इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.
- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?
आहा... हा सार्वकालिन बीबी
आहा... हा सार्वकालिन बीबी सगळा पुन्हा वाचून काढला.. पुलाखालून बरंच पाणी गेलय
झक्कींनी काही पोस्ट्स मधला मजकूर उडवल्याने जरा हळहळ वाटली इतकच 
सद्ध्या 'परतोनि पाहे' (उलट्या बाजूस) सुरु आहे, निवांतपणे लिहीन एकदा..
सद्ध्या 'परतोनि पाहे' (उलट्या
सद्ध्या 'परतोनि पाहे' (उलट्या बाजूस) सुरु आहे, निवांतपणे लिहीन एकदा..>> नक्की लिहा. परत परदेशात का येत आहे?
उपास पुढील लेखन आले नाही....
उपास पुढील लेखन आले नाही.... काय झाले?
उत्सुकता आहे.
दरवेळी भारतात गेलो की...
अरे मी हा बाफ कसा काय पाहिला
अरे मी हा बाफ कसा काय पाहिला नाही? बरेच दिवस मायबोलीकडे नीट न बघण्याचा परिणाम!
रैना, तुम्ही ही चर्चा सुरु केलीत त्याबद्दल प्रथम तुमचे धन्यवाद! तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची जमेल तशी आणि प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न करते (यापूर्वी असा सर्वे इथे प्रदीप भिडेच्या पुतणीने तिच्या थीसीस साठी घेतला होता त्यावेळी साधारण हेच प्रश्न तिने विचारले होते.पण त्याला ५-६ वर्षे झाली). मला आणि माझ्या दोन मुलांना भारतात परत येऊन आता बारा वर्षे झाली आणि माझ्या जोडीदाराला इथे परतून दहा वर्षे झाली.
- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं? - अमेरिकेत जातानाच ठरवल होतं की दहा वर्षानी परत यायचं(१९९२ ते २००१), सुदैवाने दोघही त्या निर्णयापासून ढळलो नाही. माझी आई - तिने सर्व आयुष्य एकटीने काढ्ल, दोन मुलांना वाढवल - तिला म्हातारपणी एकटं रहायची वेळ येऊ नये हे अजुन एक कारण. ह्याचे वडीलही एकटे होते व ते माझ्या आईपेक्षाही म्हातारे आणि एकटे होते. मुलगी ऑड वयाची होण्याआधी यायचं होतं म्हण्जे तिलाही फार फरक जाणवणार नाही वा शालेय वातावरणाचा, अभ्यासाचा ताण पडणार नाही. धाकटा मुलगा खूपच लहान असल्याने तो आजी-आजोबांची कंपनी एन्जॉय करणार होता - त्यामुळे मलाही नोकरी करता येणार होती. आम्हा दोघांनाही बहिण-भावंड, भाचेकंपनी बरोबर मजा येते. सोशल वर्कची पण आवड आहे.
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ? - बाकी कुठल्याच बाबतीत आमचं सहजासहजी एकमत होत नाही पण याबाबतीत दोघांचाही निर्णय एक होता त्यामुळे नाखुष असायचं कारण नाही .फक्त रिस्क नको म्हणून मी ठरल्याप्रमाणे पुढे आले आणि माझं आणि मुलांच बस्तान बसल्यावर दोन वर्षानी नवरा परत आला. त्यामुळे मला एकटीला सर्व करताना थोडा त्रास झाला पण नातेवाईक होते मदतीला. आणि पहिलं वर्ष त्रास होणार अशी मानसिक तयारी केल्याने त्याचं फारस काही वाटलं नाही. आम्ही इथे आलो आणि लगेच तिथे ९/११ झाल्यामुळे जरा धस्स झालं पण .. नंतर सर्व रुटीनप्रमाणे चालू झालं. मुलांना बाबाला सोडून रहायची सवय नव्हती(मलाही) पण दोन वर्षाचाच प्रश्न होता आणि समर वेकेशन मधे आम्ही तिथे जात होतो.
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
मुलीची अॅडमिशन तिथूनच केली होती, मुलाचं पीआयओ कार्ड केलं. मुलीला तिथेच मराठी अक्षर शिकवली होती. तिथून माझी काही क्रोकरी, डिनर सेट, भांडी, लेदरचा सोफासेट, लाकडी फर्निचर, बेबी फर्निचर, डायपर्स बरच काही शिपिंग करुन आणलं - काही त्रास झाला नाही. बोसची होम थिएटर सिस्टीम तिकडून आणली अजुनही मस्त चाललेय.
