Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला थँक्सगिविंग पॉट्लक होस्ट
मला थँक्सगिविंग पॉट्लक होस्ट करायचे आहे, प्लीज मेनु सुचवा..१८ मोठे आणि १२ मुले आहेत. सगळे मराठी आहेत
नॉन व्हेज चालत असेल तर
नॉन व्हेज चालत असेल तर लालूच्या रेस्पीने भरली कोंबडी करा . ४-६ माणसांना एक चिकन लागेल.
अजून एखादी चिकन / मटण करी , नान / पोळ्या ; जिरा राइस, रायता , बगोरा बैंगन / पालक पनीर/ भरली वांगी / अख्खा मसूर हे मुख्य जेवणात ;
अॅपेटायझर्स / डेझर्ट लोकांना आणायला सांगा.
मुलांसाठी गोष्टीगावाचे यांनी दिलेला पास्ता, किंवा मॅक अॅण्ड चीझ असं काही ठेवू शकता .
मोजकेच पदार्थ चालत अस्तील तर मटण बिर्याणी, मिरची का सालन, रायता, डबल का मीठा असं ठेवता येईल .
मेधा, ये डबल का मीठा क्या है
मेधा, ये डबल का मीठा क्या है भई?
थँक्सगिव्हिंगला मी जनरली चेंज म्हणून कॉर्निश हेन बेक करते. आणि बटाटा भाजी (कमी तिखट) भात, एखादी करी, स्~एलड इ. आणि डेझर्ट पम्पकिन पाय्...तसा पण आधीच्या महिन्यात आणलेला पम्पकिन वाट पाहात असतोच्....मला मेधाची अपेटायझर आणि डेझर्ट आउटसोर्स करायची आयडीया पण आवडली आहे.
धन्यवाद मेधा, नॉन व्हेज नको
धन्यवाद मेधा, नॉन व्हेज नको आहे ..व्हेज मेनु च सुचवा.पोळ्या,नान पण नको आहेत.
वीगन थँक्स गिव्हिंग असा सर्च
वीगन थँक्स गिव्हिंग असा सर्च मारला तर खूप ऑप्शन्स मिळतील. टर्कीच्या ऐवजी काही एक व्हेज मेन डिश बनवावी लागेल.
मला प्लीज पॉटलक साठी डीश
मला प्लीज पॉटलक साठी डीश सुचवा. ३०-४० जण असतील. सगळे अमेरीकन. रुम टेंपरेचरला सर्व करत येइल असे काय न्यावे. या पूर्वी टॉर्टीया पीनव्हिल्स , मँगो केक, समोसे, ब्राऊनीज वगैरे नेले होते. चिकन विंग्ज रुम टेंप ला चालतील का?
Pihu, choose a theme and
Pihu, choose a theme and select dishes
You can do misal, pav, dahi bhaat, jalebi.
Outsource batata vada, surali vada, kanda bhaji for appetizer.
You can chose Mexican or Italian theme-
Tacos, quesadilla, flan, guacamole, couple of types of salsa
For Italian make a couple of types of pasta, with different sauces , bruschetta, olives for apps, tiramisu for dessert
वेका, मला पम्पकिन पाय् ची
वेका, मला पम्पकिन पाय् ची पाकृ देशिल का?
http://www.pickyourown.org/pu
http://www.pickyourown.org/pumpkinpie.php
ही बघ तुला कशी वाटते
मेधा धन्यवाद. हा मेनु फायनल
मेधा धन्यवाद.
हा मेनु फायनल करायचा विचार करत आहे:
ढोकळा
समोसा चाट
ईडली चटणी
दही वडा
वेज पफ्स
रगडा पॅटीज
मॅश्ड पटेटो
मॅक एन चीज
फ्रुट ट्रे
पम्कीन पाय
कसा वाटतोय
I love this menu, can I come
I love this menu, can I come to the party
Just make sure there aren't any conservative guests who say "where's the main course"
शेवटी पॉटलकसाठी मॅकरोनी सॅलड
शेवटी पॉटलकसाठी मॅकरोनी सॅलड केले. हॅम, स्पाईसी बिन्स, स्कॅलॉप्ड कॉर्न बरोबर सगळ्यांनी फस्त केले.
You are welcome Medha ! come
You are welcome Medha ! come to boston
Yes there are no such a conservative guests .
२५ डिसेंबरला बर्थडे पार्टी
२५ डिसेंबरला बर्थडे पार्टी आहे. साधारण ५० लोकं असतील. केक, छोले-समोसा चाट, कॉर्न सँडविच, तवा पुलाव/फ्राईड राईस असा मेनू आहे. थंडी आहे (म्हणजे सीझन तरी आहे) म्हणून गरम पेय द्यावे असा मानस आहे. हॉट चॉकलेट सोडून काय पर्याय आहेत? प्लीज सुचवा.
फिल्टर कॉफी. किंवा एखादे गरम
फिल्टर कॉफी.
किंवा एखादे गरम सूप.
केसर उकाला किंवा मसाला दूध
केसर उकाला किंवा मसाला दूध
केक, छोले-समोसा चाट, कॉर्न
केक, छोले-समोसा चाट, कॉर्न सँडविच >> यासोबत समहाउ मला पुलाव 'जाईल' असं नाही वाटत... चाट चाच अजून एक पदार्थ येईल की ठेवता...
योगेश, तवा पुलावला पावभाजी
योगेश, तवा पुलावला पावभाजी मसाला असतो त्यामुळे चाट प्रकारांत चालतो.
