बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरही तमिळ पद्धतीचे पदार्थ ठेवता येतील - टॉमेटो राइस वगैरे चालून जाईलच पण हयग्रीव मस्त सूट होईल.>>> तोच विचार करतेय. कारण, जास्त लोक तमिळ आहेत आणी हे लोक इतर पद्धतीचे जेवण जास्त जेवत नाहीत असा आजवरचा अनुभव आहे. रस्सम तर बाय डीफॉल्ट ठेवणार आहे, बाकी काही का मेनू असेनात का! Happy तलपाकट्टू (डिंडीगल बिर्याणी ) पण म्हणूनच ठेवली आहे.

जी अमेरिकन आहे, ती व्हेगन आहे, त्यामुळे तिच्यासाठी परत वेगळं काहीतरी बनवावं लागेल. बाकीचे इतर कट्टर मांसाहारी. स्टार्टर जरा जास्त खपतात म्हणून त्यात गिल्ड प्रॉन्स आणि एखादा चिकन आयटम आणि दोन व्हेज आयटम असे म्हणतेय. खेकडा भजी किंवा व्हेज पकोडा हे बहुतेक नक्की होतील, पण ग्रेव्हीमध्ये आणि सूपमध्ये ऑप्शन काहीही सुचत नाहीत त्यात एखादा ऑप्शन सुचवा.

रायत्यामध्ये नेहमीचे कांद्याचे रायते आणि अजून एखादा वेगळा प्रकार सांगा.

मल्याळी स्टाइल चणाडाळीचे मसालेदार वडे असतात - परपु वडा म्हणतात इथले रेस्टॉवाले. ते चालतील का ?
भाज्यांमधे पण केरळी स्टाइल कडला करी, स्ट्यू असे करता येईल.
मंगळूर भागात पुळी कोद्देल म्हणून आमटी - सांबार टाईप तिखट आंबट ग्रेव्ही भाजी असते ती करता येईल. त्यात सांबार काकडी, शेंगा, कोहळा अशा 'मद्रासी' पदार्थात पण कॉमन असलेल्या भाज्या असतात

दही वड्यासाठी जे दही करतो- किसलेलं आलं, पुदिना, कोथिंबीर, भाजलेल्या जिर्‍याची पूड घालून- त्यात अननसाच्या बारीक फोडी किंवा चोचलेली काकडी किंवा डाळिंबाचे दाणे घातलेलं रायतं खूप हिट जातं बिर्याणीसोबत.

मंगळूर भागात पुळी कोद्देल<< हां, ही केटररला विचारून बघते.. स्ट्युचा ऑप्शन पण विचारते.

एक कांद्याचं रायतं दह्यामधलंच होइल. त्यामुळे दुसरं दह्यातलंच नकोय.

चिकन टिक्का, किंवा कृष्ण्करी (इथे आहे रेसीपी) पण जाईल. कढाई चिकन, फिश असेल त् ती करी सध्या तरी हे सुचताहेत.

वेज मध्ये दम आलू, पनीर ग्रेवी होऊ शकेल.

नंदिनी, २०-२५ च लोकांसाठी किती प्रकार करणारेस?
४ स्टार्टर, सुप अन रस्सम, २ रायते, बिर्यानी, अजून एक राइस, पोळ्या, ग्रेवी वाली भाजी, २ डिझर्ट!! पुन्हा व्हिगन प्रकार वेगळे.. बाकी काही कर- न कर, पण या मेन्यु चा पुनर्विचार नक्की कर Wink Light 1

नंदिनी, कांद्याचे दह्यातले रायते करण्यापेक्षा लाल भोपळ्यातले दह्यातले रायते केलेस तर? कांदा वेगळा ठेवलास तर अमेरिकन पण खाउ शकेल. तामिळना हे रायते आवडते. दुसरा प्रकार काकडीची पचडी/ कांदा+ टोमॅटो+नारळ्+कोथींबीर
याची कोशींबीर ही चिकन बरोबर मस्त लागते.
अननसाचे सार/ कोकमाचे सार करता येइल. रस्सा भाजी मधे कांद्या+ टोमॅटो ची गुळ, शेंगदाण्याचे कुट घालुन कमी तिखटाची भाजी . अमेरिकन पण परोठा/चपाती बरोबर खाउ शकतील.

नताशा, पोळ्या नाहीत. एक व्हेज राईस एक नॉन व्हेज राईस आणि एक ग्रेवीवाली भाजी. लोकं कमी असले तरी व्यवस्थित आनंदाने खाणारे लोक आहेत. त्यामुळे अंदाज जास्त ठेवावा लागतो.

वेगन ऑप्शनआहे त्याच मेनूमधे ठेवणार आहे, कारण ती एकच व्यक्ती आहे. स्टार्टर जनरली ड्रिंक्स असले की जास्त खपतात.

तसंही मी फक्त फिरनी आणि हयग्रीव करणार आहे, बाकीचं आऊटसोर्स.

