Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेका, तुझा मुद्दा अगदी बरोबर
वेका, तुझा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण ज्ञातीच्या मेन्यूमध्ये फक्त मिसळ आणि फ्रुटसॅलड एवढे दोनच पदार्थ दिसल्याने तिला पर्याय सुचवले. माझं ऑब्झर्व्हेशन आहे की असही मुलांना पार्टीत अगदी एका जागी बसून, चारी ठाव घरी जेवतो तसं असं काही करण्याची इच्छा नसते. बर्याचदा त्यांना मित्रमंडळींबरोबर खेळण्यात जास्त इंटरेस्ट असतो. त्यामुळे जितक्या पटकन खाणं संपेल तितकं ते बघत असतात. पार्टीत खादाडीची हौस ही मोठ्यांचीच असते. माझ्याकडे मी जनरली मुलांसाठी वेगळं करत नाही. पंजाबी मेन्यु किंवा साउथ इंडीयन, पावभाजी चायनीज , इतर काही मराठी प्रकार हे मुलं खातात थोडं थोडं. साताठ वयानंतरची मुलं तर व्यवस्थित हे पदार्थ खातात. अगदीच ४ च्या आतील असतील तर मात्र मी वरण-भात किंवा पास्ता एक ऑप्शन म्हणून नेहमी ठेवते. पण अगदीच मिसळ्/शेवेची भाजी असा काही बेत असेल तर मात्र एकतर सगळ्यांसाठी भाताचा प्रकार तरी ठेवते किंवा मग मुलांसाठी वेगळं.
पिझ्झा/पास्ता हवा की बाकीचं हा चॉईस आपण विचारू शकतो मुलांना पार्टीत. जर एखाद्या मुलाला हवी असेल मिसळ तर खाईल की तो. आवडीवर पण आहे. मला माहित आहे की माझ्या लेकाला मिसळ आणि पास्ता असे ऑप्शन दिले तर तो मिसळच खाईल.
पण सगळी मुलं तेच खातील असं नाही ना. मग त्यांनी अगदीच काही न खाण्यापेक्षा त्यांच्या आवडीचं आनंदाने खाल्लेलं बरं नाही का.
my objection is why these
my objection is why these kids had been allowed to eat or provided with 'kami or no tikhat' veggies? when they started eating solid food at the age of 6 / 8 month why they haven't been given same food which has been cooked for everybody else in the family?
my son eats whatever is prepared; so I never think about preparing seprate food for him or other kids. that created problem when some of his cousin came to our place last summer. at dinner table these other kids literally started looking at plate did not know what to eat? they started asking for gul, pithi sakhar, shikran with poli n milk with rice. they were not ready to eat bhaju, chutney n koshimbir with poli n amti / kadhi / patal bhaji with rice.
their mom told you see they eat only typical brahmani food and I asked what is this I have been cooking? it has necessary chinch-gul-kala masala-khobare-kothimbir.
वेका, एकदम व्हॅलिड पॉईंट.
वेका, एकदम व्हॅलिड पॉईंट. पटलाच. शिवाय भारताबाहेर जे पिझ्झा मिळतात ते त्यात हालापेनो नसेल तर तिखट अजिबातच नसतात.
आम्ही सुरुवातीपासूनच मुलाला नुसता चीज पिझ्झा कधीही दिला नाही. मोठ्यांच्यामधला भाज्या घातलेला पिझ्झा द्यायचो. भारतीय जेवणात तिखट नसणारा काहीतरी पर्याय मिळतोच. काही नाही तर नुसतं पनीर, रायतं,पोळी/पुरी/भात आणि गोड एवढ्यावर त्याचं जेवण व्हायचं.
मात्र आम्ही चकी चीजेस मध्ये त्याचा वाढदिवस केला तेव्हा मुलांसाठी चीज पिझ्झा मागवला होता ( आयत्यावेळी विचारलं होतं बहुतेक पालकांना पण चीज पिझ्झा मागव असंच मत दिलं बर्याचजणांनी )
राजसी, पालकच अजिबात तिखट खात नसतील तर ?
