Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा
माझा नवराही असंच म्हणतो नुतन, लिंब्याभाव.

संदीप, कुरीअरने येणारे की ग ट ग ला मिळणारे सुवर्ण पदक? तु कुत्सितपणे तर पदक देत नाहीस ना?
दादे, मी हल्ली रिस्कच घेत नाही. घरात्-बाहेर सतत चुडीदार घालते. जाऊ दे, अजुन बोलले तर संस्कृतीचा र्हास आणि मर्यादेचं उल्लंघन होइल.
ऑफीसला
ऑफीसला जाताना भिंतीवरच्या गणपतीला नमस्कार करुन आणि घड्याळात बघुन निघायची मला सवय. एकदा घाईत बाहेर पडताना गणपतीकडे बघितलं, घड्याळाला नमस्कार केला आणि निघाले ऑफीसला.....
पल्ले,
पल्ले, सगळ्यांच्या गंमतीजमतीनंतर तू केलेला शेवट भयाण हसवून गेला. माझ्या वेंधळेपणाचे अनंत किस्से आहेत. ते सांगण्यात मजा नाही. भेटू तेव्हा लक्षात येतीलच. बाकी माझा विसराळूपणा इतका वाढलाय की कधी कधी वाटतं की ही आता रश्शी बांधूनच सोबत निघेल.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे
नाही हो, मी
नाही हो,
मी खरच मनापासून प्रतिक्रीया दिली होती , प्लीज कुत्सितपणे वगैरे नाही,
मी इतका हसत होतो की प्रतिक्रीया / भावना व्यक्त करण्यासाठी मला तेच शब्द योग्य वाट्ले,
असो तुम्हाला राग आला का? तसे असेल तर मी माफी मागतो बरं का !!
मी
मी महाविद्यालयात असताना एकदा माझ्या धनश्री नावाच्या मैत्रिणीला फोन केला आणि म्हणाले, 'मी धनश्री बोलतेय'. तिने माझा आवाज ओळखला आणि म्हणाली 'अगं मी धनश्री'. पण मी परत अगदी ठासून सांगितले 'नाही, मी धनश्री बोलतेय'. शेवटी तिने मला माझे नाव घेऊन ( म्हणजे उच्चारून ) मला सांगितले मी काय गडबड केलिये तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
सहिच
सहिच फुलराणी...........गडबडीत असताना मी एकदा मैत्रिणीला फोन करुन विचारलं होतं की पूर्वा आहे का??
--------------------------------------------------------------------------------
भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!
पल्ली!
पल्ली! तुला किताब जाहीर.

माझा
माझा मोठ्ठा भाउ कॉलेजात असताना त्याचे मित्र पहिल्यांदाच घरी आहे होते. बंगल्याबाहेर वडिलांच्या नावाची पाटी वाचुन त्यांनी खात्री केली की घर बरोबर आहे. मग जोरात हाक मारली माझ्या भावाला वडलांच्या नावानी (आत्ताच वाचलेले तेच डोक्यात होते...) आम्ही आत चाट ... बाबांना नावानी हाक मारणारं कोण म्हणुन!
ओह्....पूर्व
ओह्....पूर्वा हहपुवा...
मी कॉलेज
मी कॉलेज मधे असताना केलेला वेंधळेपणा
केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल चालु होते.. टेस्ट्ट्युब मधे मी काहीतरी केमिकल गरम करत होतो..माझा पार्टनर बाकिचे साहित्य आणायला लॅब असिस्टंट कडे गेला होता..
ते गरम करत असताना माझी तंद्री एका वेगळ्याच ठिकाणी लागली होती...:फिदी:
आणि त्या नादातच मी बर्नर ची ज्योत टेस्ट्ट्युब ला लावायच्या ऐवजी बर्नरच्याच रबरी पाइप ला लावली (जिथुन गॅस बाहेर येतो :))..पाइप जळायला लागला तरी माझी तंद्री भंग पावली नाही..