कोबी पचडी /
किसलेले गाजर + मूगडाळ / हि मू + कोचवलेली काकडी कोशिंबीर (पचडी) /
खमंग काकडी /
मिक्स भाज्यांचे लोणचे/
सुंदल

पापडाची कोशिंबिर करायची -लाल पापड गॅसवर भाजून , त्यात बारीक चिरलेला कांदा, हि मिर्ची, खोबरं. शक्य असल्यास एका वाटीत निखार्‍यावर खोबरेल तेल टाकून त्याची धुरी द्यायची. निखारा वगैरे नको असेल तर थोडे खोबरेल तेल पापडावरच पसरवायचे पापड गरम असताना.

स्टार्टरमधे मसाला पापड, गनपावडर + फोडणी वाल्या कॉकटेल इडल्या हे व्हेगन लोकांना पण चालेल

फिरनी व हयग्रीव हे जाम बोअर आहे. नवे काही ऑप्शन आहे का जसे फ्रूट श्रीखंड/ मिश्टी दोई, जलेबी/झांगरी
माल पूवा रबडी. आ इस क्रीम फ्रूट सलाड? तिरा मिसू चॉकोलेट मूस

आंध्रा फूड काही नाही का रायलसीमा रुचुलू टाइप गोंगुरा मटन किंवा तेलंगणा स्पेशा लिटी? दिंडीगल बिर्यानी बरोबर फिश फ्राय मस्त लागते.

@ अरुंधती आणि गीता, धन्यवाद ऑप्शन्स सुचवल्या बद्दल! फ्राईड राईस किंवा नूडल्स चा पर्याय पण चांगला वाटतोय..आधी करुन ठेवुन ऐन वेळी वाढताना फ॑क्त गरम करुन देता येइल म्हणून राईस चा विचार करतीये..कारण फ्रँकी ऐन वेळेस करावी लागेल!

सर्व सूचना आणि सल्ल्यांसाठी धन्यवाद. आता मेनू फायनल केला.

स्टार्टर्सः चिकन कबाब, प्रॉन्स, व्हेज मिनि कटलेट, मिनि समोसा, पापड (आप्पलम), लोणचं आणि दोन प्रकारच्या चटण्या (गन पावडर आणि खोबर्‍याची)

सूपः पेप्पर रस्सम आणि लेमन कोरीअ‍ॅन्डर सूप.

सॅलडः कांद्याचं दह्यातलं रायता, मुगाची पचडी आणि कच्चे टोमॅटो, गाजर, लेट्युस वगैरे

मेन कोर्सः चिकन बिर्याणी, थक्काली सादम, मिक्स व्हेज मसाला इन तमिळ स्टाईल. (हे केटररने चवीसठी आणलं होतं. मस्त लागलं). चिकन ग्रेव्ही (ही बिर्याणीसोबत हवीच से केटररचे ठाम मत)

डेझर्टः रोझ्/कॉफी आणि प्लेन फिरनी (हे देखील केटररने त्याच्याचकडे घेतलं) आणि हयग्रीव.

शिवाय इतर व्यंजने आणी चखणा असेलच.

थक्काली सादम, मिक्स व्हेज मसाला इन तमिळ स्टाईल >> या दोन्हीची 'मामी अप्रूव्हड रेसिपी' शोधून टाकशील.

( मामी = मायबोलीवरच्या आयडी नव्हे,. नंदिनीच्या शेजारणी मामी )

धन्यवाद, पाहुण्यांना साउथ ईंडियन पदार्थ आवडतात म्हणून हा बेत ठरवला आहे. जोडीला आता पुलिहोरा आणि हयग्रिव करेन. नंदिनीची पाकृ वेळेवर आली आहे अगदी!!!! Happy

जोरदार दिस्त्येय अन काय पार्टी! आल द बेष्ट.
व्हेगन्सना दहीदूधही चालत नाही, हेच लिवायला आल्तो, पण श्रमातेने आधीच लिवलंय अन नंदिनीतैंना आल्रेडी ठावं हाय ह्ये पाहून परतायलोय.

व्हेगन्सना तूप, लोणी, जिलेटिन असलेली डेझर्ट पण चालत नाहीत. बर्‍याच अभारतीय डेझर्ट्समध्ये जिलेटिन, मिल्क पावडर असते म्हणून सांगितल.

पुरण्पोळि,कटाची आमटि, बटाटा भाजी,पुलाव्,साधा भात, काहितरी अपेटायझर या बरोबर जाणारी साईड डीश सुचवा,।हा पॉट्लक चा मेनु आहे,,पुरणपोळ्या होस्ट भारतातुन घेवुन आलिये, बाकी डिशेश कुणि कुनी आणतय..मला काय न्याव हे सूचत नाहिये..

मी भरल्या मिरच्या नेणार होते, तस तिला सा.न्गुन ही झाल, पण २ दिवस झाले मि सर्दिने एवधी हैराण आहे, त्यामुळे आता ई.ग्रो मधे जाण होणार नाही बहुधा ..त्यामुळे दुसर काही जमतय का बघत होते..
कोशी.न्बिर्,चटणि,पापड अस सगळच नेइल..धन्यवाद! ( साध्या गोश्टि ही सुचत नाहित काहिवेळा)

Pages