युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिसिबेळेभात आयडिया आवडली. रेसिपी?
थालीपीठाचा पर्याय पण मस्त आहे. पण सध्या घरी मेम्बरं खूप आहेत. खेळत बसावं लागेल. पण कधीतरी करून पाहीन.

उरलेल्या वरण्-भाताचा बिसिबेळेभात बरेचदा होतो. अगदी सोपा आणि लवकर होणारा आहे. तुमच्या विचारपुशीत रेसपी लिहिते.

धनश्रीची पाहिली आणी तिथून उड्या मारून बिल्लोच्या विपूतली बदामाच्या शीर्‍याची कृती पण लगेहाथो वाचली

धनश्रीची पाहिली आणी तिथून उड्या मारून बिल्लोच्या विपूतली बदामाच्या शीर्‍याची कृती पण लगेहाथो वाचली >>Direct Link मीळेल का ??

मॄण्मयी, स्वाती मला अग-तुग म्हणा ग.
हे काय - तुमच्या विपू त.... दार लावून घ्या. अहो-जाहो करण्याइतकी मी मोठी नाही. Happy

आणि विपूत रेस्प्या नाही असं कुणीतरी कधीतरी म्हणलंय ना. Happy

विपूत दिलेल्या चालतात, इथे किंवा तिथे द्यायच्या नाहीत.

भात केलास की तू साग्रसंगीत धागा काढून रेसिपी लिही. विपूतल्या रेसिपी ही शब्दखूण विसरू नकोस. Happy

माझ्या कडे अर्धा किलो तांदळाचं आणि अर्धा किलो उडिद डाळिचं पिठ आहे .या दोघांना एकत्र किंवा वेगवेगळं कसं वापरता येईल??

सुखदा तांदुळाच्या पीठात कांदा टोमॅटो कोथिंबिर, बारिक मिरची चिरून घालायची मीठ... सरसरित पीठ.. धिरडी घालायची. एका झटक्यात संपेल सगळं पीठ.

वरण किंवा आमटी ओवरनाइट फ्रीजमधे ठेवली तर आपोआप जाड डाळ खाली बसते नी पाणी वरचेवर रहातं.

सुखदा, आधी तुला तांदळाचं पीठ कुठे मिळालं हे सांग. इथे ना जवळपास कुठे गिरणी आहे पीठ दळून आणायला ना बाजारात तांदळाचं पीठ मिळतं.. Sad

तांदळाच्या पिठाची उकड, धिरडी हे आहेच. तांदळाच्या पिठाची भाकरीही करता येईल.

तांदळाचं पीठ लावून पातळ कालवण दाटसर करता येतं.

उडीद डाळीचं पीठ >> धिरडी, डोश्यांमध्ये वापरता येईल बहुतेक.

अल्पना ,अग हल्ली सगळी कडे तांदळाचं पिठ आरामात मिळ्तं.तु बिग बझार ला ट्राय कर्,नाही तर कोणत्याही साउथ ईंडियन दुकानात तर हमखास मिळेलच! या वर्षि तर मला मोदकांचे पिठ पण मस्स्त मिळाले होते .

दक्षा ,अकु धन्यवाद अ‍ॅक्चुली तांदळाचं पिठ संपवायचा प्रॉब्लेम नाही आहे पण उडीद डाळीचं पीठ कसं संपवू?? सांगाना प्लिज Uhoh

ही दोन्ही पिठे एकत्र करुन डोसे किंवा आंबोळ्या बनु शकतात का?

सुखदा, ही दोन्ही पिठे एकत्र करुन व्यवस्थित आंबवुन दोसे वगैरे बनवलेले आहेत व बरेच बरे पण झाले होते. फक्त प्रमाण आठवत नाही. एकास अडीच ते ३ असेल.

भिजवलेला साबुदाणा आणि शिंगाड्याच पीठ एकत्र केलेल आहे.
थालीपीठ आणि वडे सोडुन काय करता येइल?

नाही, फ्रिजमधे ठेवून आणि पातेलं तिरकं करूनही माझ्या वरणातलं पाणी वेगळं होत नाही, इतकी ती डाळ शिजून मोडून एकजीव झालेली असते Sad

थालीपीठ आणि वडे सोडुन काय करता येइल?>> भजी.

भजी बेक करायची. नाहीतर आप्पेपात्रातही करता येतील. किंवा दूध साखर घालून शिजवून लापशी देखील करता येइल.

सांडग्यातल्या साबुदाण्याच्या चकल्या होतील ना ? थोडा बटाटा शिजवून घालुन चकल्या पाडता येतील . आता उन्ह कडक नसेल तरी वाळतील मला वाटत.

Pages