इनस्टंट खरवस ..... (Added New Photos)

Submitted by मी मी on 27 June, 2013 - 07:46

इनस्टंट खरवस

मी मुंबईला राहत असतांना बरेचदा बर्याच हॉटेल मध्ये खरवस चाखले … अतिशय आवडू सुद्धा लागले होते …. पण इकडे परत आल्यावर परत तसली चव आपल्याला चाखता येणार नाही याची खंत टोचत होती …ऽश्यतच एकदा मैत्रीनिजवळ हे बोलून गेले … आणि तिने बेटच लावली …. 'म्हणाली अगदी तसेच किंबहुना त्याहून चवदार खर्वस आत्ता इथेच तुला दहा मिनिटात करून खायला घालणार ....त्याबदल्यात मी तिला मूवी दाखवायचा …

मी पण अगदी नाक वर करून आनंदाने बेट स्वीकारली …. खरतर त्यामागे दोन कारणे होतीच … एकतर मिळालाच तर खूप दिवसांनी खरवस खायला मिळणार आणि दुसरे हिला कसल जमतंय तसलं मुंबईच चविष्ट खरवस बनवायला …. बेट हरण्याचा प्रश्नच येत नाही ….

मग काय तिने खरच दहा मिनिटात खर्वस तयार केलं हो …. आणि ते सुद्धा अगदी तंतोतंत तसंच नाही खरतर अधिकच चवदार ….

घ्या तर मग तुम्ही सुद्धा कृती लिहून आणि या बानीवर बघाच करून ….पाहुणे वेळेवर टपकले तरीही अगदी कमी वेळात तयार होणारा हा उत्कृष्ट गोड पदार्थ …

Ingredients :-

1 टीन कंडेनस्ड मिल्क (मिल्कमेड किंवा कुठलेही)
त्याच प्रमाणात (1 टीन) तापवून रूमटेम्प्रेचर एवढ्या तापमानाच दुध
तेवढेच (1 टीन) गोड दही (मलाईचे नको, साधे पण अजिबात आंबट नसलेले)
पाव तुकडा जायफळ ची पूड (आवडत असल्यास) (विलायची वापरू नये)

कृती :-

* एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे …
* दुसऱ्या पातेल्यात दही, दुध आणि मिल्कमेड एकत्र करून हलक्या हाताने फेटून घ्यावे (मिक्सर किंवा ब्लाइन्डर चा उपयोग करू नये…. दह्याचे गडे तसेच राहू नये आणि व्यवस्थित एकजीव व्हावे एवढ्यासाठी लागेल तेवढ्याच प्रयत्नाने फेटावे)
* हे मिश्रण छोट्या पसरट भांड्यात काढून किंवा लहान लहान कपांमध्ये काढून त्या उकळत असलेल्या पाण्यांमध्ये हे भांड किंवा ती सगळी कपं ठेऊन वरून झाकण ठेवावे (झाकण उपडे ठेवावे जेणेकरून वाफेचे जमा पाणी परत त्यात सांडू नये …. मी काचेचे झाकण असलेल्या फ्रायपँन चा उपयोग करते)
* फक्त ५-७ मिनिट मध्यम आंचवर तसच होऊ द्यायचं ….
* नंतर टूथपिक टाकून चारही बाजूने शिजले असल्याची खात्री करून घ्यायची (टुथपिक आत पर्यंत टाकून बघायच... काहीही चिकटून आल नाही तर समजायचे खरवस तयार आहे)
* खरवस तयार आहे पण थंड करून खायची मजाच वेगळी म्हणून निदान अर्धा तास थंडगार करायला फ्रीज मध्ये ठेवायचे ……
* काढून त्यावर वरून (आवडत असल्यास) जायफळाची पूड पसरायची …
* खर्वस नुसत देखील खाता येत तसेच फळांच्या तुक्ड्यांसोबतहि खाता येत (आंबा, लीची, स्त्राव्बेरी, अननस इ.)

