इनस्टंट खरवस ..... (Added New Photos)

Submitted by मी मी on 27 June, 2013 - 07:46

इनस्टंट खरवस

मी मुंबईला राहत असतांना बरेचदा बर्याच हॉटेल मध्ये खरवस चाखले … अतिशय आवडू सुद्धा लागले होते …. पण इकडे परत आल्यावर परत तसली चव आपल्याला चाखता येणार नाही याची खंत टोचत होती …ऽश्यतच एकदा मैत्रीनिजवळ हे बोलून गेले … आणि तिने बेटच लावली …. 'म्हणाली अगदी तसेच किंबहुना त्याहून चवदार खर्वस आत्ता इथेच तुला दहा मिनिटात करून खायला घालणार ....त्याबदल्यात मी तिला मूवी दाखवायचा …

मी पण अगदी नाक वर करून आनंदाने बेट स्वीकारली …. खरतर त्यामागे दोन कारणे होतीच … एकतर मिळालाच तर खूप दिवसांनी खरवस खायला मिळणार आणि दुसरे हिला कसल जमतंय तसलं मुंबईच चविष्ट खरवस बनवायला …. बेट हरण्याचा प्रश्नच येत नाही ….

मग काय तिने खरच दहा मिनिटात खर्वस तयार केलं हो …. आणि ते सुद्धा अगदी तंतोतंत तसंच नाही खरतर अधिकच चवदार ….

घ्या तर मग तुम्ही सुद्धा कृती लिहून आणि या बानीवर बघाच करून ….पाहुणे वेळेवर टपकले तरीही अगदी कमी वेळात तयार होणारा हा उत्कृष्ट गोड पदार्थ …

Ingredients :-

1 टीन कंडेनस्ड मिल्क (मिल्कमेड किंवा कुठलेही)
त्याच प्रमाणात (1 टीन) तापवून रूमटेम्प्रेचर एवढ्या तापमानाच दुध
तेवढेच (1 टीन) गोड दही (मलाईचे नको, साधे पण अजिबात आंबट नसलेले)
पाव तुकडा जायफळ ची पूड (आवडत असल्यास) (विलायची वापरू नये)

कृती :-

* एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे …
* दुसऱ्या पातेल्यात दही, दुध आणि मिल्कमेड एकत्र करून हलक्या हाताने फेटून घ्यावे (मिक्सर किंवा ब्लाइन्डर चा उपयोग करू नये…. दह्याचे गडे तसेच राहू नये आणि व्यवस्थित एकजीव व्हावे एवढ्यासाठी लागेल तेवढ्याच प्रयत्नाने फेटावे)
* हे मिश्रण छोट्या पसरट भांड्यात काढून किंवा लहान लहान कपांमध्ये काढून त्या उकळत असलेल्या पाण्यांमध्ये हे भांड किंवा ती सगळी कपं ठेऊन वरून झाकण ठेवावे (झाकण उपडे ठेवावे जेणेकरून वाफेचे जमा पाणी परत त्यात सांडू नये …. मी काचेचे झाकण असलेल्या फ्रायपँन चा उपयोग करते)
* फक्त ५-७ मिनिट मध्यम आंचवर तसच होऊ द्यायचं ….
* नंतर टूथपिक टाकून चारही बाजूने शिजले असल्याची खात्री करून घ्यायची (टुथपिक आत पर्यंत टाकून बघायच... काहीही चिकटून आल नाही तर समजायचे खरवस तयार आहे)
* खरवस तयार आहे पण थंड करून खायची मजाच वेगळी म्हणून निदान अर्धा तास थंडगार करायला फ्रीज मध्ये ठेवायचे ……
* काढून त्यावर वरून (आवडत असल्यास) जायफळाची पूड पसरायची …
* खर्वस नुसत देखील खाता येत तसेच फळांच्या तुक्ड्यांसोबतहि खाता येत (आंबा, लीची, स्त्राव्बेरी, अननस इ.)

