Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सीमा, तू दीपचे फ्रोजन पंजाबी
सीमा, तू दीपचे फ्रोजन पंजाबी समोसे कधी खाल्ले नाहीयेस का? त्याच्या सारणासारखी चच मी आजवर कुठे खाल्लेली नाही.
ज्ञाती तयार ईडली पिठाची
ज्ञाती तयार ईडली पिठाची ट्रायल रन घेण्यास वेळ असेल तर करून बघ. मी ह्या बीबी वर नेहेमी जनतेला तयार पीठ चांगलं नाही वगैरे सांगताना वाचलंय पण माझा अनुभव बरोब्बर उलटा आहे. जनरली लोकल वेंडर्स असतात त्या त्या एरियात. त्यामुळे वेळ असेल तर आधी करून बघ. ३० औंझ तयार पिठाच्या साधारण २४ मोठ्या ईडल्या होतात.
प्रॅडी,आपल्याकडे चांगलं मिळतं
प्रॅडी,आपल्याकडे चांगलं मिळतं तयार पीठ..स्पेशली मदुराई ब्रँडचं...
आमच्याकडेही मस्त मिळतं तयार
आमच्याकडेही मस्त मिळतं तयार इडली पीठ, डोसा पीठ. आता तर मूगाचे डोसे, रागी डोसे ही पीठं पण मिळतात, चांगली असतात. मी तर फक्त डाळीच्या इडल्या करायच्या असतील तरच घरी भिजवते, नाहितर तयार पीठ झिंदाबाद.
मल्टीग्रेन पास्ता विथ
मल्टीग्रेन पास्ता विथ वेजिटेबल,
ढोकळा
हा.न्डवो
साबुदाणा वडे
वाटली डाळ
दडपे पोहे
शेवया.न्चा उपमा
आप्पे
मुग-भजि
मिनी पुर्या
स्वाद्चे कटलेट्स
पेस्ट्रि पफ चे पॅटिस
स्पेशली मदुराई ब्रँडचं...<<<
स्पेशली मदुराई ब्रँडचं...<<< अरे वा थेट तुमच्याकडे पण पाठवतो का तो? घरा जवळ आहे त्याचा कारखाना.
पूर्वा, मवा वाचुन बर वाटलं.
पूर्वा, मवा वाचुन बर वाटलं. आमच्याकडेही चांगलच मिळत पण बाकीच्यांच्या कॉमेन्ट्स वाचुन मला वाटल माझ्याच अपेक्श्या लो आहेत की काय..
आम्ही श्री किंवा बालाजी ह्य
आम्ही श्री किंवा बालाजी ह्य आमच्याइथे मिळणार्या ब्रँड्स बद्दल बोलत आहोत. मदुराईबद्दल कल्पना नाही.
प्रॅडी,पटेलकडून घेते
प्रॅडी,पटेलकडून घेते मी..आमच्या गावात अजून देसी स्टोअर नाहिये गं
अर्र बरंच लांब येता की.
अर्र बरंच लांब येता की.
तयार पीठ आणण्यापेक्षा मी
तयार पीठ आणण्यापेक्षा मी आयडिया सांगते. मी आमच्याकडे मुलांच्या पार्टीला १ कीलो उडदाची डाळ भिजत घातली आणि मिक्सर मधे वाटली. त्यात २ कीलो तांदळाचे पीठ घालून (मॅडम ब्रँड) रात्रभर भिजवले. २५० ईड्ल्या झाल्या. खूप मऊ झाल्या होत्या.
नवऱ्याच्या ऑफिस मधील ५-६
नवऱ्याच्या ऑफिस मधील ५-६ मित्र dinner ला येणार आहेत शनिवारी. मी office मधून half day घेतला तरी मला preparation साठी २ तासच मिळतील
पुढील मेनु बरा वाटतो का ते :
Starter : Paneer chilly विथ colourful capsicum
क्रिस्पी potato / फ्रेंच fries
Main Course :
Chapati
mix कडधान्य उसळ (मिनी कूकर ला लावता येईल )
बोनेलेस chicken
fried rice वीथ plenty ओफ vegetables
दही रायता (कांदा , tomato , काकडी , पुदिना आणि चाट मसाला टाकून )
पापड , लोणच
Sweat मधे Cake आणि ice cream असेल
Sweat मधे Cake आणि ice cream
Sweat मधे Cake आणि ice cream असेल. इयू
गोड पदार्थ असं लिहा, किंवा sweet लिहा प्लीज
धन्यवाद सर्वांना! रवा इडली
धन्यवाद सर्वांना!
रवा इडली चटणी मुलांकरिता, मैत्रिणींकरिता मिसळ आणि फ्रूट सॅलड असं करेन. एम्टीआर चे पॅकेट आणून ठेवलेत.
आद्या २ तासात इतकं सगळ होइल
आद्या २ तासात इतकं सगळ होइल बनवुन????
आणि चिकन असताना उसळ??? सर्वजण नॉन वेज खाणारे नाहीत का??
आ द्या, इथे पनीर माखनी आहे
आ द्या, इथे पनीर माखनी आहे रेसिपी ती करा हम खास छान होणारी रेस्पी आहे. शिवाय सोपी नो कटकट.
