इनस्टंट खरवस
मी मुंबईला राहत असतांना बरेचदा बर्याच हॉटेल मध्ये खरवस चाखले … अतिशय आवडू सुद्धा लागले होते …. पण इकडे परत आल्यावर परत तसली चव आपल्याला चाखता येणार नाही याची खंत टोचत होती …ऽश्यतच एकदा मैत्रीनिजवळ हे बोलून गेले … आणि तिने बेटच लावली …. 'म्हणाली अगदी तसेच किंबहुना त्याहून चवदार खर्वस आत्ता इथेच तुला दहा मिनिटात करून खायला घालणार ....त्याबदल्यात मी तिला मूवी दाखवायचा …
मी पण अगदी नाक वर करून आनंदाने बेट स्वीकारली …. खरतर त्यामागे दोन कारणे होतीच … एकतर मिळालाच तर खूप दिवसांनी खरवस खायला मिळणार आणि दुसरे हिला कसल जमतंय तसलं मुंबईच चविष्ट खरवस बनवायला …. बेट हरण्याचा प्रश्नच येत नाही ….
मग काय तिने खरच दहा मिनिटात खर्वस तयार केलं हो …. आणि ते सुद्धा अगदी तंतोतंत तसंच नाही खरतर अधिकच चवदार ….
घ्या तर मग तुम्ही सुद्धा कृती लिहून आणि या बानीवर बघाच करून ….पाहुणे वेळेवर टपकले तरीही अगदी कमी वेळात तयार होणारा हा उत्कृष्ट गोड पदार्थ …
Ingredients :-
1 टीन कंडेनस्ड मिल्क (मिल्कमेड किंवा कुठलेही)
त्याच प्रमाणात (1 टीन) तापवून रूमटेम्प्रेचर एवढ्या तापमानाच दुध
तेवढेच (1 टीन) गोड दही (मलाईचे नको, साधे पण अजिबात आंबट नसलेले)
पाव तुकडा जायफळ ची पूड (आवडत असल्यास) (विलायची वापरू नये)
कृती :-
* एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे …
* दुसऱ्या पातेल्यात दही, दुध आणि मिल्कमेड एकत्र करून हलक्या हाताने फेटून घ्यावे (मिक्सर किंवा ब्लाइन्डर चा उपयोग करू नये…. दह्याचे गडे तसेच राहू नये आणि व्यवस्थित एकजीव व्हावे एवढ्यासाठी लागेल तेवढ्याच प्रयत्नाने फेटावे)
* हे मिश्रण छोट्या पसरट भांड्यात काढून किंवा लहान लहान कपांमध्ये काढून त्या उकळत असलेल्या पाण्यांमध्ये हे भांड किंवा ती सगळी कपं ठेऊन वरून झाकण ठेवावे (झाकण उपडे ठेवावे जेणेकरून वाफेचे जमा पाणी परत त्यात सांडू नये …. मी काचेचे झाकण असलेल्या फ्रायपँन चा उपयोग करते)
* फक्त ५-७ मिनिट मध्यम आंचवर तसच होऊ द्यायचं ….
* नंतर टूथपिक टाकून चारही बाजूने शिजले असल्याची खात्री करून घ्यायची (टुथपिक आत पर्यंत टाकून बघायच... काहीही चिकटून आल नाही तर समजायचे खरवस तयार आहे)
* खरवस तयार आहे पण थंड करून खायची मजाच वेगळी म्हणून निदान अर्धा तास थंडगार करायला फ्रीज मध्ये ठेवायचे ……
* काढून त्यावर वरून (आवडत असल्यास) जायफळाची पूड पसरायची …
* खर्वस नुसत देखील खाता येत तसेच फळांच्या तुक्ड्यांसोबतहि खाता येत (आंबा, लीची, स्त्राव्बेरी, अननस इ.)