टीप ; जास्तीची साखर घालण्याची गरज नाही मिल्कमेड असल्याने खर्वस बेताचा गोड होतो
मिश्रण ओतयच्या भांड्याला तेल-तुपाचा हात लावायची गरज नाही ….
ढोकळा पात्र किंवा इडली पात्रात सुद्धा हा पदार्थ करता येतो ……

तर खर्वस करायला आता गायीच्या ताज्या चिकाची वाट बघायची गरज नाही …
अतिशय चविष्ट आणि उत्तम दर्जाचा खरवस अगदी घरीच दहा मिनिटात तयार करता येतो ….

मी यानंतर अनेकदा खर्वस स्वतः बनवून मन भरेल इतपत खाल्ला देखील आहे …. आमचा मूवी बघायचा मुहूर्त मात्र अजून काही निघेना झालाय......

1390634842081.jpg1390634841748.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हा खरवस करुन पाहिला.
हा बरासचा अमुलच्या मिष्ठी दोहि सारखा होतो.(मी original मिष्ठी दोहि खाल्लेले नाहि).
ठाण्यात Tip Top मधे मिळणारा किंवा चिकाचा घरि केलेला खरवस यापेक्शा हा बराच वेगळा पदार्थ बनला.
खरवस नावाने वाढला तर घरी कोणीच खाल्ला नाहि.
Pudding नावाखाली मैत्रींणीमधे खपवला.
(एक Tin ची quantity खुपच जास्त होते,पहिल्याद करणार असाल तर पाव मापानेच करा,आवडला तर
उरलेले टिन वापरु शकता)

खरवस राहु दे पण सेलिना जेटली बाई आणी अमिताभ बुवा, मग यात तुलना कशी?:अओ: खरच समजले नाही.:अरेरे:

अमिताभबरोबर शहरुख वगैरे तत्सम मंडळी तुलनेसाठी उदाहरण म्हणून चालतील. ( अमिताभ पंखा असल्याने तुलना जरा खटकली, बाकी या खरवस चर्चेशी संबंध नाही, आणी सध्या सिनेमा माध्यमाशी संपर्क पूर्ण तुटल्याने सेलिनाचा उल्लेख खरच कळला नाही. )

जमल्यास सांगायची कृपा करावी.:स्मित:

मयी, मस्त रेसिपी...मी हा प्रकार राजश्री फुड चॅनेल मधे बघितला होती मिल्क पुडींग या नावाने. मी त्याच नावाने खाऊ घातला. तेव्हा बर्याच जणांनी मला हे खर्वसासारखं लागतय असं सांगितलं आणि खुप आवडीने खाल्लं. अर्थात ओरिजनल खरवसाची चव १००% मिळणार नाही पण चांगला चिक कायम मिळणं शक्य नसल्याने दुधाची तहान ताकावर म्हणायला नक्कीच हरकत नाही...तेही चविष्ट Happy

पण हा पदार्थ आणि चिकाचा खरवस यांत सलीना जेटली आणि अमिताभ बच्चन यांच्यात असेल तितकंच साम्य आहे. फिदीफिदी >> Lol

आधीही खरवस म्हणून अशीच रेसीपी लिहिली गेलीय.. तिथे नाही तो निषेध नोंदवलाय की ह्याला 'खरवस' का म्हणताहेत म्हणून?
तिथे सर्वांनी अगदी खरवस'च' म्हणत 'छान हो, खरवसाची रेसीपी दिलीय वगैरे म्हटलेय.. त्यांना देव कसे माफ करणार? Proud

मंजूडी,
तुम्ही तिथल्या रेसीपीला खरवस म्हणून केलात की अपमान खरवसाचा... बघा तिथे जावून..
>>>> तुला सध्या नेहमीचा खरवस खूप खाता येणार नाही पण हा खरवस जी भरके खायला हरकत नाही. स>>>><<

आरतीने आणि मी उपरोल्लेखित पदार्थ केला व खाल्ल्ला. (अनुक्रमे)
एक गोड पदार्थ म्हणून चांगला वाटला, पण त्याला खरवस म्हणणे कुठल्याच चिकपावन माणसाला पटणार नाही.

