इनस्टंट खरवस ..... (Added New Photos)

Submitted by मी मी on 27 June, 2013 - 07:46

इनस्टंट खरवस

मी मुंबईला राहत असतांना बरेचदा बर्याच हॉटेल मध्ये खरवस चाखले … अतिशय आवडू सुद्धा लागले होते …. पण इकडे परत आल्यावर परत तसली चव आपल्याला चाखता येणार नाही याची खंत टोचत होती …ऽश्यतच एकदा मैत्रीनिजवळ हे बोलून गेले … आणि तिने बेटच लावली …. 'म्हणाली अगदी तसेच किंबहुना त्याहून चवदार खर्वस आत्ता इथेच तुला दहा मिनिटात करून खायला घालणार ....त्याबदल्यात मी तिला मूवी दाखवायचा …

मी पण अगदी नाक वर करून आनंदाने बेट स्वीकारली …. खरतर त्यामागे दोन कारणे होतीच … एकतर मिळालाच तर खूप दिवसांनी खरवस खायला मिळणार आणि दुसरे हिला कसल जमतंय तसलं मुंबईच चविष्ट खरवस बनवायला …. बेट हरण्याचा प्रश्नच येत नाही ….

मग काय तिने खरच दहा मिनिटात खर्वस तयार केलं हो …. आणि ते सुद्धा अगदी तंतोतंत तसंच नाही खरतर अधिकच चवदार ….

घ्या तर मग तुम्ही सुद्धा कृती लिहून आणि या बानीवर बघाच करून ….पाहुणे वेळेवर टपकले तरीही अगदी कमी वेळात तयार होणारा हा उत्कृष्ट गोड पदार्थ …

Ingredients :-

1 टीन कंडेनस्ड मिल्क (मिल्कमेड किंवा कुठलेही)
त्याच प्रमाणात (1 टीन) तापवून रूमटेम्प्रेचर एवढ्या तापमानाच दुध
तेवढेच (1 टीन) गोड दही (मलाईचे नको, साधे पण अजिबात आंबट नसलेले)
पाव तुकडा जायफळ ची पूड (आवडत असल्यास) (विलायची वापरू नये)

कृती :-

* एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे …
* दुसऱ्या पातेल्यात दही, दुध आणि मिल्कमेड एकत्र करून हलक्या हाताने फेटून घ्यावे (मिक्सर किंवा ब्लाइन्डर चा उपयोग करू नये…. दह्याचे गडे तसेच राहू नये आणि व्यवस्थित एकजीव व्हावे एवढ्यासाठी लागेल तेवढ्याच प्रयत्नाने फेटावे)
* हे मिश्रण छोट्या पसरट भांड्यात काढून किंवा लहान लहान कपांमध्ये काढून त्या उकळत असलेल्या पाण्यांमध्ये हे भांड किंवा ती सगळी कपं ठेऊन वरून झाकण ठेवावे (झाकण उपडे ठेवावे जेणेकरून वाफेचे जमा पाणी परत त्यात सांडू नये …. मी काचेचे झाकण असलेल्या फ्रायपँन चा उपयोग करते)
* फक्त ५-७ मिनिट मध्यम आंचवर तसच होऊ द्यायचं ….
* नंतर टूथपिक टाकून चारही बाजूने शिजले असल्याची खात्री करून घ्यायची (टुथपिक आत पर्यंत टाकून बघायच... काहीही चिकटून आल नाही तर समजायचे खरवस तयार आहे)
* खरवस तयार आहे पण थंड करून खायची मजाच वेगळी म्हणून निदान अर्धा तास थंडगार करायला फ्रीज मध्ये ठेवायचे ……
* काढून त्यावर वरून (आवडत असल्यास) जायफळाची पूड पसरायची …
* खर्वस नुसत देखील खाता येत तसेच फळांच्या तुक्ड्यांसोबतहि खाता येत (आंबा, लीची, स्त्राव्बेरी, अननस इ.)