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
खूप काही शिकायला मिळालं - नवीन सॉफ्टवेअर पासून संस्कृती, पदार्थापर्यंत! तिथेही खूप मोठ मित्रमंडळ होतं, तिथे विविध कार्यक्र्मात सहभाग घेतला होता. १९९७ साली भारताच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली तेंव्हा बर्लिंगटनच्या मेयरच्या अध्यक्षतेखाली तिथे ध्वजवंदन केले होते - बोस्टन ग्लोबमधे लिहिले होते. IDRF तर्फे गाण्याचा कार्यक्रम करुन भारतातील पूरग्रस्तांसाठी निधी उभा केला होता. अनेक देशांच्या लोकांशी मैत्री झाली व ती अजूनही बर्॓यापैकी टिकून आहे. त्यामुळे तिथलं ते सगळं उत्साही वातावरण, वर्ककल्चर, मित्रमैत्रीणी, ट्रिप्स हे सगळं गमावलं - फेसबूक मायबोलीच्या कृपेने त्यांची खबरबात मिळते. इथे काय कमावलं याची यादी मोठीच आहे - आई व सासरच्यांचा सहवास, समारंभातील धमाल, गणपती-दिवाळी सारख्या सणातील उत्साह, चमचमीत पदार्थ खाण्यातली मजा! परत आल्यावर भेटलेले मित्रमैत्रीणी! मुलांनी वेगवेगळ्या कलामधे, खेळांमधे केलेली प्रगती!
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
भारतात नोकरी म्हणाल तर मला आणि ह्याला दोघांनीही लगेच मिळाली. येस वर्ककल्चर थोडं त्रासदायक होतं - फिजीकल प्रेझेन्सला महत्त्व, डेलीगेशन ऑफ रीस्पॉन्सिबिलिटी नाही याचा सुरुवातीला थोडा त्रास झाला पण ड्रायव्हर गाडी याचं सुख होतं. मी पहिले सहा महिने नोकरी केलीच नाही. सगळं सेटल झाल्यावर मग कामाला सुरुवात केली. पॉलिटिक्स आहे पण आपण त्यात पडायचं नाही आणि त्रास करुन घ्यायचा नाही असं ठरवलं तर माझ्यासारखीला शक्य होतं. मी फार करियर ओरिएंटेड रहायचं नाही असं ठरवलं.
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
मुलगा अजुन शाळेत जायच्या वयाचा नव्हता, मुलीला गुरुकुलसारखी उत्तम शाळा मिळाली जी डे-बोर्डिन्ग स्कूल आहे - तिला अमेरिकेत तशाच शाळेची सवय होती. मराठी लिपी येत असल्याने अवघड गेले नाही. त्यात तिला तू छान स्कोर केलास की बाबा लवकर भारतात येइल असे सांगितल्याने तिने बाजी मारली. रस्ते, ट्रॅफिक, स्वच्छता या गोष्टींचा त्रास झाला, प्रदूषणाचाही सुरुवातीला खूप त्रास झाला पण मग होमिओपथीने साथ दिली. लाच किंवा डोनेशन म्हणाल तर कुठेच दिली नाही - वशिलाही फारसा कुठे लावायला लागला नाही. सिन्सिअरली प्रयत्न केले.
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
माझी आई आणि याचे बाबा खूष! आता बाबा नाहीत पण मुलाच्या मुंजीपर्यंत होते. एकत्र दिवाळी, लग्न समारंभ व वार्षिक एकदा ते पुण्याला रहायला येत व एकदा आम्ही धारवाडला जात असू. माझ्या पाठोपाठ तीन वर्षानी माझा धाकटा भाऊ परत आल्याने आई कधी इथे तर कधी तिथे - एन्जॉय करते आहे. मध्यंतरी तिचे पाठीच्या मणक्याचे मेजर ऑपरेशन झाले तेंव्हा मी नोकरी सोडली आता बरेच काही उद्योग करते, मुख्य म्हणजे मुलांच्या शिक्षणाकडे, आईच्या तब्येतीकडे लक्ष देते. राहून गेलेलं गाण्याच शिक्षण परत सुरु केलं. सोशलवर्क करते आणि किटी पार्टी पण!
