युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उकडलेली अंडी ऑफिस मध्ये खाण्यासाठी सोलून न्यावीत की न सोलता. सोललेल्या अंड्याचा वास येऊ नये याकरता काय करावे. कामाच्या टेबल वर बसल्या बसल्या खायचे आहे. न सोलता ऑफिसमध्ये नेल्यास पटकन कशी सोलावीत.

>>दिनेश. | 4 December, 2013 - 03:55
सायो, कमलाबाईंचा तो उपाय मोठ्या प्रमाणावर (लग्नाच्या जेवणासाठी ) केलेल्या भाजीसाठी होता. त्यात आणखी बटाटे घालायचे ?>> पण हे तुमच्या मूळ पोस्टमध्ये कुठे लिहीलंय? तिथे जो उपाय सुपारी सुचवलाय सुपारीकरता- खळबळून धुवायची- तशीच मसाले घातलेली भाजी खळबळून धुवून मग न वाळवता खोबरं घालायचं असा माझा समज झाला ते वाचून.

कमलाबाई ओगल्यांना उपाय सुचवायचा झाल्यास त्यांना (बहुतेक) प्लँचेटवर बोलवावं लागेल. Wink

वल्लरी, अंडे सोलून ने. उकडलेले अंडे गरजेपेक्षा जास्त शिजले तर वास येतो. अंडी उकडताना पाण्याला उकळी फुटली की लगेच भांडे खाली उतरवायचे आणि त्यावर झाकण ठेवायचे. १५ मिनिटांनी झाकण काढून अंडी गार पाण्यात घालायची.

इब्लिस Rofl

बरं हे एक असंच त्यादिवशी क्लिक झालं..इथे आधी कुणी लिहिलं असेल तर ठाऊक नाही.

इडलीचं पीठ रात्री (बंद) मायक्रो मध्ये ठेवायच्या विचारात असताना सुरू असलेला डिश वॉशर दिसला. सहज म्हणून मग पीठाचं भांडं त्या काउंटरवर ठेवलं. तसं इथे रात्री फ्रिजिंग आहे पण नेमकं यावेळी सकाळी पाहिलं तर पीठ मस्त फुगून वर आलं होतं. आम्ही नॉर्मली हिटेड सायकल वगैरे साग्रसंगीत करतो आणि त्यावेळी तिथे जास्त गरमी पीठाला मिळाली असावी...माझ्याकडे इडलीचा चाहता वर्ग प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे हिवाळ्यात इडली करायची (माझ्यापुरता) तरी सोय झाली असं दिसतंय. पुन्हा हेच करून पाहीन. इच्छुकांनी नक्की करून पहा. Happy
ईडली फॅन क्लबची लिंक शोधून तिथे पण हे टाकायचंय.

सीमा ते सगळं पण करते. पण या उपायात मला काहीच करावं लागलं नाही आणि डिशवॉशर तर इमाने इतबारे लावावाच लागतो नं त्यामुळे सध्यातरी फेवरीट ट्रीक वाटतेय Happy

रच्याकने, काल उपमा चवीला खवट लागत होता पण मस्त मोकळा झाला होता. सव्वदोन पट उकळतं पाणी आणि थोडं दही.. शिजताना.

पोहे कोरडे होउ नये याकरिता काय काळ्जी घ्यावी?
मी पोहे कढईत टाकल्यावर चांगला अर्धं फुलपात्रभरून पाण्याचा हबका देते तरी छान मऊ आणि वाफवलेले होत नाहीत. एकतर कच्चे राहतात किंवा चांगले वाफवु म्हटलं तर कोरडे Sad तो पोहे फॅन क्लब बघून अगदी टडोपा झालंय.

जाड (मध्यम) पोहे वापरता का पातळ (चिवड्याचे) पोहे. सहसा पोह्यासाठी जाड पोहे वापरावेत. कांदा चिरून झाला की पोहे पूर्ण पाण्यात बुड्तील इतके पाणी घ्यावे आणि लगेच पोहे चाळ्णीत काढून निथळायला ठेवावेत. दरम्यान, फोडणी, कांदा परतणे करून घ्यावे. पोहे टाकल्यावर अगदी एखाद-दोन मिनिटांची वाफ आणावी. तेलाचे प्रमाण वाटीला एक चमचा घेऊन बघा, तेलकट वाटले तर कमी करा. कांदा व्यवस्थित हवा त्यात चालढकल नको.

