केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात ग्रीन फार्मसीची मेडिकेटेड मेंदी मिळते केसांना लावायला. ती इथे कुणी वापरून बघितली आहे का?

मधुरीता, इफेक्ट टिकत नाही म्हणजे रंग लवकर उडतो का? किती दिवसात? जास्त फ्रिक्वेन्सीने मेंदी वापरण्यात तोटे नाहीत ना काही?

नील … केस दाट होण्यासाठी डॉ . बालाजी तांबे यांचे VILLAGE HAIR OIL वापर आणि बरोबर SAN HAIR च्या TABLETS सुद्धा वापर मस्त फायदा होतो ….जेवणात सोयाबीन ,अंडे अशी भरपूर प्रोटीन असलेल्या गोष्टी वापर फायदा होईल .

नियमीत वापरासाठी (म्हणजे शक्यतो रविवारीच. फार तर ५ दिवसांनी एकदा या फ्रिक्वेन्सीला) कोणता शाम्पू घेऊ? सुटीत वेळ असेल तेव्हा कोरफड, कडूनिंब, लिंबू, शिकेकाई वगैरेंचा घरगुती काढा-कम-कंडिशनर वापरते. न्हायच्या आदल्या रात्री घरी केलेलं औषधी तेल लावून मसाज मात्र न चुकता करते नेहमी.
सध्या वाटिका ब्लॅक शाम्पू आहे, पण जरा बदल हवाय. साधारण कुठेही मिळेल आणि अगदी स्पेशल वगैरे नसेल, लश इतका महाग नसेल असा हवाय. केसांचा सुदैवाने काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे काही केलं तरी गळतातच, पण ते बर्‍यापैकी आटोक्यात आलंय.

खूप स्ट्राँग नसलेला, टिपिकल आयुर्वेदिक नसलेला आणि जरा मंद, छान वासाने मला फ्रेश वाटेल असा शाम्पू हवा. Proud

मि ईथे नविन आहे. क्रुपया माझि विनन्ति आहे, माझे अनुवाशिक टक्क्ल पड्ले आहे उपाय सुचवा. मि आपला खुप खुप अभरि राहिल.

प्रवासात नेण्याच्या दृष्टीने कॉम्पॅक्ट असा बेसिक हेअर ड्रायर कुठल्या कंपनीचा बरा?
माझ्याकडे एक होता. जो नुकताच बंद पडला. (२५० रूपयात घेतलेला हेअर ड्रायर ३ वर्ष चालला हेच ग्रेट आहे. Wink )

माझे केस हल्ली भरपुर गळायला लागले आहेत.
मी सध्या भिमसेनी कापुर टाकलेले पॅरेशुट तेल(यात थोडे एरंडेल तेलही टाकले आहे) रविवारी सकाळी लावते.३-४ तास ठेवते.
काही दिवसांपुर्वी क्लिअर-फोर वुमन्स-ड्राय अन्ड डेमेज हेअर हा शॅम्पु वापरते.काय करु?
इथे वाचुन वेगवेगळे उपायही केले आहेत .फारसा फरक पडला नाही. Sad

पावसाळा सुरु झाल्यापासून माझ्या केसांचा तेलकट्पणा जातच नाहीये, तेल न लावता धुतले तरी कुठेतरी तेलकटपणा राहतोच आहे,काय करावे नेमक लक्षात येत नाहीये, असा प्रॉब्लेम कधी आला नाही, म्हणजे परत चार दिवसांनी केस धुतले की तेल जात होतं, जास्त शाम्पू वापरायलाही नको वाटतो, काय करता येईल?

राह,

अनुवांशिक टक्कल म्हणजे अ‍ॅन्ड्रोजेनिक अ‍ॅलोपेशिया ना?
त्यावर सहसा उपाय नसतो पण औषधे वापरुन टक्क्ल पडण्याची प्रक्रिया मंद केली जाते. यावरचे उपाय तज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.

एखादा चांगला डॉक्टर बघा.

पतंजलीचा "केशकांती" शाम्पू चांगला आहे

मीही तोच वापरते. त्यांची कपडे धुवायची पावडर, अंगाचा साबण हेही वापरतेय. कपड्यांची पावडर तर सर्फच्या २५% किमतीत आणि तरीही क्वालीटीत कुठेही सर्फ एक्सेलपेक्षा कमी नाही. बाकीच्या वस्तू वापरल्या नाहीत अजुन पण त्याही चांगल्या असाव्यात.

पतंजलीचा milk protein shampoo चांगला आहे antidantraff वापरला नाहिय...........

अविगा,
कधीकधी आपण वेग्वेग्ळे उपाय एकाचं वेळी केल्यानेही केस जास्त गळतात. मी मागे बरेचं उपाय केले आणि केस अधिकचं गळायला लागले. मग एकेक बंद करुन पाहिले :). जास्मिन तेल आणि अंडा माझ्या केसांना सुट होत नव्हते. ते बंद करताचं फरक जाणवला. मेथ्याची पेस्ट आणि aloe vera gel चा मात्र चांगला अनुभव आला. कळव.

मि उद्या उद्योग करनार आहे नारळाच्या दुधाचा..खुप केस कोरडे होतात..आनि कुनि सान्गेल का..माझ्या डोक्यात बर्याच वर्शान्पसुन पावडर सारखा कोन्डा आहे..काहि राम बान उपाय..

मि उद्या नारळाच्या दुधाचा प्रयोग करनार आहे...फार केस कोरडे होतात..आनि कुनि सान्गेल का..कोन्ड्यावर राम बान उपाय..खुप पाव्डर सारख कोन्डा होतो..फार वर्शान पास्ना आहे...फार इचिन्ग होते..

नारळाच्या दुधाचा प्रयोग मागच्या पानावर लिहला आहे. पतंजलीचा milk protein shampoo वाप रुन पहा त्याने

केस सिल्की होतिल व कोरफ ड पण लावत जा ते ही एक conditionar च आहे याने केसाचा कोर डेपणा कमी

होइल

Pages