टीप ; जास्तीची साखर घालण्याची गरज नाही मिल्कमेड असल्याने खर्वस बेताचा गोड होतो
मिश्रण ओतयच्या भांड्याला तेल-तुपाचा हात लावायची गरज नाही ….
ढोकळा पात्र किंवा इडली पात्रात सुद्धा हा पदार्थ करता येतो ……
तर खर्वस करायला आता गायीच्या ताज्या चिकाची वाट बघायची गरज नाही …
अतिशय चविष्ट आणि उत्तम दर्जाचा खरवस अगदी घरीच दहा मिनिटात तयार करता येतो ….
मी यानंतर अनेकदा खर्वस स्वतः बनवून मन भरेल इतपत खाल्ला देखील आहे …. आमचा मूवी बघायचा मुहूर्त मात्र अजून काही निघेना झालाय......
ओके. धन्स मयी, सायो.
ओके. धन्स मयी, सायो.
फोटो इंटरनेट वर आहे …. आणि हा
फोटो इंटरनेट वर आहे …. आणि हा फोटो नाही तर दुसरा जरी घेतला असता तरी तो कुणाचा तरी असताच मग तो फक्त दिनेशदा यांचा नाहीये म्हणून सर्व खुश राहिले असते का ?? एरवी फेसबुक वर सुद्धा मी माझे फोटो न टाकता लहान मुलं किंवा फुलं असे फोटो टाकते ते असेच इंटरनेट वरून घेत असते …. अगदी तसेच सध्या भावनेतून हा फोटो उचलला होता …. दुसरे …… या प्रकाराला खरवस म्हणतात अस दाखवायला माझ्या स्वतः जवळ फोटो नाही तर मला कुठला तरी टाकायचाच होता …। हव तर मी फोटो काढूनच टाकते पण मग खरवस म्हणजे काय या प्रश्नाच उत्तर माझाजवळ नसेल ……
हा फोटो नाही तर दुसरा जरी
हा फोटो नाही तर दुसरा जरी घेतला असता तरी तो कुणाचा तरी असताच मग तो फक्त दिनेशदा यांचा नाहीये म्हणून सर्व खुश राहिले असते का ?? >> सर्वांनी खुश रहाण्याचा काय संबध येतो? तुम्हाला मागच्या पानावर प्रताधीकाराबद्दल सांगितले, तो कायदा आहे. तो पाळावा लागतो.
माबो वरूनच मी फोटो घेतलाय अस
माबो वरूनच मी फोटो घेतलाय अस काही म्हणायचं काय सायो तुम्हाला तर …. एक अगदी स्पष्ट सांगते …. माबो वर खर्वस ची पाक्रु आहे हे सुधा मला माहिती नव्हतं…. तस माहिती असतं तर मी वेगळी पाक्रु टाकली नसती …. अनावधानाने झालय यावर तुमचा विश्वास नसेल आणि कीस काढून वाद घालायचा असेल तर सॉरी …. फोटो तर मी काढतेच आहे पण यापेक्षा जास्त एक्स्प्लेन करण्याची मला गरज वाटत नाही ….
मयी, जे चूक आहे, ते चूकच आहे.
मयी, जे चूक आहे, ते चूकच आहे. आधी तुम्हाला माहीत नसताना ठिके, पण आता फोटो कुणाचा आहे, असा फोटो कॉपी पेस्ट करणे हा प्रताधिकार कायद्याचा भंग आहे हे माहीत झाल्यावर तरी फोटो काढून टाकणे इष्ट.
आणि हा फोटो दुसर्या कोणाचा तुम्ही ढापला असता तरीदेखील लोकं हेच बोलतील. कारण मूळातच तसं करणं चूक आहे.
रेस्पी चांगली आहे. करून पाहीन.
