आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< सर्वच नद्या त्यांनी ओलांडल्या >> पण 'गुण तक्त्या'च्या नकाशावरून तरी तसं नाही ना दिसत! Wink असो, आज 'जागतिक हास्य दिन' म्हणून जरा इनोद करायचा प्रयत्न केला इतकंच !!

आज मुंबई जिंकायला हवीये Happy

प्रथम फलंदाजी घेतली तरच जिंकतील (ते सुद्धा ५०: ५०)

प्रथम गोलंदाजी घेतली तर वाटय.

मज्जा कधी येईल जेव्हा कोलकता आणि पंजाब आपल्या राहिलेल्या मॅचेस जिंकतील तेव्हा खरी रंगत येईल......चेन्नई आणि बँगलोर जवळपास निश्चित झालेले आहेत

>>काय बुमरँग, तुमच्या मागच्या भविष्यवाणींचा ट्रॅक रेकॉर्ड
अहो मी कधीच त्याला भविष्यवाणी म्हंटले नाही... मी नेहमीच त्याला अंदाजवाणी म्हणत आलोय.... चार अंदाज बरोबर यायचे तसे एखाद्-दोन चुकायचेही... असो.... म्हणूनच मी सट्टा खेळत नाही Proud

<<आयपीएल संघ आणि त्यांचे जावई
१) चेन्नई सुपर किंग्सः- मुरली विजय
२) कोलकता ना रायडर्स :- युसुफ पठाण
३) मुंबई इंडीयन्स : - सचिन तेंडुलकर
४) पुणे वॉरिअर्स : - अशोक डिंडा (तशी सगळीच टीम आहे)
............ >>
वरील जांवयांच्या पंक्तीतून सचिनने उठावं हा मुख्य इंटरेस्ट आहे आजच्या सामन्यातला, निदान माझा तरी ! Wink

कठीण आहे Sad

रोहीत शर्मा आणिक दिनेश कार्तिक कडन अपेक्षा आहेत थोड्याफार. पुढे रायडू आहेच Happy

चेन्नई ला सवय आहे सोप्पी मॅच अवघड करुन जिंकायची...... शेवटच्या ओव्हर मधे जिंकतील ....धोनी फोर सिक्स मारुन विजय मिळवुन देणार

इतकं नाट्य ठांसून भरलेलं ! एकाच षटकांत हसीचे एकाच ठीकाणी तीन झेल सुटतात व तेही पोलार्ड कडून !! पुढच्या षटकात जॉन्सनचे दोन बळी !! पोलार्डने रैनाचा घेतलेला अफलातून झेल !! टेरिफिक !!

ही मॅच म्हणजे एका समांतर जगातली वाटत आहे..
पोलार्ड कॅच सोडत आहे...हरभजन विकेट घेत आहे..ब्राव्हो टिकुन राहत नाही... ?

८ बाद.

पचले नाही............चेन्नई अश्या रितीने हारेल...... काल दिल्ली ८० वर ऑल आउट झाले कळले पण चेन्नई ९ व्या नंबर पर्यंत फलंदाजी असलेली ७९ मधे ऑलआउट ...:अओ:
.
.

मला परवाचा राजस्थानचा (कोलकत्त्याविरुद्धचा) पराभव, कालचा दिल्लीचा पराभव आणि आजचा चेन्नईचा पराभव यातले काहीच पचले नाही.... असो.... Cricket is a game of glorious uncertanites का काय म्हणतात ते असेल हे!

csk harali ki fix
fix tar cskchya sagalyach match ahet ......
Yekhadi harayachi baki tar fixach ahe na

world bhangar dhoni, csk, n shrinivasan...

मला परवाचा राजस्थानचा (कोलकत्त्याविरुद्धचा) पराभव, कालचा दिल्लीचा पराभव आणि आजचा चेन्नईचा पराभव यातले काहीच पचले नाही.
???? .
.
कोलकत्याची क्षमता होती त्या धावांमधे रोखण्याची .... गेल्या आयपीएल मधे १६ पैकी १२ सामन्यांमधे त्यानी प्रतिस्पर्धी संघाला १५० च्या आतच रोखलेले...
दिल्लीचा यावेळी फार्माच नाही आहे......भारतात आधी पासुन असलेला वॉर्नर कसोटी सामने मधे पण चालला नाही..सेहवाग चा आनंदी आनंदच असतो नेहमी आणि जयवर्धने सुध्दा फार्मात नाही आहे त्या मुळे त्यांना विजय मिळवता आला नाही...
राहीली बात आजच्या मॅच ची ..... ही अत्यंत स्लो विकेट होती अश्या विकेट वर खेळायचा अनुभव चेन्नई ला चांगलाच आहे शिवाय ९ क्रमांका पर्यंत असलेली फलंदाजी होती ...ब्राव्हो अचानक वर येतोय २ फोर मारुन अचानक कसा आउट झाला ???????????????