- समाजाचे देणे
माझ्या मालवणच्या शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाली त्याआधी सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करुन शाळेसाठी दोन मजली इमारत - व्यक्तिमत्त्व विकास केंद्र बांधून दिले - आमच्या सरांच्या स्मरणार्थ! शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी वोकेशनल गायडन्स पासून ते को-करिक्युलर /कला विषयक अनेक कार्यशाळा आयोजित करते. सेंटेनरीच्या निमित्ताने शाळेतील सर्व माजी-शिक्षकांसाठी गुरुपूजन समांरभ आयोजित केला - खूप छान वाटलं. एका अंधशाळेसाठी मदत करते. माझ्या मुलांच्या शाळेत काहीबाही मदत करते. आणि इग्लिशचे क्लास घेते.
क्लासची फी घेते(कारण आजकाल मोफत दिलेल्या सेवेची किंमत रहात नाही) आणि त्यातून मिळालेले पैसे समाजकार्यासाठीच वापरते.
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?
दोन्ही ठीकाणी आम्ही मजा लुटली - मूळ म्हणजे रडत रहांण्याचा स्वभाव नाही, दोघांचेही फ्रेंडली नेचर आहे त्यामुळे कुठेही राहिलो तरी प्रोब्लेम नाही - पैसा म्हणाल तर तो कितीही मिळवला तरी कमीच आहे त्यामुळे त्याच्या मागे लागायचं नाही हे ठरवलेलच आहे.
परत तिथे स्थायिक होण्यासाठी नाही येणार. मुलं शिक्षणासाठी नोकरीसाठी परदेशी गेली (मोठी मुलगी दोन वर्षात पोस्ट ग्रॅज्युएशनला येईल) तर त्यांना भेटायला जरुर येऊ. खर तर पुणं सोडून गावी जाऊन रहायची इच्छा आहे पण ते कितपत जमेल माहित नाही.
फारच दिवसानी फारच मोठा प्रतिसाद दिलाय.
-- श्रुती
श्रुती, मस्त वाटलं वाचून!
श्रुती, मस्त वाटलं वाचून!
श्रुती.. इतका पॉझिटिव्ह
श्रुती.. इतका पॉझिटिव्ह अॅटिट्युड.. जीयो..
श्रुती, खूप सकारात्मक
श्रुती, खूप सकारात्मक प्रतिसाद वाचून छान वाटलं.
खूप छान पोस्ट श्रुती. ब्लेस
खूप छान पोस्ट श्रुती. ब्लेस यू.
श्रुती मस्त पोस्ट
श्रुती मस्त पोस्ट
श्रुती मस्त पोस्ट! स्वतःच नाव
श्रुती मस्त पोस्ट! स्वतःच नाव लिहितांना गंमत वाटतेय.
श्रुती, एकदम मस्त लिहलयं.....
श्रुती, एकदम मस्त लिहलयं.....
श्रुती.. मस्त लिहिलयं
श्रुती.. मस्त लिहिलयं
धन्यवाद लोक्स! पण मी जे आहे
धन्यवाद लोक्स! पण मी जे आहे जस आहे तस लिहिण्याचा प्रयत्न केलाय. काही कटू अनुभव सगळीकडेच येतात, अॅडजस्टमेंट सगळीकडेच करावी लागते. आपण मनाची तयारी ठेवली की झालं. नाहीतर परत येण्याचा निर्णय असो वा तिथे रहाण्याचा - दोन्हीही कठीणच आहेत. त्यात चांगल-वाईट, योग्य-अयोग्य अस काहीच नाही. फक्त एकदा निर्णय घेतला की मग रडायचं नाही किंवा दुसर्याला /परिस्थितीला ब्लेम करायचं नाही. हे सोप्प नाही पण अशक्यही नाही.
abhishruti खूप छान
abhishruti
खूप छान लिहिलंय.
>> काही कटू अनुभव सगळीकडेच येतात, अॅडजस्टमेंट सगळीकडेच करावी लागते. आपण मनाची तयारी ठेवली की झालं. नाहीतर परत येण्याचा निर्णय असो वा तिथे रहाण्याचा - दोन्हीही कठीणच आहेत. त्यात चांगल-वाईट, योग्य-अयोग्य अस काहीच नाही. फक्त एकदा निर्णय घेतला की मग रडायचं नाही किंवा दुसर्याला /परिस्थितीला ब्लेम करायचं नाही. हे सोप्प नाही पण अशक्यही नाही. >> अगदी खरंय.
अभिश्रुती, दोन्ही पोस्टस
अभिश्रुती, दोन्ही पोस्टस आवडल्या.
तिथून माझी काही क्रोकरी, डिनर
तिथून माझी काही क्रोकरी, डिनर सेट, भांडी, लेदरचा सोफासेट, लाकडी फर्निचर, बेबी फर्निचर, डायपर्स बरच काही शिपिंग करुन आणलं <<< हे कसं केलतं अभिश्रुती?
