Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बटरनान करा
बटरनान करा
फक्त बटरनान ? त्याच्या
फक्त बटरनान ? त्याच्या जोडिला?
फार तिखटही नकोय कारण मुले लहान लहान आहेत ना.
फळांचा खाऊ देता येईल सोबत.
फळांचा खाऊ देता येईल सोबत. रेवड्या, चिक्की, काजूकंद, बडीशेपेच्या गोळ्या, डोंगरी (मोठे) आवळे, ग्लुकोज बिस्किटाचे छोटे पुडे, साखरफुटाणे - खारे दाणे - फुटाणे, सुके अंजीर - मनुका - बेदाणे - अक्रोड - बदाम - काजू यांपैकी जे योग्य व आवडेल ते इ. इ.
एका मैत्रिणीने आलेल्या मुलांच्या गळ्यात द्राक्षाच्या, संत्र्याच्या फोडींच्या माळा करून घातल्या होत्या. मुलं सगळी दीड-दोन वर्षे वयोगटातली. मग त्या माळा गळ्यातून उपसून खात बसण्यात सर्व बालकंपनीचा वेळ चांगला गेला.
बोरनहाणासाठी पारंपारिक ज्या
बोरनहाणासाठी पारंपारिक ज्या गोष्टी आहेत बोरं (खोबरी हवीत, शक्यतो शेंबडी नकोत), लाह्या, बत्तासे, उसाचे करवे, ओले हरबरे, रेवड्या, (अजून आता आठवत नाहीत) त्याची छोटी-छोटी पाकीटं करायची आणी नहाणासाठी वापरायची मुलांना उचलायला सोपे जाते आणि आपला पण कार्यक्रम सुटसुटीत होतो(बघा पटतय का). शास्त्र म्हणून वाडगाभर बोरं अशीच सुटी टाकायची. गोळ्या, चॉकलेटस, जेली चॉकलेट (ते स्ट्रॉबेरी जेलीचे एका सॅशेत एक जेली असते), खारका, बदाम, बेदाणे, छोटी गाजरं, मटार अस पण वापरता येईल. तीळगूळ असेलच. एवढी लहान मुलं स्वतःहून काही खात नाहीत त्यामुळे अजून काही वेगळे ठेवायला नको. मॉम्सना जे काही खायला देणार असाल तेच ती पण खातील की, वेगळी प्लेटपण कदाचित नाही दिलीत तरी चालेल.
आमच्याकडे (माहेरी)
आमच्याकडे (माहेरी) बोरन्हाण्याला छोटे कडबोळे, छोट्या करंज्या करतात. आणि गूळ-चुरमुर्याचे लाडूपण. मुलांना हा खाऊ आवडतो. नहाणात हा खाऊपण डोक्यावर घालतात इतर गोष्टींबरोबर.
राजसी +१
आम्ही सुनिधीचं सहाव्या
आम्ही सुनिधीचं सहाव्या महिन्यात बोरन्हाण केलं होतं. तेव्हा तिला सरळ तिच्या अंगोळीच्या टबमधे बसवलं होतं आणि वरून ते लाह्या बत्तासे वगैरे घातलं होतं. ते सगलं सामान घरभर पसरायची, नंतर आवरायची गरज नाही. अगदी लहान मुलांना केक आणि वेफर्स दिले होते. मोठ्या लोकांसाठी कचोरी, बटाटेवडा आणि केक असं आणलं होतं. सगळं विकत आणलं होतं. घरात एवढ्या पन्नाससाठी लोकांसाठी करणं शक्य झालंच नसतं.
आयत्यावेळी पाहुणे आले किंवा
आयत्यावेळी पाहुणे आले किंवा आलेले जेवणाच्या वेळेपर्यंत थांबले आणि घरात भरपूर दही असल्यास... मस्तपैकी लस्सी बनवून आधी पिऊ घालावी. रूह आफझा असल्यास गुलाब, केसर पिस्ता, नुस्तीच वेलची-बिलची घालून किंवा जिर्याची पुड घालून खारी...
थोडक्यात काय तर त्यांचे पोटोबा भरून आपल्याला विचार तरी करायला वेळ मिळावा.
मग मसालेभात, खिच्डी बिचडी कायपण धावतं... असा नुक्ताच आलेला अण्भव आहे.
फक्तं प्रॉब्लेम इतकाच झाला की...
दोन दिवसांनी अजून एक मित्रं दांपत्यं... तो तुझा फेमस (??) लस्सी-मसालेभात मेन्यू जेवायला आलो असं म्हणतच घरात शिरले.... वर आणखी... फार चटकन जमतो तुला.... आयत्यावेळचा छानच मेन्यू हं...
घ्या...