दुसरीकडे गेलं की आम्हालाच तिखट जेवणाचा प्रॉब्लेम येतो तर मुलगा काय करेल ... तरी जसा मोठा होतोय तसं हायहुय करत तिखट खायला शिकतोय. पण सवय नसल्याने त्रास होतोच !
* आधीच्या पोस्टस नीट वाचलेल्या नाहीत. हा मुद्दा मलाही फार खटकत आलाय म्हणून लिहावंसं वाटलं.
बिल्वा म्हणून मी ज्ञातीला
बिल्वा म्हणून मी ज्ञातीला सॉरी सांगून ठेवलंय I m only taking my frustration off that I have here and none of the MB ids or their parties are associated to that...I said it's just a general observation.
खर् ही चर्चा हा वेगळ्या धाग्याचा अत्यंत वॅलिड विषय आहे...बर्याच लोकांच्या मनात असेलही
बिल्वाची पोस्ट पटली. साधारण
बिल्वाची पोस्ट पटली.
साधारण सर्व मुलांना आवडेल, ते पटकन, फार मेस न करता खातील असा मेनु ठेवायचा विचार होस्ट करत असतील.
अगो, इथे मोठ्यांसाठी सुद्धा चीज पिझा ऑर्डर करतात बहुतेक वेळा.
अगो, इथे मोठ्यांसाठी सुद्धा
अगो, इथे मोठ्यांसाठी सुद्धा चीज पिझा ऑर्डर करतात बहुतेक वेळा. >>> हो का ? मी तरी कधीच नाही पाहिले. मोठ्यांसाठी कायम अर्धे चिकन आणि अर्धे व्हेज डिलाईट.
I am all for personal
I am all for personal preference / capacity to eat tikhat but these kids says no without even tasting if its tikhat or spicey. they straightaway rejects healthy choices n go for jam cheese, sugar , gul
I think parents also does not press for healthy choices n go for easy way out. I may be wrong 
I am all for personal
I am all for personal preference / capacity to eat tikhat but these kids says no without even tasting if its tikhat or spicey. >>> ओके
बिल्वा +१
बिल्वा +१
वेकाचा मुद्दा मलाही
वेकाचा मुद्दा मलाही पटला.
माझ्याकडे हळदीकुंकू आहे, येणार्या निम्म्या मैत्रिणींना अजून एका ठिकाणी जायचेय. मुलांना खायला सोप्पा पडेल असा पदार्थ हवाय. उपमा करायचा विचार केला पण ते किती आवडीने खातील माहीत नाही. पास्ता हा चांगला पर्याय वाटतोय. होल व्हीट पास्ता सहज उपलब्ध असतात ते एक बरे.
मिसळीच्या प्रमाणाबाबत कोणी आणखी मार्गदर्शन करू शकेल का? आगाऊ धन्यवाद!
गाजर किसून, कोबी किसून
गाजर किसून, कोबी किसून कोलस्लॉ त्यात मटार उकडून ह्याचे होल ग्रेन ब्रेड मध्ये सँडविच बनवता येइल ह्यात मे योनीज हा एक अनहेल्दी फॅटनिन्ग पदार्थ आहे. कमी ति खटाची मटार कॉ र्न पॅटी? इथे भारतात
मॅकेन ब्रँड व्हेज कटलेट, आलू टिक्की पोटॅटो वेजीज वगिअरे मिळतात ते न तळता तव्यावर परतून दिले
व बरोबर सलाद दिले तर हेलदी होणार.
पर्वा मैत्रिणीकडे हळदीकुंकू
पर्वा मैत्रिणीकडे हळदीकुंकू होतं, वीकडे होता. आणी येणार्या बायका बर्याचशा लांबून, कुणी ऑफीस करून येणार्या अशा होत्या. तिने मोठ्यांसाठी पावभाजी ठेवली होती आणी लहान मुलांसाठी तीच पावभाजी थोडी कमी स्पायसी वेगळी काढून ब्राऊन ब्रेडमधे ती भाजी आणी चीज घालून सँडविचेस केली होती. जोडीला मुलांसाठी कपकेक्स होते.
