Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्याकडे वीकेंड ला १२ मोठे
माझ्याकडे वीकेंड ला १२ मोठे जेवायला येणारेत . veg Biryani आणि Rayata final आहे . नंतर ice cream देईन
पोळी-भाजी असा घाट घालायचा नाहीये . आणि पाव भाजी / इडली / etc पण नकोय . तळलेले नकोय .
veg Biryani आणि Rayata सोबत अजुन पोटभरीचे काय ठेवता येईल ?
चाट प्रकारातला एखादा पदार्थ
चाट प्रकारातला एखादा पदार्थ बिर्याणीबरोबर खायला आवडातो असा अनुभव आहे, उदा. पापडी चाट किंवा कॅनपीजमधे शेबपुचं मटेरीयल.
रेडिमेड नाचोज + घरचं एखाद
रेडिमेड नाचोज + घरचं एखाद दुसरं डीप (साल्सा आणि चीजी वा तसलं) पण अर्थात ते काही पोट्भरीच अस नसेल. उगाच कुरकुरीत चावायला
पॅटीस, ग्रील्ड व्हेज वगैरे पण चालतील
veg Biryani बरोबर मसाला पापड
veg Biryani बरोबर मसाला पापड किंवा मंजूडी म्हणते तसं शेव बटाटा पुरी.
चिकन बिर्याणी असेल तर माझं ठरलेले कॉम्बिनेशन म्हणजे चिकन बिर्याणी, मसाला पापड, कैरीचा चुंदा आणि सोलकढी.
रुमाली रोटी आणि कबाब मिर्ची
रुमाली रोटी आणि कबाब मिर्ची का सालन. टॉमाटो कट, खट्टी दाल. बिर्यानी, रायता डबल का मीठा/ खुबानी का मीठा.
आलू पराठे / मेथी पराठे / इतर
आलू पराठे / मेथी पराठे / इतर कोणत्याही प्रकारचे स्टफ्ड पराठे - भाज्यांचे लोणचे. पापड. चिरलेले सॅलड. तडका दाल / दाल माखनी.
मिसळ-पाव??
१५ लोकांसाठी आलू पराठे आणि
१५ लोकांसाठी आलू पराठे आणि गाजराचा हलवा करणारे ... किती बटाटे आणि गाजरं घ्यावीत ?
१५ लोकांसाठी आलू पराठे?
१५ लोकांसाठी आलू पराठे? धैर्यवान!
practically ४ लोकांपेक्षा जास्त असतील आणि एकटाच माणूस बनवत असेल तर बनवायला थोडी मदत घ्या कारण सगळ्याना गरम-गरम पराठे देण्यातच मजा आहे. तव्यावरून-ताटात! वर दणदणीत तूप आणि बाजूला कांदा, मूळा आणि "आचार - पचरंगा" चे लोणचे! Trust me! a Winner Combo!
साधारण १५ कप किसलेले गाजर लागेल म्हणजे अंदाज घ्या. जास्तच कमी नको!
१५ लोकांसाठी आलू पराठे?
१५ लोकांसाठी आलू पराठे? धैर्यवान! >>> खरंच!
आलू पराठे करताना कणीकेची पारी करून त्यात बटाट्याचे सारण भरून करीत असाल तर आणि व्यवस्थित खाणारे असतील ३.५० ते ४ किलो बटाटे लागतील.हे प्रमाण देताना आलू पराठ्याचा आकार मोठा धरला आहे.
आलू प्राठे वगैरे दमछाक काम
आलू प्राठे वगैरे दमछाक काम आहे.
पाहुणे येतात तेव्हा आपणे थकलेले दिसून चालणार नाही.
दुसरं मेनू ठेवलेला बरा राहिल. तुम्हाल पटत असेल तर बाहेरच का नाही मागवत?
आलू पराठे पोळ्यांना मावशी
आलू पराठे पोळ्यांना मावशी येतात, त्या करुन देणारेत... आयत्या वेळी मायक्रो ..मधे गरम करणारे ..
