इनस्टंट खरवस
मी मुंबईला राहत असतांना बरेचदा बर्याच हॉटेल मध्ये खरवस चाखले … अतिशय आवडू सुद्धा लागले होते …. पण इकडे परत आल्यावर परत तसली चव आपल्याला चाखता येणार नाही याची खंत टोचत होती …ऽश्यतच एकदा मैत्रीनिजवळ हे बोलून गेले … आणि तिने बेटच लावली …. 'म्हणाली अगदी तसेच किंबहुना त्याहून चवदार खर्वस आत्ता इथेच तुला दहा मिनिटात करून खायला घालणार ....त्याबदल्यात मी तिला मूवी दाखवायचा …
मी पण अगदी नाक वर करून आनंदाने बेट स्वीकारली …. खरतर त्यामागे दोन कारणे होतीच … एकतर मिळालाच तर खूप दिवसांनी खरवस खायला मिळणार आणि दुसरे हिला कसल जमतंय तसलं मुंबईच चविष्ट खरवस बनवायला …. बेट हरण्याचा प्रश्नच येत नाही ….
मग काय तिने खरच दहा मिनिटात खर्वस तयार केलं हो …. आणि ते सुद्धा अगदी तंतोतंत तसंच नाही खरतर अधिकच चवदार ….
घ्या तर मग तुम्ही सुद्धा कृती लिहून आणि या बानीवर बघाच करून ….पाहुणे वेळेवर टपकले तरीही अगदी कमी वेळात तयार होणारा हा उत्कृष्ट गोड पदार्थ …
Ingredients :-
1 टीन कंडेनस्ड मिल्क (मिल्कमेड किंवा कुठलेही)
त्याच प्रमाणात (1 टीन) तापवून रूमटेम्प्रेचर एवढ्या तापमानाच दुध
तेवढेच (1 टीन) गोड दही (मलाईचे नको, साधे पण अजिबात आंबट नसलेले)
पाव तुकडा जायफळ ची पूड (आवडत असल्यास) (विलायची वापरू नये)
कृती :-
* एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे …
* दुसऱ्या पातेल्यात दही, दुध आणि मिल्कमेड एकत्र करून हलक्या हाताने फेटून घ्यावे (मिक्सर किंवा ब्लाइन्डर चा उपयोग करू नये…. दह्याचे गडे तसेच राहू नये आणि व्यवस्थित एकजीव व्हावे एवढ्यासाठी लागेल तेवढ्याच प्रयत्नाने फेटावे)
* हे मिश्रण छोट्या पसरट भांड्यात काढून किंवा लहान लहान कपांमध्ये काढून त्या उकळत असलेल्या पाण्यांमध्ये हे भांड किंवा ती सगळी कपं ठेऊन वरून झाकण ठेवावे (झाकण उपडे ठेवावे जेणेकरून वाफेचे जमा पाणी परत त्यात सांडू नये …. मी काचेचे झाकण असलेल्या फ्रायपँन चा उपयोग करते)
* फक्त ५-७ मिनिट मध्यम आंचवर तसच होऊ द्यायचं ….
* नंतर टूथपिक टाकून चारही बाजूने शिजले असल्याची खात्री करून घ्यायची (टुथपिक आत पर्यंत टाकून बघायच... काहीही चिकटून आल नाही तर समजायचे खरवस तयार आहे)
* खरवस तयार आहे पण थंड करून खायची मजाच वेगळी म्हणून निदान अर्धा तास थंडगार करायला फ्रीज मध्ये ठेवायचे ……
* काढून त्यावर वरून (आवडत असल्यास) जायफळाची पूड पसरायची …
* खर्वस नुसत देखील खाता येत तसेच फळांच्या तुक्ड्यांसोबतहि खाता येत (आंबा, लीची, स्त्राव्बेरी, अननस इ.)
टीप ; जास्तीची साखर घालण्याची गरज नाही मिल्कमेड असल्याने खर्वस बेताचा गोड होतो
मिश्रण ओतयच्या भांड्याला तेल-तुपाचा हात लावायची गरज नाही ….
ढोकळा पात्र किंवा इडली पात्रात सुद्धा हा पदार्थ करता येतो ……
तर खर्वस करायला आता गायीच्या ताज्या चिकाची वाट बघायची गरज नाही …
अतिशय चविष्ट आणि उत्तम दर्जाचा खरवस अगदी घरीच दहा मिनिटात तयार करता येतो ….
मी यानंतर अनेकदा खर्वस स्वतः बनवून मन भरेल इतपत खाल्ला देखील आहे …. आमचा मूवी बघायचा मुहूर्त मात्र अजून काही निघेना झालाय......
झकास्स्स
झकास्स्स
मस्त्....जरा मोठा पिस टाका
मस्त्....जरा मोठा पिस टाका की. एवढ्या लोकांना बघायला पुरायला नको का ?
