माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद दिनेशदा! पुन्हा एकदा प्रयोग करून बघायला पाहिजे.
डॅफोडिल्स: धन्यवाद! पण माझ्या कडे मावे नाहीये त्यामुळे जरा पारंपारिक पद्धतीच बघाव्या लागतील.

मी आज सकाळी केळफुलाची भाजी करण्याचा प्रयत्न केला. (पहिल्यांदाच) कमलाबाई ओगलेंच पुस्तक रेफर करत होते. पण त्या फुलातला नेमका कोणता भाग काढावा ते कळलं नाही बहुतेक मला Sad त्यांनी मधला एक दांडा आणि त्या लगत एक वाटीसारखा भाग असतो तो काढून टाका असं लिहिलं होतं. मला नेमकं हे सांगू शकेल का कोणी की नक्की काय काधायचं आनी काय ठेवायचं ते Uhoh मी थोडी मिक्स रेसिपी फॉलो केली. चिंचेच्या पाण्यात तासभर भिजवून मग कुकरात शिजवलं ते मटेरियल. मूग डाळ वगैर घालून फोडणी दिली. पण भाजी जरा कडवट लागली. ते का/ Uhoh

दक्षिणा, केळफुलातलं वरचं आमसुली रंगाचं साल काढल्यावर आतमध्ये बर्‍याच फुलांचा गठ्ठा दिसतो. त्यातलं प्रत्येक फूल वेगळं करायचं. त्या प्रत्येक फुलात मध्यभागी एक काळसर दांडा दिसेल. हाताला कडकसर लागतो. तो काढून टाकून बाकीचं फूल घ्यायचं. सगळी फूलं काढून झाली की बारीक चिरायची आणि रात्रभर ताकात भिजवून ठेवायची (केळफुलाला खाज असेल तरी ती जावी म्हणून). दुसर्‍या दिवशी ही भाजी निथळून कुकरमध्ये ३ शिट्ट्या करुन शिजवून घ्यावी.

केळफुलाबरोबर काहीतरी कडधान्य घालावं लागतं ह्याचं कारण ती चोरटी होते म्हणून असेल. काळे वाटाणे+ केळफुल भाजी हे बेस्ट काँबिनेशन आहे. जर काळे वाटाणे नको असतील तर मटकी वगैरे चालेल पण मग ती वेगळी कुकरमध्ये शिजवून घ्यावी( खूप शिट्ट्या न करता) आणि मगच केळफुलात घालून शिजवावी तरच गच्च गोळा होत नाही.

दक्षिणा, हा व्हिडीओ सगळ्यात पहिला ब. आणि मगच बाकी लिंक उघड.

http://m.youtube.com/#/watch?v=lhCYK5U52VA&desktop_uri=%2Fwatch%3Fv%3Dlh...

मला फाँटमुळे ही जुनी रेसिपी वाचता येत नाहीये. तुला येतेय का बघ

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/57606.html?1221990822

http://chakali.blogspot.com/2010/06/banana-flower-recipe-sabzi.html

सायो धन्यवाद Happy
पहिल्यान्दाच प्रयत्न चुकल्याने थोडी निराश झालेय मी. पुन्हा निवांत नक्की करून पाहिन Happy

कोणाचे बेसन लाडू बिघडलेत का कधी? माझ्याकडून तो पराक्रम घडलाय Sad मिश्रण पातळ झालंय .. दुध जास्त झालं बहआहेत, मी कोरडं बेसन भाजून घातलंय आत्ता पण नाही वळले गेले तर काय करू?
(आणि बेसनाचे गोळे गोळे पण दिसत आहेत)

बेसनलाडू करुन एकावर एक ठेवलेत तरी ते कधीकधी चिकटतातच.... त्यामुळे मिश्रण मुकाटपणे डब्यात भरुन ठेवा. लाडू खायची इच्छा झाली की मिश्रण काढून तेवढ्यापुरते लाडू वळावेत आणि खावेत. हे घाला, ते घाला, असे करून डोंगर वाढवण्यापेक्षा हा मार्ग चांगला.

( ही चेष्टा नाही, खराखुरा सल्ला आहे.)

