इनस्टंट खरवस ..... (Added New Photos)

Submitted by मी मी on 27 June, 2013 - 07:46

इनस्टंट खरवस

मी मुंबईला राहत असतांना बरेचदा बर्याच हॉटेल मध्ये खरवस चाखले … अतिशय आवडू सुद्धा लागले होते …. पण इकडे परत आल्यावर परत तसली चव आपल्याला चाखता येणार नाही याची खंत टोचत होती …ऽश्यतच एकदा मैत्रीनिजवळ हे बोलून गेले … आणि तिने बेटच लावली …. 'म्हणाली अगदी तसेच किंबहुना त्याहून चवदार खर्वस आत्ता इथेच तुला दहा मिनिटात करून खायला घालणार ....त्याबदल्यात मी तिला मूवी दाखवायचा …

मी पण अगदी नाक वर करून आनंदाने बेट स्वीकारली …. खरतर त्यामागे दोन कारणे होतीच … एकतर मिळालाच तर खूप दिवसांनी खरवस खायला मिळणार आणि दुसरे हिला कसल जमतंय तसलं मुंबईच चविष्ट खरवस बनवायला …. बेट हरण्याचा प्रश्नच येत नाही ….

मग काय तिने खरच दहा मिनिटात खर्वस तयार केलं हो …. आणि ते सुद्धा अगदी तंतोतंत तसंच नाही खरतर अधिकच चवदार ….

घ्या तर मग तुम्ही सुद्धा कृती लिहून आणि या बानीवर बघाच करून ….पाहुणे वेळेवर टपकले तरीही अगदी कमी वेळात तयार होणारा हा उत्कृष्ट गोड पदार्थ …

Ingredients :-

1 टीन कंडेनस्ड मिल्क (मिल्कमेड किंवा कुठलेही)
त्याच प्रमाणात (1 टीन) तापवून रूमटेम्प्रेचर एवढ्या तापमानाच दुध
तेवढेच (1 टीन) गोड दही (मलाईचे नको, साधे पण अजिबात आंबट नसलेले)
पाव तुकडा जायफळ ची पूड (आवडत असल्यास) (विलायची वापरू नये)

कृती :-

* एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे …
* दुसऱ्या पातेल्यात दही, दुध आणि मिल्कमेड एकत्र करून हलक्या हाताने फेटून घ्यावे (मिक्सर किंवा ब्लाइन्डर चा उपयोग करू नये…. दह्याचे गडे तसेच राहू नये आणि व्यवस्थित एकजीव व्हावे एवढ्यासाठी लागेल तेवढ्याच प्रयत्नाने फेटावे)
* हे मिश्रण छोट्या पसरट भांड्यात काढून किंवा लहान लहान कपांमध्ये काढून त्या उकळत असलेल्या पाण्यांमध्ये हे भांड किंवा ती सगळी कपं ठेऊन वरून झाकण ठेवावे (झाकण उपडे ठेवावे जेणेकरून वाफेचे जमा पाणी परत त्यात सांडू नये …. मी काचेचे झाकण असलेल्या फ्रायपँन चा उपयोग करते)
* फक्त ५-७ मिनिट मध्यम आंचवर तसच होऊ द्यायचं ….
* नंतर टूथपिक टाकून चारही बाजूने शिजले असल्याची खात्री करून घ्यायची (टुथपिक आत पर्यंत टाकून बघायच... काहीही चिकटून आल नाही तर समजायचे खरवस तयार आहे)
* खरवस तयार आहे पण थंड करून खायची मजाच वेगळी म्हणून निदान अर्धा तास थंडगार करायला फ्रीज मध्ये ठेवायचे ……
* काढून त्यावर वरून (आवडत असल्यास) जायफळाची पूड पसरायची …
* खर्वस नुसत देखील खाता येत तसेच फळांच्या तुक्ड्यांसोबतहि खाता येत (आंबा, लीची, स्त्राव्बेरी, अननस इ.)

टीप ; जास्तीची साखर घालण्याची गरज नाही मिल्कमेड असल्याने खर्वस बेताचा गोड होतो
मिश्रण ओतयच्या भांड्याला तेल-तुपाचा हात लावायची गरज नाही ….
ढोकळा पात्र किंवा इडली पात्रात सुद्धा हा पदार्थ करता येतो ……

तर खर्वस करायला आता गायीच्या ताज्या चिकाची वाट बघायची गरज नाही …
अतिशय चविष्ट आणि उत्तम दर्जाचा खरवस अगदी घरीच दहा मिनिटात तयार करता येतो ….

मी यानंतर अनेकदा खर्वस स्वतः बनवून मन भरेल इतपत खाल्ला देखील आहे …. आमचा मूवी बघायचा मुहूर्त मात्र अजून काही निघेना झालाय......