मयी आज केला हा खरवस ...मस्त
मयी आज केला हा खरवस ...मस्त झाला. आयुश्यात कधि वतले नव्ह्ते कि मी खरवस घरी बनविन.... मस्त झालाय. धन्यवाद.
माझा खरवस जरा आंबट झाला,
माझा खरवस जरा आंबट झाला, बहुतेक दही आंबट होतं जास्त. पण एंड प्रॉडक्ट अतिशय चविष्ट झालं होतं.
एका वाटीचाच केला.
मयि, धन्यवाद.
परत करेन उद्या परवा
इतकं सोप्प आहे कि करायला
इतकं सोप्प आहे कि करायला कंटाळा येत नाही … आता तर दुध दही घरी असले कि मी लगेच मिल्कमेड मागवून घेते आणि दहा मिनिटात खरवस तयार …दोन दिवस बघावं लागत नाही …. आणि जे जे चाखून जातात ते ते कृती विचारून जातात …. मज्जा असते

मयी..मी त्यावर केशर घातलं
मयी..मी त्यावर केशर घातलं .....इतका सुरेख पिवळा रंग आला ना.... !!
खरवस प्रचंड आवडतो. म्हणून आज
खरवस प्रचंड आवडतो. म्हणून आज मुद्दाम करून पाहिला.
चवीला बरे लागत होते. किंचित आंबट लागले.
पण खरं सांगू? खरवसाची चव नाही आली. मी खरवसात गूळ घालते म्हणून असेल का....माहिती नाही.
पण खरवस खाल्ल्यासारखे वाटले नाही.
मी करून बघितला हेच प्रमाण
मी करून बघितला हेच प्रमाण घेऊन १ टीन मिल्कमेडचा.
५ -७ मिनिटात काहीच झालं नाही ... चांगलं १५ - २० मिनिटं तरी शिजवावं लागलं. चव आंबट नाही, पण अस्सल खरवसापेक्षा जरा वेगळी लागली (मी हॉटेलचा कधी खाल्लेला नाही.) मला चीकाचा खरवस खूप आवडतो पण खाल्ल्याने त्रास होतो ... त्या दृष्टीने हा पर्याय छान आहे.
मी करून पाहिला. चव आणि
मी करून पाहिला. चव आणि टेक्स्चर खरवसासारखे नाही वाटले. पण छान होती चव. देशात मलई बर्फी मिळते तसे वाटले.
१००वा प्रतिसाद. मी केलं हे
१००वा प्रतिसाद.
मी केलं हे वीकेन्डला. 'एक गोड पदार्थ' इतकंच म्हणता येईल. चव आणि टेक्श्चर ठीकठाक.
पण हा पदार्थ आणि चिकाचा खरवस यांत सलीना जेटली आणि अमिताभ बच्चन यांच्यात असेल तितकंच साम्य आहे.
स्वाती, सलिना कोणती आणी
स्वाती, सलिना कोणती आणी अमिताभ कोणता ते सांग आता.
हा गोड पदार्थ मी नक्की करून बघणार आहे.
शूम्पी, इस सवाल से साफ जाहिर
शूम्पी, इस सवाल से साफ जाहिर है कि तुमने कभी चिकाका खरवस नहीं खाया!

फिर खुश तो बहुत होगी तुम ये पदार्थ खाकर!
सध्या गोठा सापडत नाही..
सध्या गोठा सापडत नाही..
आमच्या सौ. रॉक्स ने करुन पाहिला.. चवीला छान ! पण चिकाचा खरवस .. वो बात ही कुछ और है
नही.... भगवान के लिये ऐसा मत
नही.... भगवान के लिये ऐसा मत कहो. चीक का खरवस खाते ही मै पली बढी हू. वो तो मैने उनके लिये पूछा जिन्हे नही पता.
लेकीन एक बात है, कौनसाभी गोड पदार्थ खाके हम खुष हो ही जाते है!
चिक बिक का खरवस वाली वो
चिक बिक का खरवस वाली वो तुम्हारे जमाने ची बाते अब जुनी हो गयी ….:D हमरे जमाने मे काहेका अच्छा दुध अन काहेका अच्छा चिक …. हमने चिक का वड्या … खरवस बिरवस हॉटेल मे हि सुन्या और उधर हि खाया …. ये उसके जैसैच लग्या …. इसलिये यैच हमरा खरवस …. तुम खरवस समज के खाओ नाहीतर नर्वस होकार खाओ …. खाओ बस ,…. मज्जा करो

पण हा पदार्थ आणि चिकाचा खरवस
पण हा पदार्थ आणि चिकाचा खरवस यांत सलीना जेटली आणि अमिताभ बच्चन यांच्यात असेल तितकंच साम्य आहे. >>>>
तोच विचार करत होतो इतके दिवस. आम्ही आणी आमचे बापजादे चु*च म्हणायचे की काय, जे चिकाच्या खरवसासाठी जीव टाकायचे.