१) मुरली विजयः- कोणत्याही सामन्यात खेळला नाही त्याच्या जागी आलेल्या वृध्दीमान ने चांगल्या धावा केलेल्या मग आज याला का घेतले ?
२) हसी :- अगदी पहिल्या चेंडु पासुन आउट होण्याच्या मागे होता एक ही फटका बरोबर जात नव्हता सगळेच
खेळाडुंकडे ??????????
३) रैना : हा मात्र दुर्दैवी ठरला ..जॉन्सन चा अप्रतिम बॉल समजलाच नाही त्याला
४) बद्रिनाथ : जसा कोलकत्याकडे कॅलिस आहे अश्या खेळपट्टीवर तसाच बद्रिनाथ चेन्नई कडे आहे त्याने सुध्दा बेजवाबदार फटका मारला ?
५) अश्विन : धोनी आणि जाडेजा असताना अश्विन काय दिवे लावणार होता त्यांच्या आधी जाउन ? त्याने जास्त बॉल खेळले असते आणि धावा कमी केल्या असत्या तर प्रेशर हे जास्त होणार होते...अश्या संथ खेळपट्टीवर हे परवडणारे असते का ??
६) धोनी : संथ खेळपट्टी आहे हे माहीती असुन सुध्दा ओझाला उंचावरुन मारण्याच्या नादात आउट ? एकेरी आणि दुहेरी धाव घेउन किमान आधी १०० रन्स पुर्ण करुन मग हाणामारी करायची होती...
७) जाडेजा: काय बोलावे हेच कळत नाही

१) मुरली विजयः- कोणत्याही सामन्यात खेळला नाही त्याच्या जागी आलेल्या वृध्दीमान ने चांगल्या धावा केलेल्या मग आज याला का घेतले ?
२) हसी :- अगदी पहिल्या चेंडु पासुन आउट होण्याच्या मागे होता एक ही फटका बरोबर जात नव्हता सगळेच
खेळाडुंकडे ??????????
३) रैना : हा मात्र दुर्दैवी ठरला ..जॉन्सन चा अप्रतिम बॉल समजलाच नाही त्याला
४) बद्रिनाथ : जसा कोलकत्याकडे कॅलिस आहे अश्या खेळपट्टीवर तसाच बद्रिनाथ चेन्नई कडे आहे त्याने सुध्दा बेजवाबदार फटका मारला ?
५) अश्विन : धोनी आणि जाडेजा असताना अश्विन काय दिवे लावणार होता त्यांच्या आधी जाउन ? त्याने जास्त बॉल खेळले असते आणि धावा कमी केल्या असत्या तर प्रेशर हे जास्त होणार होते...अश्या संथ खेळपट्टीवर हे परवडणारे असते का ??
६) धोनी : संथ खेळपट्टी आहे हे माहीती असुन सुध्दा ओझाला उंचावरुन मारण्याच्या नादात आउट ? एकेरी आणि दुहेरी धाव घेउन किमान आधी १०० रन्स पुर्ण करुन मग हाणामारी करायची होती...
७) जाडेजा: काय बोलावे हेच कळत नाहीी>>>
agadi asach dusarya team csk viruddha khelatana hot....yevathach kay yanchya match baki nasatil tari dusarya team harun yanna top 4 madhe jaga detat.....world bhangar csk....

'फिक्सड' म्हणावं तर पोलार्डकडून हसीचे तीन झेल कां सुटावेत ? ' या विकेटवर चेंडूला 'बाऊन्स' असला तरी तो संथ आहे व फटके मारायला कठीण आहे ' हें जें चेन्नईचा डाव सुरूं होण्यापूर्वीं गावसकर मुंबईच्या संथ फलंदाजीबद्दल म्हणाला त्यांत तथ्य असावं; ' चेन्नईने सुद्धां 'बाऊन्सचा' अंदाज येईपर्यंत काळजीपूर्वक खेळलं पाहिजे ', असा सल्लाही त्याने दिला होता ! हसी व रैनाने तरी तो पाळला नसावा !
[ आज पोलार्ड नाकाला चेंडू लागल्याने उपचारासाठी आंत गेला व बदली क्षेत्ररक्षक म्हणून पाँटींग आला तेंव्हां जरा गंमतच वाटली.]

>>गेल्या आयपीएल मधे १६ पैकी १२ सामन्यांमधे
मला वाटते की अशी दोन हंगामातली तुलना करणे योग्य नाही.... खेळाडूंच्या फॉर्मपासून संघाच्या मॉमेंटमपर्यंत सगळेच बदललेले असते

वृद्धीमान मला वाटतय की आज इंज्युअर्ड होता अन्यथा तोच खेळला असता

'फिक्सड' म्हणावं तर पोलार्डकडून हसीचे तीन झेल कां सुटावेत ? >>>>> हेच कळत नाही Uhoh बहुदा आधी मुंबई कडे नव्हती नंतर मेसेज आला मग एकदम झकास झेल पकडला रैनाचा Biggrin

<< हेच कळत नाही >> आत्तां आमच्या वाण्याकडचा माल देणारा पोरगा म्हणाला, "सचिनने लिंबू फिरवलं !" Wink

Pages