टीप ; जास्तीची साखर घालण्याची गरज नाही मिल्कमेड असल्याने खर्वस बेताचा गोड होतो
मिश्रण ओतयच्या भांड्याला तेल-तुपाचा हात लावायची गरज नाही ….
ढोकळा पात्र किंवा इडली पात्रात सुद्धा हा पदार्थ करता येतो ……

तर खर्वस करायला आता गायीच्या ताज्या चिकाची वाट बघायची गरज नाही …
अतिशय चविष्ट आणि उत्तम दर्जाचा खरवस अगदी घरीच दहा मिनिटात तयार करता येतो ….

मी यानंतर अनेकदा खर्वस स्वतः बनवून मन भरेल इतपत खाल्ला देखील आहे …. आमचा मूवी बघायचा मुहूर्त मात्र अजून काही निघेना झालाय......

1390634842081.jpg1390634841748.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झम्पी … सुजा, सोनलि... मनापासून धन्यवाद…. समजून घेतल्या बद्दल Happy

अगो …. मी बनवलेली रेसिपी फार पाणी न सुटता (नाममात्र पाणी सुटलेले जसे प्रोफेशनल खरवस ला सुटतं…. ते वर वर काढून टाकले कि झालं) अगदी तसंच तेवढंच घट्ट होतं…. फक्त सांगितलेले प्रमाण योग्य असायला हवे …. करून न बघतां तर्क लावण्यात काहीच अर्थ नाही …. असो …

मला हे प्रोफेशनल खरवस आणि मुंबईला मिळ्णारा खरवस वगैरे वाचून जाम कन्फ्युज व्हायला झालंय.

हा खरवस चीकाच्या दुधाचा खरवस जसा लागतो तसा लागतो, की अगर अगर /चायना ग्रास वगैरे वापरून बॉम्बे हलवा म्हणून एक मिठाई करतात तसा लागतो? कृती बरीचशी भाप्पा दोईसारखीच आहे, त्याची चव खरवसासारखी निश्चितच नसते.

श्राघे दिसला म्हणजे संपलं.. आता थोड्याच वेळात याचा विनोदी बाफ होणार Happy

सुरुवात माझ्यापासुन..

१. मला अजुनही चायना ग्रास हे काय प्रकरण आहे ते माहीत नाही. पण खुपसे लोक खरवस समजुन तो खातात हे पाहीले आहे.

२. खरवस असा बनवता येतो का? गायीच्या दुधाच्या चिकाची चव ह्या खरवसात कशी येते?

३. मध्यंतरी एक मेल आली होती ज्यात दुधात जिलेटीन घालुन त्याचा इन्स्टंट खरवस बनवता येतो म्हणे. कोणाला माहीत आहे का?

(जिलेटीन शरीराला हानिकारक नाहीये का?)

सारीका - जे दूध असतं त्याला चीक( आज पहिल्या दिवसाचा चीक दिला) असं म्हणतात. त्याच्या वड्या म्हणजे चीकाच्या वड्या ज्या दिसायला नारळाच्या वड्या सारख्या दिसतात त्या बरेच दिवस टिकतात.

एकदा करून बघा …. मग भोप्पा दही किंवा मिष्टी दही आणि खर्वस यापैकी कशासारखे जास्त आहे ते कळेल …. कारण मी आज पर्यंत फक्त खर्वस चाखले आहे(ते सुद्धा हॉटेल चे) आणि हे त्या सारखेच लागते … इतर पदार्थांबद्दल मी फारसे सांगू शकणार नाही

आणखी एक पनवेल जवळ एक फ़ेमस दत्त वडापाव नावाचे दुकान आहे …. इथला खरवस खूप फ़ेमस आहे …मी सांगितलेला खर्वस त्याच टेस्ट चा बनतो …. (फक्त प्रमाण तसेच असायला हवे)

मयेकर, तुम्ही लिंक दिलेला बॉम्बे हलवा नव्हे, तो कराची हलवा. माहिम हलवा बरोबरे.

मी म्हणत होते तो हा गिट्सचा बॉम्बे हलवा.. दिनेशदांची की कृती आहे त्याने जवळपास हाच हलवा तयार होतो.

