बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरळीच्या वड्या, पाटवड्या, इंग्रो मधल्य अळू वड्या, कोथिंबीर वडी असे काहीतरी अ‍ॅपेटाय्झर
फुग्यामिरचीची पंचामृत नावाची भाजी , भजी तळण करण्याएवजी वांगी , फ्लावर, बटाटा, कच्ची केळी यांचे शॅलो फ्राय केलेले काप असे काही नेता येईल

बेत मस्त आहे. Happy
भजी, पापड्या, कुरडया, पापड, मिरगुंडं असं तळण फर्मास होईल ह्या बेतात. सिंडरेला +१.
कोशिंबीर : गाजर-टोमॅटो / खमंग काकडी / बुंदी रायता / पचडी / केळं - डाळिंबाची दह्यातली कोशिंबीर.

अरे वा! मस्त मस्त सजेशन
दुसर कुणि आणणार नसेल तर अळुवड्या, कोशि.न्बिर, आणी प.न्चाम्रुत हे जमवेल.. होस्ट बाई.न्ना विचारते..

अळूवड्या दिपच्या कीस्वादच्या?, कोणत्या चा.न्गल्या आहेत, आम्च्याकडे दोन्ही ब्रॅन्ड दोन वेगबेगळे दुकान वाले ठेवतात..

प्राजक्ता, पुपो आणि बटाटा भाजी असल्यावर असल्यावर पाटवड्या, सु.वड्या, को. वड्या इत्यादी बेसन असलेले पदार्थ शक्यतो टाळलेले बरे Wink वांगी तर अजिबात नकोत Proud
तिकडे कैर्‍या सहज मिळण्यासारख्या असतील तर कैरीचा टाक्कू/ इन्स्टन्ट लोणचं/ सखुबत्ता यापैकी काही नेता आलं तर लोकं तुटून पडतील.
कैर्‍या मिळणार नसतील तर खमंग काकडी.. बाधणार नाही.

म.न्जुडि!smiley4.gif
कैरिचा तक्कु भारी प्रर्याय आहे.. बघते कैरी मिळतेय का! पण तरी अळुवडि नेइलच,
अमा!दिपच्या समोस्या.न्ना नो मिळालाय! लई वेळा होतात..

कोकणात होळिसाठी जायचंय. तर तिथे देवाची पालखी येऊन गेली कि सगळ्यांना काही खाऊ (स्नॅक्स) द्यावा लागतो. मी मुंबईतुन जाणार आहे दोन दिवस आधी!! तिथे जाऊन बनवु शकत नाही.
तर काय नेता येईल? (गेल्या वर्षी चिवडा-लाडू नेलेला. पण तो खुप कॉमन वाटला)

स्वाती, बालूशाही?? गोड पदार्थ आहे, चांगल्यापैकी टिकते आणि वाटायला सोपी.
(व्हिटी स्टेशनच्या सबवेमधे 'श्रीजी फूडस'कडची छान असते Wink पेढ्याच्या आकारात असल्याने लोकं 'तुकडाच द्या, अर्धीच घेतो' वगैरे प्रकार करत नाहीत.)

Tikhat bundi/ Shev? Kinwa konatyahi prakarchya chips?

दिपच्या अळुवड्यच नेल्या, ( दिपच पाकिट फसव आहे, दिसायला बाहेरुन लहान दिसत होत पण आत वड्या भरपुर आहेत.)
३ पाकिट वड्या भरपुर झाल्या..

मी ३५ लोकांसाठी २ आठवड्यापुर्वी हा मेनु घरी एकटीने केला.
व्यवस्थित अन्न पुरलं, वाया अजिबात गेलं नाही.

स्टार्टर-
कच्छी दाबेली (३६ पिसेस)
कॉकटेल समोसे (४८)
स्पिनाच चीझ स्टार्टर (६६ पिसेस)

मेन कोर्स-
पनीर मटर (५.५ कॉर्टचं भांडं)
बैंगन मसाला (४० वांग्यांचा )
पालक मकई (४.४ कॉर्टचं भांडं)
छोले (५.५ कॉर्टचं भांडं )
नान - ३० (विकतचे)
दाल तडका (२.५कॉर्टचं भांडं)
जीरा राईस (७ कपाचा )

एका चितळेच्या पॅकचे गुलाबजामुन

आईस्क्रिम आणि बुंदी रायता फ्रिजात विसरले.

शुक्रवारी दोन फॅमिलीजना बोलवायचंय जेवायला. व्हेजी मेन्यू ठेवायचाय. पिटा पॉकेट्स मधे फलाफल घालून सँडविचेस करावी म्हणतेय. पण ह्या बरोबर अजून काय ठेवता येईल? काही सजेशन्स?

मुग्धा, व्हेगन म्हणजे प्राणीजन्य पदार्थांचा वापर नाही.

प्रीति, कमाल आहे बाई तुझी!
मला तर खाणार्‍या लोकांचीही कमाल वाटते. दाबेली, कॉ. समोसे सारखे स्टार्टर खाऊन चार - चार भाज्या, गुलाबजाम वगैरे कसे काय खाऊ शकले?
रच्याकने, त्या उरलेल्या आईसक्रिमचं काय केलं? Wink
आईसक्रिम तर ठीक आहे, ते फ्रिजमधे टिकू शकेल, पण बुंदी रायत्याचं काय केलं?

१० Officechya लोकान्साठी.. पोट्लक साठी स्टार्टर बनवायचे आहे.
मी रुमवर राहते. No refridgerator, No oven, No mixer-grinder. (नोर्मल कुट्बिट करण्यासाठी छोटा खलबत्ता आहे Happy )..
तसेच सकाळी ७.३० ला घरातून निघावे लागते..
त्यामुळे जास्त complicated पदार्थ नाही करता येणार मला.
काहितरी सोपे पदार्थ सुचवता का प्लिज. आणि जमल्यास रेसिपीची लिन्क दिलात तर खूप खूप आभारी.. Happy

@ स्नेहा: फ्रेंच फ्राईज-केचप / आलू कटलेट्/मिनि साईज मिक्स व्हेज कटलेट/ मिनि ईड्ली + तिखट मीठ जीरेपूड फोडणी / ईडली चिली/ पनीर चिली

@ स्नेहा: फ्रेंच फ्राईज-केचप / आलू कटलेट्/मिनि साईज मिक्स व्हेज कटलेट/ मिनि ईड्ली + तिखट मीठ जीरेपूड फोडणी / ईडली चिली/ पनीर चिली

Pages