Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कडधान्यांमध्ये लवंगा घालून
कडधान्यांमध्ये लवंगा घालून ठेवल्यास किडे होत नाहीत.
पोहे भिजवुन झाल्यावर साधारण 2
पोहे भिजवुन झाल्यावर साधारण 2 डिश पोहे करणार असु तर 2 टेबलस्पून दुध त्या पोहयाना लावुन ठेवावं. पोहे मऊ होतात. आणि मीठ आणि साखर सुद्धा तेव्हाच लावुन ठेवावं.
मुंबईत बिग बास्केट. कॉम वरून
मुंबईत बिग बास्केट. कॉम वरून मागविल्यास लगेच घरपोच डिलिवर होते सामान. म्हणून मी अगदी वीकली बेसिस वर भरते. रोज थोडे लवकर उठल्यास स्वच्छतेचा प्रश्न सोडविता येइल. किती छान मॅनपावर आहे तुमच्याकडे. खरंच. यू आर लकी.
आमच्याकडे दोन तीन महिन्यातून
आमच्याकडे दोन तीन महिन्यातून एकदा किराणा भरावा लागतो. (का ? त्याची एक वेगळीच कहाणी आहे!) तरीपण किलोभर रवा एकदाच कोरडा भाजून टप्परवेअरच्या डब्यात घालून ठेवला तर महिनाभर खराब होत नाही. (मी मायक्रोवेव्हमधे भाजते). शेंगदाणे पण असेच भाजून ठेवले तर चांगले राहतात.
कडधान्येदेखील टप्परवेरमधे ठेवली तर काही होत नाही, आणतानाच त्यात कीड असेल तर मात्र लगोलग वापरून संपवावी लागतात. मी आण्ताना एक किलोचं पाकिट आणण्यापेक्षा पाव पाव किलोची चार पाकिटं आणते. लागेल तशी फोडत जाते. मसाल्यासाठी परत टप्परवेअरच झिंदाबाद. मसाल्याच्या प्रत्येक डब्यामधे एक चमचा आधीच ठेवलाय, म्हणजे कोरडा-ओला चमचा भानगडच नाही.
रवा कोरडाच भाजून ठेवावा व
रवा कोरडाच भाजून ठेवावा व पुर्ण गार झाला की भरावा. गरम जरा जरी असेल तर वाफ धरून खराब होइल.
बाहेर ठेवला तर काहीही होत नाही. कच्चा रवा मी डीप फ्रीजरमध्येच ठेवते. मी तर हेच करत आलेय. उलट तूपात/तेलात भाजला तर खवटेल.
रवा पुराणावर बर्याच पोस्टी पडल्या की.
पुर्ण गार झाला की भरावा. गरम
पुर्ण गार झाला की भरावा. गरम जरा जरी असेल तर वाफ धरून खराब होइल.
बाहेर ठेवला तर काहीही होत नाही. >>>
+१
हे रवा भाजायच्या पद्धती वगैरे
हे रवा भाजायच्या पद्धती वगैरे सगळं खरं असलं तरी वल्लरीच्या कंट्रोलमधे या गोष्टी नाहीत ना गं! म्हणून तर ती वैतागली आहे
बाजरीचं पीठ बाहेर जास्त दिवस
बाजरीचं पीठ बाहेर जास्त दिवस ठेवलं तर कडु होतं.
मी ऐकलय, की परदेशात आपली मराठी माणसं बाजरीचं पीठ फ्रीजमधे ठेवतात. तसं केल्यावर कडु होत नाही का?
वल्लरी, मी अंड उकडून चार भाग
वल्लरी, मी अंड उकडून चार भाग करून वरती मीर पूड घालून, टपर वेअर च्या डब्यातून ऑफीस मधे नेते, आणि चमच्याने खाते. काहीही वास येत नाही. रोज नाही , पण जेव्हा नेते तेव्हा जास्त वेळ ठेवत नाही. १०.३० पर्यन्त खाऊन घेते.