--**********************
हे त्या युक्तिच्या बाफेवर दवडयला हवं नै? गल्ली चुकलं आमचं.
पार्ले जी ची पन पाच पाच
पार्ले जी ची पन पाच पाच बिस्किटांची पाकिटे मिळतात. ती वाप्रता येतील.
५ जणांसाठी रात्री जेवायला
५ जणांसाठी रात्री जेवायला बटाटेवडे + साबुदाणा वडे + नारळाची (ओली) चटणी + दाण्याची (कोरडी) चटणी + दही/ ताक + गाजर हलवा असा बेत आहे. मला किती किलो बटाटे? किती वाट्या साबुदाणा? लागेल ते प्लीज सांगा. साधारण प्रत्येकी दोन्ही प्रकारचे किती वडे धरू? एका नारळाची आणि अर्धा किलो दाण्याची चटणी पुरेल असे वाटते आहे.
-५ जण किती वडे
-५ जण किती वडे खातील?
बटाटेवड: प्रत्येकी ४ छोटे (मध्यम)
साबुदाणा: प्रत्येकी २ किंवा ३.
त्याप्रमाणे अंदाजः
एका बटाट्यात २ छोटे वडे असा अंदाज धरून --५ जण किती वडे खातील?
साबुदाणा वडे : त्यात पण बटाटा घालावा.. एक मूठ साबुदाण्यात ३ वडे होतात.
चटणी:
दाणा चटणी पाव किलो पुश्कळ झाली.काराण ब वडे अन सा वडे बरोबर शक्यतो ओली चटणी छान लागते.
साबुदाणा वड्यबरोबर दाण्याची चटणी दह्यात कालवुन ठेवली तरी छान लागते.
खोबरे: दीड नारळाची चटणी पुरेल असं वाटतं.
`
वैयक्तिक मतः
ब वडे अन सा वडे एकत्र करणे हा पर्याय क निवडला आहे? काहिंचा उपवास आहे का?
दोन्ही पदर्थ "हेवी" होतात, त्यामुळे दोन्ही पदर्थाना जस्टिस दिले जैलच असे नाही.
दोन्ही प्रकारचे वडे का
दोन्ही प्रकारचे वडे का ठेवताय? कोणाचा उपास आहे का? लोकांना सपोज बवडा जास्त आवडला आणि तेच खाल्ले तर?
आवडत्या पदार्थात कन्फ्यूजन करणारा बेत आहे हा
तरी- एका मोठ्या बटाट्याचे दोन वडे होतील असा अंदाज घ्या. साबूदाण्याचे माहित नाही. दोन्ही प्रकारचे वडे म्हणजे हे दोन अन ते दोन तर माणशी नक्की खाल्ले जाणार.
असाच 'गो क्रेझी' मेनू
असाच 'गो क्रेझी' मेनू ठरवलाय:) उपास-बिपास काही नाही, सगळे घरचेच आहेत
मला सा. वडा हवाय, नवर्याला ब. वडा हवाय. मुलाला नेहमी हलवा खा रे! असं मागे लागते तर तो ढुंकून बघत नाही आणि काल हिंदीच्या पुस्तकात 'हलवा' आल्याबरोबर त्याला तोंडाला पाणी सुटलयं म्हणून हलवा
हे सगळं 'पाप' त्या ताकानी धुतलं जाईल अशी अपेक्षा आहे
'अन्लिमिटेड' खाता येतील असे पदार्थ आहेत, रात्रीची वेळ आहे म्हणूनच प्लेटबेसीसपेक्षा थोडे जास्त करीन. माणशी प्रमाण त्यासाठी हवे होते. कारण नेहमी वरीलपैकी एक वडा 'फक्त' केला जातो(मला त्या प्रमाणाची कल्पना आहे.) काकडीची दह्यातली कोशिंबीर पण करावी अशा विचारांत आहे. 
माझ्याकडे ६ मोठे आनि ६ लहान
माझ्याकडे ६ मोठे आनि ६ लहान जेवायला येणार आहेत.
त्यांना सटर फटर खायला स्टार्टर टाइप काहितरी सुचवा...तळलेले नको..पोट्भरिच नको.नंतर जेवण आहे
देशी टाईपचे स्टार्टर हवे असेल
देशी टाईपचे स्टार्टर हवे असेल तर उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा (हळद, मीठ लावून),
भाजलेले सोलाणे / हरभर्याचे दाणे, स्वीट कॉर्न दाणे वाफवून / भाजून त्यांवर सैंधव - मिरपूड भुरभुरून,
पेरूच्या फोडी तिखट-मीठ लावून
निखार्यात भाजलेली रताळी, बटाटे, इतर कंद
वांग्याचे काप
आलू टिक्की / कटलेट्स
असे ठेवता येईल.