मी बर्‍याचदा भप्पा दोइ बनवते तेव्हा कृती बरीचशी वरच्या कृतीसारखीच आहे. फरक असलाच तर मी फ्राय पॅनमधे न करता प्रेशर पॅनमधे भांडं ठेवून (प्रेशर न लावता) करते आणी ५-७ मिनिटे न ठेवता चांगलं १५-२० मिनिट शिजवते. पण तरी मला याची चव आणी टेक्स्चर खरवसासारखं कसं येइल हा प्रश्न पडला आहे. मुळात चीकाचं दूध असल्याने शिजवल्यावर त्याला एक थलथलीतपणा येतो. तो नेहमीच्या दुधामधे येण्यासाठी चायना ग्रास अथवा तत्सम काही वापरायला हवं ना? अन्यथा खरवसाचा तो स्पॉन्जीपणा आणि खमंगपणा कसा येइल?

तसंही हॉटेलचे खरवस हे बर्‍याचदा चायना ग्रास वापरून बनवलेले असतात, तेच मुळात चीकाच्या खरवसासारखे लागत नाहीत.

हे करून बघावंसं वाटतंय. पण माझ्याकडे दूध, दही गाईचंच असतं. ते याच प्रमाणात घ्यायचं का? त्याला मिल्क पावडर लावायला लागेल का?

ए माझा एकदम झक्क बनला गं खरवस ..धन्यु Happy
फक्त एक सांग..... मला जरा जास्त गोड झाला.......जरा कमी गोड हवा असेल तर काय करावं ?

विना साखरच आहे कृती तेव्हा साखर कमीचा प्रश्न नाही …. पुढल्या वेळी थोड दुध आणखी जास्त घालून करून बघा …. कसा होईल याची मात्र शाश्वती नाही Proud

मी शनिवारी मुद्दामहून दीड लिटर "होल टोन्ड" की कायसेसे दूध आणुन बनवला.
मिल्कमेड ऐवजी दुधाची पावडर वापरली, जेवढ्यास तेवढे मिल्कमेड नसल्याने व दुधाची पावडर कमी असल्याने दुध दह्याचे प्रमाण थोडे बदलले. दही विकतचे टीनबन्द आणले.
भरपुर साखर अन थोडी जायफळपूड टाकली. कुकरची दोन भान्ड्यात मटेरिअल घेऊन पातेल्यात पाणि घालुन आत ठेवुन वरुन ताट झाकण म्हणून ठेवले. चान्गले अर्धा तास शिजवले(?).
जो पदार्थ झाला त्याची चव बर्‍यापैकी खरवसा सारखीच होती, जायफळाने मजा आली.
पण दूध अतिशयच फाल्तु असल्याने प्रच्ण्ड प्रमाणात पाणी सुटले. अर्धा भान्ड इतक्या जाडीचे मिश्रण घातले असता एक सेन्टिमिटर जाडीचा "खरवस" बनला.
पोरान्नी दोन्ही भान्ड्यान्च्या पाण्यासहित फन्न्ना उडविला तो भाग निराळा.
मात्र ज्यास चिकापासून दुधाने वाढवित वाढवित शेवटी दूधच अपुरे पडते इतके माहित आहे, त्यास हे कैतरीच वाटेल. चिकाला पर्याय नसला तरि हे देखिल् वेळेला मस्त आहे.
धन्यवाद.

limbutimbu, तुम्ही काहितरी चुकिच केल आहे.

मी मिल्कमेड चा अर्धा टिन, तेवढेच दुध अणि दही वापरेले, तरि एक सेन्टिमिटर जाडीचा खरवस बनला.

limbutimbu मी सांगितले तेच तसेच प्रमाण घेऊन करून बघा एकदा …. दुधाची पावडर घालायची गरज नाही… फुलक्रीम दुधाची पण गरज नाही सर्वसाधारण घरात असतात तेच पदार्थ लागतात मिल्कमेड सोडता …. आणि चविष्ट खर्वस तयार होतो …

हेमाली एकदम सही!
आता तु काही बदल केले का लिही... आणि कसे उकडले तेही लिही Happy

रच्याकने हे फोटोत दाखवले तसा एक पिस झाला की जास्त. अ‍ॅज फोटोवरुन साईझचा अंदाज येत नाही

मी कुकर मधे १५ मी. वाफवला. बाकी रेसीपीत काहीच बदल नाही केला. हा फक्त फोटो पुरता एक पीस. पण एका मील्कमेड टीन पासुन ,कुकर चा एक डबा भरुन ( एक बोट जाड) खरवस झाला.

Pages