तो पराक्रम माझ्या पार्टनरने लांबुन पाहिला..आणि लॅब असिस्टंट ला घेउन बोंबलत आला माझ्याकडे
तरी मि विचार करत होतो.. हा असा का पळत येतोय? काय झाले याला ?. नंतर मी खाली पहिले आणि लक्षात आले :)..पाइप जाड होती..म्हणुन पुढची दुर्घटना टळली..
त्यानंतर लॅब असिस्टंट ने मला बर्नर च्या जवळपास ही भटकु नाय दिले.
०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/
पर्वाचाच
पर्वाचाच किस्सा. २ तारखेच्या जेट लाइटच्या गोवा-मुंबई फ्लाइटचे बुकिंग केले १६ मे ला. आणि १८ ला मुंबईतून निघताना 'नीट बघून' इ-तिकिट बरोबर घेतले. २ सावंतवाडीहून गोव्याला जाणार होतो फ्लाइट पकडायला. म्हणजे प्रवासाचे २ तास आणि चेक-इन, सिक्युरिटीचे १:३०-२ तास असे धरून उशीरात उशीरा ३:३० ला निघायचं ठरलं होतं. सगळं आवरून पावणे तीनच झाले होती. बिफोर टाइम इत्यादी मुळे मी जाम खुश होते. रूम सोडायच्या आधी इ-तिकीट आता वरती काढावे अश्या विचाराने बाहेर काढले आणि लक्षात आले की गेल्या महिन्यात केलेल्या प्रवासाचे हे इ-तिकिट आहे. तेव्हा ३ वाजले होते. नशिबाने सावंतवाडीतलं नेट कॅफे माहीत होतं. तो दिवस सोमवार नव्हता (सोमवारी सा'वाडी मधे दिवे जातात). घाईघाईने पळाले नेट कॅफे कडे. पण हाय रे कर्मा. ज्या इमेल अकाउंटस वरून मी नेहमी सगळे हवाई प्रवास बुक करते त्या अकाउंटसवर जेट लाइटची मेलच सापडेना. मी हैराण. शेवटी माझा काही कोपर्यातले इमेल अकाउंटस आहेत त्यावर बघूया आहे का असा विचार केला आणि ते सगळे उघडून बघितले. नशिबाने त्यातल्या एकात मिळाला. मग प्रिंट आउट घेतला. आणि पुढे प्रवासाला सुरूवात झाली हे होईतो ३:३० वाजून गेले होते आणि माझ्या बिफोर टाइमच्या खुशीचा चक्काचूर झाला होता.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
जनरली जर
जनरली जर बेंगलोरला गेलो तर बेंगलोरहून पुण्याला येताना मी उद्यान एक्स्प्रेसने किंवा विमानाने येतो. काही महिन्यापूर्वी सगळी फॅमिली घेऊन बेंगलोरला एका लग्नाला गेलो होतो. सगळे मिळून ट्रेनने गेलो आणि परतीचं बुकिंग उद्यानचं मिळालं नाही म्हणून कुर्ला एक्स्प्रेसचं केलं होतं.
निघायच्या आदल्या दिवशी वडिलांना उद्यान मध्ये बसवून देण्यासाठी स्टेशनवर गेलो. आणि दुसर्या दिवशी सगळे जण तयार होऊन सवयीने उद्यानच्याच वेळी स्टेशनकडे निघालो. तेव्हा अगदी स्टेशनच्या जवळ गेल्यावर तिकिट काढून बघितलं आणि लक्षात आलं की कुर्ला तर दुपारीच गेली होती..
तशीच टॅक्सी परत घेऊन आलो आणि सायबर कॅफेमध्ये जाऊन दुसर्या दिवसाची किंगफिशर बुक केली.. वेंधळेपणाचा भुर्दंड, दुसरं काय?