रवा तूप टाकून भाजावा , अजिबात खराब होत नाही, फ्रीज मधे ठेवायची गरज नाही - माझ्या सासू बाई असेच करतात.
कडधान्ये फ्रीज मधे ठेवायची गरज नाही, बोरिक पावडर घालून ठेवावी - माझ्या सासू बाई असेच करतात.
आम्ही ग्राहक चे सामान घेतो. ते जास्त प्रमाणात असते, पण कधीही खराब झाले नाही.
पोह्यांबद्दल चर्चा आहेच तर
पोह्यांबद्दल चर्चा आहेच तर विचारून घेते. सध्या कुणी ग्राहक चे जाडे पोहे घेतले आहेत का? खूपच जाडे आहेत. मंजुडी च्या पधतीने त्याचे पोहे चांगले होतील का? दोनदा पोहे करून ते एवढे चिवट लागले की आता धीरच होत नाही करायला.
वल्लरीच प्राची ला रव्यासाठी
वल्लरीच प्राची ला रव्यासाठी अनुमोदन आणि सामीला उकडलेल्या अंड्यासाठी.
मी ही रोज उकडलेली २ अंडी घरीच सोलून (फक्त व्हाईट) तुकडे करून डब्यात त्यावर तिखट आणि मीठ भुरभुरून आणते. काहीही वास येत नाही अजिबात. मी ती अंडी साधारण संध्याकाळी डेस्क वर बसूनच खाते. अजून तरी कुणीच तक्रार केलेली नाहिये.
दक्षु, उकडलेल्या अंड्यावर
दक्षु, उकडलेल्या अंड्यावर नेहमी थोडी काळिमिरी पूड घालावी पोटाला बरं असतं असं आई-आज्जी म्हणतात. उद्यापासून ते एक अॅड कर. एक फु.स.
वेके मला मिरी अज्जिब्बात
वेके मला मिरी अज्जिब्बात म्हणजे अज्जिब्बातच आवडत नाही
पहिल्यान्दा उकडलेली अन्डी
पहिल्यान्दा उकडलेली अन्डी खाल्ली ती मीठ आणी मीरपुड घालुनच. जबरी लागतात.
सामी, मलातरी वाटते की बोरिक
सामी, मलातरी वाटते की बोरिक पावडर पेक्षा फ्रीज बरा, तसेच तुपावर रवा भाजून ठेवला की वास येतो हा स्वानुभव . चव सुद्धा घेवू शकले नव्हते.
नंदिनी - टप्परवेअर चा डबा >>
नंदिनी - टप्परवेअर चा डबा >> उघडल्यावर बंद करायचा असतो ना ग . अर्धवट उघडा टाकला तर काय टप्परवेअर आणि काय काय ...
<< अमा - किती छान मॅनपावर आहे तुमच्याकडे. खरंच. यू आर लकी .>>
हा सगळा वेगळाच मुद्दा आहे.तुम्हाला वाटते तशी लकी असते तर .... असो. ह्यावर इथे चर्चा नको गल्ली चुकेल.
बाकी टिश्यु पेपर, लवंग प्रयत्न करते. एक लक्षात आलं रवा डब्यात भरताना डबा सुद्धा ओला असू शकतो..
उकडलेली २ अंडी घरीच सोलून>> आज हेच केलं मी तुमचा सगळ्यांचा सल्ला ऐकून. मस्तच. जेवण मिसलं होतं छान जागेवर बसून खाता आलं.
रवा भाजून लग्गेच वापरायचा
रवा भाजून लग्गेच वापरायचा असेल तर तुपावर भाजणे ठिक आहे. मोठ्या प्रमाणावर रवा भाजून साठवायचा असेल (एक किलो वगैरे) तर कोरडाच भाजलेला उत्तम. आणि वापरायच्या वेळेला थोडा पुन्हा तापवून परतून घ्यायचा तूप घालून. उपमा मोकळा होतो छान.
