आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
>>शाळेतील मुल देखील चांगली
>>शाळेतील मुल देखील चांगली टीम निवडतील
मॉर्गन चांगला खेळतोय, काल कॅलीसही चमकला, नरेन तर त्यांची जान आहे...... राहता राहीला सेनानायके.....पण त्याच्या एवजी मॅकलमची निवड होणे अवघड आहे तश्यात आता बिसला ही काल चांगला खेळलाय!
पुढच्या मॅचला बहुतेक सेनानायकेच्या एवजी ब्रेट ली आत येईल
राजस्थान कडून आज हॉजच्या जागी ओवेस शहा आणि कूपरच्या जागी एडवर्डची निवड होईल असे वाटतेय.
हैद्राबादकडून क्यू डी कॉकचा जागी पार्थिव पटेल परत संघात येईल... कॅमरुन व्हाईट, स्टेन आणि सॅमी नक्की असतील.... परेराला आत घ्यायचे असेल तर संगाला परत एकदा बाहेर बसावे लागेल
मुंबईकडून पोलार्ड, मलिंगा, मिशेल जॉन्सन आणि डेवेन स्मिथ असतील बहुदा... पॉटींग आज बहुतेक परत बाहेरच असेल
बंगलोर गेल, अॅबी, रामपॉल आणि मुरलीला खेळवतील
एकूणच कर्णधार आहे म्हणून कोणताच परदेशी खेळाडू त्याची संघातली जागा पक्की धरू शकत नाही.... संगा, पॉटींग, मॅथ्यूज, गिली (काल खेळला नसता तर याच्यावर पण बाहेर बसण्याची वेळ आलीच होती).... पुढच्या वेळी कर्णधार निवडताना फ्रेंचायझी नक्कीच याचा विचार करतील
राहता राहीला सेनानायके.....पण
राहता राहीला सेनानायके.....पण त्याच्या एवजी मॅकलमची निवड होणे अवघड आहे तश्यात आता बिसला ही काल चांगला खेळलाय!
पुढच्या मॅचला बहुतेक सेनानायकेच्या एवजी ब्रेट ली आत येईल >>>>>>>>>>>>>> बिसला कालच फक्त चांगला खेळला याच्या आधीच्या ७ मॅचेस मधे तर दिवेच लावलेले त्याला तर मागच्या ३ मॅच मधे बॅटींगलाच नाही उतरवला
परेराला आत घ्यायचे असेल तर संगाला परत एकदा बाहेर बसावे लागेल>>> नक्कीच संघ हिताच्या दृष्टीने हे चांगले आहे कारण परेरा चांगल्या फार्मात आहे
राजस्थान कडून आज हॉजच्या जागी ओवेस शहा >>>>> नाही. बहुदा कारण हॉज ने ऐन मोक्याच्या क्षणी चांगलाच दंडपट्टा चालवुन रन वाढवलेले आहेत त्यामुळे अचानक शहा ला आत घेणे चाल अंगलट देखील येउ शकते
KKRचं काही खरं दिसत
KKRचं काही खरं दिसत नाही...
तिवारी आठवडाभरासाठी बाहेर..
उदयनसाहेब साकिब आल्यावर बदल होईलच...
पठान बंधूना आता बाकावरच बसावं लागेल..नाव मोठं अन लक्षन खोटं..
ए.बी. आजचा पावर प्लेयर माझा...
हातातली मॅच घालवली राजस्थान
हातातली मॅच घालवली राजस्थान ने....६ विकेट्स २९ रन्स वर होत्या...आता १४४ रन्स बनवले हैद्राबाद ने...
अमित मिश्रा आणि सामी दोघांनी उपयुक्तता सिद्ध केली
बुकरँग , माझा संघ अजुनही
बुकरँग , माझा संघ अजुनही पुणे वॉरियर आहे , कारण काय आहे देव जाणे पण पुणे वॉरियर विषयी मनाला विशेष प्रकारची ओढ जाणवते !
बुकरँग , माझा संघ अजुनही
बुकरँग , माझा संघ अजुनही पुणे वॉरियर आहे , कारण काय आहे देव जाणे पण पुणे वॉरियर विषयी मनाला विशेष प्रकारची ओढ जाणवते , तशी ओढ मुंबईविषयी नाही जाणवत!
आज सचिनची मोठी खेळी बघायला
आज सचिनची मोठी खेळी बघायला मिळेल ही आशा फोल ठरली. २९ काढून पायचीत !
मुंबई इंडियन्सचा
मुंबई इंडियन्सचा सर्वोत्क्रूष्ठ खेळ ! जिँकण्याच्या उंबरठ्यावर
कायतरी ते बोगस २० /२० बनवलंय
कायतरी ते बोगस २० /२० बनवलंय अन लोकं पण बाकीच्या गोष्टी सोडुन बघत बसतात.
