इनस्टंट खरवस ..... (Added New Photos)

Submitted by मी मी on 27 June, 2013 - 07:46

इनस्टंट खरवस

मी मुंबईला राहत असतांना बरेचदा बर्याच हॉटेल मध्ये खरवस चाखले … अतिशय आवडू सुद्धा लागले होते …. पण इकडे परत आल्यावर परत तसली चव आपल्याला चाखता येणार नाही याची खंत टोचत होती …ऽश्यतच एकदा मैत्रीनिजवळ हे बोलून गेले … आणि तिने बेटच लावली …. 'म्हणाली अगदी तसेच किंबहुना त्याहून चवदार खर्वस आत्ता इथेच तुला दहा मिनिटात करून खायला घालणार ....त्याबदल्यात मी तिला मूवी दाखवायचा …

मी पण अगदी नाक वर करून आनंदाने बेट स्वीकारली …. खरतर त्यामागे दोन कारणे होतीच … एकतर मिळालाच तर खूप दिवसांनी खरवस खायला मिळणार आणि दुसरे हिला कसल जमतंय तसलं मुंबईच चविष्ट खरवस बनवायला …. बेट हरण्याचा प्रश्नच येत नाही ….

मग काय तिने खरच दहा मिनिटात खर्वस तयार केलं हो …. आणि ते सुद्धा अगदी तंतोतंत तसंच नाही खरतर अधिकच चवदार ….

घ्या तर मग तुम्ही सुद्धा कृती लिहून आणि या बानीवर बघाच करून ….पाहुणे वेळेवर टपकले तरीही अगदी कमी वेळात तयार होणारा हा उत्कृष्ट गोड पदार्थ …

Ingredients :-

1 टीन कंडेनस्ड मिल्क (मिल्कमेड किंवा कुठलेही)
त्याच प्रमाणात (1 टीन) तापवून रूमटेम्प्रेचर एवढ्या तापमानाच दुध
तेवढेच (1 टीन) गोड दही (मलाईचे नको, साधे पण अजिबात आंबट नसलेले)
पाव तुकडा जायफळ ची पूड (आवडत असल्यास) (विलायची वापरू नये)

कृती :-

* एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे …
* दुसऱ्या पातेल्यात दही, दुध आणि मिल्कमेड एकत्र करून हलक्या हाताने फेटून घ्यावे (मिक्सर किंवा ब्लाइन्डर चा उपयोग करू नये…. दह्याचे गडे तसेच राहू नये आणि व्यवस्थित एकजीव व्हावे एवढ्यासाठी लागेल तेवढ्याच प्रयत्नाने फेटावे)
* हे मिश्रण छोट्या पसरट भांड्यात काढून किंवा लहान लहान कपांमध्ये काढून त्या उकळत असलेल्या पाण्यांमध्ये हे भांड किंवा ती सगळी कपं ठेऊन वरून झाकण ठेवावे (झाकण उपडे ठेवावे जेणेकरून वाफेचे जमा पाणी परत त्यात सांडू नये …. मी काचेचे झाकण असलेल्या फ्रायपँन चा उपयोग करते)
* फक्त ५-७ मिनिट मध्यम आंचवर तसच होऊ द्यायचं ….
* नंतर टूथपिक टाकून चारही बाजूने शिजले असल्याची खात्री करून घ्यायची (टुथपिक आत पर्यंत टाकून बघायच... काहीही चिकटून आल नाही तर समजायचे खरवस तयार आहे)
* खरवस तयार आहे पण थंड करून खायची मजाच वेगळी म्हणून निदान अर्धा तास थंडगार करायला फ्रीज मध्ये ठेवायचे ……
* काढून त्यावर वरून (आवडत असल्यास) जायफळाची पूड पसरायची …
* खर्वस नुसत देखील खाता येत तसेच फळांच्या तुक्ड्यांसोबतहि खाता येत (आंबा, लीची, स्त्राव्बेरी, अननस इ.)

टीप ; जास्तीची साखर घालण्याची गरज नाही मिल्कमेड असल्याने खर्वस बेताचा गोड होतो
मिश्रण ओतयच्या भांड्याला तेल-तुपाचा हात लावायची गरज नाही ….
ढोकळा पात्र किंवा इडली पात्रात सुद्धा हा पदार्थ करता येतो ……

तर खर्वस करायला आता गायीच्या ताज्या चिकाची वाट बघायची गरज नाही …
अतिशय चविष्ट आणि उत्तम दर्जाचा खरवस अगदी घरीच दहा मिनिटात तयार करता येतो ….