सहा जणांच्या जेवणासाठी
सहा जणांच्या जेवणासाठी सेमिहोममेड किंवा थोडं आधी शिजवून न्यायचं असेल तर चिकनचा एखादा प्रकार सुचवा. तिकडे पण करता येईल. पूर्ण किचन आहे पण स्वयंपाकघरातच वेकापणा करायचा नाहीये. सकाळसाठी उप्मा प्रिपेअर करून तिथे फक्त पाण्यात उकळायचं करणार आहे..असा सोप्पा, कमी कटकटीचा प्रकार जेवणासाठी आहे का? प्रिफरेबली नॉनव्हेज...भारतीयच हवं असं काही नाही फक्त झेपणेबल हवं.
आभार्स
वेकापणा म्हण्जे???
वेकापणा म्हण्जे???
वेका, चिकन लझानिया किंवा
वेका, चिकन लझानिया किंवा तत्सम पदार्थ नेता येईल का? घरून बेकिंग ट्रेमधे लेअर्स लावून घेऊन जाता येतं. जेवणाच्या तासभर आधी, टायमर लावून बेक करून गरम आणि ताजं जेवायला घ्यायचं.
वेळकाढूपणा योगेश लझानियाची
वेळकाढूपणा योगेश

लझानियाची कल्पना चांगली वाटतेय...ते लेअर्स आधीपासून लावले तर सॉगी होत नाही नं? मी अॅज इट इज स्वत लझानियाज केले नाहीत पण खाल्लेत..मुलं पण खातील असं वाटतंय..
सॉगी होतं की नाही याची कल्पना
सॉगी होतं की नाही याची कल्पना नाही. बहुतेक होत नसावं.
इथल्या कृतीमधली १७वी पायरी बघा. : http://www.food.com/recipe/the-best-make-ahead-lasagna-420883
धन्यवाद नंदिनी, योगेश, आरती,
धन्यवाद नंदिनी, योगेश, आरती, स्वाती.
थोडे फॅन्सी प्रकारातले हवेय शक्यतो. म्हणजे मुलांना इंटरेस्टिंग वाटेल असे.
अॅपल सायडर, बनाना हॉट
अॅपल सायडर, बनाना हॉट चॉकलेट, Hot Spiced Concord Grape Juice असे बरेच प्रकार नेटवर सापडतील.
वेका , मला चिकन ची कृती माहित
वेका , मला चिकन ची कृती माहित नाही. व्हेजला सिमिलर असावी . पण एनचिलाडा नेता येईल.
ओह धन्यवाद सीमा. बरं झालं एक
ओह धन्यवाद सीमा. बरं झालं एक ऑप्शन दिला कारण बरोबर असणार्^यापैकी एक पोरगं लझानिया खात नाही त्यामुळे मूळ प्रश्न आहे तिथेच आहे...आम्ही चिकन तंगड्या मरिनेड करून नेऊ तिथल्या अव्हनमध्ये घातलं की झालं. सोबतीला आणखी काही सुचलं की बरंय..आणि आता ते चिकन किंवा नॉन व्हेज हवंच असं नाही फक्त तिकडे जाऊन घाट घालायला नको
आभार्स.
ब्रेकफास्टसाठी गोड चालत असेल
ब्रेकफास्टसाठी गोड चालत असेल तर ब्रेड पुडिंगचे सर्व सेटिंग करुन नेता येईल. सकाळी जो कोणी पहिले उठेल त्याने अव्हनमधे टाकायचे काम राहील फक्त .
http://www.maayboli.com/node/16579 या पद्धतीने मी आदल्या रात्री करुन ठेवते कधी कधी.
जेवणाकरता बिर्याणीचे लेयर्स लावून नेता येतील. भात + मटण दोन्ही ३/४ शिजलेले असेल तर फार वेळ पण लागणार नाही.
हलीम + नान असा बेत चालत असेल पॅकेज्ड हलींम मिक्स वापरून तर स्लो कूकरमधे हलीम करता येईल.
सामन + लिंबाच्या चकत्या+ बटर+ अर्ब्स असे वॅक्स पेपरमधे पॅकेट्स करुन नेले तर बेक्ड सामन + गार्लिक ब्रेड असे करता येईल. गार्लिक ब्रेड साठी पण लोफला बटर / गार्लिक /अर्ब्स लावून फॉइल मधे रॅप करुन नेता येईल.
माझ्या मुलाचा वाढदिवस आहे पु
माझ्या मुलाचा वाढदिवस आहे पु ढच्या आठवड्यात
गव्हाचा केक, पावभाजी, गोड गुलाब जाम [अजुन ऑप्श्न सुचवा]
अजुन काय काय करु
[गव्हाचा के[: नवर्याला जंक फुड वाला केक नकोय म्हणुन गव्हाचा ]
सोया चिप्स किंवा बेक्ड
सोया चिप्स किंवा बेक्ड प्रकारातल्या चिप्स, ओनियन रिंग्ज, जेली+आईसक्रीम+फ्रूट्स, ढोकळा (बाईट साइझ) इ. इ.
लहान मुले जास्त असतील तर त्यांना खाता येईल असा सौम्यसर चवीचा मेनू ठेवा.
दहीशेवबटाटापुरी हा प्रकार मुलांना आवडतो. मिनी सँडविचेस (चीज सँडविच, जॅम सँडविच, चटणी सँडविच), मिनी बटाटेवडे (फार तिखट करायचे नाहीत) देखील मुलं खातात आवडीने.
Pages