स्वाती मी फोटोच काढते आहे …
स्वाती मी फोटोच काढते आहे … फोटोसाठी मी हट्ट धरत नाहीये …। फक्त प्रश्नांची उत्तर देतेय
>>माबो वरूनच मी फोटो घेतलाय
>>माबो वरूनच मी फोटो घेतलाय अस काही म्हणायचं काय सायो तुम्हाला तर >> कृपया माझं नाव घेऊन मला अडकवू नका. मी फक्त मामींना मदत करायच्या हेतूने इथे लिहिलेलं आहे. बाकी खरवस प्रकरणाशी मला सोयर सुतक नाही.
मयी सहसा पाकृवर आपण स्वतः ती
मयी सहसा पाकृवर आपण स्वतः ती केली असताना फोटो काढून टाकला जातो. नाहीतर नंतर टाकू वगैरे लिहून पुढच्यावेळी तो पदार्थ केला असताना फोटो काढून टाकतात. फारतर तुम्ही करा आणि प्रतिसादात फोटो टाका असं आवाहन माबोकरांना केलं जातं.
तुम्ही स्वतःच्या पाकृकरता स्वत: न काढलेला फोटो वापरला आहे. अशावेळी निदान आंतरजालावरून साभार घेतलाय याची नोंद करावी.
अनवधानानं चूक झाली असेल तर सॉरी म्हणून पुढे चला. जे तुम्हाला योग्य सल्ले देत आहेत त्यांच्याशी वाद घालण्यात काय अर्थ आहे?
मामी >>>मी वर सांगितले …
मामी >>>मी वर सांगितले … पहिल्याच प्रतिक्रियेत मी टाकणार होते पण धागा संपादन करत होते तेवढ्यात गतीने येणाऱ्या प्रतिक्रियेचे उत्तर देत देता राहिलेच …. हि समजून घेता येईल अशी बाब नाही अस वाटलं नाही…आणि मी कुठेही वाद घालत नाहीये ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातेय मी फक्त उत्तर देत होते आणि अनवधानानेच झालेय म्हणूनच पुढे काहीही जास्त explain न करता फोटो कधीच काढला आणि आता थांबतेय …… धन्यवाद
>मी वर सांगितले … पहिल्याच
>मी वर सांगितले … पहिल्याच प्रतिक्रियेत मी टाकणार होते पण धागा संपादन करत होते तेवढ्यात गतीने येणाऱ्या प्रतिक्रियेचे उत्तर देत देता राहिलेच …. हि समजून घेता येईल अशी बाब नाही अस वाटलं नाही…आणि मी कुठेही वाद घालत नाहीये ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातेय मी फक्त उत्तर देत होते आणि अनवधानानेच झालेय म्हणूनच पुढे काहीही जास्त explain न करता फोटो कधीच काढला आणि आता थांबतेय …… धन्यवाद >>
अनवधानानेच झालेय म्हणूनच पुढे काहीही जास्त explain न करता फोटो कधीच काढला आणि आता थांबतेय >>>>>
४ पोस्टि एक्ष्प्लेन केल्यावर? तुम्ही अनवधानाने केलेय हे पटवायची गरज नाही ते पटलय सगल्या.न्ना...तुम्हाला तुमची चुक पटलिय का?
पाकक्रुती चान्गलिय! करुन
पाकक्रुती चान्गलिय! करुन खाण्यात येइल.
अरे वा... बघतोच करून.
अरे वा... बघतोच करून.
रेसिपी सोपी वाटत्येय. करुन
रेसिपी सोपी वाटत्येय. करुन बघेन.
https://www.google.co.in/search?q=%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B8&t...
या लिंक वर दिनेशदांच्या खरवसाच्या फोटोंबरोबर माझ्या २ पाकृंचे पण फोटो सापडले
माबोवरचे हेडिंग्ज आणि फोटो
माबोवरचे हेडिंग्ज आणि फोटो गुगल सर्च मध्ये येतात की... मला माबो तसंच सापडलेलं.