ज्ञाती, इडली चटणी सांबार का
ज्ञाती, इडली चटणी सांबार का नाही करत? आत्ता हळदी कुंकूला गेलेले तिथे तोच होता मेनु. मुल पण खातील. ३५ लोक म्हणजे खूप आहेत. घरी करण्या ऐवजी दोन ट्रे ऑर्डर करु शकशील का?
दोघी/तीघीनी मिळून परवा हळदी कुंकु ठेवलेले तिथे खिचडी, ढोकळा,सामोसा,चहा असे होते.
मिसळ करणार असाल, तर सोबत दही
मिसळ करणार असाल, तर सोबत दही ठेवता येईल की.. जर् तिखट लागली मिसळ कोणाला, तर दही मिसळीचा ऑप्शन असतोच. ती लहान मुलांनाही खाता येइल.
कमी तिखटाची कटलेट्स, कॉर्न
कमी तिखटाची कटलेट्स, कॉर्न पॅटीज, आलू टिक्की हे पर्यायही लहान मुलांना खायला चालू शकतात. उडीद वडे, लहान आकाराचे बटाटेवडे, तिखटाचे आप्पे, ढोकळा हेही प्रकार चालतील बहुतेक.
माझ्याकडे शनिवारी ५ फॅमिलीज
माझ्याकडे शनिवारी ५ फॅमिलीज जेवायला होत्या. तेव्हा हे केलं होतं-
स्टार्टर्स- दीपचे बेक्ड समोसे, चिप्स डिप्स, नॉनव्हेज मंडळींना चिकन कबाब्ज, फिश वगैरे
मेन कोर्स- पनीर मखनी, बघारे बैंगन, चिकन करी, गोट करी, रायता, पुलाव, गूळपोळ्या, नान
डेझर्ट- फ्रूट सॅलड विथ आईस्क्रिम.
( यातलं सगळं नॉनव्हेज, नान बाहेरून ऑर्डर केले होते. मुलांनीही हेच खाल्लं)
सल्ल्यांबद्दल सर्वांना
सल्ल्यांबद्दल सर्वांना धन्यवाद.
इंग्रो मध्ये तयार इडलीचे पीठ मिळते त्यात साधारण किती इडल्या होतात, म्हणजे मोठ्या आकाराच्या.
अकु, मुलांन चालतील असे पदार्थ आहेत गं, मला घरी त्यादिवशी इतक्या प्रमाणात काय करायला सोपे पडेल या दृष्टीने विचारतेय.
इंग्रोच्या तयार पीठाच्या
इंग्रोच्या तयार पीठाच्या इडल्या एकदम बेक्कार होतात. अगदी दडदडीत. त्यापेक्षा घरी पीठ करणं बरं पडेल जरी थोडं खटपटीचं झालं तरी.
ज्ञाती, इडल्याच करणार असाल तर
ज्ञाती, इडल्याच करणार असाल तर शेवयांच्या किंवा MTRच्या रवामिक्स्च्या इडल्या छान होतात. फरमेंट होण्या- न होण्याची भानगड नसल्यामुळे डोक्याला व्याप नाही.
MTR किंवा गिट्सच्या रेडी
MTR किंवा गिट्सच्या रेडी मिक्सच्या इडल्या चांगल्या होतात.
फ्रोझन मेदु वडे बेक करून आणि सोबत घरी केलेलं सांबार असा मेनु चालेल का?
इंग्रोच्या तयार पीठाच्या
इंग्रोच्या तयार पीठाच्या इडल्या एकदम बेक्कार होतात. अगदी दडदडीत. >> ओह! बरं झालं सांगितलंस, मी कधीच आणलं नव्हतं त्यामुळे हे माहीतच नव्हतं. सांबार तर नक्की जमेल करायला. इडल्या ऑर्डर करता येतात का पाहते. नाहीतर एम्टीआर चं रवा मिक्स वापरते.
