निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश,, कस्टर्ड वगैरे मंडळी संपलेली Sad Sad तिथल्या वेटराने काय शिल्लक आहे याची यादी वाचली आणि आम्ही ते मागवले. खाता खाता 'अजुन एक प्लेट पॅटीस आण' म्हटल्यावर त्याने अर्धी प्लेट आणली आणि ही शेवटची म्हणुन सांगितले... काय लोक आहे यार.. रोज करताय पदार्थ तर करा ना भरपुर. हॉटेल चांगले भरलेले होते.. पण लोकांना भुर्जी पावापलिकडे दुसरे काही खायला घालायचेच नाही असे ठरवलेले.

मी कॉइन केक असे नाव असलेली नानखटाईसदृष्य बिस्किटे घेतली. ती सुरतच्या कुठल्यातरी पारशाने बनवलेली आहेत (बहुतेक धोतीवाला ) काय अफलातुन आहेत.. आहा..

जिंजर नावाची बिस्किटे मात्र दातपाडू आहेत एकदम... Sad

शशांक... Happy

साधना, माझे वडील व्होल्टास मधे होते त्यावेळी मुद्दाम ग्रँट रोड ला उतरून ते केक आणायचे. म्हणजे किमान ४५ वर्षांपासून तरी ते केक आमच्या घरी येताहेत. त्यावेळी आकार जरा मोठा असायचा आणि ४० पैसे किम्मत असायची. त्यानंतर इतर अनेक ठिकाणी मावा केक खाल्ले, पण ती चव कुठेही नव्हती.

राणी बाग मात्र फुललेली नव्हती. त्यामुळे आम्ही आधीच खट्टू झालो, त्यात पावसाने हजेरी लावुन उरल्या सुरल्या आनंदाची पण भिगी बिल्ली करुन टाकली. विचित्र हवेने डोके इतके दुखायला लागले की कधी एकदा चहाचा कप मिळतोय असे झाले.

न्युयोर्करला जायचे राहुन गेले. आता एप्रिलमध्ये परत जाऊन बहर बघायचा, दाजी लाड बघायचे आणि मग न्युयोर्कर खायचे , वर कुल्फी दाबायची असा बेत शिजतोय Happy

आनंदाची गोष्ट ही की राणीबागेत झाडांवर नावे लिहिलीत आता. त्यामुळे झाडे ओळखता यायला लागली. तरी कृष्णवड सापडला नाहीच. त्याला तसेच सोडुन पळालो शेवटी.

दिनेश, माझे बाबा पण केक आणाअयचे त्याच्याकडुन. मेरवान नेहमी कागदात चांगले गुंडाळून, पॅकिंग करुन केक द्यायचा. पिवशी दिलेली मला तरी आठवत नाही.

आनंदाची गोष्ट ही की राणीबागेत झाडांवर नावे लिहिलीत आता. त्यामुळे झाडे ओळखता यायला लागली. तरी कृष्णवड सापडला नाहीच. त्याला तसेच सोडुन पळालो शेवटी. >>>>>>>
आमच्यासाठी आनंदाची गोष्ट ही की राणीबागेबाबत अखेर लिहिले कोणीतरी ...... नाही तर इतका वेळ नुसती खादाडीचीच चर्चा ..... Happy Wink
.....अरे पूर्वीची मंडळीच वेगळी होती, त्यांची गोष्टच वेगळी -तहानभूक हरपून झाडे, पाने, फुले पहायची - फळे तर अजिबात नाही... चुकून तोंडाला पाणी सुटले तर ..... Happy Wink

कृष्णवड ला मागच्या वेळीच टेकू लावलेले होते. मणिमोहोराच्या झाडाकडून आपण वळतो आणि पाचुंद्याच्या आणि चेंडू फळाच्या झाडाकडे येतो, तिथेच आहे कृष्णवड.

.....अरे पूर्वीची मंडळीच वेगळी होती, त्यांची गोष्टच वेगळी -तहानभूक हरपून झाडे, पाने, फुले पहायची - फळे तर अजिबात नाही... चुकून तोंडाला पाणी सुटले तर .....

गेलेSSSSSSSSSSSSSSSSS ते दिन गेलेsssssssssssssss

आणि राणिबागेत फळांच्या (माणसे खाऊ शकणा-या) झाडांवर बंदी आहे, जर समजा नसली तर मग माणसे येण्याच्या वेळेस फळे येण्यावर बंदी असेल आणि तीही समजा नसेल तर मग ती फळे माणसांना दिसु नयेत अशी काहीतरी सोय केलेली असेल....

हा निसर्गाच्या गप्पांचा धागा आहे कृपया मेरवान केक वगैरे वगैरे खाण्याच्या गप्पा मारून जे इच्छा असुनही गेले नव्हते त्यांना अशा गप्पा मारून जळवू नये. Lol

साधना आजच डेलिया घरी घेउन जाते. धन्स.