1390634842081.jpg1390634841748.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते चीनीमातीचे कुल्हड आहेत मी खास याच रेसिपी साठी वापरते वर सांगितलेल्या quantity मध्ये ७ कप होतात प्रत्येकाला अस सर्व करायला छान हि दिसतं. .

कुल्हडमध्ये कस केलस??>>>>>>> मिश्रण एकत्र झाले कि यात ओतून पाणी उकळत ठेवलेल्या pan मध्ये हे कप ठेऊन दिलेत वरून झाकण. मला एकावेळी दोन pan वापरावे लागलेत. हे कप direct पाण्यात न ठेवता मी खाली घडी घातलेला रुमाल ठेवला होता

मयी, माझ्याकडेपण चिनीमातीचेच कुल्हड आहेत जे तुम्ही फोटोमध्ये दिले तसेच आहेत. Happy
आयडीया खूप आवडली. नक्की ट्राय करणार. आम्हाला ताजा चीक मिळतो. त्यामूळे तो सुद्धा कुल्हडमध्ये करुन बघणार.
धन्यवाद लगेच प्रतिसाद दिल्याबद्द्ल.

मस्त दिसतोय खरब्स.. मी महालक्ष्मी सरसमधुन आणुन खाल्ला होता Happy वरच्या रेस्पीने करुन पाहेन थोड्या प्रमाणात.

चिकाचा खर्वस असाच सेम लागतो का माहिती नाही पण हॉटेलात जे काही खर्वस म्हणून विकले जाते ते सेम असेच असते. ज्यांना हॉटेल चे खर्वस आवडते त्यांना हे १००% आवडणार … इतरांनाही आवडणार फक्त ते वेगळं नाव घेऊन खाणार Wink Proud

दिविजा हे कुल्हड कप दही विर्जनासाठी सुद्धा वापरता येतील.

दिविजा मी आणले आहेत असेच. पुण्यातलं वॉलमार्ट आहे ना तिथून. अभिरूचीच्या जागी झालाय तो मॉल. नाव आठवेना आजिबात.

मयी फोटो छान आहे..

ख़ूप चांगले फोटो आले आहेत. तु खुपच क्रियेटिव आहेस Happy
माझ्या माहेरी लहानपणी दुधवाले काका यायचे, ते आणायचे खरवस. आम्ही त्यांना दुदुकाका म्हणायचो. आठवणी जाग्या झाल्या, त्याबद्दल तुझे धन्यवाद.

मयि, मे नविन आहे म.बो. वर . मला खर्वस प्रकार खुप आवद्तो..तु नविन फोटो कोनत्या पनावर ताकलेत ..क्रुपया सान्ग्शिल का? पहायला खुपच उत्त्सुक आहे मी...

आजच खऱ्या गायीच्या चिकाचा खर्वस खाल्ला … टेक्स्चर सेम, कलर सेम पण प्रामाणिक सांगते मी करते त्यापेक्षा अजिबात चविष्ट वाटला नाही.
छान होता पण भीत भीत खाल्ला खूप गरम असतो प्रकृतीला म्हणून यात तशी भीती नाही आणि चव पण मी करते तीच जास्त आवडते हे नक्की झाले

सुनिधी ग्लास नको मग त्यापेक्षा कुकर च भांड किंवा पातेलं वापरता येतं … सगळं एकत्र तयार करायचं आणि तयार झालं कि वड्या कापून घ्यायच्यात

मिल्कमेड असल्यामुळे दुध व दहि low fat घेतले तर चालेल का? कि टेक्श्चर बिघडेल?>>>>>>>low fat वगैरे वापरल्याने बिघडेल का माहिती नाही, घरी वापरतात ते साध दुध मी वापरते दही फक्त पाणी नसलेलं आणि फार आंबट नसलेलं असावं लागतं

भयंकर नालायकपणा करणारय ही पोस्ट टाकून... पण मोह आवरत नाहीये.

दुसर्‍या दिवसाचा दोन लिटर चीक मिळाला....

ही पोस्ट टाकायचा नालायकपणा करण्याआधी, दोन मैत्रिणींना त्यातला देऊन पुण्य कमावलय. गुळाचा आणि साखरेचा असे दोन्ही प्रकार करून सर्व मायबोलीकरांना नैवेद्य दाखवून (मगच) खाण्यात येतील.

सिडनीसारख्या ठिकाणी चीक मिळण्याची दुरापास्तता माहीत असल्यासच ह्या पोस्ट्मधला आनंद(??)घेता येईल.

ही पोस्ट टाकायचा नालायकपणा करण्याआधी, दोन मैत्रिणींना त्यातला देऊन पुण्य कमावलय.>> पाप करे और गंगा नहाये, टेक ईट इझी पॉलिसी... Wink एन्जोय!!! Happy

Pages