मागे दहिवडे फ्यान क्लबाच्या धाग्यावर पाव-बटरं पाण्यात भिजवून दही, चिंचेच्या चटणी सोबत डिट्टो वड्यांसारखी लागतात, अन शिवाय तळकट नसल्याने जास्त ह्येल्दी अस्तात अशी एक सब-रेस्पी टाकलेली होती.

त्याला हे ऑथेंटिक वडे नाहीत म्हणून तमाम जन्तेने तु.क. दिले होते. ते अत्यंत बरोबर होते. इट वॉज जस्ट अ टोस्ट डिप्ड इन दही.

म्हशी/गायीचा कोल्स्ट्रम नसलेले कोणतेही दूध/दुधाची पावडर/कण्डेन्स्ड मिल्क इत्यादी कितीही इन्जेनियसली उकड उकड उकडले, वा काय वाट्टेल ते उपद्व्याप केले तरी तो 'खरवस' नव्हेच. खरवसासारखा 'लागणारा' प्रकार असे म्हणा हवे तर.

चीक मिळाला, तर काहीही न करता डायरेक्ट कुकरमधे लावून झक्कास घट्ट अन कडक खरवस तयार होतो.

इन्स्टंट Happy

झम्पी …. इकडे न एक गम्मत आहे … एक जण वा म्हणतो अन इतर वा वा म्हणत सुटतात …. तिथेच मग लगेच एखादा येउन छी म्हणतो आणि त्या पाठोपाठ बरेच येतात छी छी म्हणत सुटतात …ते बघून हसायला येत मात्र ……
कुठला पदार्थ कितीही प्रमाणात घेतला तरी दही चा घट्टपणा आणि चव … दुधाचा घट्ट पणा त्यानंतर शिजवण्याची पद्धत, वेळ परत आपल्या सर्वांची आवड … बर्याच जणांच्या घरी खर्वस गुळाचा बनवतात (यात तर साखर सुद्धा नाहीये) …. …. या सर्व गोष्टींवर पदार्थ अवलंबून असतो …. परत सर्वांची आवड सारखी कशी असणार एखाद्या च्या घरी दही आंबट असल्याने बिघडला पदार्थ तर सर्वच जन पदार्थाचा अपमान म्हणत सुरु झाले … अहो कुठलाही असला तरी हा एक पदार्थ च आहे …. दह्या दुधा सारख्या हेल्दी पदार्थापासून बनलेला …. काहीच्या काही बोलून तुम्ही त्याचाही अपमान करत नाहीये का ?? ,महत्वाच म्हणजे चिक मिळणार नसेल तेव्हा सुद्धा हा पदार्थ करून खाता येतो हे विशेष नाहीये का …. अगदी एकाच चिकाचा दोन वेगळ्या वेळी केलेला खर्वस तरी एक्काच चवीचा होतो का ??

पदार्थाला इतकी नावं का ठेवायचीत... करायचं तर करा नाहीतर नका करु.
ज्याची त्याची आवड.
वर त्यात एकीने तशीच रेसीपी तेच नाव देवून लिहिलीय तर ते चालतं..तिथे त्या रेसीपीवर कसे प्रमाण घेवू, किती छान रेसीपी, ५० वेळा वाचली वगैरे प्रतिक्रिया एकीची(मंजूडी आयडीची). पण दुसर्‍याने लिहिली तर खरवसाचा अपमान नका करु वगैरे?

कशाला ते? उगीच खोड म्हणून का?