मुलं आधीपासूनच म्हणत होती की ट्रेनने जायला नको.. आणि मुलाला थोडं बरंही नव्हतं.. त्यांची मागणी पूर्ण झाली.
नीरजाचा
नीरजाचा किस्सा वाचला आणि माझा असाच एक वेंधळेपणा आठवला. मागच्या सप्टेंबरमध्ये चेन्नइला जायचे होते. २२ सप्टेंबरला बुकिंग चेक केले आणि २४ ची सकाळची IC ची फ्लाईट बुक केली. २४ तारखेला सकाळी सहा वाजता धावत पळत सांताकृझ विमानतळावर पोहोचलो. बोर्डिंग पासच्या रांगेत उभा राहीलो.. मोठी रांग होती. जवळजवळ दहा मिनीटे उभे राहिल्यावर माझा नंबर आला आणि समोरच्या सुबकठेंगणीने माझे ई-तिकिट बघुन सुहास्य (किं येडाच दिसतोय अशा नजरेने) वदनाने मला सांगितले, सर हे तिकीट २४ ऑक्टोबरचे आहे.........
मग तिथुन पुढे तिकीट कॅन्सल करणे, नवे त्या दिवशीचे तिकीट बुक करणे आणि कॅन्सलेशनमुळे खिशाला लागलेली चाट चुकवण्यासाठी बॉसला कसल्या कसल्या टेपा लावणे इ. कार्यक्रम केले. सगळ्यात वाईट म्हणजे आधीचे तिकीत ४२५० रुपयात मिळाले होते. नव्या तिकीटासाठी साडे आठ हजार मोजावे लागले.
***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
ह्या
ह्या वेंधळेपणाचे श्रेय पल्लि ला अजिबात मिळता कामा नये.
पहिल्या प्रसंगाचे श्रेय आईंना आणि दुसर्याचे श्रेय चिमुरडीला मिळाले पाहिजे.
शिवाय श्री लिमये, आहेतच !!
पंक्चर
पंक्चर साठी चाक काढलेल्या मोटरसायकलवर बसलंय कोणी ? सॉलीड मजा येते (बघणार्यांना)
हेल्मेट घातलेले असताना पान खाउ नये
*************************************************
जे जे आपणासी ठावे.
नमस्कार,
नमस्कार,
मी माबो चा नवीन सदस्य आहे. तुमचे सर्वान्चे किस्से वाचुन खुप मज्जा आली.
आता माझ्या कडचे किस्से सांगतो.
हा किस्सा माझ्या बाबांचा:
बाबा एकदा कामावर जाताना घाई घाईत एका हतात २ घड्याळ घालुन गेले होते आणि कार्यलयात गेल्यवर त्याना हे समजल.
हा किस्सा माझ्या काकुचा:
ती एकदा रत्नगिरितुन मुंबईला रेलवेने येनार होती. घरुन निघताना घाईत ती चप्पलच घालायची विसरली.
पण ते तीला मुंबईला स्टेशनवर उतरल्यावर समजल. तेव्हा पासुन काका नेहमी बाहेर पडताना तीला चप्पल घातलीस का विचरतात.
आता माझा किस्सा:
आभियांत्रिकि college ला असताना मी प्रत्येक विषयासाठी ४-४ पानांचे वेगवेगळे bunch केले होते. आणि ते bunch एका file folder मधे घेऊन मी college ला जात असे. एके दिवशी उशीर झाल्याने मी file folder न घेताच college ला गेलो.आणि class मधे entry मारताना समजल, मग दिवस भर तसेच सर्व lectures attain केले.
ए संदीप,
ए संदीप, ईईई माफी -बिफी काय असत रे.
मला अजुन ओळखत नाहीस वाटतं तु? गटग ला ये, सगळा उलगडा कि भ्रमनिरास की काय म्हणतात ते होइल तुझं.
