निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई महानगरपालिका आयोजित फळ, फुल, झाडांचे प्रदर्शन राणीबागेत दिनांक १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी. Happy

कोण कोण येतंय?

किती तरी दिवस झाले, गप्पा इतक्या धावताहेत, की माझं इथलं वाचून पूर्ण होतच नाहीये! आज शेवटी आधी लिहायचं, मग वाचायचं असं ठरवलं. Happy

लोकसत्तामधल्या टूथपेस्टवरच्या लेखात वज्रदंती म्हणजेच कोर्‍हांटी असे लिहिलेय ? हि कुठली कोर्‍हांटी. निळी, पिवळी की पांढरी. ? कोर्‍हांटीचा कधी असा उपयोग मी वाचला नव्हता. उलट आघाड्यांच्या काड्याचा असा वापर करतात ते वाचले होते. त्या लेखात आघाड्याचा उल्लेख नाही.

दिनेशदा, रविवारी जाणार असेल तर तिला नक्कीच घेऊन जाईन. Wink

त्या झाडाचा थोडासा क्लोजअप फोटो. यातील वर गेलेल्या फांद्या (?) या एखाद्या फुलं गळुन गेलेल्या तुर्‍यासारख्या दिसत आहे. (फोटो क्रॉप केलाय)

खरेच रे.. फुले गळून गेलेले तुरे वाटताहेत..

मला वाटते की मीही पुणे कोल्हापुर प्रवासात अशी झाडे खंबाटकी घाटात पाहिलीत.

गौरी, अगदी अगदी Happy

वर्षूदी, चलेगा Happy

शनिवारी १५ तारीख फिक्स करूया. रविवारी गर्दी असणार आणि प्रदर्शनात ठेवलेली फुलही थोडीफार कोमेजुन गेलेली असतील. Happy

सकाळी पुष्प,फळ,वृक्ष प्रदर्शन त्यानंतर राणीबागेत फेरी आणि मग ग्रॅण्टरोडला मेरवानजीकडे अल्पोपहार (मावा केक इ.) Happy
जर सर्वांना वेळ असेल तर तेथुन गिरगाव चौपाटी "न्युयॉर्कर" मध्ये फलाफल, छोले भटुरे आणि मग कॉर्नवर "कुल्फी". Happy
(दिनेशदा, वाचताय ना? Wink )

सध्यातरी, जिप्सी, साधना, वर्षूदी तयार आहेत. Happy

सकाळी पुष्प,फळ,वृक्ष प्रदर्शन त्यानंतर राणीबागेत फेरी आणि मग ग्रॅण्टरोडला मेरवानजीकडे अल्पोपहार (मावा केक इ.) स्मित >>>>>>
मावा केक सकाळी साडे सात पर्यंत संपतात. आधी ऑर्डर देऊन ठेवावी लागते. मावा सामोसे सुद्धा लवकरच संपतात. पाव बटर मिळेल. शुक्रवारी सकाळी सव्वाआठ वाजता गेले होते. फक्त पाव बटर आणि कॉफी मिळाल्री. ऑफिसला वेळेपेक्षा पंधरा मिनिटे आधी पोहचले. फार निराशा झाली. मेरवान लवकरच बंद होणार आहे म्हणून हा खटाटोप!!

आधीच सांगितलेले बरे.

मावा केक सकाळी साडे सात पर्यंत संपतात. >>>>>भ्याआआआ Sad

मेरवान लवकरच बंद होणार आहे म्हणून हा खटाटोप!!>>>>हो मधुरा. त्यासाठीच Happy

महानगरपालिका आयोजित फळ, फुल, झाडांचे प्रदर्शन पुण्यात सुद्धा आहे संभाजी उद्यानात. १५ /१६ लाच बहुतेक. जमेल त्यांनी जरूर जा.

शनिवारी १५ तारीख फिक्स करूया. रविवारी गर्दी असणार आणि प्रदर्शनात ठेवलेली फुलही थोडीफार कोमेजुन गेलेली असतील.<<<< किती वाजता ???

राणीच्या बागेला एकच एंट्रन्स आहे वर्षू. पण हे प्रदर्शन बागेच्या बाहेरच असते. तूला हवी तर खात्रीची गुलाबाची रोपे मिळतील. पण त्यापेक्षा ग्लॅडीओलाचे , निशिगंधाचे कंद घे. घरी नसलीस तरी ते कंद मातीत तग धरून राहतील.

अरे काय चाल्लय क्काय आँ ? ......कसले जबर्‍या प्लॅन्स चाल्लेत!.... ओक्के करा मज्जा!
नंतर सांगा बर्का इथे!

दिनेश.. पार्टी.. केक... Lol

ग्लॅडीओलाचे , निशिगंधाचे कंद .. वॉव ग्रेट सजेशन .. Happy

जिप्स्या ला फोन करीनच सर्व ठरवायला..

Pages