नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज सकाळीच सिताफळाचे आईस्क्रिम सेट करायला ठेउन आलेय. संध्याकाळी गेल्यावर टेस्ट करुन सांगतेच. Happy

सिताफळाच्या बिया काढण्यात वेळ गेला आणि ऑफिसला यायला लेट. Lol

रेसिपी करता थँक्यु लिहायचं राहीलंच. मस्त सोपी रेसिपी आहे. टेस्टी आहेच.
फक्त मिक्सर तेवढा धुवायचे कष्ट Wink

mast

जागु फोटो आठवणीने टाकावे ही विनंती. आणि सिताफळाच्या बिया कशा काढायच्या ते मी वर सांगितल होत की सुमेधाच्या पोस्टीला उत्तर म्हणुन.

सावली.. यम्मी दिसतयं आईस्क्रीम!
घसा खराब झालाय त्यामुळे अजुन लांबणीवर गेलं माझ्याकडे

हाईला!!
सावली काय हल्ली ऐकत नाही. त्या आईस्क्रिमात फळ काय घातलं आहेस गं?
संत्र्याची रिंग कसली भारी दिसते आहे त्यावर...

शहाळं वापरलं.
( पण नेमकं खोबरं जाड निघालं त्यामुळे खोबर्‍याचं आईस्क्रिम वाटतय, शहाळ्याचं नाही )

अशा सोप्या रेसिप्या अस्ल्या तर करता येतात मला. Wink

खोबर्‍याचं आईस्क्रिम>> काय हरकत नाही. आपण टेंडर म्हणू नये, नुसतंच कोकोनट आईस्क्रिम म्हणावं Wink

त्यावर ती निळी कलाकुसर कशी केलीस?

duudh high fat...whole milk hote ka? >>> हो, गोकुळ चे वापरले.

शिक्रेट कसलं!!
आईस्क्रीम बॅटर चौकोनी ट्रे मधे ओतलं आणि चमच्यात अगदी एकच थेंब खायचा निळा रंग घेतला आणि चमचा दोन चारदा एकाच दिशेने गोलाकार फिरवला.
हो हो 'कोकोनट ओशन ब्लू आईस्क्रीम' असं नामकरण करु.

सावली सुरेख शेड आलेय निळ्या रंगाची... माझं पण आईस्क्रीम करणं लांबणीवर... सगळे पेशंट आहेत घरी! Sad

भांडं साधं स्टीलचा डबा चालेल सेट करायला की अल्युमिनीअम वगैरे ट्रे लागतो? शी काय ब्बावळट्ट प्रश्न आहे खरा पण घरी कधी आईस्क्रीम कारायच्या भानगडीतच नाही पडले. लग्नाआधी कॉफी, कोजगिरीचं मसाला दूध वगैरे फ्रिजरमध्ये ठेवायची उठाठेव बर्‍याचदा केलेय म्हणा... पण हे कसं... कौतुक पदरात पाडून घ्यायचं तर पर्टीक्युलरच पाहीजे नै Proud

भांड..? मी इतका विचार नै केला. काचेचा चौकोनी ट्रे मधे टाकलं.
ते काढताना जरा त्रास होतो. पण विकतचं आईस्क्रीमही डिप फ्रिजर मधे ठेवल्यावर काढताना तसाच त्रास होतो.

मी चक्क कुकरमध्ये लावायच्या स्टीलच्या मोठ्या भांड्यात (म्हणजे ते गोल असतात ना डबे म्हणतात त्याला काही ठिकाणी) ठेवल होत आईस्क्रिम सेट करायला.

काचेचा चौकोनी ट्रे मधे टाकलं

नशिब फुटला नाही ट्रे..

मलाही हे एकदा करुन पाहायला हवे. मी याआधी केलेल्या सगळ्या आइसक्रिममध्ये बर्फ झालेय भरपुर.. Sad

जबरी फोटो! सजावटही मस्तच! ती प्लेट उचलून मट्कवावीशी वाट्तेय आताच!

सावली: ़जेलीपण केलेली मी. मस्त झाली! डबाभर करून ठेवली होती. मस्तपैकी ३ दिवस जेवणानंतरची स्वीट डिश मिळाली.
़जेली तर अग्दी कुण्णालाही जमेल... Happy

जागू मासे नुसते दाखवते, खायला देतच नाही Sad म्हणून मी रागावले होते. त्यात हे नॅचरल्स आईसक्रिमही तिने केले अन मला नुसते फोटो पाठवले, इथे टाकायला. मग काय आज्ञा मानली पाहिजे ना, कोण जाणे पुढे मागे बोलवेलही माशे खायला .
तर हे जागूने केलेल्या आईअस्क्रिमचे फोटो

IMG-20131003-WA0027.jpg

हा अजून एक क्लोज अप

IMG-20131003-WA0026.jpg

आता इतकं हाताशी आल्यावर मी काय सोडते. घेतलं थोडं काढून

IMG-20131003-WA0025 copy.jpg

स्लर्र्प..., घ्या तुम्ही पण चाखा थोड, मस्त यम्मी झालय

IMG-20131003-WA0024 copy.jpg

अवले धन्स ग. सकाळपासून माझा खटाटोप चालू आहे हे फोटो इथे अपलोड करायचे पण ऑफिसमधले स्लो नेटवर्कींग आणि घरचा पिसि बंद यामुळे जमतच नव्हते म्हणून अवलला हे काम सोपवले आणि तिने इतक्या प्रेमाने ते पार पाडले Happy

मुग्धा अग तुझे आभार मानावे तितके थोडे आहेत. आमच्या घरात आठवडा- पंधरा दिवसांनी आईस्क्रिम असतच. उन्हाळ्यात रोज म्हणायला हरकत नाही. आता बाजारातून आणायला नको. घरी बनवूनच सगळ्यांना देणार आणि खाणार.

काल मी सिताफळचे आईक्स्रिम केले तुझ्या रेसिपीने आणि इतके भन्नाट झाले ना. अप्रतिम अगदी. घरातील मुले आणि मोठे दोन्ही वर्ग एकदम खुष.

Pages