अच्छा
अच्छा अच्छा !! मला वाट्लं तुम्हाला राग आला की काय, मग ठीकें
चालेल गटग ला येईल तेव्हा पाहून घेईन
मी ववि चा वृत्तांत वाचला गेल्यावेळेचा या ववि ला मी पण नक्की येणार आहे !!
काल मी
काल मी भावाला तो बेडरुमच्या गॅलरीत काहीतरी काम करत असतांना घराचे मेन डोअर लॉक करुन सरळ ऑफीस ला निघून गेलो नंतर २ तासाने त्याचा ऑफीसमधे फोन आला आणी कळाले कि सोसायटीच्या वॉचमन्च्या अथक प्रयत्नांनी तो बाहेर आला
ह्या
ह्या वेंधळेपणाचे श्रेय पल्लि ला अजिबात मिळता कामा नये.
पहिल्या प्रसंगाचे श्रेय आईंना आणि दुसर्याचे श्रेय चिमुरडीला मिळाले पाहिजे.>>>>> ????? मला???
ठीक ठीक.. वेन्धळेपणाचे किस्से!!
आई
आई, तुमचा
आई,
तुमचा आय.डी. खूSSSSप छान आहे.
बारावी पास
बारावी पास झाल्यावर श्री दगडुशेट गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. बरोबर एक मित्रही होता. व्यवस्थित दर्शन झाले. बाहेर आलो रिक्षा पकडली आणि त्याला सांगितले 'चलो बारामती हॉस्टेल'. हॉस्टेलला उतरलो. रुम मध्ये शिरताना सँडल काढले आणि बघतच राहीलो ......
मी मंदीरातुन बाहेर पडताना बोलण्याच्या नादात एका पायात माझे सँडल आणि एका पायात दुसर्याच कुणाची तरी चप्पल घालुन निघालो होतो.
***********************************
आज घर कसं निटनेटकं वाटतय,
माझा संगणक बिघडलाय ना !
गिरगावात
गिरगावात असताना मी मरिन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉकला जायचे. पहाटे डोळे चोळत उठले, दात घासले, केस विंचरले व हाताला येईल तो ड्रेस चढवून निघाले. भर मरिन ड्राईव्हवर आल्यावर जवळून जाणारे मॉर्निंग वॉक वाले माझ्या पायांकडे बघत. मग मीही बघितले तर मी सलवार उलटी घातली होती
मग जवळ जवळ पावले टाकत (वर आलेली शिवण दिसू नये म्हणून) सरळ घर गाठले.
तसेच, मी छोटी असताना बाबांची लांब दांड्याची छत्री होती. जागा लहान असल्याने ते छत्री सुकण्यासाठी वरच्या दांडीला उलटी लटकवून ठेवत. दुपारी आमच्या घरगड्याने कसं कुणास ठाऊक, पोतेरं त्या छत्रीत पाडलं. दुसर्या दिवशी सकाळीच पाऊस लागल्याने बाबांनी छत्री काढली व न बघताच बंद केली व ऑफिसला निघाले. थोडं अंतर गेल्यावर त्यांनी छत्री वर धरुन उघडली तर त्यांच्या डोक्यावर पोतेरं पडलं. पहिल्यांदा ते दचकले पण मग जसे काही झालेच नाही असं दाखवत पोतेरं झटकून पुढे गेले.
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |
गेल्या
गेल्या वेळी भारतात गेलेले परत येतानाचे flight २३ तारखेचे पहाटे १.३० चे होते. मी आपली भारतात गेल्या दिवसापासून सर्वांना मी २३ ला निघणार सांगितलेले. कोणी कशाला माझे तिकिट बघतय? वास्तविक २३ ला पहाटेची flight म्हणजे २२ ला संध्याकाळी घरून निघायला हवे. मी आपली २3-२३ करत बसलेले. २२ ला संध्याकाळी online check-in करण्याकरीता site वर गेले तेव्हा एकाएकी लक्षात आलं की आपल्याला आज आत्ता निघावं लागेल. मग काय धावपळ! दुसर्या दिवशी सांगितलेली सुमो आदल्या दिवशीच हवी म्हणून फोन, बॅग्ज भरलेल्या तश्या, पण check न करता भराभर बंद करून टाकल्या. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना phones न करताच मी नी आई-बाबा धावत सुटलो .
