Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी हेच सर्व लिहणार होते. फेस
मी हेच सर्व लिहणार होते. फेस पॅक फार मस्त होतो त्याचा. घरात असेल ते घालायचे. मध, मुल्तानी मट्टी नाहीतर बेसन , दही काय पण.
वास? येत असणारच. केसांना
वास? येत असणारच. केसांना लावतानाही येतो. मुलायम त्वचेकरता काहीही सहन करण्याची तयारी हवी

(No subject)
हो, टॅन निघून जातो म्हणे
हो, टॅन निघून जातो म्हणे पिवळा बलक + मध + मुलतानी माती या फेस पॅकने.
तेलकट, घामट चेहर्याला हा पॅक
तेलकट, घामट चेहर्याला हा पॅक चालतो का?
पॅक लावून घरी वावरलं तर घरातील बाकी मंडळी वाळीत नाही ना टाकणार पॅक वाळेपर्यम्त?
सुरक्षित अंतर ठेवा.
सुरक्षित अंतर ठेवा.
पण पॅक वाळेपर्यंत तू वावरू
पण पॅक वाळेपर्यंत तू वावरू नकोस घरात! म्हणजे वाळीत टाकायचा प्रश्नच नाही येणार
अहो _डी, घरात वावरताना घरातील
अहो _डी, घरात वावरताना घरातील बाकी मंडळी अंतर ठेवूनच वावरतात. येता जाता मंडळी एकमेकांना धडकली तर काय आणि किती नुकसान होईल...
पौ, वैनीच्या सल्ल्याला वाळीत नाही टाकणार.
तर, शर्मिला, अमा, आशू आणि पौ पण, पॅकबंद सल्ल्यासाठी धन्यवाद!
निकाल कळवणेत येईल.
प्याक लावुन भाजी आणायला जायचे
प्याक लावुन भाजी आणायला जायचे का मग?
पहा: टीव्ही.
सुरक्षित अंतर ठेवा. >>
सुरक्षित अंतर ठेवा. >>
माझ्याकडे नाचणीचं जुनं सत्त्व
माझ्याकडे नाचणीचं जुनं सत्त्व आहे साखर असलेलं त्याचे लाडू (रेफ - http://www.maayboli.com/node/6359?page=13) करता येतील का? साखर भाजल्याने जळेल का?
>>दक्षिणा | 27 November, 2013
>>दक्षिणा | 27 November, 2013 - 05:55
माझ्याकडे अर्धी बरणी भरून पातळ पोह्यांचा (विकतचा) चिवडा आहे. त्यात शेंगदाणे वगैरे भरपूर आहेत. नुसतं खाण्याव्यतिरिक्त संपवण्यासाठी युक्ती सांगा.>> नुसता खायचा तर कोरडा होईल. पण बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओलं खोबरं आणि वरून लिंबू पिळून असं पटकन संपेल. भेळेची चटणीही बरी लागते. ह्या व्यतिरिक्त दुसरे उपाय सुचत नाहीत.
दक्षे एक काम कर, सगळी टाळकी
दक्षे एक काम कर, सगळी टाळकी गप्पा मारायला बसव घरातली अन सगळ्यांच्या मधे मोठ्या परातीत तो चिवडा, अन वर सायोनी सांगितलंय तसल्या भेळीचा प्रकार करून ठेव... लग्गेच संपेल.
आरती. यांची आलेपाककृती
आरती. यांची आलेपाककृती पहा.सायोची पाकृ. मस्त आहे.
हो सायो आणि योगेश आता तसंच
हो सायो आणि योगेश आता तसंच करणार आहे.
thanx all.. मी try करून
thanx all..
मी try करून feedback देते काय work झाले ते
मला घरी गच्चीवरती बारबेक्यु
मला घरी गच्चीवरती बारबेक्यु करायचे आहे. त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल कोणी सांगेल का?
जे काही ग्रिल करायचं ठरवलं
जे काही ग्रिल करायचं ठरवलं आहे त्याचं मॅरिनेशन ..
गच्चीत आधी फार वारा येणार
गच्चीत आधी फार वारा येणार नाही अशी जागा निवडा. मग ग्रिल आहे का? ती सेट करा. त्याकरता कोळसे, लायटर तयार ठेवा. मग काय मेन्यु असणार त्यावर विचार करून लागणार्या जिन्नसांची यादी करा.
TSF म्हणजे टेबलस्पुन की
TSF म्हणजे टेबलस्पुन की टीस्पुन??