चिक बिक का खरवस वाली वो तुम्हारे जमाने ची बाते अब जुनी हो गयी ….हाहा हमरे जमाने मे काहेका अच्छा दुध अन काहेका अच्छा चिक …. हमने चिक का वड्या … खरवस बिरवस हॉटेल मे हि सुन्या और उधर हि खाया >>> आवराच.
चिक बिक का खरवस वाली वो
चिक बिक का खरवस वाली वो तुम्हारे जमाने ची बाते अब जुनी हो गयी >> खरंच आवराच!
परवाच चांगला अर्धा किलो
परवाच चांगला अर्धा किलो गुळाचा आणि अर्धा किलो साखरेचा, चिकाचा खरवस साधारण कोकणस्थाकडे गणपती ठेवतात तितक्या वेळात संपवलाय ३ जणांत.
पर्या
पर्या
खरवसाची काँटीटी पण तेवढीच
खरवसाची काँटीटी पण तेवढीच होती का कोकणस्थांचा गणपती जितके दिवस ठेवतात तेवढी? फक्त चमचा का वाटी हा प्रश्ण आहे. आणि खाताना चमचा वापरला का बोट? कारण लवकर संपला म्हणजे ...
जे लोकं खरवस समजून खायला बोट
जे लोकं खरवस समजून खायला बोट वापरतात ते खरवस फ्लेवर्ड श्रीखंड असावे बहुतेक
गोष्ट कोकणस्थब्रांची चाललीय,
गोष्ट कोकणस्थब्रांची चाललीय, ते श्रीखंड, खरवस म्हणून खपवू शकतील काय सांगता येत नाही आणि हातावर काय बोटाने पण सांगतील खायला... शेवटी भांडी धुवायला साबणाचा खर्च कशाला म्हणून....
काही खरे नाही.
चिक बिक का खरवस वाली वो
चिक बिक का खरवस वाली वो तुम्हारे जमाने ची बाते अब जुनी हो गयी ….हाहा हमरे जमाने मे काहेका अच्छा दुध अन काहेका अच्छा चिक …. हमने चिक का वड्या … खरवस बिरवस हॉटेल मे हि सुन्या और उधर हि खाया >>>
या पदार्थाला 'खरवस' म्हणून खरवसाचा अपमान करू नका.
आणि खाताना चमचा वापरला का बोट?>>> खरवस खायला बोट??
देवा, खरवसाचा अपमान करणार्या या सर्वांना माफ कर.
खरवस बिरवस हॉटेल मे हि सुन्या
खरवस बिरवस हॉटेल मे हि सुन्या और उधर हि खाया …. ये उसके जैसैच लग्या …. इसलिये यैच हमरा खरवस >>>

लगता है उस हॉटेलवाल्याने गंडव्याच आपको.
पदार्थाला 'खरवस' म्हणून
पदार्थाला 'खरवस' म्हणून खरवसाचा अपमान करू नका.
> मी पहिल्याच पानवर लिहिलय. वरील कृती खरवसाची नाही. खरवसाचे टेक्स्चर आणि खमंगपण येणार नाही. होटेलमधे मिळतो तो खरवस चायना ग्रास वापरूनच केलेला असतो. तोच मुळात चीकाच्या खरवसासारखा लागत नाही. हा वरील पदार्थ भप्पा दोईसारखाच लागेल.
वरील पदार्थ भप्पा दोईसारखाच
वरील पदार्थ भप्पा दोईसारखाच लागेल. >>> माझ्याकडच्या पुस्तकात भप्पा दोई नावाने आहे. मी केला तेव्हा घरात फक्त खरवस न आवडणार्या माझ्या लेकाला हा पदार्थ आवडला. आणि अख्खा मिल्कमेडचा डबा यात ओतला म्हटल्यावर बाकीच्यांकडुन मला तुच्छ लुक दिला गेला. [ नेहमी मिल्कमेडचा डबा उघडला की एका दिवसात फस्त होतो. ] फ्रीजमधे पदार्थ २ दिवस लोळत.. शेवटी काल संपला एकदाचा. बहुदा मी वापरलेले दही किंचित आंबट असेल
ज्यांना करायचा आहे त्यांनी दही अजीबात आंबट नाही याची खात्री करुनच करा.
विकतच दही वापरलं तर जमेल का?
विकतच दही वापरलं तर जमेल का?
खर्या चिकाच्या खरवसाबद्दल
खर्या चिकाच्या खरवसाबद्दल ज्या ज्या लोकांनी लिहीलेय त्या सर्वांना जियो!! एवढेच बोलावेसे वाटले इकडे.
पण हा पदार्थ आणि चिकाचा खरवस
पण हा पदार्थ आणि चिकाचा खरवस यांत सलीना जेटली आणि अमिताभ बच्चन यांच्यात असेल तितकंच साम्य आहे.
Pages