हो मनी, पण खरवस हे सर्च मधे
हो मनी, पण खरवस हे सर्च मधे दिल्यावर मी दिलेल्या अंड्यांच्या (फंडू अंडू सिरीज मधल्या) रेसिपीज चे फोटो आलेत
छान रेसिपि. मयी, तुम्हि परत
छान रेसिपि. मयी, तुम्हि परत खरवस करताना स्टेप बाय स्टेप फोटो काढून इथे पेस्ट करा. हाकानाका.
सोपी आहे कृती. आणि मला सर्वात
सोपी आहे कृती. आणि मला सर्वात महत्वाचं हे वाटलं की कंडेन्स्ड मिल्क वगळता बाकी घरातलेच पदार्थ (सहजगत्या हाताशी असणारे) वापरून खरवस करता येईल.
छान रेसिपि. मयी, तुम्हि परत
छान रेसिपि. मयी, तुम्हि परत खरवस करताना स्टेप बाय स्टेप फोटो काढून इथे पेस्ट करा. हाकानाका.>>>>>>>>>>>सुमेधा +१००
४ पोस्टि एक्ष्प्लेन केल्यावर?
४ पोस्टि एक्ष्प्लेन केल्यावर? तुम्ही अनवधानाने केलेय हे पटवायची गरज नाही ते पटलय सगल्या.न्ना...तुम्हाला तुमची चुक पटलिय का?>>>>>>>>>>>. मयी अनवधानाने का होइना चुक झाली...बरं, झाली तर झाली....मान्य करा मोकळे व्हा.....इथे सर्वजण काहीतरी सांगतात ते चांगल्या साठी.....उगाच चुकीचं सांगुन कोणाला काय मिळणार???
मयी, तुम्ही प्लीज स्वतः
मयी, तुम्ही प्लीज स्वतः बनवलेल्या खर्वसाचा फोटो टाकाल का ? काल तुम्ही जो फोटो टाकला होता तो इथलाच आहे हे माझ्या लक्षात आलं नव्हतं पण तेव्हाही फोटो बघून नुसत्या दह्या-दुधाचा खर्वस इतका घट्ट कसा झाला असा प्रश्न नक्कीच पडला होता. दिनेशदांनी चायनाग्रास वापरलं आहे त्यामुळे तो खर्वस असा घट्ट आहे. मी जी मिल्क पावडर घालून कृती दिली आहे त्यानुसार बनवूनही तो इतका घट्ट बनत नाही. थुलथुलीतच राहतो.
प्रताधिकार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहेच पण प्रताधिकारमुक्त फोटो टाकला तरी त्यातला पदार्थ मूळ कृतीबरहुकूम केलेला नसल्यामुळे फोटो आणि वर्णन न जुळणारे असते. कल्पना येण्यासाठी धान्यं, डाळी, भाज्या ... थोडक्यात घटकपदार्थांचे फोटो देणे वेगळे आणि तयार पदार्थाचा फोटो देणे वेगळे
एकदम भारी. मी करणार आता.
एकदम भारी. मी करणार आता.
<<इकडे विदर्भात वगैरे खर्वस
<<इकडे विदर्भात वगैरे खर्वस हा शब्द फारसा लोकांना माहिती नाही <<. अमान्य.. बाकी पाकृ आवडली. नक्की करुन बघणार.
विदर्भात चिकाच्या वड्या असे
विदर्भात चिकाच्या वड्या असे म्हणतात ना?
माझ्या साबा तेच म्हणतात..
चूकून फोटो टाकला म्हणून इतके
चूकून फोटो टाकला म्हणून इतके चढून जायचे काय कारण?
मान्य आहे त्यांची चूक झाली व कायदा हा पाळलाच पाहिजे.
पण उगाच धोपटगिरी कशाला ती?
त्यांनी संयम न सोडता उत्तर देत बसल्या. फोटो काढायला उशीर झाला जरासा...
इतके सर्व जण मयी ह्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टी करताहेत.. तर त्यातलीच अशी किती जण इतर असे कायदे नेमाने पाळता?