किंवा
चीज क्यूब + सफरचंद / अननसाच्या चौकोनी फोडी + द्राक्ष + पाकवलेली चेरी टूथपिकला लावून,
मोनॅको बिस्किटांवर चीज स्प्रेड/ चीज क्यूब / किसलेले चीज + बारीक चिरलेली सिमला मिरची + मिक्स हर्ब्ज (किंवा इतर आवडीचे ड्रेसिंग, भाज्या, गार्निश इ.)
पनीर चिली / पनीर मॅरिनेट करून ग्रिल केलेले - इतर भाज्यांबरोबर.
बेक्ड चिप्स आणि साल्सा डिप.
भाजलेला मसाला पापड (टो, कां, शेव, कोथिंबीर इ.इ.)
चाट आयटेम्स (शेवपुरी चाट, ढोकळा चाट, खमण, पाणीपुरी इ. इ.)
मोनॅको बिस्किटांवर चीज
मोनॅको बिस्किटांवर चीज स्प्रेड/ चीज क्यूब / किसलेले चीज + बारीक चिरलेली सिमला मिरची + मिक्स हर्ब्ज (किंवा इतर आवडीचे ड्रेसिंग, भाज्या, गार्निश इ.)
>> हे झालय..
फळांचा ऑप्श्न करणार आहे...
बेक्ड चिप्स आणि साल्सा
बेक्ड चिप्स आणि साल्सा डिप.>>
साल्सा डिप्च्या रेसिप्या..प्लीज्,. नेट्वर पाहिलं पण तरीही काही खास असल्या तर
१.लेट्यूस-रॅप्स - थाई
१.लेट्यूस-रॅप्स - थाई पद्धतीचे - भाजके दाणे, भाजके किसलेले सुके खोबरे, चिरलेला कांदा, आल्याचे/ गलांगलचे तुकडे, मिरची तुकडे/ चिली फ्लेक्स, खजूर चटणी/ थाई पाम सॉस अश्या गोष्टी फिलिंग म्हणून ठेवता येतील.
२. काकडी, गाजर, मूळा, बीट असे सलाड आयटम्स मध्ये मेयोनिज/ चक्का सिझनिंग घालून(hung curd)
धन्स सर्वाना. झाल बोरनान..
धन्स सर्वाना.
झाल बोरनान.. (बोरस्नान/बोरन्हान)
ईडली चटणी केली लहान मुलाना, अगदी लहान मुल होती त्यांना कप केक केलेले.
बोरनान मधे पारलेचे छोटे छोटे पुडे पण ठेवलेले... धन्स अकु / अमा
रॅप्सवरून आठवलं, अळूवडी,
रॅप्सवरून आठवलं, अळूवडी, कोथिंबीर वडी, तिखटाचे आप्पे, चीज-चिली टोस्ट असे कायबाय प्रकारही ठेवता येतील.
आज अचानक एक पाहुणा येणार आहे.
आज अचानक एक पाहुणा येणार आहे. घरात क्रॅब केक्स आहेत ते अपेटायझर, कोलंबी पुलाव (एकच सर्वेसर्वा डीश) करेन...तसंही ऑफिसमधून जाऊन घरी करण्याचा वेळ, त्राण सगळं गृहित धरता आणखी काय करता येईल? एखादी ग्रेव्ही करू का? आय थिंक थोड्या भाज्या आहेत जसं फ्लॉवर्,बटाटा, फ्रोजन मटार वगैरे...की हेच बस आणि कांदा टमॅटो, पापड, लोणची इ.इ. चालेल?
डेझर्टसाठी फ्रीजमधे काही पर्याय आहे त्यामुळे वी आर गुड ऑन दॅट...
सी फूड प्रेमी पाहूणा असेल तर
सी फूड प्रेमी पाहूणा असेल तर फार तर सोलकढी ठेवावी कोलंबी भाताबरोबर. उगीच भाजी करण्याच्या फंदात पडू नये ...
यम्म..सोलकढीला इसरलेच होते
यम्म..सोलकढीला इसरलेच होते म्या... ठांकु ठांकु
आणि मेन म्हणजे पँट्रीमध्ये नारळाचं दूध पण आहे.. 