टीप ; जास्तीची साखर घालण्याची गरज नाही मिल्कमेड असल्याने खर्वस बेताचा गोड होतो
मिश्रण ओतयच्या भांड्याला तेल-तुपाचा हात लावायची गरज नाही ….
ढोकळा पात्र किंवा इडली पात्रात सुद्धा हा पदार्थ करता येतो ……

तर खर्वस करायला आता गायीच्या ताज्या चिकाची वाट बघायची गरज नाही …
अतिशय चविष्ट आणि उत्तम दर्जाचा खरवस अगदी घरीच दहा मिनिटात तयार करता येतो ….

मी यानंतर अनेकदा खर्वस स्वतः बनवून मन भरेल इतपत खाल्ला देखील आहे …. आमचा मूवी बघायचा मुहूर्त मात्र अजून काही निघेना झालाय......

1390634842081.jpg1390634841748.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा अजून एक फीडबॅक द्यायला विसरले. मझ्या मते गोड पदार्थ, बाबांच्या मते अगदी खरवसासारखाच तर नवर्‍याच्या मते चीजकेकच्या जवळ जाणारी चव Uhoh

मझ्या मते गोड पदार्थ, बाबांच्या मते अगदी खरवसासारखाच तर नवर्‍याच्या मते चीजकेकच्या जवळ जाणारी चव >>> Solution jo mile to saa*a, Question kya tha pata nahin ... आल इज वेल.... Happy
करुन नक्की बघेन! पण काय म्हणून करु हा प्रश्न आहे आता Wink

इथे नॉर्थ अमेरिकेत कोलॉस्ट्रुम पावडर मिळते, तिचा खरवस कोणि करुन पाहिला आहे का. कदाचित एक अजुन ऑप्शन म्हणुन ट्राय करता येईल.

हा इन्स्टंट खरवस म्हणजे मलईबर्फी आणि सोप्पं कॅरॅमल पुडिंगला जोरदार टशन आहे!

मयी, कृपया शब्दखुणांमध्ये

दुधाचा प्रकार, गोड प्रकार, दह्याचा प्रकार, डेझर्ट, मिल्कमेड, चीक

हे देखिल घाला. ही वरची ओळ अशीच कॉपी पेस्ट करून तिथे टाकता येईल.

इथे नॉर्थ अमेरिकेत कोलॉस्ट्रुम पावडर मिळते, तिचा खरवस कोणि करुन पाहिला आहे का.>>मी केला नाही पण मैत्रिणीने केला होता. फारच बंडल लागला चवीला....त्यापेक्षा हे मिल्क पुडिंग जास्त चविष्ट झाले होते.

इतक्यांनी लिहिलय तर माझेही २ पैसे.
केला. आजच केला... हा पदार्थं. मी खाल्लेल्या खरवसासारखा लागत नाहीये. टेक्श्चरही वेगळं आहे. पण एक वेगळा गोड पदार्थं म्हणून चांगलाय.

मिष्टी दोई (दही) - हा बोंगाली पदार्थं आंबट दह्याचा(च) खाल्लाय. चवीला नाही पण टेक्श्चरला त्याच्यासारखाच लागला हा पदार्थं.
कोलेस्ट्रम (चीक) विकायला बंदी आहे ऑस्ट्रेलियात. पण माझे एक विद्यार्थी ह्यांनी (आदरार्थी एकवचनी)... "डेअरी चा धंदा आहे... तुम्ही करता का ते स्वीट? ... मग देतो आणून थोडासा..."
म्हणून वीस लिटरचे दोन कॅन्स आणून दिले होते. पहिल्या-दुसर्‍या दिवसाचा चीक.
टोटल वेडेपणा त्यानंतर. आम्हीच काय पण आमचे अनेक मित्रही अजून आठवण काढतात त्यांची. शोधून शोधून पदार्थ केले होते. आई होती इथे तेव्हा... तिला फक्तं वेड लागायचं बाकी होतं... "काय गो ह्या... मुंबईत भैय्याक हाता-पाया पडुचे लागतात... तिसर्‍या दिवसाचो मेळ्ळो तरी पावला म्हणुचा" हा श्लोक ती रोज एकदातरी म्हणत होती... बरेच दिवस.