नशिबाने सर्व ठीक झाले. इथे पोहोचल्यावर आईला फोन केला तर म्हणाली, आज दिवसभर नुस्ते तुला बाय-बाय करायला येणार्यांचे फोन attend करत्ये नी तुझ्या बावळटपणाचा किस्सा सांगत्ये. सर्वांची ह. ह. पु. वा. झाल्ये.
आता कधीही भारतात गेले की जो भेटेल तो माझं तिकिट चेक करतो.
आता ह्याला
आता ह्याला वेंधळेपणाच म्हणावे का कळत नाही.
जेंव्हा मी लिस्ट मध्ये हा धागा पाहतो तेंव्हा त्या समोर मला नंदिनीचेच नाव दिसते.
मला वाटले की नंदिनी रोजच कशी वेंधळेपणा करत असेल.
आज समजले की ते नाव धागा सुरु कर्नार्याचे आहे म्हणुन.
Share your code .. http://www.maayboli.com/node/7676
माझी रोजची
माझी रोजची सवय ऑफिस मधुन निघताना, किंवा कुठेही बाहेर जाताना खिशात मोबाईल, पाकीट वैगरे तपासुन पहातो,
एके दिवशी ऑफिस मधुन निघालो, नुकताच बस मध्ये बसलो आणि मित्राचा फोन आला. मी त्याच्याशी बोलत होतो आणि सवयी प्रमाणे खिशाला हाथ लावला तर मोबाइल हाताला नाही लागला मोबाइल खांदयाने धरुन दोन्ही हाताने खिशे चाचपले , मला वाट्ले कि मोबाइल बस मध्ये चढताना पडला कि काय?
मी त्याच फोन वरुन मित्राला सांगतोय कि"माझा मोबाइल बस मध्ये चढताना पडला वाट्तं' मित्राला काहिच समझत नव्ह्तं परत त्याने विचारले अरे कोणता मोबाइल? आणि तु बोलतोयस कशावर? तेव्हा माझ्या लक्शात आलं पण तो पर्यंत मी बस मधुन खाली उतरलो होतो
ही सगळी गोष्ट अर्ध्या मिनिटात घडली, पण नंतर आम्ही अर्धा तास हसत होतो.
मोबाइल
मोबाइल कानाल आणि खिशात शोध.... लय भारी. माझ्याच सारखा आहेस तु तर
माझ्या
माझ्या मैत्रिणीचा हा किस्सा...
अभियांत्रिकीला असतांना आम्ही आमच्या प्रॅक्टिकल फाईल मध्ये बाँड पेपर वर लिहुन ते बाँड पेपर पंच करुन लावायचो....
माझ्या मैत्रिणीने बरेचदा एका विषयाचे बाँड पेपर दुसर्या विषयाच्या फाईल मध्ये लावले आहेत...
आणि प्रोफेसर'स ची सही सुध्दा घेतली आहे....त्यांना हा घोळ कळु न देता
मला वाटले
मला वाटले की नंदिनी रोजच कशी वेंधळेपणा करत असेल>>> नंदिनी वेंधळेपणा रोजच करतेय. पण इथे लिहायच्या आधीच विसरून जाते.
एकदा चुकून माझ्याऐवजी नवर्याचे आयकार्ड घेऊन माझ्या ऑफिसला निघून आले.
त्याचे बिचार्याचे अॅक्सेस कार्ड होते ते.
--------------
नंदिनी
--------------
पल्ली, काय
पल्ली,
काय हे? तुझा किस्सा वाचला
खरंच तुझा सत्कार केला पहिजे, आता तरि ठिक आहेस कि अजुनहि गुळ आणायला जातेस?
Pages