ज्ञाती, तिकडे पो. फॅ. क्ल. मधे अरुंधतीने अश्याच मोठ्या बाफवर कुठल्यातरी पानावर लिहिलेल्या इंदौरी पोह्यांची लिंक दिली आहे भरत मयेकरांनी... ती वाच आणि तश्या पद्धतीने पोहे करून बघ.

वल्लरी, अश्या खराब झालेल्या वस्तू पोटात ढकलूनच संपवण्याचा अट्टहास का?

पोह्यांसाठी माझ्या आत्याची आयडीया भारी आहे. पाणी हलक गरम करुन घ्याव. त्यात जाडे पोहे घालावेत आणि एक मिनिट ठेवून लगेच चाळणीत निथळायला ठेवावेत. नंतर कांदा चिरायला घ्यावा. आणि फोडणीची तयारी करावी. तोपर्यंत पोहे छान फुलतात आणि खातानासुद्धा खुटखुटीत लागत नाहीत.

पंजाबात असताना जे पोहे मिळायचे ते खूपच जाड पोहे असायचे. ते मी गरम पाण्यात घालून ठेवून मग चिराचिरी, फोडणी करायचे. आणि कांदा शिजेपर्यंत पोहे निथळून घेऊन फोडणीत घालायचे. तेव्हा कुठे मऊ पोहे व्हायचे. ज्ञाती, तुझ्याकडचे पोहे असेच जाड असतील कदाचित.

अमा???? असे प्रश्न पडू नयेत का कोणाला? का पडू नयेत?

आणि तुम्ही कशाला फुटताय? उकडलेलं अंडं फुटायला हवंय.. तेही पटकन.

अमा - ऑफिसमध्ये डेस्क वर बसल्या बसल्या (कँटिन्मध्ये न जाता) मेस न करता अंड कसे फोडावे. आजूबाजूला लोकांना वास सुद्धा येऊ नये.

थोडा रवा उन्हात सुकवून पाहणार. वास जातो का? तसं सुद्धा कडक ऊन आहे सध्या. नाहीच गेला तर ...:(

ह्याचं कारण माझ्या घरात हे असं बरेचदा होतं. स्वयंपाकघरात मी सोडून अजून चार माणसे वावरतात. कुक, आजेसाबाना सांभाळणारी पूर्ण दिवसाची बाई आणि माझी नणंद आणी कधे कधी साबा (ह्यातल्या कोणावरही मी एक कणाचा विश्वास ठेवू शकत नाही, अनुभवाने). प्रत्येक जण हात वाटी चमचा कोरडे करून रव्यात (अगदी साखरेतसुद्धा) घालतील ह्याची खात्री नाही. एका वेळी दोन महिन्याला लागेल असा रवा भाजून भरून ठेवलेला असतो. फ्रीज मोठा आहे. पण त्यात कडधान्य असतात. रवा ठेवायला जागा नसते.

त्यात त्या बाईने काल अक्कल शिकवायचा प्रयत्न केला. रवा भाजून ठेवला तर असाच खवट होतो. खरच असं होतं का? मी तेल तूप न वापरता नुसता भाजून ठेवते. माझ्या गैरहजेरीत तो मोठ्या आचेवर सुद्धा भाजला जातो. रव्याच्या रंगावरून समजतं. यावर प्रश्न विचारला तर - शप्पथ मी बारीक गॅसवरच भाजला, त्या रव्यामधेच काही तरी प्रॉब्लेम आहे. दर वेळी वास यायला लागला म्हणून फेकता नाही येत रवा. थोडासा असेल तर फेकता येतो. यावेळी जास्त उरलाय.

दर वेळी वास यायला लागला म्हणून फेकता नाही येत रवा.>> पण वास दर वेळीच येत असेल तर काहीतर बदल करायला हवा की नको? दोन महिन्यांऐवजी महिन्याभराचा रवा भरून ठेवा. कडधान्यांनी फ्रिज भरू नका. जेव्हा कडधान्य खायची तेव्हाच त्यांना मोड आणा. कोरडी कडधान्य फ्रिजात ठेवण्याची आवश्यकता नाही. मुंबईतही नाही.
अश्या वस्तू खाणं आरोग्यासाठी अपायकारक नाही का?

असो!!

मी तेल तूप न वापरता नुसता भाजून ठेवते. > मि पण असच करते .. रवा कधि खराब नाहि झाला आहे..
बहुतेक ओला हात लागला असेल..