की आपले मायबोलीवर कोणी चुकलेला भेटला की धोपटा...
मायबोलीवर आहेत की असे नग... जिथे अॅडमिन पुर्ण लिंक द्यायची सांगून सुद्धा नुसते इंटरनेट/आंतर्जाल लिहितात्...(ते एक वेळ परवडले) पण इथे आंतरजालावरची रेसीपी जशीच्या तशी देवून 'स्वप्रयोग' लिहिणारे महाभाग आहेत की. पण हेच लोकं दुसर्याला शिकवायला येतातच पुढे.
(असे कितीतरी नग करताच कायदा भंग.. व त्यांना जाणीव नसतेच...कायद्याने बंदी असताना आणतातच लोकं धान्य, लोणची, मसाले, दूध-मिठाई,लाडू वगैरे.)
झंपीचा झटँग झटका!
झंपीचा झटँग झटका!
झंपी + १ की हा मुद्दा डाळी
झंपी + १ की हा मुद्दा डाळी ंचे इत्यादी फोटो आणि तयार रेसेपीचे फोटो हा मुद्दा मुळातच चुकीचा... मुद्दा हा की लोकाना प्रामाणिक्पणे आपण तयार केलेल्याच पदार्थाचे फोटो द्यायला कमीपणा का वाटावा ...
असो
आपल्याला ही डिश ज्जामच आवडते
माहीती दिल्याबद्दल आभार
झंपीशी सहमत.. ईथे मायबोलीवर
झंपीशी सहमत..
ईथे मायबोलीवर अनेक लोकांनी इंटरनेट वरुन फोटो कॉपी पेस्ट करून टाकले आहेत....अगदी नेटवरून साभार असे न लिहिताही. तसेच ते ओळखिचे कोण असेल तर जास्त धोपटगिरी होत नाही.
कधी एकाने चूक दाखविली आणि ती करणा-याने सुधारली तरी बाकीचे चार जण पुन्हा पुन्हा तेच सांगतात. हे ईथे नवीन नाही.
त्याने काय नक्की फरक पडतो मग?
त्याने काय नक्की फरक पडतो मग? >>> नुसत्या दह्यादुधाचा खर्वस चायनाग्रास घालून केल्यासारखा घट्ट होणार नाही असे मी ज्या पद्धतीने केलाय त्यावरुन मला वाटते. त्यामुळे वरचा फोटो पाहून गोंधळायला झाले म्हणून त्यांना कृतीबरहुकूम केलेल्या खर्वसाचा फोटो टाकण्याची विनंती केली आहे. हे धोपटणे वाटत असेल तर तसे.
डाळीचे इत्यादी फोटो आणि तयार रेसेपीचे फोटो हा मुद्दा मुळातच चुकीचा >>> प्रताधिकारमुक्त असलेली प्रकाशचित्रे एरवी कुणीही वापरु शकतं पण तरी पाककृतींमध्ये ती वापरु नयेत ह्या मताची मी आहे आणि हा एक स्वतंत्र मुद्दा आहे.
मयी, वाद अजून थोडा खेचल्याबद्दल क्षमस्व.
मीही आत्तापर्यंत शिट्टी काढून कुकरमध्येच केला आहे खरवस, आता फ्रायपॅनमध्ये करुन बघेन
मस्त पाकृ.... चायनाग्रास
मस्त पाकृ.... चायनाग्रास घालुन करतात हे माहित होते पण असेही करता येते हे नविनच आहे...
<<झंपीशी सहमत.. ईथे मायबोलीवर
<<झंपीशी सहमत..
ईथे मायबोलीवर अनेक लोकांनी इंटरनेट वरुन फोटो कॉपी पेस्ट करून टाकले आहेत....अगदी नेटवरून साभार असे न लिहिताही. तसेच ते ओळखिचे कोण असेल तर जास्त धोपटगिरी होत नाही.>>एकदम सहमत
Pages