टेबलस्पुन कोणता?
टीस्पुन कोणता?
चहाचा छोटा चमचा असं प्लीज सांगु नका. कारण माझ्या चहाच्या डब्यात मी मोठा जेवताना वापरायचा चमचा ठेवला आहे. दुकानात असे मागुन मिळतात का योग्य त्या साइझचे?
दुकानात असे मागुन मिळतात का
दुकानात असे मागुन मिळतात का योग्य त्या साइझचे? >> हो.. सेट असतो.
TSP म्हणजे टीस्पुन
धन्यवाद सायो. वेका माबोवर
धन्यवाद सायो.
वेका माबोवर दिवे घेऊनच फिरावे लागते कारण कोणाकडुनही सरळ उत्तर येईल अशी कधी अपेक्षाच करत नाही मी.
गुलाबजामचा पाक उरलेला. त्यात
गुलाबजामचा पाक उरलेला. त्यात भाजलेला रवा अन ओलं खोबरं टाकुन लाडु करायचे होते.. पण अंदाज न आल्याने रवा-खोबरं कमी पडलय, लाडु वळणार नाहीत, पातळ झालय मिश्रण.. आधीचा रवा नीट मुरला असल्याने वरतुन जास्तीचा रवा घातला तर तो नीट मुरणार नाही. काय करता येइल? तसाच खाउन संपणार नाही.. पाक जास्त असल्याने खुपच गोड लागेल.
लाडवासाठी दोन तारी पाक लागतो.
लाडवासाठी दोन तारी पाक लागतो. गुलाबजामचा पाक कच्चा असतो, त्यामुळे ते मिश्रण पातळ झाले आहे. ते तसेच मंद गॅसवर ठेवून हलवत रहा. मिश्रण जरा आळून आलं की गॅस बंद करा. आणि लाडू वळा.
हे करायचे नसेल तर त्यात मिल्क पावडर+पिठीसाखर घाला. प्रमाण सांगता येणार नाही.
मंजुडी, तो पाक आधीच आटवुन दोन
मंजुडी, तो पाक आधीच आटवुन दोन तारी करुन घेतलेला.. आता अजुन ते मिश्रण आटवलं तर कडक होतील का लाडु?
मिल्क पावडर+पिठीसाखर घातलं तर
मिल्क पावडर+पिठीसाखर घातलं तर अजुन गोड होइल.. आधीच खुप गोड आहे ते मिश्रण.. बेसनपीठ भाजुन टाकलेलं चालेल का?
चिमुरी, मिल्क पावडर किंवा खवा
चिमुरी, मिल्क पावडर किंवा खवा घालून पाहा ना. भाजलेलं गव्हाचं किंवा ज्वारेचं किंवा मूगाचं पीठ किंवा बेसन हे सुद्धा चालेल. थोडी वेगळी चव हवी असेल तर ओला नारळ घालून पाहा,
आधीच खुप गोड आहे ते मिश्रण..
आधीच खुप गोड आहे ते मिश्रण.. बेसनपीठ भाजुन टाकलेलं चालेल का?>>> मिल्कपावडरीला गोड करण्यासाठी पिठीसाखर लिहिली होती. मि.पा./बे/कणीक यातलं काहीही घाल.
असा किती उरला होता पाक?
आठ आण्याची कोंबडी आणि दोन रुपयांचा मसाला
मिल्कपावडरीला गोड करण्यासाठी
मिल्कपावडरीला गोड करण्यासाठी पिठीसाखर लिहिली होती. मि.पा./बे/कणीक यातलं काहीही घाल. >>>>>>>>>> ओक्के.. कळलं आत्ता..
असा किती उरला होता पाक?
पाक भरपुर होता.. शिवाय एक प्रसादाचा नारळही संपवायचा होता.. भाजलेला रवा आयताच घरात होता.. अन रव्याचे लाडुही घरात हवेच होते, सो एका दगडात (पाकृत) बरेच पक्षी मारायचा प्रयत्न केलेला 
आठ आण्याची कोंबडी आणि दोन रुपयांचा मसाला>>>>>>>
आईने सुपारीविना सुपारी केली
आईने सुपारीविना सुपारी केली आहे पण शेंदोलेन पांदोलेन (का काय ते) खडे असल्याने अंदाज आला नाही आणि जरा खारट झाली आहे. खारटपणा कमी करण्यासाठी पुन्हा ज्येष्ठमध, बडीशेप पण घातली पण फरक पडला नाही. काय घातले की खारटपणा कमी होईल?
Pages