नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी घरी शहाळ्याच आइस्क्रीम करुन बघितल होत. तेव्हा नवर्‍याची प्रतिक्रिया होती की चव सेम टु सेम नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते आहे. त्याच्याकडुन पहिल्याच घासाला चांगल्या प्रतिक्रिया फार कमी म्हणजे अगदी नगण्य प्रमाणात ऐकायला मिळतात.... Happy

सोपी वाटते आहे कृती! करून पाहीन Happy

यात दूध कुठलं वापरायचं? नेहेमीचं का 'फुल्क्रीम' (इती भैया) दूध?
क्रीम घरचं वापरलेलं का अमूल वगैरे?

नेहेमीचं का 'फुल्क्रीम' (इती भैया) दूध?>>>> चालेल. आमच्याकडे पिशवीतल दुध येत चितळ्यांच्या कृपेने, मी तेच वापरल होत. भैयाकडच्या दुधाबद्दल माहित नाही, तुम्ही करुन बघा आणि मला सांगा इथे.

सुमेधाव्ही फोटो जरा कठीण आहेत. कारण हे उन्हाळ्यात केल होत. पुढच्या वेळी करेन तेव्हा प्रयत्न करेन प्रचि टाकायचा.
एक शंका आहे इथेच विचारते - माझ्याकडे घरी डेलच अल्ट्राबुक आहे आणि त्यावर विंडोज ८ इन्स्टॉल केल आहे बहुतेक. माबोवर टाकण्यासाठी लागणार्‍या प्रचिच्या साईजची सेटिंग तिथे कशी करायची???

विन्डोज ८ वर सगळंच कॉम्लिकेटेड करून ठेवलंय.
तो फोटो सरळ गूगल पिकासा/ पेन्ट्ब्रश ह्या सॉफ्ट्वेअरनी क्रॉप कर मग सेव करून अप्लोड कर.

छान आहे पाकृ. आईसक्रिम करतना ते दोन तासांनी मिश्रण बाहेर काढुन परत घुसळायचं असतं ते यात नाही त्यामुळे नो कटकट आइसक्रिम होईल एकदम.

सोपी आहे. करुन बघेन बर्‍याचदा नुसते दुध आणि साय घालून करते पण बर्फ लागतॉच. आता दुध पावडर टाकुन बघेन.

दुध पावडर कुठल्या ब्रँड्ची वापरली???>>>> रोचीन nestle everyday milk powder वापरली...

छान आहे पाकृ. आईसक्रिम करतना ते दोन तासांनी मिश्रण बाहेर काढुन परत घुसळायचं असतं ते यात नाही त्यामुळे नो कटकट आइसक्रिम होईल एकदम.>>>>>> हो साधना एकदम नो कटकट आईस्क्रिम. एकदा फ्रिज उघडुन सेट करायला लावल की डायरेक्ट खायच्या वेळेसच फ्रिज उघडायचा...

नॅचरल्स ची आईस्क्रीम आवडतात, त्यामूळे हे आवडेलच. ( आता त्या स्वादाची फळेच इथे मिळणार नाहीत, त्याचे काय करू ? )
मी एक आईस्क्रीम मेकर घेतला आहे, अजून मुहुर्त केला नाही. फ्रीजमधे थंड केलेला द्रव त्यात ओतला की
अर्ध्या तासात स्मूथ आईस्क्रीम तयार होते (म्हणे.)

भारी लागेल असं वाटतय ! मी साधारण असच प्रमाण घेऊन आईस्क्रीम मेकर मधे करते पण दुधाची पावडर कधी घातली नव्हती - आता पुढल्या वेळी नक्की घालून पाहते.

>> फ्रीजमधे थंड केलेला द्रव त्यात ओतला की अर्ध्या तासात स्मूथ आईस्क्रीम तयार होते (म्हणे.)

दिनेशदा, ते कंसातलं 'म्हणे' अगदी बरोबर आहे Happy त्यात फक्त सॉफ्टी सारखे आईस्क्रीम तयार होते - नंतर ते फ्रीझर मधे ठेवावे लागते अर्धा तास अजून थोडे घट्ट होवून आईस्क्रीम खातो आहोत असे वाट्ण्याच्या लायकीचे व्हायला - तसेच खायला घेतले आणि चांगले गरम हवामान असेल, तर आईस्क्रीम पितो आहोत असे वाट्ते लवकरच Happy - स्मूथ होते त्याबद्द्ल सहमत.

काल पाहुने आले होते आनि त्यान्च्यव्रच हा पप्रयोग करुन बघितला. पहिल्या घासात बोल्ले..नचुरल्स सार्खि वाटते...

मस्त रेसिपि...धन्यवाद.

शहाळ्याचे आईस्क्रीम कसे केले...नारळाचे दूध घातले का...
मला ते अतिप्रचंड आवडते टेंडर कोकनट....
घरी करायला मिळत असेल तर ऑल टाईम फेव

To Mugdha Ranade

Excellent natural icecream. me kaal kela hota ani ghari saglyanna bhaannat avadla. Thanx for the recipe.

Hello Mugdha Ranade

Me Sitaphalacha kela hota te lihilach nahi. Farach masta zala hota. agadi tumhi sangitlya pramane kela. Kahihi vegla nahi kela ani khupach chchaan zala hota. Thanx once again. Ashach masta masta recipes ikde pathavat ja.

अंजलि, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आणि घरी सगळ्यांना आवडल हे ऐकुन खूप छान वाटल.

शहाळ्याचे आईस्क्रीम कसे केले...नारळाचे दूध घातले का... मला ते अतिप्रचंड आवडते टेंडर कोकनट....घरी करायला मिळत असेल तर ऑल टाईम फेव>>>>>> आशु, नाराळाच दुध नाही शहाळ्याचे तुकडे घातले. ते आधी थोडे मिक्सरमधुन काढले (पेस्ट नाही करायची) आणि मग वर सांगितलेली रेसिपी केली..... खाताना मध्ये मध्ये खोबर्‍याचे तुकडे लागल्याने नवरा म्हणाला की नॅचरल्ससारखी चव लागते आहे.

दिपमाला.... धन्यवाद

मुग्धा, सोपी आणी शुअर शॉट वाटतेय रेसिपी..
एक रिक्वेस्ट.. एडिट करून दुधाचा आणी मिल्क पावडरचा ब्रँड पण अ‍ॅड करून टाक प्लीज..:)

Hello Mugdha

Mala itka photo vagaire kasa takayacha mahit nahi. Me 57 yrs old ahe ani sadharan computer mulan barobar chatting sathi vaparte. Thoda far ikde tikde cooking chi avad aslyamule shodhat asate recipes. Sorry tya mule me tumchi photo chi ichcha purna karu shakat nahi. Tasahi photo Sitaphal icecream cha vanila sarkhach disla asata. So no regrets. Pan khupach avadla amhala ani ata me nakki shahala vaparoon pan karoon baghen ani maza pratikriya kalveen. Thank u.

chhan

मी या पद्धतीने सिताफळ आइस्क्रीम करते..सिताफळ चा थोडा गर मिक्सरमधे दुध इ.वाटताना व बाकी गर वरुन तसाच मिक्स करुन फ्रिज मधे सेट करायला ठेवते.इसेन्स कोण्स्तेच वापरत नाही.असेच चिकू चे ही छान रवाळ होते.

Pages