<< मुंबई इंडियन्सचा
<< मुंबई इंडियन्सचा सर्वोत्क्रूष्ठ खेळ ! >> सहमत. मला जाणवलेलं कांहीं-
१] के. कार्तिक हा मुंबईसाठी सातत्याने कामगिरी करणारा महत्वाचा खेळाडू ठरतोय; फलंदाजीतच नाही तर यष्टीमागें त्याचं असणं विरुद्ध संघावर दडपण आणण्याइतपत परिणामकारक वाटतं; कालचे त्याचे दोन झेल [ कोहली व डी व्हिलीयर्स] महत्वाचे होतेच पण अरूण कार्तिकचं त्याने केलेलं 'स्टंपींग' अफलातून होतं;
२] नेमकी गोलंदाजी करत कुळकर्णीने कालच्या खेळपट्टीचा सुंदर उपयोग करून घेतला;
३] इतकीं वर्षं सचिनबरोबर खेळायची सुवर्णसंधी मिळूनही रोहित शर्मा 'टेंपरॅमेंट'बद्दल त्याच्याकडून कांहीच शिकला नाही, याचं काल खूप वाईट वाटलं; तो धांवचित झाला त्यांत त्याचीच चूक अधिक होती पण त्याने बाद झाल्यावर कार्तिकवर चिडाचीडीचं जें ओंगळ प्रदर्शन मैदानावर [व परत आल्यावर संघ सहकार्यांबरोबर बसताना] केलं तें एका ज्येष्ठ खेळाडूला व संघाच्या कर्णधाराला तर न शोभेसंच होतं;
४]क्षेत्ररक्षणाचा दर्जा टी-२० मुळे सुधारतोय हें निर्विवाद. काल कोहलीने केलेल्या दोन 'रन-आऊट'मधे कार्तिकचा रन-आऊट उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुनाच होता.
<<... बाकीच्या गोष्टी सोडुन बघत बसतात.>> बाकीचं 'बघण्यासारखं' टीव्हीवर काय असतं ? मालिकांमधले घराघरांतले बालीश डांवपेंच, विषप्रयोग, बायकांचं एकमेकांच्या थोबाडीत मारणं इ.इ.पेक्षां माझी पसंति तरी टी-२०च्या आडव्यातिडव्या कां होईना पण फटकेबाजीला !
बाकी गोष्टी म्हणजे फक्त
बाकी गोष्टी म्हणजे फक्त टीव्हीच का? असो.
बघण्यासारख्या गोष्टी टीव्हीवर
बघण्यासारख्या गोष्टी टीव्हीवर असतात. आम्ही मॅच आणि डिस्कवरी सारखेच चॅनल बघतो
आपल्याला आवडत नसेल तर बघु नये...:)
आयपीएल काही वर्षभर नसते . इतर
आयपीएल काही वर्षभर नसते . इतर सर्व आपण वर्षभर पाहु शकतो . अन शिवाय live telecast असल्याने पाहण्यात सुध्दा जिवंतपणा येतो तो वेगळाच !
मुंबईचा पब्लिक ज्या प्रकारे
मुंबईचा पब्लिक ज्या प्रकारे एखाद्याला चिअर अप करतो, त्याच्या दुप्पटीने एखाद्याची हुर्ये सुद्धा उडवतो. या गोष्टीचा प्रत्यय विराटला काल आला असेल... मॅचच्या सुरवाती पासून विराटला चिअर अप करणारा पब्लिक रायडू रनआऊट झाल्या नंतर मॅचच्या शेवट पर्यंत विराटची 'चिटर' म्हणून हुर्ये हुडवत होता.
आज टोटली कॅरेबियन ट्रीट आहे... > अगदी... स्मिथ, पोलार्ड, गेल आणि रामपॉलने यांनी मुंबईकरांना षटकारांची ट्रीट दिली खरी पण त्यात गेलचा वाटा फार कमी होता.
रायडूने गेलचा झेल पकडल्यावर स्टेडियम पेक्षा मुंबईच्या टिमने मैदानात साजरी केलेली दिवाळी कायम लक्षात राहिल... अशी दिवाळी कधी काळी सचिन गेल्यावर विरुद्ध टिम साजरी करत असे.
कालच्या मुंबई इंडियन्सच्या सांघिक कामगिरेचे खरेच कौतुक केले पाहिजे.... गेल डन माफ करा वेल डन
<< बाकी गोष्टी म्हणजे फक्त
<< बाकी गोष्टी म्हणजे फक्त टीव्हीच का? असो .> > रात्रीं आठ ते अकरा ..... पण जावूंदे ! असो !!!
