ्याकडे यायला उशीर झाला तरी चालेल पण माझ्या बिया ठेव$$$$$$$$$$$$

मला जमले तर मी येईन तुझ्याकडे.

Pages