मी यानंतर अनेकदा खर्वस स्वतः बनवून मन भरेल इतपत खाल्ला देखील आहे …. आमचा मूवी बघायचा मुहूर्त मात्र अजून काही निघेना झालाय......

1390634842081.jpg1390634841748.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>बाकी झंपीबिंपी तुमची बाजू घ्यायला आलेल्या नाह>><<

स्वाती_आंबोळे,
तुम्हाला कसे कळले?

स्वतःला इतके स्पष्टीकरण देण्याची गरज का वाटली?

उगाच का बनून फिरताय? तुमचे काय खेळ व टवाळक्या चालतात कोणाही आयडीच्या मागे माहित नाही का कोणाला? कोणाही आयडीला टारगेट बनवून खेळायचे दिवसभर चालते. इथे एका आयडीला तर सतत टारगेत बनवले असते हं

आणि आज तुम्हाला का अशी सारवासारवीची वेळ यावी? अरेरे... Proud

मयी ह्याच आयडीवरून काय टवाळक्या चालल्या होत्या थोड्या दिवसांपुर्वी विसरले दिसता?

स्वतःविषयी बोला आधी.. मग दुसर्‍याचे काय चालते त्याचे कयास बांधा.. आलात मोठे शिकवायला.

मंजूडी सोडा आता. उगी नवीन नवीन काहीतरी खुसपटं नका काढू. तुमच्या कमेंटने तुम्ही तोंडावर आपटल्या आहात व्यवस्थीत. आता पब्लीक मजा घेतंय. त्यांची करमणूक चालू ठेवायची की वेळेत आवरतं घ्यायचं ते तुम्हीच ठरवा.

मयी ह्याच आयडी वरून >>>>>>>> अरे देवा …… मी अगदी ओरीजनल आणि एकमेव आहे … आणि नवीन सुद्धा …. कृपया माझावर असले काही आरोप बिरोप लावू नका …. मी असल्या फंदात राहत नाही …. माझा संबंध फक्त लिखाणाशी आहे ….

कशाला वाद नी विवाद? जमेल तेव्हा आणि जमलं तर आपापला गुप्चुप करुन खा नी खायला घाला 'खरवस' आणि मज्जा करा. कोण कायका बोलेना. Proud

मयी,
अहो मी काही म्हणत नाही तुमच्याविषयी.
ह्या आता आलेल्या ना स्वाती_आंबोळे त्या काय करतात दुसर्‍या बीबीवर त्या विषयी लिहिलेय.

ह्या इतर आयडींविषयी हि आयडी का ती आयडी खेळ खेळतात. कोणाही आयडीला पकडून त्याच्या मगे उगीच त्याची टेर खेचतात.
तसेच तुमच्या एका लेखावरून त्यांच्या टवाळक्या चाललेल्या . तो नेहमीचा भाग आहे दिवस घालवायचा त्यांचा..
आणि आज त्याच सांगताहेत असे करू नका, तसे करू नका तुम्हाला. हास्यास्पद आहे नाही का?

मागे काय चालतं मला ह्याच्याशी काही घेण देन नाही … मला इथला काहीही इतिहास माहिती नाही …. मी या धाग्यापुरता विचार करते …. या एकाच धाग्यावर मला दोनदा कोंडीत धरले गेले … का मला माहिती नाही …. माझा खरा उद्देश जाणून न घेणारे होतेच आणि जाणून घेणारे सुद्धा आहेत मला त्यांचा आदर असणारच …… मला जे स्पष्ट दिसतंय तेच माझ्यासाठी सत्य …. बाकी तुमचे हिशेब तुम्ही बघा ….

>>बाकी तुमचे हिशेब तुम्ही बघ>><<

नक्कीच. मलाही काहीही सुरुवात न्हवतीच करायची(मी केली सुद्धा न्हवती). सुरुवातीला फोटो टाकण्यावरून केलेला कल्लोळाला उत्तर म्हणून लिहिले.
व नंतर खरवस नावावरून घातलेला गोंधळ...

तुमचा गैरसमज झाला असेल तर माफी.

मग आल्या स्वाती बाई.. स्कोअर चे गणित घेवून... Rofl

झम्पी …. मी लिहिलंय वर …. मी फक्त या धाग्याचा विचार करतेय यावर मला समजून न घेनार्यांपेक्षा समजून घेणारे आलेत आणि मला त्यांचा आदर वाटणारच …. या धाग्य व्यतिरिक्त पुढे मागे काय असेल ह्याचा विचार मी का करावा … ज्याचा त्याने करावा …. नाही का ?