मयी, मी खरवस प्रेमी आहे.जो खरवस Mumbai , पुण्यात मिळतो तो तंतोतंत ह्या रेसीपी सारखा लागतो हे माझा मत आहे. एक झटपट होणारी मस्त रेसीपी आहे. तुझ्या मैत्रीणी ला थॅन्क्स Happy

हेमाली …. नवी मुंबई पनवेल पुणे रस्त्यावर एक दत्त वडापाव म्हणून हॉटेल आहे …. चारशे + रुपये किलो खरवस… तरीही घेण्यासाठी धमाल गर्दी …. कुपन काढून वाट पहावी लागते …. आमच्या ऑफिस चा टूर तिकडे झाला कि आम्ही आवर्जून खायला जायचो …. मी सांगितलेल्या पद्धतीने केलेला खरवस अगदी तसाच लागतो …चारशे रुपयात त्याच चवीने घरच्या घरी 'गाव भोजन' (खर्वसचे) देता येईल आता Lol Lol

च्च च्च.... मनुस्विनीचा नक्की काय प्रॉब्लेम आहे कळत नाही.

झंपी, एवढी वतवत करण्याआधी 'खरवसाचा अपमान करू नका' हे नक्की कशाला लिहिलंय ते नीट वाच आधी. अवतरण चिन्ह घालून व्यवस्थित कोट केलंय वाक्य. येईल तुला वाचायला.

जाऊ दे झम्पी …. तू बनवून खा हं एकदा नक्की …>>> Lol मयी, हे आवडलंच बर्का!!

>>झंपी, एवढी वतवत करण्याआधी 'खरवसाचा अपमान करू नका' हे नक्की कशाला लिहिलंय ते नीट वाच आधी. अवतरण चिन्ह घालून व्यवस्थित कोट केलंय वाक्य. येईल तुला वाचाय>><<
मंजूडी, Rofl

खरवस डोक्यात चढला वाटतं....
बाकी तुम्हाला वाण लागला असेल तर तुम्ही चालू ठेवा.. ज्यास्त चालू ठेवले तर कळेलच कशी बसेल ते. Wink

मंजूडी तुम्ही केला होता का हो पदार्थ … ?? चाखून पाहिलात का खरंच ?का नुसताच 'अपमान' केलंत

नसेल केला तर तुम्हाला सुद्धा आवर्जून सांगते …. बनवून खा हं एकदा नक्की Happy

अगंबाई झंपी, कितीवेळा एडीट करशील ती पोस्ट Lol

आधी लिहिलेलं 'हा आयडी की तो आयडी' हे मी वाचलं बरं का लब्बाडे Proud

मयी, बाकी कशाबद्दल माझं काहीही म्हणणं नाही, तेवढं ते 'तुम्हारा जमाना हमारा जमाना' लिहिलं नसतंत तर बरं झालं असतं. अनेकांना दुखावलंत तुम्ही तसं लिहून.

अगदी एकाच चिकाचा दोन वेगळ्या वेळी केलेला खर्वस तरी एक्काच चवीचा होतो का ??>>> +१

खरं सांगायचं तर मी खरवस विकत आणून खाल्ल्याचं आठवतच नाही. आई जेव्हा चीक मिळेल तेव्हा घरीच करायची.
विकतचा नक्की चिकाचा असेल कशावरुन? तो असाच चिकलेस खरवस असेल तर?

पण मी वेळात वेळ आणि उत्साह काढून
दिनेशदांच्या रेसिपीने, अगार अगार घालून खरवस/गोड पदार्थ , भाप्पा दोई, अगोच्या रेसिपीने खरवस/गोड पदार्थ आणि मयि च्या रेसिपीने खरवस/गोड पदार्थ ट्राय मारणारच आहे.

खरवसासारखं नाही लागलं तरी यातला १ पदार्थ तरी आवडेल असं वाटतय.

वाचलास ना, बर केलत मंजूडी.

वाटलच होतं तुम्ही गाडी ह्याच वळणावर आणणार म्हणून , शेवटी बोलायला काही राहत नाही तुमची चूक असल्यावर.