अॅक्च्युअली पाहुणा सी फूड प्रेमी आहे का ते कळेलच (मांसाहार प्रेमी आहे इतकं बास) पण आमच्याकडे नो ग्रोसरी शॉपिंग ऑप्शन नेमके सी फूडचे निघाले
मॅगीची नारळाच्या दुधाची पावडर
मॅगीची नारळाच्या दुधाची पावडर पण चांगली अस्ते पँट्री मधे स्टॉक म्हणून. कॅन एकदा उघडला की पूर्ण संपवणे होत नसेल तर ती पावडर एकदम बेस्ट आहे
हो ती पूर्वी ट्राय केली आहे
हो ती पूर्वी ट्राय केली आहे आणि आयत्यावेळी वापरायला बरी पडते. फक्त आजकाल डोक्यात लाइट कोकोनट मिल्कचं खूळ आल्यामुळे तो एक कॅन तरी बॅक-अप म्हणून ठेवते. शक्यतो मग बॅक टु बॅक काही तरी करून संपवते...
३५ मोठे आणि २० लहान
३५ मोठे आणि २० लहान यांच्याकरिता संध्याकाळचं खाणं काय ठेवता येईल? मला मिसळ आणि फ्रूट सॅलड या
पलीकडे काही सुचत नाहीये.
इतक्या प्रमाणा करिता मटकी किती लागेल?
मुलं मिसळ खातील का ज्ञाती?
मुलं मिसळ खातील का ज्ञाती? मुलांसाठी पास्ता, मॅक अँड चीज किंवा सँडविचेस असं काही ठेवता येईल का?
बिल्वा +१! मुलांना सौम्य
बिल्वा +१!
मुलांना सौम्य चवीची मिसळ एखादे वेळी चालू शकेल. पण सेफ म्हणून पास्ता / सँडविचेस/ कॉर्न भेळ असे प्रकार असलेले बरे.
ज्ञाती, १ कप कोरडी मटकी ४ ते
ज्ञाती, १ कप कोरडी मटकी ४ ते ६ जणांसाठी धर (पाहूणे कितपत खवय्ये आहेत त्यावर).
मुलांसाठी बिल्वा आणि अकुने ऑप्शन्स दिले आहेतच. पिझाही ऑर्डर करु शकतेस.
ही तक्रार नाही आहे. जनरल
ही तक्रार नाही आहे. जनरल ऑब्जर्वेशन...
प्रत्येक वेळी पार्टी म्हटलं की मुलांना आपल्या जेवणात सामावून घ्यायचे पर्याय असण्ञापे़क्षा पिझा, पास्ता किंवा गेला बाजार वरण भात असं का ठेवलं जातं? मोस्ट्ली ऑपशन्स मैदा ...आजकाल इतका कंटाळा येतो बर्थडे पार्टीजचा..मागच्या आठवड्ञात एका अशाच पार्टीत मुलांना सुरुवातीलाच प्लेन चीज पिझा देऊन मग सुगरणीने मोठ्यांचा साग्रसंगीत मेन्यु सुरू केला. मला खात्री आहे इतकी मेहन्त केली होती फक्त एक बिना मसाल्याची बिन्स्ची शेंग वगैरे भाजी केली असती तर माझी मुलं तरी नक्की नीट जेवली असती. निव्वळ मुलं तिखट खात नाहीत या एका गोष्टीमुळे आपण मुलांना एक चुकीचा संदेश देतो त्यापेक्षा पार्टी कम थोडं योग्य खाणं मुलांना दिलं तर चांगलं असं मला वाटतं. काही पार्टीज बाहेर जिथे फक्त पिझा अलाउड अशी ठीकाणं सोडली तर इतर ठिकाणी मुलांना अट्टाहासाने फक्त मैदा , एकही ग्रिन्स नाही असे पर्याय प्लान करणार्ञा पालकांचा मी विचार करते की घरी इतर वेळी मुलांना काय देतॉ? पार्टी आहे जाऊदे करत प्रत्येक विकेंडला हे होणार असेल तर कठीणच आहे ब्व्वा.. शिवाय जंक म्हणुन हक्काचा केक खाणार असतातच नं सर्व..
ज्ञाती सॉरी...तुला टूथपिकला एक strawberry, grape and cherry or some other fruit हे पण करायचं आहे का? माझ्या मुलांना हे बनवायला पण मजा येते.
वेका, तक्रार नसली तरी तुझा
वेका, तक्रार नसली तरी तुझा मुद्दा अतिशय वॅलिड आहे. मला नेहमी हे खटकतं पण माझ्याच मुलांबाबत बोलायचं झालं तर जेवणाबाबतीत अत्यंत फसी आहेत. भारतीय जेवण खूप आवडतं असं नाही आणि त्यातून तिखट, मसालेदार असलं तर मग काहीच न जेवण्यापेक्षा पिझ्झा वगैरे एकवेळ बरा.
एखाददोन भाज्या कमी तिखटाच्या नक्कीच करता येऊ शकतात. म्हणजे ज्यांना पिझ्झा, पास्ता नको त्यांना खाता येतील.
Pages