कडधान्य मोड आलेली नव्हेत ग, कोरडी, माझ्या घरात कोरडी कडधान्य फ्रीज मध्ये ठेवावी लागतात. त्याला सुद्धा कीड लागते. हळद तिखट सोडून साधे मसाले सुद्धा फ्रीजमध्ये ठेवावे लागतात. ़ओनाचा तरी ओला हात लागत असणार हे नक्कीच.

मसाल्याचा डबा कळकट्लेला असतो, तेलाच्या छोट्याश्या बुधलीवरही ओघळ गेलेले असतात. ड्ब्यांची झाकणं लावलेली नसतात. सगळाच मेस. एकतर कुक बदलायला हवा पण जुनी स्वयपाकाची बाई होती तेव्हासुद्धा हेच होत होतं, सो ते सोल्युशन नाहीये मग घरातली बाई बदलायला हवी किंवा मी स्वतः सगळं करायला हवं.

स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरे, माझ्या बाबतीत तरी. नशीब आजे साबांना उठता येत नाही, नाही तर म्हणाल्या असत्या मी करत होते तेव्हा सगळं सोच्च ठेवत होते.

पण एखादी वस्तू खवट वासाची झाली तर त्यात पहिले काहीतरी तेल तूप सद्रुश्य पाहिजे ना? ते हाय झाले ( विघटन झाले) तर वस्तू खवट होणार. नाहीतर तसे होता कामा नाही. तेलातुपावर भाजला आहे का ते चेक केले पाहिजे.

उकडलेल्या अंड्यातून जो वायू बाहेर पडतो. एच टू एस तो फार पॉवरफुल स्मेल आहे. सहजी मास्क होणार नाही. घरून निघतानाच ब्रेड वर बटर व अंड्याचे तुकडे ठेवून सँमविच केले व डब्यातून खाल्ले तर वास आटोक्यात राहिल.

वल्लरीच, रवा नीट भाजला जात नाहीये असा याचा अर्थ आहे.
दरवेळी खवट होऊन टाकावा लागत असेल तर जास्त प्रमाणात आणु नका रवा. थोडा थोडा आणून भाजून ठेवा.
एका महिन्याला लागेल एवढाच ठेवा. मुंबईत फ्रीजबाहेर दोन महिने रवा टिकेलसे वाटत नाही. (मला नक्की माहिती नाही मुंबईच्या हवामानाबद्दल.)

मी नेहमी थोडे तूप घालून भाजून ठेवते रवा. फ्रीजबाहेर असूनही कधी खराब झाला नाहीये.

सध्या तो रवा टाकूनच द्यावा असे माझे मत.

पण एखादी वस्तू खवट वासाची झाली तर त्यात पहिले काहीतरी तेल तूप सद्रुश्य पाहिजे ना? ते हाय झाले ( विघटन झाले) तर वस्तू खवट होणार. नाहीतर तसे होता कामा नाही. तेलातुपावर भाजला आहे का ते चेक केले पाहिजे.

>> will check.

वल्लरी, लोकांच्या सवयी कधीच बदलणार नाहीत असं गृहित धरून चाल. त्या कुणालाही याचा मानसिक त्रास होत नाहीये, फक्त तुला होतोय. त्यामुळे तुला सारखं आवरावं लागत असेल तर सतरांदा करण्यापेक्षा रात्री/संध्याकाळी पंधरावीस मिनिटं याच्याचसाठी वेगळी ठेवून स्वैपाकघर आवरून टाकायचं. दिवसभर काय चाललंय ते चालू द्यावं (कारण ते तुझ्या हाताबाहेरचं आहे). रोज तेलाची बुधली टिश्यूने पुसून घ्यायची, डब्यांची झाकणं लावायची, इ.

रवा वगैरे गोष्टी अर्धा अर्धा किलोच्या प्लॅस्टिक पॅकेट्समधे आणता आल्या तर बघ. लागेल तशीच फोडायची आणि वापरून टाकायचा रवा.
कदाचित जुन्या तेलावर रवा भाजला गेला असेल म्हणून खवट वास येत असेल.

कडधान्य/ इतर धान्य खराब होत असतील तर त्या बाटल्या/ बरण्यांमधे कडधान्याच्यावर टिश्यूपेपर घडी घालून ठेवून दे. आणि शक्यतो धान्य, कडधान्य, तेल इत्यादी सगळंच सामान महिन्याभराचंच भरता येतंय का पहा. आपल्याला सांभाळायला आणि हिशेबालाही बरं पडतं ते.

Pages