आज सचिनची एक मुलाखत ' क्रिकइन्फो'वर वाचली; ' ....whoever wants to become a cricketer, should be passionate about the game. Cricket should be in your heart first and then as you mature and grow, slowly you will find how to score runs ..... and how to bowl ' , हें त्याचं वाक्य वाचल्यावर एक जुनी आठवण जागी झाली; पूर्वीच्या वे.इंडीजच्या फर्ग्युसन नांवाच्या तुफान गोलंदाजाला ' भारतात तेज गोलंदाज कां नाही तयार होत ?' असं विचारल्यावर तो म्हणाला होता कीं, भर उन्हात तासनतास घाम गाळत अचाट मेहनत करत रहाणं हें मनापासून आवडणारीं मुलं इथं नसावीत !!
काल ची लढत देव विरुध्द राक्षस
काल ची लढत देव विरुध्द राक्षस अशी होती

ज्यात देव जिंकला
<< ज्यात देव जिंकला >> सहसा
<< ज्यात देव जिंकला >> सहसा देव राक्षसांविरुद्ध लबाडी करूनच जिंकल्याचं वाचलंय [ भस्मासूर- मोहिनी, बळी- वामनावतार, इ.इ.] पण काल मात्र ते गुणवत्तेवरच जिंकले !!!
गेल म्हणजे साक्षात राक्षसच
गेल म्हणजे साक्षात राक्षसच म्हणावा लागेल
if sachin is "GOD" then gale is "GODZILLA"
<< if sachin is "GOD" then
<< if sachin is "GOD" then gale is "GODZILLA" >> मालवणीत बच्चा मुलाला "झिला'' म्हणून हांक मारतात; त्या अर्थाने, सचिन 'गॉड' असेल- माझ्याकरता कांहीसा आहेच - तर गेल ' गॉड-झिला' असेलही !!!
मैदानावरील काल खेळाडूंचे
मैदानावरील काल खेळाडूंचे वर्तन नक्कीच अशोभनीय होते...
आज तळाच्या स्थानासाठी स्पर्धा असेल...
आज कोण जिँकणार ? पहिला सामना
आज कोण जिँकणार ? पहिला सामना CSK जिँकणार यात शंका नाही ! पण रात्रीचा सामना कोण जिँकणार ?
२०० ??????????? तुमच्या मुख्य
२०० ??????????? तुमच्या मुख्य बॉलर ला बाहेर बसवल्यावर काय होते हे लक्षात आले असेल गंभीर च्या
तुमच्या मुख्य बॉलर ला बाहेर
तुमच्या मुख्य बॉलर ला बाहेर बसवल्यावर काय होते हे लक्षात आले असेल गंभीर च्या >> कोणाला बसवले म्हणतोयस नक्की ? ली बरेच गेम बाहेर आहे नि सेनानायकेच्या जागी मॅक्मुल्लम येणे मस्ट होते KKR च्या batting ची consistency बघून.
अरे बालाजी गेल्या ३ मॅचेस
अरे बालाजी गेल्या ३ मॅचेस पासुन अशोक डिंडाचा कुंभ के मेले मे बिछडा हुवा भाई झाला आहे
नरेन आणि कॅलिस हे दोनच चांगले बॉलर आहे बाकिच्या १२ ओवर चा आनंदी आनंद आहे कोलकत्या कडे
.
. भाटीया बोनस आहे लगा तो तीर वरना फकिर या प्रकारात मोडतो.
अश्या वेळेस गोलंदाजी कमजोर पडते...
केकेआर चे १२ नक्की वाजणार
केकेआर चे १२ नक्की वाजणार आज...!
मॉरगन येईतो मॅच संपलेली असेल.
मॉरगन येईतो मॅच संपलेली असेल. बिस्ला नि कॅलिस चा strike रेट कमी होतोय.
आला मोर्गन................
आला मोर्गन................:)
हार के जितने वाले को ही
हार के जितने वाले को ही बाजीगर केहते है ........
,
.
.जबरदस्त मॅच झाली..
अशी मॅच असायला हवी... बिस्ला कॅलिस मोर्गन जबरद्सत खेळले
काल च्या मॅच सारखे गेल आउट झाला तर बंगलोर ने जसे शेपुट घातलेले तसे किमान तरी नाही घातले
२०० सारखा प्रचंड स्कोर असुन सुध्दा दबाव शेवट पर्यंत येउ दिला नाही..
मोरिस ने छान ओव्हर टाकली ३ परफेक्ट यॉर्कर टाकले तिथेच मॅच आली हातात
आता कोण जिँकणार ? पुणे की
आता कोण जिँकणार ? पुणे की दिल्ली ? पुण्याने टॉस जिँकून प्रथम गोलंदाजी स्विकारली . पायावर कुर्हाड तर नाही ना मारुन घेतली ?
बिस्ला कॅलिस मोर्गन जबरद्सत
बिस्ला कॅलिस मोर्गन जबरद्सत खेळले >> कॅलिस मूळे मॅच हरले KKR. 92 strike rate ?
Pages