अभिश्रुती, छान लिहीले
अभिश्रुती, छान लिहीले आहे.
अदिती - ते परदेशातून भारतात (व उलटेही) कंटेनर मधून शिफ्टिंग्/मूव्हिंग करणार्या कंपन्या वापरून केले असेल.
हो मी कंटेनर मधूनच केलं
हो मी कंटेनर मधूनच केलं न्युयॉर्कची कंपनी होती - मला आता नाव नीट आठवत नाही पण ओशन वर्ल्ड असं काहीसं होत. आपण परत येतोय असं डिक्लेअर केलं पाहिजे म्हणजे जास्त चार्जेस पडत नाहीत. इथे मुंबईमधे त्यांचे एजंट्स असतात ते सर्व काम करुन देतात. फक्त डोर-टू-डोर सर्विस घ्यावी आणि आपलं सामान आल्यावर आपण जातीने तिथे हजर रहावे(सोडवून घेण्यासाठी) नाहीतर हे एजंट्स पैसे उकळतात. शिपिंग चार्जेस जास्त नसतात पण इथे माल सोडवून घेताना आपण जागरुक नसलो किंवा हजर नसलो तर अव्वाच्या सव्वा पैसे मागतात. आपल्याला ऑक्ट्राय पण द्यावा लागतो पण ते सामान घरी पोचल्यानंतर! जरी ते ४५ दिवस म्हणत असले तरी आपण दोन महिन्यापेक्शा जास्त वेळही लागू शकतो असं धरुन चालायचं. मी एप्रिलमधे शिप केलेलं सामान मला जुलै मिड्च्या दरम्यान आलं (मी हे डीटेल्स मुद्दाम लिहितेय पण हे दहा वर्षापूर्वीचे आहेत! आता थोडाफार बदल झाला असेल) पण एकही आयटम मिसिंग अथवा डॅमॅज झाला नव्हता.
ऑल द बेस्ट!
अजूनही साधारण दोन महिने
अजूनही साधारण दोन महिने (किंवा एखादा आठवडा कमी) लागतात शिप केलेलं सामान यायला.
साधारण किती खर्च येतो?
साधारण किती खर्च येतो?
खरंच मस्त पोस्ट abhishruti...
खरंच मस्त पोस्ट abhishruti... परतण्याचा जेव्हा विचार करु तेव्हा ही पोस्ट फारच उपयोगी पडेल.. धन्यवाद
अभिश्रुती, दोन्ही पोस्टस
अभिश्रुती, दोन्ही पोस्टस आवडल्या..>> +1
<<नाहीतर परत येण्याचा निर्णय
<<नाहीतर परत येण्याचा निर्णय असो वा तिथे रहाण्याचा - दोन्हीही कठीणच आहेत. त्यात चांगल-वाईट, योग्य-अयोग्य अस काहीच नाही. फक्त एकदा निर्णय घेतला की मग रडायचं नाही किंवा दुसर्याला /परिस्थितीला ब्लेम करायचं नाही. हे सोप्प नाही पण अशक्यही नाही.>>
श्रुती खरच खूप छान व्यक्त झाली आहेस
श्रुति....... कडक सलाम
श्रुति....... कडक सलाम .......खुपच आवडल.......जिओ......
>>फक्त एकदा निर्णय घेतला की
>>फक्त एकदा निर्णय घेतला की मग रडायचं नाही किंवा दुसर्याला /परिस्थितीला ब्लेम करायचं नाही.
अभिश्रुती, वरच्या पहिल्या दोन्ही पोस्टी आणि सकारात्मक दृष्टीकोन फार आवडलं.
अभिश्रुती, एकदा निर्णय
अभिश्रुती, एकदा निर्णय घेतल्यावर त्यातला ठामपणा आणि मुख्य म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन आवडला.
श्रुती,खूपच सुंदर मांडलत
श्रुती,खूपच सुंदर मांडलत सर्व, छान आहे तुमचा सकारात्मक दृष्टीकोन.
धन्यवाद! आदिती, दहा
धन्यवाद!
आदिती, दहा वर्षापूर्वी मला ४० फूट कंटेनरचा खर्च काहितरी ८०० डॉलर्स पडला होता.
अभिश्रुती तुमचे अनुभव आणि
अभिश्रुती तुमचे अनुभव आणि दृष्टीकोन फार आवडलं.
श्रुती, फार सुंदर लिहिलंयस
श्रुती, फार सुंदर लिहिलंयस गं... खुप आवडलं.
Pages