अंजली मी आहे तुझ्याबरोबर बेसन लाडू चुकवण्यात. Happy माझे ही काल केलेले बिघडले. माक्रो रेस्पी होती. एका घाण्यात तूप खूप जास्त झालं. त्यामुळे सगळं पीठ पातळ. नंतर कोरडं बेसन भाजून घातलं पण लाडू चुक्या तो चुक्याच!! Sad

आता अजून एक प्रयत्न करावासा वाटतो आहे. पण तोही चुकला तर राजगिर्‍याच्या लाडवाचा फराळ!! Happy

आंबा सल्ला खरंच चांगलाच वाटतोय कारण आता साखर पण घालावी लागेल Happy
धनश्री Proud
थोडावेळ फ्रीजमधे ठेवून बघण्यात येईल काय होतंय ते Happy

अंजली, गुठळ्या मोडायला आणि पिठीसाखर घालुन ते मिश्रण एकदा मिक्सर मधुन काढ आणि मग डब्यात भरुन ठेव... तुमच्याकडे आता हवा गार व्हायला लागली असेल तर बहेरच ठेव.. उद्या सकाळी आयस्क्रिम स्कुप ने स्कुप करुन लाडु बनव.

लाजो ते मिश्रण मिक्सरमधे चिकटून नाही ना बसणार? नाहीतर डबल कुटाणा Happy
हो हवा आता तशी गारच आहे मग फ्रिजमधे नको म्हणतेस...
ओके बाहेर ठेव्ते मग

नाही.... मिक्सर मधे फिरवलेस की तूप सुटेल आणि काढताना लगदा नीट बाहेर पडेल. स्पॅच्युलाने सगळे मिश्रण काढुन घे आणि मग मिक्सरच्या भांड्यात गरम पाणी, लिक्विड सोप आणि थोडे मिठ घालुन एकदा फिरवुन घे.. भांड्याचा ओशटपणाही जाईल.

मागच्यावर्षी मी लाडुबेसन आणले त्याचे लाडु फारच रवाळ झाले होते... मग मी ही मिक्सरची आयडिया वापरली होती.. मस्त हवे ते टेक्श्चर आले Happy

लाजो मी ह्यावेळी आणलेले बेसन खूप रवाळ आहे, माझे बेसन भाजुन झाले आहे आता ते साखरेबरोबर मिक्सर मधुन फिरवावे का आधीच फिरवुन मग साखर घालावी?

तु बेसन कोरडेच मिक्सरमधुन काढुन घे आणि मग पिठी साखर घालुन हाताने मळून घे. मिक्सर मधे फिरवल्याने तूप सुटेल आणि मिश्रण थोडे कोमटसर पण होइल.. त्यात साखर नीट विरघळेल.

मी पूर्ण साखर, तूप घालुन लाडू वळायला घेतले होते... Uhoh

अगं हो, चालतं की.. मी नेहमी तेच घेते आणि रवाळपणासाठी अर्धीवाटी बारिक रवा घालते. यंदा तसेच केलेत.

ते लाडुबेसन घेऊन उगाच डब्बल काम झाले होते मला मागच्यावर्षी....

लाजोच्या या रेसिपीवर पण कमेंट टाकली आहे...मला वाटतं त्यांनी पाहिली नाहीये म्हणून इथे पण टाकते ...

तर ही आणि ती दुसरी उपासाची न्योकी रेसिपी पाहून बटाटा आणि उपास भाजणीने ट्राय केली तर गरम पाण्यात ते तुकडे विरघळलेच..काहीच हातात आलं नाही. Sad शेवटी उरलेल्या गोळ्याचे पॅटिस केले...
काय चुकवल?
पुन्हा करायचं झालं(च) तर सुधरायला वाव आहे का यासाठी इथे हा प्रश्न... Happy

अगं नाही गं.. या रेसिपीज मी नेहमी करते आणि हे फोटो केव्हाच काढलेले आहेत. कधीपासुन इथे टाकेन टाकेन म्हणत होते पण वेळ नव्हता मिळत. काल अल्पनाची भाज्यांच काय करु अशी पोस्ट बघुन या रेसिप्या टाकावं म्हंटल Happy

बादवे, काल डिनरला बाहेर होतो Wink

ताजा केलेला पातळ पोह्याचा चिवडा जरा सादळल्यासारखा लागतोय
पोहे कमी भाजले गेले किंवा फोडणी नीट झाली नाही बहूतेक. काय करता येईल की परत कुरकुरीत होईल?
सगळं गरम केलं तर मीठ-साखर वितळून अजूनच चिवट होईल का?

_मधुरा_, ट्रेला aluminum foil लाऊन ३५० वर ओव्हनमध्ये २-३ मिनीटे ठेऊन बघ. मी पोहे तसे भाजते, मस्त कुरकुरीत होतात. चिवडा पण कुरकुरीत होऊ शकेल.

मी आलं लसुण पेस्ट नेहमी लागेल तशी करते ... कालच जरा जास्तीची करुन ठेवली freeze मध्ये ....पण आज हिरवट दिसत आहे , वास आणि चव चांगली आहे, पण रंग का बदलला असेल?.

Pages