मयी डिअर, तू नागपुरी और मै भी नागपुरी. म्हणून तुला चार हिताच्या गोष्टी सांगते. त्या तुला माबोवर अन अन्यत्रही उपयोगी पडतील. माबोसारख्या साइट्सवर तुला लोक दिसत नाहीत अन लोकांना तू दिसत नाहीस. शिवाय तू नविन असल्याने कधी तू गंमत करतेय याचा लोकांना अंदाज येत नाही. शिवाय इथे आपला कॅज्युअल नागपूरी मजाक चालत नाही. यु नीड टु बी पोलिटिकली करेक्ट ऑल्वेज. लोक एकदम सिरिअसली घेऊ लागतात अन मग भावना-बिवना दुखावतात. कॅज्युअल/गंमतीतल्या कमेंटमुळे ज्याच्या भावना दुखावतात तो प्रतिसाद देताना समोरच्याच्या भावनांचा मात्र विचार करताना दिसत नाही.
कांगावा, अपमान, एवढ्या-तेवढ्यावरुन भावना दुखावणे हे सर्व चालायचंच. Wink
बाकी हा पदार्थ खरवसा सारखा लागणार नाही, याविषयी मी इथे अनेकांशी सहमत आहे. भाप्पा दोईसारखा लागेल बहुतेक.

नताशा …… मनापासून धन्यवाद …. पण पोलिटिकली करेक्ट बिरेक्ट मला कळत नाही ग … माझं आपलं साधं सरळ काम …. जिथे जे योग्य वाटलं वागलं …. आणि राहिला प्रश्न मस्करीचा तर मी नाही सुरु करत उगाच मस्करी … त्यांच्याच ओघात स्वतःला सामील करण्याचा प्रयत्न तेवढा करते …. आणि उगा ह्याला काय वाटतंय तो काय म्हणेल म्हणून स्वतःला चेंज करणं मला फारसं जमलं नाही आजपर्यंत …. तुझी कळकळ मात्र कळाली …. आणि खूप बर वाटलं भेटून Happy Happy

आज परत केला , परवा जरा आंबट झाल्यानं आज थोडं प्रमाण बदललं.

३/४ वाटी कंडेन्स्ड मिल्क + १/४ वाटी इव्हॅपोरेटेड मिल्क + १ वाटी दूध ( कच्चं ) + ३/४ वाटी दही + केशर + जायफळ + वेलदोडा

मस्त झाला, अगर अगर घालून केलेल्या व्हर्जन पेक्षा मला हा जास्त आवडला.

मी पण केला. कृतीत थोडा बदल केला.
साध्या दुधाऐवजी एव्हॅपोरेटेड मिल्कचा १ छोटा कॅन. ही अ‍ॅडिशन दिनेशदांच्या भाप्पा दोई रेसिपीतून घेतली.
दही नॉन फॅट ग्रीक योगर्ट वापरलं.
चव अजून घेतली नाही. फ्रीज मध्ये थंड करत ठेवलं आहे.
Fake Kharwas.jpg

चव ठीक होती. दही किंचित आंबट होतं असं खाताना लक्षात आलं.
मला तरी माझ्या आठवणीतल्या खरव्सासार्खा नाही लागला पण सध्या आई बाबा इथे आहेत. बाबांना अगदीच खरवसासारखा लागला म्हणाले. एकाच घरात एकच पदार्थ खाउन दोघांची मतभिन्नता लक्षात घेता, इथे जे रणकंदन माजलं ते काहीच नाही असच म्हणावं लागेल Happy

मी पुन्हा करीन असं वाटत नाही. पुढच्या खेपेस अगार अगार घलून करीन.

, पण त्याला खरवस म्हणणे कुठल्याच चिकपावन माणसाला पटणार नाही.????>>>

ह्या गोंधळात जीएसची ही कोटी वाया नका घालवु लोकहो. Happy

जीएस मस्त शब्द आहे तो. Lol

पण त्याला खरवस म्हणणे कुठल्याच चिकपावन माणसाला पटणार नाही>>> Lol

भाप्पा दोईच आहे हे. Happy

एकाच घरात एकच पदार्थ खाउन दोघांची मतभिन्नता लक्षात घेता, इथे जे रणकंदन माजलं ते काहीच नाही असच म्हणावं लागेल >> Lol

पाककृतीसाठी धन्यवाद मयी.

Pages