वर्षूदीने आणलेले वेगवेगळ्या प्रकारचे डोनट्स, उजुने आणलेल्या चकल्या, केरळचे बनाना चिप्स, संत्री इ. चा उल्लेख राहिलाच कि. Wink Happy

(नारायण नारायण :फिदी:)

आणि राणिबागेत फळांच्या (माणसे खाऊ शकणा-या) झाडांवर बंदी आहे, >>>> साधना .... तू पण ना - अगं तिथल्या बागेत काम करणार्‍या मंडळींचा विचार कर की जरा - त्यांनी बिचार्‍यांनी काय करायचे ??? त्यामुळे त्या फळांची "खरी काळजी" तेच घेत असणार ..... शिंपल .... Happy Wink

वर्षूदीने आणलेले वेगवेगळ्या प्रकारचे डोनट्स, उजुने आणलेल्या चकल्या, केरळचे बनाना चिप्स, संत्री इ. चा उल्लेख राहिलाच कि >>>>> आणि जिप्सीकडचे व्हॅलेंटिन स्पेशल केक्स (किंवा अजून काय काय ...) पण राहिलेच की .. Happy Wink

कृष्णवड ला मागच्या वेळीच टेकू लावलेले होते. मणिमोहोराच्या झाडाकडून आपण वळतो आणि पाचुंद्याच्या आणि चेंडू फळाच्या झाडाकडे येतो, तिथेच आहे कृष्णवड. >>>> दिनेशदा - तिथे आफ्रिकेत बसून तुमच्या डोळ्यासमोर सारे आहे पण इथे मंडळींना खादाडीतच रस असेल तर समोर झाडे असूनही बघतात कशाला त्यांच्याकडे ????? Happy Wink

आणि मग कारणं सांगायची की <<< राणी बाग मात्र फुललेली नव्हती. त्यामुळे आम्ही आधीच खट्टू झालो, त्यात पावसाने हजेरी लावुन उरल्या सुरल्या आनंदाची पण भिगी बिल्ली करुन टाकली. विचित्र हवेने डोके इतके दुखायला लागले की कधी एकदा चहाचा कप मिळतोय असे झाले. >>>>> अरे सरळ जायचं ना चहा प्यायला आणि केक्स- पेस्ट्री- पॅटिस.. इ. इ. इ. इ. ...... खायला ..... Happy Wink

शशांक, पावसाने गोंधळ घातला. नाहीतर निवांत पाहता बहर पाहता आला असता.
रच्याकने, इतक्या पावसातही आम्ही पिवळी धम्मक "सोनसावर" मात्र आवर्जुन पाहिली. Happy (तिथे जायला परवानगी नसली तरी Wink )

इतक्या पावसातही आम्ही पिवळी धम्मक "सोनसावर" मात्र आवर्जुन पाहिली. >>>>
अखेर ....... खादाडीच्या इतक्याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ पोस्ट्स नंतर "एक" का होईना पोस्ट पडली बाबा - काय पाह्यलं त्याची ...... धन्योहं, धन्योहं ..... Happy Wink

रच्याकने जिप्सी - तो सोनमोहोरच होता ना का तुझ्या नजरेतून "गुलाबी" ???????? Happy Wink

मुलं शहाणि होती हो पुर्वी. माझ्याबरोबर कशी गुमान असायची..... त्या XXने बिघडवले !
आता मला पुढच्या भेटीत त्या कृष्णवडाला भेटल्याशिवाय चैन पडणार नाही.

आंगाश्शी...राणीबागेत जाऊन खादाडी करून आणी झाडं वगैरे बघून (बहुतेक) आता जरा जोर आलाय सगळ्यांना! गुड!
४१ पोष्टी!

अर्रारा.. शशांक... किती रागावशील.. Lol

आता नावं साधना, उजू आणी जिप्सी सांगतील..

मला स्पेशल आवडलेली फुलं आणी झाडं

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

सापाच्या आकाराची कॅक्टस

प्रचि ५
काळा गुलाब

बाकीचे फोटो जिप्सी टाकेल.. आणी हे फोटो ही ..

वैधानिक चेतावनी
कृपया जिप्स्याच्या फोटोंशी मी टाकलेल्या फोटोंची तुलना करू नये.. Proud

अन्जू, मानु.. थांकु..

मानुषी..अजून जागी हैस???????????

अर्रारा.. शशांक... किती रागावशील.. >>>>> अगं, सग्ळं हलके हलकेच चालू आहे आणि हलके हलकेच घ्यावे सगळ्यांनी ...... मजे-मजेत ---- खेचाखेची, फिरक्या वगैरे सर्वच ....

फोटु मस्तचेत, अजून येउंदेत..

वैधानिक चेतावनी
कृपया जिप्स्याच्या फोटोंशी मी टाकलेल्या फोटोंची तुलना करू नये..>>>>> जिप्सीने फोटु टाकले तर ना !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! .... Happy Wink

सुप्रभात निगकर्स!
आज खूप दिवसांनी आले इकडे. राणीच्या बागेचे फोटो टाकले नाहीत का अजून ?
कोर्सेरा वर फ्री ऑनलाईन कोर्स धुंडाळतांना मला हा कोर्स सापडलाय, मी तो करणार आहे. अजून कुणी करणार का इथलं? बरोबर करायला जास्त मजा येईल!

https://www.coursera.org/course/plantknows

Pages