आलू पराठे पोळ्यांना मावशी
आलू पराठे पोळ्यांना मावशी येतात, त्या करुन देणारेत... आयत्या वेळी मायक्रो ..मधे गरम करणारे .. > एक फु. स. - आलू पराठे करून, अर्धेवट भाजून (कोरडेच) ठेवा. आयत्यावेळेस २ तवे करून भराभर बटर/तू/ते वापरून भाजून सगळ्यांना गरम गरम देता येतील. आधी थोडी मेहेनत होईल पण नंतर सगळ्यांना एकदम खाता येतील.
मायक्रोमध्ये सॉगी नाही का होणार?
जनरली मोठा पराठा असेल अन व्यवस्थित खाणारे लोक असतील तर माणशी २ (अॅवरेज) खाल्ले जातात.
योकु +१ सरासरई माणशी २ आलु
योकु +१
सरासरई माणशी २ आलु पराठे (पराठा मोठा आणि छान जाडसर आहे हेगृहित धरले आहे) + २-४ जास्तिचे इतके पुरतिल.
पराठ्वे मावेमध्ये गरम केल्यावर मजा येत नाही. त्यापेक्षा योकुनी लिहिल्यासारखं कोरडे भाजून ठेवायचे आणि मग वाढताना तव्यावर तुप घालून तळायचे (हो कॅलरीज चा विचार न करता भरपुर तुपामध्ये/तेलामध्ये तळल्यासारखे भाजायचे) एकदम करारे व्हायला हवेत.
योकू जबरी आयडिया आहे.. चमकी,
योकू जबरी आयडिया आहे..
चमकी, गाजराचा हलवा आदल्या दिवशी केला तर जास्त मुरतो आणि दुसर्या दिवशी खायला छान लागतो! म्हणजे एकाच दिवशी धावपळ नाही होणार!
आलू पराठ्यात साधारण एका
आलू पराठ्यात साधारण एका बटाटेवड्याएवढा गोळा कणकेत भरला जाईल असं गृहीत धरलं तर ३० बटाटेवडे + १० वडे जास्ती अश्या अंदाजाने दीड ते पावणेदोन किलो बटाटे लागतील.
एक किलो बटाट्यात मध्यम आकाराचे १६-१८ बटाटे येतात आणि साधारणपणे २५ ते ३० बटाटेवडे होतात.
अल्पना .. हो ग ! सॉगी होतील
अल्पना .. हो ग ! सॉगी होतील कदाचित ..
योकु आणि तुझ्या आयडियाने 'करारे' करुन बघेन
गायत्री आदल्या दिवशी करणारे ..
मंजुडी ..धन्यवाद !
शनिवारी आमच्याकडे पाहूणे
शनिवारी आमच्याकडे पाहूणे जेवायला येणार आहेत. ईडली, सांबार, चटणी असा बेत ठरला आहे. त्याच्या जोडीला आणि काय करता येईल ते सुचवा ना प्लीज!!!!!
गव्हाची खीर.
गव्हाची खीर.
गाजर हलवा (+
गाजर हलवा (+ आईसक्रीम)
शेवयाची / दलिया खीर
खरवस
इडली चटणी सांबार बरोबर पाल
इडली चटणी सांबार बरोबर पाल पायसम, स्वीट पोंगल, हयग्रीव यातील एक काही तरी.
भात नसला तर जेवण झालेच नाही असे वाटणारे लोक असतील तर चित्रान्ना, लेमन राइस, कर्ड राइस, पुलिहोरा , वांगी भात असे काहीतरी एक
मेधा छान suggest केलत. माला
मेधा छान suggest केलत. माला इडली चटणी सांबार बरोबर काय serve करायचे हा नेहमी ? पडतो.
चित्राना झिंदाबाद प ण सिरीअस
चित्राना झिंदाबाद प ण सिरीअस ली इडली सांबार हा ब्रेकफासट मेन्यू आहे. अर्थात पाव्हण्यांना हवेच असेल तर नो इश्यूज.