ज्ञाती कृपा करून इंग्रो
ज्ञाती कृपा करून इंग्रो मधल्या पीठाच्या इडल्या नको. चिकट आणी वरती लिहिल्याप्रमाणे बेक्कार.
इंस्टंट रवा इडली बेष्ट ऑप्शन.
वेका चा मुद्दा बरोबर आहे. माझंही मत बिल्वासारखच. आता आम्हा सगळ्यांची पोरं ७-८ ते १५-१६ वयोगटातली असल्याने मुलांसाठी वेगळं काही करावं लागत नाही
गेस्टांमध्ये अमेरिकन मुलं
गेस्टांमध्ये अमेरिकन मुलं असतील तर काय करता? १५-१६ वर्षांची असली तरी भारतीय पदार्थांचं वारं न लागलेली मुलं असतात की. मोठी माणसं पण असतात अशी.
अमेरिकन मुली असतील तर मी
अमेरिकन मुली असतील तर मी भारतीय मेन्यूच नाही ठेवत. मेहनत फुकट जाते उगाच. मग मोठ्यांसाठी पण पास्ताच
ज्ञाती, मिपावरच्या पेठकर
ज्ञाती, मिपावरच्या पेठकर काकांच्या रेसीपीने झटपट रवा इडल्या होतात. माझा लेक त्याच करतो. छान फ्रीज होतात त्यामुळे आधी करुन ठेवता येतात.
अमेरिकन मुल असतील तर मी
अमेरिकन मुल असतील तर मी पिझ्झाच ठेवते. बरोबर सॅलड, मॉझरेला स्टिक्स ,मॅकरोनी चीज,स्पॅगीटी बर्याच प्रकारची फळ कापून (काचेच्या बोल मध्ये), इत्यादी असत. सर्व पदार्थ व्हेजिटेरिअन.
..................
ज्ञाती, जर घरी करणार असशील तर नेहमीच्या पद्धतीने पीठ फरमेंट करुन कर.(अस मला वाटत.कारण पुरवठा येईल. ) फक्त पीठ एक दिवस पुर्ण फरमेंट करुन फ्रीज मध्ये ठेव. म्हणजे ऐनवेळी पीठ फुगले नाहीतर वगैरे टेंशन रहाणार नाही. इडली करण्याच्या अगोदर २ तास बाहेर काढून ठेव. सांबार डाळ वगैरे शिजवून फ्रीज मध्ये ठेव. फोडणी मात्र त्या दिवशी सकाळी घाल.
परवा माझ्याकडे चाट खूप
परवा माझ्याकडे चाट खूप आवडणारी साउथ इंडिअन फॅमिली जेवायला होती.
मी पाणी पुरी, छोले -सामोस चाट, कॉर्न (चाट मसाला लावून .त्यांच्या मुलीची फर्माईश होती),दही वडे, गुलाबजाम (बिन खव्याचे) अस केलेल. Just in case असावच म्हणुन सायोच्या पद्धतीने पनीर माखनी आणि पुरी.
सामोसा तयार आणलेला कॉस्टको मधून सुखी चा. आणि पुरी सेमी होम मेड.
सामोसा तयार आणलेला कॉस्टको
सामोसा तयार आणलेला कॉस्टको मधून सुखी चा.>>>> कसा आहे?
आणि पुरी सेमी होम मेड>>> ती कशी?
सुखी चा सामोसा आमच्याकडे
सुखी चा सामोसा आमच्याकडे फार्मर्स मार्केट ला पण मिळतो, एक स्टॉल सुखी चा असतो, त्यांचे सगळे प्रॉडक्ट्स टेस्ट करायला पण मिळतात.
BS , आम्हाला आवडला. स्पायसी
BS , आम्हाला आवडला. स्पायसी अजिब्बात नाहीये. आकारही एकदम पर्फेक्ट आहे. (मला देसी फ्रोजन फुड आजपर्यंत कुठल आवडल नव्हत पण हा सामोसा आवडला.
Pages