पुलाव बनवला तर बरे पडेल. बाकीचे पदार्थ इंडिअन आहेत. एकच चायनीज होईल.
आ द्या, इथे पनीर माखनी आहे
आ द्या, इथे पनीर माखनी आहे रेसिपी ती करा हम खास छान होणारी रेस्पी आहे. >>> हो हो. अगदी सोप्पी आणि मस्त चव. सायोची पनीर माखनी आमच्याकडे ऑल टाइम हीट आहे. (मी आजच डब्याला घेवून गेले होते)
३८ मोठे आणि २२ छोटे
३८ मोठे आणि २२ छोटे यांच्यासाठी अॅपेटायझर्\स्नॅक सुचवा प्लीज. एक पॉटलक पार्टी आहे. अजुन ४ लोक अॅपेटायझर्\स्नॅक्स, १० लोक मेन कोर्स, ३ लोक गोड आणणार आहेत सगळी जनता भारतीय आहे, दाक्षिणात्य जास्त आहेत. एवढ्या लोकांसाठी टिक्क्या, पॅटिस असं खेळत बसायच काम नको आहे. बल्क मधे होणारा काय प्रकार करता येईल? मला कोथिंबीर वडी (पुडाची), कोबी वडी असे प्रकार सुचत आहेत. अजुन काही?
हो आणि गरम करायला जमणार नाही बहुदा, त्यामुळे गरमच चांगला लागेल असा पदार्थ नको.
ढोकळा न्या. बल्कमधे होईल. गरम
ढोकळा न्या. बल्कमधे होईल. गरम करणे भानगड नाही.
साधारण ७० पातिस
साधारण ७० पातिस (रगड्याच्या) साठी किती बटाटे लागतिल? त्याबरोबर पुलाव व गाजर हलवा/ कुल्फी कसे वाटेल? अजुन काय करु सुचत नहीये. लेकीचा बर्थ वाला डे आहे ना. यावर्शी मोठा नाही कराय्चा असे ठरव्ले. ६ मुले व आई वडिल. मेनु घरीच करेन मग.
दही बुत्ती राईस+पापड+लोणचे
दही बुत्ती राईस+पापड+लोणचे यासोबत अजुन काय करता येइल?
आज इथे भयंकर उन्हाळा आहे. त्यामुळे गॅसजवळ फार वेळ थांबायचे नाहीये.
काकडीची कोशिंबीर/खमंग
काकडीची कोशिंबीर/खमंग काकडी/कायरस
धन्यवाद मयेकर!
धन्यवाद मयेकर!
@वत्सला, खाकरा भेळ!
@वत्सला, खाकरा भेळ! (खाकर्याचे तुकडे+ बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, असल्यास कैरी इ. + वरून आवडीप्रमाणे तिखट, मीठ, शेव, आवडत असल्यास मोड आलेले हिरवे मूग इ.)
@सानुली, फ्रेंच फ्राइज / स्प्राऊट भेळ / कॉर्न भेळ / कॅनपीज मधील स्वीट कॉर्न चाट / फळांचे तुकडे - चीज क्यूब - चेरी इ. टूथपिकवर खोचून / फाफडा/ पकौडे.
धन्स अकु!
धन्स अकु!
आम्ही १० मैत्रिणी पॉट्लक
आम्ही १० मैत्रिणी पॉट्लक ठरवतोय. माझ्या घरी
कोणी काय करून आणायचं हे पण मीच सांगायचं त्यांना असं ठरलंय
आमचा सगळ्यांचा हा पहिलाच अनुभव आहे.
हा कार्यक्रम नीट पार पडण्यासाठी टिप्स ची गरज आहे मला.
वयोगट ४५ ते ५५......... लहान मुलं नाही आहेत.
सगळ्या जणी कारनी येतील अशा आहेत........त्याप्रमाणे त्याना कोण्ते पदार्थ सांगू हे सुचवा.
मी कोणता पदार्थ करणं सोयीचं तेही सांगा.
तुम्हाला आणि तुमच्या
तुम्हाला आणि तुमच्या मैत्रिणींना काय चांगलं बनवता येतं ते बघून मेनुचा मध्य काढा
नुसत्या मैत्रिणीच की त्यांचे
नुसत्या मैत्रिणीच की त्यांचे नवरेही आहेत? १० जणींमध्ये एक दोन स्टार्टर्स, एक दोन भाज्या, भात, रायता, पोळ्या वगैरे विभागणी करा. दुसरा काही मेन्यु असल्यास त्याप्रमाणे.
नुस्ती अपेटायझर पार्टी पण
नुस्ती अपेटायझर पार्टी पण करता येइल. किंवा १ डिश मील/दबदबीत स्नॅक आयटम्स.
सानुली! दिपचे मिनी
सानुली!
दिपचे मिनी समोसे
लिलवा कचोरी
खट्टा धोकळा
मिक्स व्हेज इडली
कॉस्ट्कोत ले अलापिनो पॉपर्स,मोझरेला स्टिक
वाटली डाळ
सुन्दल
Pages