व्हेज फ्रँकी, गार्लिक ब्रेड,
व्हेज फ्रँकी, गार्लिक ब्रेड, मंच्याव सूप या मेनु बरोबर राईस जाईल का? मी एग राइस करायचा विचार करतीये. शनीवारी किंवा रवीवारी संध्याकाळी असेल पार्टी. एकूण ८ जण आणि ३ लहान मुले! काही तरी वेगळ हवय, आत्ता पर्यंत न झालेल म्हणून फ्रँकीचा ऑप्शन घेतला..अजूनही काही ऑप्शन सुचवा प्लीज! स्वीट मधे ट्रायफल पुडींग कसे वाटेल?(मिसळपाव वरची "अनन्न्या" हीची रेसीपी)
योकू जबरी आयडिया आहे..
योकू जबरी आयडिया आहे.. +++१
करुन बघतेच आता .
काय करून बघणार?
काय करून बघणार?
शनिवारी रात्री सतिशच्या काही
शनिवारी रात्री सतिशच्या काही ज्युनिअर्सना घरी सकुसप जेवायला बोलवायचे ठरत आहे. साधारण पंधरा ते पंचवीस लोकं असतील. लहान मुल चार पाच. त्यामध्ये बरेचसे तमिळी, दोन तीन मल्ल्याळी, तेलुगु, एक नॉर्थ ईस्टकडचा आणी एक अमेरिकन असा ग्रूप आहे. आज केटरर बोलावला होता त्याने नुसत्या भाताचे सतराशे आयटम्स सांगितलेत. पण सर्वांना झेपेल असा मेनू ठरवायचा आहे.
स्वीटमधे मी फिरनी आणि हयग्रीव करणार आहे. बाकी सर्व आऊटसोर्सिंग. चिकन बिर्याणी आणि टोमॅटो राईस हे दोन भाताचे ऑप्शन फायनल केलेत. अ, स्टार्टर्स, सूप आणि ग्रेव्हीमध्ये वगैरे. अजून थोडे सजेशन्स द्या
नंदिनी >> स्टार्टर्स >>
नंदिनी >>
स्टार्टर्स >> पाणीपुरी / शेव दही बटाटा पुरी / बेबी कॉर्न मंचुरियन / व्हेज मंचुरियन / मिक्स व्हेज पकौडे / बोंडा.
सूप >> मंचाव सूप / मिक्स व्हेज सूप / स्वीट कॉर्न सूप.
कुसुमिता१२३४, फ्राईड राईस?? किंव तवा पुलाव??
@ नंदिनी: वेजः स्टार्अरः
@ नंदिनी:
वेजः
स्टार्अरः हराभरा कबाब्/स्प्रिन्ग रोल्/ कोर्न पकोडा
सूपः लेमन कोरिअन्डर / मन्चाव/ हॉट अन सोर
मेनः टोमॅटो राईस
नॉन्वेजः
स्टार्अरः चिकन कबाब-ग्रीन मसाला(हैद्राबादी), प्रॉन्स फ्राय
सूपः क्लिअर चिकन/ चिकन मन्चाव
मेनः चिकन बिर्याणी.
कॉमनः मसाला पापड/ रशिअन सलाद/ पास्ता प्रकार जो मुले पण खाऊ शकतील., आईस्क्रीम.
वेल्कम ड्रिन्कः पन्हं/कोकम्/लिम्बुसरबत
@कुसुमिता: चाय्नीज नूडल्स
@कुसुमिता:
चाय्नीज नूडल्स हक्का/शेज्वान? किंवा वेज पास्ता ?
नंदिनी, एखादी थीम ठरवून
नंदिनी, एखादी थीम ठरवून त्यानुसार पदार्थ ठरवता येतात का पहा
बिर्याणीमधे सुद्धा डिंडीगल पद्धतीची बिर्याणी धरलीस तर इतरही तमिळ पद्धतीचे पदार्थ ठेवता येतील - टॉमेटो राइस वगैरे चालून जाईलच पण हयग्रीव मस्त सूट होईल.
फिरनी नक्की असेल तर थोडे मुस्लिम इन्फ्लुएन्सड पदार्थ - शीख कबाब , चापली कबाब,पाया सूप , दम बिर्याणी, मिरची का सालन, दुसरे स्वीट म्हणून शेवयांची खीर असा मेनू ठेवता येईल.
मल्याळी पदार्थ करुन देणार असेल तर मीन मोइली, मल्लू स्टाइल चिकन करी, अवियल, लेयर्ड पराठा, असे पदार्थ विचारु शकता केटररला
Pages