ओला नारळ विळीवर किंवा नारळ
ओला नारळ विळीवर किंवा नारळ खवायच्या खवणीवर न खवता कसा वापरायचा? मिक्सरमधे त्याचा कीस केला तर मला तरी अज्जिब्बात आवडत नाही.
अंजलीचा कोकोनट स्क्रेपर घेऊन
अंजलीचा कोकोनट स्क्रेपर घेऊन या.
बटाट्याची ज्याने साल काढतो
बटाट्याची ज्याने साल काढतो त्या सारखेच एक नारळ सहज हातात धरुन खोवण्यासाठी यंत्र्/उपकरण येते फार सोपे जाते त्याने .. फोटो मिळाला तर टाकेन..
आनंदी, प्लीज फोटो किंवा आणखी
आनंदी, प्लीज फोटो किंवा आणखी तपशीलात माहिती टाकणे
डबा ओला असेल तर फंगस फॉर्म
डबा ओला असेल तर फंगस फॉर्म होणार झाकण लावल्यावर.
उकडलेले अंडे आणि बटाट्याचे सलाड मस्त बनते. बनपावात घालून खायचे अमूल बटर लावून. आज मी सक्काळी पावावर बटर आणि ऑरेंज मार्मालेड लावून चापले. लै भारी. तुम्ही यलो एग खात नाही ना? त्यात को लेस्टेरॉल फार असते. २५ नंतर ठीक नाही. शॉप राइट मध्ये अंड्याच्या व्यवस्थित
चकत्या कर्ण्याचे बारके मशीन मिळते. त्याचाही तुम्हास उपयोग होईल.
शेव्हिंग करतात तस नारळ खोवता
शेव्हिंग करतात तस नारळ खोवता येतो ...
डी मार्ट मध्ये मिळाल..
नेटवर एक्झॅक्ट फोटो नाहिये..
घरी जाउन काढुन टाकेन
http://auriasmalaysiankitchen
http://auriasmalaysiankitchen.blogspot.in/2012_02_01_archive.html >>> वरदा या ब्लॉगवर फोटो आहे त्याप्रकारची एक हातात पकडून नारळ खवायची खवणी मिळते. आईकडे आहे. खूप उपयोगी पडते.
आईकडची खवणी अगदी http://talesfromourtable.wordpress.com/2010/01/08/coconut-grater/ अशीच आहे.
बरचस अस From December 5, 2013
बरचस अस
From December 5, 2013
From December 5, 2013
ओला नारळ विळीवर किंवा नारळ
ओला नारळ विळीवर किंवा नारळ खवायच्या खवणीवर न खवता कसा वापरायचा? मिक्सरमधे त्याचा कीस केला तर मला तरी अज्जिब्बात आवडत नाही.>> हो मला पन आवडत नाही . वेळ नसेल तर मला तेच करावे लागते.
अल्पना, काकुंना सेम पिंच
अल्पना, काकुंना सेम पिंच सांग.
पण याने जास्त नारळ खोवायचे असल्यास हात भरून येतात (माझे). सुरुवातीला बरेचदा नारळावरची पकड सुटल्याने खवणी अंगठ्यावर चालवली आहे (माझ्याच). पण छोटेसे असल्याने पॅकिंगला त्रास पडत नाही(मला). शिवाय आरामात टीव्ही बघता बघता नारळ खोवता येतो (परत मलाच),म्हणून आवडते मला.
http://www.magickart.in/media
http://www.magickart.in/media/catalog/product/cache/1/image/9df78eab3352...
मी हा वापरते. हात भरून येत नाहीत.
ओह, तत्सम प्रकरण आहे
ओह, तत्सम प्रकरण आहे माझ्याकडे. पण मला नीटसं जमत नाही त्यावर
Pages