केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नहाताना डोक्यावर पाणी घ्यायच्या आधी अर्धाकप निरसं दूध डोक्यावर ओतायचे. मग नेहमीसारखे नहायचे. यामुळे माझे केस गळण्याचे प्रमाण खूप कमी झालेय.
कोंड्यावर फ्लॉवर रेमिडि, होमिओ पॅथीत छान औषध आहे, नेहमीच्या तेलात (पॅरॅशूट वा तत्सम ५० एम एल च्या बाटलीत) क्रॅब अ‍ॅपल, मीझिरियम आणि अर्निका यांचे ५-५-५ थंब घालून ठेवायचे. ही औषधे कोणत्याही होमिओपॅथीच्या दुकानात मिळतात. ( मी दुकान चालवण्यासाठी हे सांगत नसून, कोंड्याचा काय त्रास असतो हे अनुभवल्यामुळे सांगते आहे , कृ गै न )

अवल,
नीरसं दूध केसावर वापरून मग काय नेहमीचाच शँपू वापरूनच धुतले तर चलते काय?
दूधाचा व शँपूचा परीणाम कसा असेल ह्या विचारात?

>>>कोणी Sesa Hair Oil वापरले का>>>>>मी वापरले आहे. वास खूपच तीव्र आहे. पण रात्री लावून झोपल्यास झोप फार छान लागते. Happy पण बेडरूमभर तेलाचा उग्र वास भरून राहतो.

स्विमिंग कॅप वापरा.>>> ती तर वापरेनच, पण तरी केस ओले होतीलच ना? त्याचे काय करू? तिथल्या पाण्यात क्लोरीन असते ना खूप?

माझ्या तीन वर्शाच्या मुलीचे केस खुप पातळ आहेत. मी तिला रोज रात्री खोब्रेल तेल लावते. अजुन काय करता येइल?शिकेकाई इ. उपाय लहान मुलीला केले तर चालतील का?

३ वर्ष म्हणजे तशी छोटी आहे ती, नंतर दाट होतील केस तरिही खोबेरेल तेल चालुच ठेवा पण केस पातळ असतील तर आयुर्वेदिक डॉ. कडून ट्रीट्मेंट घेतल्यास लवकर आणि चांगला फायदा होतो, पोटात घेण्यास औषध देतात बाकी तेल वगैरे पण छान असतात.

पाच वर्षाची होईपर्यन्त बेबी शांम्पु वापरलात तर उत्तम, मला अजुन अनुभव नाही पण माझी बहीण तिच्या मुलीसाठी वापरते. केस धुण्याची फ़्रिक्वेन्सी आठवड्यातुन दोन पेक्शा जास्त नको.

मना, ३ वर्षांच्या मुलीच्या केसांची एवढी काळजी नका करु...

पाचवीत जाईपर्यंत माझ्या लेकीचे केस इतके पातळ होते की केस कमी आणि टकलेच (म्हणजे डोक्याची त्वचा Happy )जास्त दिसायचे. समोरुन पाहिले तरी डोक्याच्या दोन्ही बाजुंना टक्कल दिसाय्चे.

नंतर जेवण सुधारले, चौरस आहार पोटात जाऊ लागला तसे केस आपोआप सुधारले. डोक्याची पुर्ण त्वचा झाकली गेली, दोन्ही बाजुची टक्कले दिसेनाशी झाली. आता केस अगदी व्यवस्थित दाट आहेत.

त्या काळात तेल वगैरे तर ती कधी लावतच नव्हती.

ड्राय हेअर असतील त्यांनी दर आठवड्याला केसांना ओला नारळ वाटून त्याचं दूध आणि थोडासा चोथाही लावावा.....तासाभरानी केस धुवावेत..नेहमीप्रमाणे.....ओल्या नारळाच्या दुधात उटणं मिसळून त्याने आंघोळ केली असता ड्राय स्कीनला खूप फरक पडतो...मात्र नंतर त्यावर कोणताच साबण लावायचा नाही

काल मी सुट्टी चा दिवस असल्याने आवळे खिसलेले
मी, नवरा अन २.१० वर्षे मुलीने लावले [त्यान्चे पाणी]
मला थोडासा फरक वाटतोय पण अजुन २ ३ दा प्रयोग करावा लागेल...

इथे ग्रेनीलबद्दल वाचले. केसांना लावल्यावर याचा रंग किती दिवस टिकतो?
त्यात नीळ आहे हे वाचून शंका पण आहे की लावावे का केसांना? कोणताही कलर लावयच्या आधी केस शँपू केले असले पाहिजे का?

अंजली, ३ आठवडे तर नक्कीच टिकतो माझ्या केसांन वर. तुमचे केस किती प्रमाणात पांढरे आहेत त्यावर अवलंबून आहे.

धन्यवाद सख्यानो..........खुपच उपयोगि माहीती मिलालि...आता भिमसेनि कपूर वापरुन पाहनार आहे,

काल आनला भिमसेनी कापूर आनि खोबरेलात मिक्स करुन लेकिस लावला एकदचा !!!!!! साधना च्या पोस्त खुप च मस्त आहेत !!!! मी ग्रेनील इन्स्तन्त काफित भिजवुन आज लवले आहे. मला पन सफेद केसान्चा प्रश्न होता !!!!!
खुप अनमोल महिती मीलाली !!! सार्या सख्याना धन्यवाद !!!!!

अन्जलि ---१२ अग मी बरेच दिवस ग्रेनील वापरते आहे, मला तरी मस्त परिनाम वातला !!!!! आनी केमिकल तरी नाही त्यात ग !!!!! मला पन लाल केस नाही आवदत म्हनून मी दोन्ही शेदस मिक्स करुन लावते !!!! तु वापरुन बघ !!!!!

Pages