असो... फारच अवांतर झालं.

म्हणून वीस लिटरचे दोन कॅन्स आणून दिले होते. पहिल्या-दुसर्‍या दिवसाचा चीक.>>> देनेवाला जब भी देता देता छप्पर फाड के... Happy

इथे अमेरीकेत मिळायचे कोल्स्ट्रम पण मध्येच बंदी आणली.. त्या दिवसात अगदी दर दोन आठवड्याला अगदी खूप ड्राईव करून जायचो. आत त्या फार्मवरच केस चालू आहे.... .

दादच्या पोस्ट नंतर ते सर्व आठवले व एकदम दु:ख झाले की हाये दिन गेले ते...

वरच्या पद्धतीने करून खाल्लाय तसा.

म्हणून वीस लिटरचे दोन कॅन्स आणून दिले होते. पहिल्या-दुसर्‍या दिवसाचा चीक.>>> जीव तळमळला
इथे पुण्यात लिटर भर सुद्धा मिळत नाही.
अवांतर - पुण्यात कुठे चिक मिळत असेल तर लिहा हो

म्रुणाल,
अरण्येश्वरला (सहकारनगर)आमचा दूधवाला आहे, त्याच्याकडे मिळतो. मी मागच्याच आठवड्यात खरवस करुन खाल्ला.
अंतर जमण्यासारखे असेल, तर मला विपू करा, मी नंबर देईन.

म्हणून वीस लिटरचे दोन कॅन्स आणून दिले होते. पहिल्या-दुसर्‍या दिवसाचा चीक.>>> हाय दाद!!! जीव कासाविस झाला गं हे वाचून... आमच्या गावची गाय व्याली की आठवणीने माझ्यासाठी चीक येतो. पण तोही गावाकडनं कुणी येणारं असेल तर माझ्यापर्यंत पोचतो. मागच्या कालवडीचा चीक माझापर्यंत पोचलाच नाही. Sad अस्सल खरवस आता कधी चाखायला मिळणारे देव जाणे!

खरवस डोंबिवली,ठाण्यात विकत मिळतो पण जास्त करून साखरेचा असतो. आम्हाला गुळाचा जास्त आवडतो. नवऱ्याच्या नोकरीनिमित्याने श्रीरामपूर (नगर जिल्हा) येथे असताना आमचा दूधवाला चिक आणून द्यायचा तेव्हा मस्त गुळाचा खरवस घरी करायाची आणि कधी कोकणात गावी गेल्यावर मिळायचा गुळाचा खरवस.

इथे अमेरीकेत मिळायचे कोल्स्ट्रम पण मध्येच बंदी आणली.. त्या दिवसात अगदी दर दोन आठवड्याला अगदी खूप ड्राईव करून जायचो. आत त्या फार्मवरच केस चालू आहे.... . >>>organic pastures का? मी पण केला आहे त्यांचा ट्राय.पण आता नाहि मिळत.

200!

मृणाल१, पुण्यात साने डेअरीत चीक, तयार खरवस (गुळाचा) असे दोन्ही बर्‍याचदा मिळते. (कोथरुड, डेक्कन). विशाल दुग्धालय - बाजीराव रोडलगत, लोणीविके दामले आळी - तिथेही नियमित चीक मिळायचा. डेअरीवाल्यांकडे मिळू शकतो चीक, नाहीतर मग जवळपास कोठे गोठा असेल तर गोठेमालकाला विचारायचे.

शुक्रवार पेठेत बाजीराव रोडकडून मंडईत जाताना गोरवडेकडे जन्मभर फ्रोजन चीक मिळतो. मस्त होतो खरवस त्याचा.

दुकानात मिळणारे खरवस मला तरी बंडल वाटतात..भेसळीचे व साखर टाकलेले..

.

दुसरे म्हणजे ह्यांच्या(दुकानांतल्यांच्या गाई, म्हशी) गाई काय कायम व्यालेल्या असतात का? (हा कायम प्रश्ण मला पडतो) Proud

Pages