मला मनुस्विनी काय, आर्च काय ते महिन सगळं म्हणून झालय लोकांच. मला फरक पडत नाही. तो तुमचा खेळ आहे कोणी चुका तुमच्या काढल्या की. फक्त दुसर्‍या आयडीची बदनामी करताय ते बघा.

>>अनेकांना दुखावलंत तुम्ही तसं लिह>><<

Rofl अनेक जण दुखावले तुम्हाला कसे कळले?

दु:खावल्याच्या गोष्टी तुम्ही करताय?.

नवी मुंबई पनवेल पुणे रस्त्यावर एक दत्त वडापाव म्हणून हॉटेल आहे >> मी केला आहे तिथला खरवस ट्राय पण त्याला आत ३.५ वर्ष झालि..मला तर खरवस मिळाल्याचा आनंद झाला होता तिथे खाल्ला तेंव्हा. आता चव आठवत नाहि. हा ट्राय करायची इच्छा आहे पण कंडेनस्ड मिल्कच्या कॅलरिचा विचार करुन अजुन केला नाहिये.

मला मनुस्विनी काय, आर्च काय ते महिन सगळम म्हणून झालय लोकांच.>> पण मी तर तुला यातलं काहीही म्हटलेलं नाही Uhoh मी तुला उद्देशून सरळसरळ 'झंपी' असंच लिहिलेलं आहे.

Happy

हो का, वरची पोस्ट लिहिली तेव्हा मी म्हटले ना खरवस डोक्यात गेलाय का?

मी आपली माहीती पुरवली , जर तुम्हाला माहीत नसेल मला किती आयडींनी ओळखतात ते.

मुंबईत खर्‍याच चीकापासून बनवलेला खरवस कुठे मिळेल? आता तो ऑथेंटिक खरवस एकदा तरी खाऊन बघावासा वाटतोय. चीकापासून बनवला तरी त्यात दूध घालावे लागतेच ना? आणि चीकापासून बनवला आहे याची शहानिशा करण्याचे काही ठोकताळे आहेत का?

या सगळ्या चर्चेतून एकदम मी अश्वत्थामा असल्याची जाणीव झाली.

मंजूडी >>>>>>>>>> 'तुम्हारा जमाना हमारा जमाना' लिहिलं नसतंत तर बरं झालं असतं. अनेकांना दुखावलंत तुम्ही तसं लिहून.>>>>>>>>कस काय बुवा … उलट तुम्ही हे लिहून इतरांना भडकवत आहात …… मी हे लिहिण्या आधी तिथे हिंदी मराठी मिश्रित गम्मत सुरु होती …. मी त्या प्रवाहात गम्मत च केलीये …. आम्ही केली ती मस्करी दुसर्याने केली कि टोमणे म्हणून घेत असाल तर माझाजवळ काय उपाय …. मस्करीच्या ओघात मस्करीच होत असते …. बाकी इथे कोणी आपले जमाने (काळ-वर्ष) मेन्शन करून ठेवले नाहीये …. तेव्हा लिहिणारे माझापेक्षा लहान सुधा असतील हे न समजण्या इतपत मी मूर्ख नाही …. किंवा माझा शब्दांचा अर्थ 'तस्साच' असेल अस समजायला इतर सर्वच मूर्ख नाही ….

मयी, तुम्ही मनावर घेऊ नका. तुम्हाला पदार्थ आवडला, तुम्हाला हाच खरवस म्हणून माहीत आहे हे लक्षात आलं. तुम्ही मी केलेल्या मस्करीत सामिल झालात ते तर मला आवडलंच.

बाकी झंपीबिंपी तुमची बाजू घ्यायला आलेल्या नाहीत. त्या त्यांचे त्यांचे कुठलेसे स्कोअर्स सेटल करत फिरत असतात. बरेचदा काय बोलतात कोणालाच कळत नाही. तुम्ही त्यात पडू नका. मजा बघा.

Pages