युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंबट चवीने खारटपणा कमी होतो. त्यात थोडे लिंबूफूल घालता येईल.
जर कडक उन असेल तर थोडी सुपारी पाण्यात खळबळून धुवून परत वाळवता येईल. मीठ पाण्यात विरघळेल. मग ती गाळून घ्यायची. ( ती कुटलेली नसावी ) हा उपाय कमलाबाई ओगले यांनी खारट झालेल्या मटाराच्या
भाजीसाठी सांगितला होता. अर्थात भाजी वाळवली नव्हती तर परत फोडणीला टाकली होती व त्यात ओले खोबरे घातले होते.

शेंदोलेन पांदोलेन>> Lol शेंदेलोण पादेलोण गं!

सुक्या खोबर्‍याचा कीस घाल.

थोडी सुपारी पाण्यात खळबळून धुवून परत वाळवता येईल.>> बिनसुपारीची सुपारी आहे Happy

जर कडक उन असेल तर थोडी सुपारी पाण्यात खळबळून धुवून परत वाळवता येईल. मीठ पाण्यात विरघळेल. >> मी पण हेच सांगायला आलेले इथे.

मी केलेली मोकळी भाजणी कधीच 'मोकळी' होत नाही Sad गिच्च होते, कोरड्या पिठल्यासारखी. मोकळी व्हावी यासाठी टिपा द्या.

तेल कमी पडत असेल फोडणीत. पाण्याच्या प्रमाणानुसार वाफ देण्याचा वेळही वाढवून बघ. कमी दिली जात असेल.

ंमोकळी भाजणी करण्यासाठी आधी थालीपिठाला भिजवतो तसा गोळा भिजवून घ्यायचा आणि फ़ोडणीस टाकून परतायचा.झाकण ठेऊन वाफ आणायची. चांगला शिजला की आपोआपच मोकळा होतो असा माझा अनुभव आहे.

पूनम, भिजवताना नेहमी घालतेस त्यापेक्षा पाणी कमी घालून पहा. नंतर लागेल तसतसा पाण्याचा शिपका मारून भाजणी शिजव.
मी भाजणी भिजवताना रव्यासारखं दुप्पट पाणी घालून भिजवते, मग लागेल त्याप्रमाणे शिंपडते.

नंतर लागेल तसतसा पाण्याचा शिपका मारून भाजणी शिजव.>> ओह! जास्त तेल घालत होते पण हे लक्षात नाही आलं. थँक्स मुलींनो Happy

धन्यवाद मृणाल1, पौर्णिमावैनी. रिझल्ट सांगेनच. दिनेश., तुम्ही वर काय लिहीलंय ते झेपलं नाही मुखशुद्धी पावडर ऑलरेडी केलीये (सुपारी न घालता, पथ्यासाठी) जी खारट लागतेय. सध्या इथे ऊन नाही मीठाचे बाष्पीभवन व्हायला. नाहीतर गच्चीत पसरली असती ती पावडर. (मग ब्रेकिंग न्यूज: सुपारीने पाडला धो धो पाऊस.. पुणेकरांचा अभिनव प्रयोग. :फिदी:)

>>जर कडक उन असेल तर थोडी सुपारी पाण्यात खळबळून धुवून परत वाळवता येईल. मीठ पाण्यात विरघळेल. मग ती गाळून घ्यायची. ( ती कुटलेली नसावी ) हा उपाय कमलाबाई ओगले यांनी खारट झालेल्या मटाराच्या
भाजीसाठी सांगितला होता. अर्थात भाजी वाळवली नव्हती तर परत फोडणीला टाकली होती व त्यात ओले खोबरे घातले होते.>> खारट झालेल्या भाजी, आमटीत बटाटा (उकडलेला, न उकडलेला) घातल्यानेही खारटपणा कमी होतो. अगदी सोप्पा आणि सहज करता येण्यासारखा उपाय आहे.

सायो, बहुतेक खारट झालेल्या ग्रेव्ही/रस भाजीत एखादा कोळसा टाकला (आणि थोड्या वेळाने काढला) की खारटपणा कमी होतो बहुतेक Happy

कुटलेली नसती तरच तो उपाय होता. तशीही असते सुपारी. मूळ प्रश्नात ते क्लीयर नव्हते.
मीठाचे बाष्पीभवन होत नाही.

सायो, कमलाबाईंचा तो उपाय मोठ्या प्रमाणावर (लग्नाच्या जेवणासाठी ) केलेल्या भाजीसाठी होता. त्यात आणखी बटाटे घालायचे ?
घरात थोड्या प्रमाणात केलेली भाजी / आमटी असेल तर बटाटा टाकता येतो.

>> तशीही असते सुपारी. मूळ प्रश्नात ते क्लीयर नव्हते.
'सुपारीविना सुपारी'त जेष्ठीमधाच्या काड्याच्या काड्या, शेंदेलोण पादेलोणाचे खडेच्या खडे होते असं वाटलं गं वाचणार्‍यांना आशुडे. नीट लिहीत जा पुढच्या वेळी!

सायो, तू कमलाबाईंना उपाय सुचवायला गेलीस?! मला वाटलं सहज भाजीचा विषय निघाला म्हणून ती माहिती दिलीस.
किती प्रमाणात भाजी केली होती हे पहिल्या पोस्टीत क्लीअर नसलं म्हणून काय झालं! आपण कमलाबाईंना शिकवायला जाऊ नये!

रवा भाजून ठेवला होता, तो खवट झालाय, तरी नेटाने त्याचा उपमा केला, तोंडाची सगळी चवच गेली.

रवा खवट का झाला असेल? भाजताना काही गडबड? खूप जास्त रवा नाही ५-६ वाट्या असेल. काय करू त्याचं. उपम्यात एकदम यक लागतोय

कचर्‍याची कुंडी नसेल, तर नव्या कुंडीतील बागेत वापरता येईल. सिताफळाच्या कुंडीत घातला तर मस्त रवाळ सिताफळं येतील.

Pages