माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोहना पी | 15 July, 2013 - 16:12 नवीन
भन्नाट!! कविता मस्तच! >> माझं काय चुकलं Proud

गुलाबजाम तळताना विरघळत आहेत. मी नेहेमी खव्याच्या निम्म पीठ /मैदा हे प्रमाण वापरते गुलाबजाम करताना. काल निम्म्यापेक्षा जास्त गव्याचं पीठ घालूनही गुलाबजाम तळताना विरघळलाच. परत पीठ घालून बघितलं पण तरी तेच. तिन वेळा प्रयत्न केला पीठ वाढवून पण तरी विरघळणं थांबल नाही. शेवटी कंटाळून तो पीठ घातलेला खवा फ्रिजमध्ये ठेवला.

आता काय करता येईल?

फार उत्साहात ग्व्हाची गुळ घातलेली धिरडी (जे काही नाव म्हणाल ते) करायला घेतले. थोड दुध अन पाणि घालून सरसरीत बॅटर बनवल.पण तव्याला चिकटतायत. एर्वी माझे डोसे /घावन कॅटॅगरीतील पदार्थ न मोडता निघतात . माकाचु. Uhoh तवा गरम ,नॉन्स्टिक वगैरे बदलून पाहिल. बिनाअंड्या चा उपाय हवाय मात्र.

हो प्राची खवा विकतचा होता.
मंजूडी, त्या मिश्रणात नुसती पिठीसाखर घालून पोळ्या करायच्या का? सारणातली कणिक/ मैदा कच्ची रहाणार नाही का?

अगं, एकदा खूप जास्त गुजा तळून झाले आणि तरीही खव्याचं मिश्रण उरलं होतं तेव्हा आम्ही साखर घालून खवा भरून पोळ्या लाटल्या होत्या. सारण कच्चं राहिलम नव्हतं. पण तेव्हा एक किलो खव्याला दोनशे ग्रॅम मैदा एवढंच प्रमाण होतं, पण तू तर निम्म्यापेक्षा जास्त मैदा घातलाहेस म्हणत्येस, तर कच्चं राहिल की कसं??

घरात थोड अनारस्याच पिठ उरल आहे.अनारसे आवडतात. पण तुप खुप जात पोटात.[ कोलेस्ट्रोल वाढायला नको.] म्हणुन . त्याच दुसर काही करता येइल का? आप्पे होतील का?

घरात थोड अनारस्याच पिठ उरल आहे.अनारसे आवडतात. पण तुप खुप जात पोटात.[ कोलेस्ट्रोल वाढायला नको.] म्हणुन . त्याच दुसर काही करता येइल का? आप्पे होतील का?...................नाही व्हायचे! थालीपिठाप्रमाणे थापून बाजूने तूप सोडून करण्याचा प्रयत्न करा.

मी नेटवर शोधून ब्रेड करायला घेतला. सगळे सांगितल्याप्रमाणे केले तरी ब्रेड खूपच कडक झाला, माझे काय चुकले प्लीज सांगा ना

पीठ भिजवायला पाणी फार गरम वापरलं होतं का ? मी असा पराक्रम केला होता मध्यंतरी. ११० डिग्री फॅरेनहाईट तपमानाचं पाणी घालायला सांगितलं होतं. अस्मादिकांनी डिग्री सेल्सियसचं वापरलं होतं.

......

फेकत नाहीये. खरंच उकळतं पाणी घातलं मी. पीठ मळायचं काम माझ्या स्टँड मिक्सरने केलं.आणी त्या ब्रेडची बेक झाल्यावर जेव्हा वाट लागली तेव्हा पाकिटावर लिहिलेली कृती परत वाचली. तेव्हा कळलं काय घोटाळा झाला ते.

पोह्यात घातलेले दाणे मऊ पडतात नेहेमी माझ्याकडून. नवर्‍याला ते कायम कच्चे आहेत असं वाटतं. (भाजलेले दाणे वापरून सुद्धा :रागः)
मी फोडणीत घालून कांद्याबरोबर परतून पाहिलं, नंतर पोहे झाल्यावर वरून पेरले. पण याचं आपलं एकच पालुपद दाणे कच्चे, नीट शिजले नाही काहीतरी चुकलंय. वैतागले आता मी.
काय करू ज्याने ते क्रिस्पी राहतील.

दाणे जर वेगळे तळून घेतले आणि पोह्यांत घातले तर रुचकर, क्रिस्पी लागतात. [तेलाचा विचार करू नये! ;-)]

दाणे जर भट्टीत भाजून घेतले तर त्याची वेगळी खमंग चव येते. मग कोणीही 'कच्चे दाणे वापरलेत' असे म्हणू शकतच नाही!

मी फोडणी करण्यापूर्वी त्याच तेलात दाणे तळते आणि बाहेर ताटलीत काढून ठेवते.मग फोडणी करुन पोहे व दाणे परतते.

काय करू ज्याने ते क्रिस्पी राहतील.
<<
साबांना विचारा. चिरंजिवांच्या जिभेला त्यांच्या हाताची सवय असेल अजूनही Proud

फोडणी तडतडली की दाणे घालून मंद आचेवर तळून घ्यायचे आणि मग त्यात हि मि, कडिपत्ता, कांदा/बटाटे घालायचं. मला पण पोह्यात किंवा पोळीच्या कुस्कुर्‍यात दाणे कच्चे राहिलेले अजिबात आवडत नाहीत Happy

फोडणी तडतडली की दाणे घालून मंद आचेवर तळून घ्यायचे आणि मग त्यात हि मि, कडिपत्ता, कांदा/बटाटे घालायचं>> +१

पोहे म्हणजे कांदेपोहे ना? मी ड्राय रोस्टेड दाणेच घालते. पण खाताना ते कसे लागतात ते मलाच आठवत नाही कारण बाकी लक्ष देण्यासारखा बराच मालमसाला असतो.

Pages